agriculture story in marathi, dairy farming, savleshawar, solapur, | Agrowon

झोपडीत राहणाऱ्या बापूसाहेबांचे दररोज १३ हजार लिटर दूधसंकलन ! दुधाचा 'पाझर ब्रॅण्ड, दही, तुपाचीही विक्री
सुदर्शन सुतार
शनिवार, 1 जून 2019


आजही राहतात झोपडीत 
बापूसाहेबांनी स्वतःच्या हिंमतीवर झपाट्याने प्रगती केली. आज त्यांच्या व्यवसायातील वार्षिक उलाढाल लाखांच्या घरात पोचली आहे. चारचाकी गाडी, घर या बाबी ते सहज साध्य करू शकले असते. पण सुमारे सात वर्षे त्यांनी खुषी-आरामाच्या अनेक बाबींचा त्याग करून उद्योगवृद्धीकडेच लक्ष दिले. आजही आई व पत्नी यांच्यासह शेतातील झोपडीतच त्यांचे वास्तव्य असते. त्यात ते समाधानीदेखील आहेत. 

कोठेही अनाठायी वेळ घालवणे नाही, पूर्ण लक्ष देऊन व्यवसायाचा विस्तार करण्याचे प्रयत्न, अविरत मेहनत, जिद्द व निश्‍चय. याच गुणांच्या जोरावर सावळेश्‍वर (जि. सोलापूर) येथील बापूसाहेब तरटे यांनी शेतातच सुमारे ५० लाख रुपयांच्या गुंतवण्कीतून प्रति दिन १० ते १३ हजार लिटर दूध संकलन असलेला व्यवसाय भरभराटीस आणला आहे. ‘पाझर' या ब्रॅण्डखाली दूधविक्री होते. आजही शेतातील झोपडीतच त्यांनी आपले वास्तव्य ठेवले आहे. 
 
सोलापूर- पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यात सावळेश्‍वर टोलनाक्‍याच्या डाव्या बाजूला अर्धा किलोमीटरवर बापूसाहेब तरटे यांची ११ एकर शेती आहे. त्यात ऊस आणि चारा अशी पिके आहेत. त्यांचे वडील केरबा शेती पाहातच पूर्वी दुग्धव्यवसाय करीत. स्वतःकडील गायींच्या दुधाबरोबर गावातील अन्य शेतकऱ्यांकडील दूध घेऊन ते विक्री करीत. त्यासाठी सोलापूरला तब्बल २२ किलोमीटरची रोजची सायकलवरील पायपीट करीत. तब्बल २० वर्षे हा व्यवसाय केला. बापूसाहेब हे त्यांचे एकुलते एक चिरंजीव. त्यांनाही या व्यवसायात गोडी लागली. पण घरच्यांनी आधी शिकून नोकरी कर असाच सल्ला दिला. पण बापूसाहेबांचे मन काही शाळेत रमेना. अखेर नववी इयत्तेनंतर शाळा सोडून त्यांनी हा व्यवसाय पत्करला. 

खडतर वाट 
बापूसाहेबांनी दोन वर्षे दूध घातले खरे. पण स्वप्न मोठे होते. दूध संकलन करून शीतकरण केंद्र, पॅकिंग आणि प्रक्रिया उद्योग त्यांना उभारायचा होता. बोलण्यासाठी या गोष्टी सोप्या होत्या, पण वाट खडतर होती. हाती रुपयाही नव्हता. पण इच्छाशक्ती आणि कष्टाची तयारी होती. त्याच बळावर स्वतःकडील कमाई व मित्रमंडळीकडील उसनवारीच्या आधारे २०१५ मध्ये प्रत्यक्ष सुरवात केली. सुमारे ५० ते ६० लाख रुपयांची गुंतवणूक होती. त्यासाठी बॅंकेचे दरवाजे ठोठावले. पण पदरी निराशाच पडली. पण धडपड पाहून काही मित्र, तसेच हाॅटेल व्यावसायिकांनी मदत केली. पैसे येतील तशी एकेक मशिनरी घेण्यास सुरवात केली. 

दुधाचा 'पाझर' ब्रॅण्ड 
मध्यंतरीच्या काळापर्यंत गायींची संख्या ५० पर्यंत होती. पण अलीकडील सततची दुष्काळी परिस्थिती व अर्थकारण पाहाता ही संख्या घटली आहे. सध्या १५ ते १६ गायी, सात म्हशी अशी सुमारे २२ जनावरे गोठ्यात आहेत. 

जिद्दीने तयार केला ब्रॅंड 
दुग्धव्यवसाय जिकिरीचा आहे. यात नुकसानीची झळ मोठी बसू शकते याची जाणीव होतीच. पण ध्येयाने पछाडलेल्या बापूसाहेबांना त्याची फिकिर नव्हती. अनेकांनी त्यांना वेड्यात काढले. पण लोक काय म्हणतील याचा विचार न करता २०१६ मध्ये शेतातच ५० बाय ५० फूट आकाराचे पत्र्याचा सुसज्ज शेड उभारले. होमोनाईज्ड आणि पाश्‍चराईज्ड मिल्क पिशव्यांमधून विकण्यासाठी आवश्‍यक यंत्रणा उभारली. या संपूर्ण व्यवसायात ब्रॅण्डला महत्त्व आहे हे ओळखले. त्यासाठी 'पाझर' हे ब्रॅण्डनेम निश्‍चित केले. त्या व्यतिरिक्त खुल्या स्वरूपातही दूध, दही, तूप यांची विक्री सुरू केली. प्रत्येक अडचणीवर त्याच हिंमतीने मात केली. गुणवत्ता, सातत्य टिकवल्यामुळेच व्यवसायात स्थिरता व नाव मिळवले. 

सध्याचा दुग्धव्यवसाय 

  • वळेश्‍वर व परिसरातील अर्जुनसोंड, पोफळी, मुंढेवाडी, विरवडे, बीबीदारफळ, पाकणी या सात गावांतून सध्या दूध संकलन. 
  • सुमारे सातशे शेतकऱ्यांचे त्यासाठी नेटवर्क. 
  • हंगामात प्रतिदिन १३ हजार लिटर तर वार्षिक सरासरी ९ हजार लिटरपर्यंत. सध्या दुष्काळामुळे घट. 
  • पाच छोट्या गाड्या. त्या संंबंधित गावांत फिरून थेट बांधावरून संकलन करतात. 
  • साडेतीन ते साडेआठ एसएनएफ असलेल्या दुधाला २५ रुपये प्रतिलिटर दर दिला जातो. अनेक शेतकऱ्यांची बॅंक खाती नोंदवली आहेत. दर महिन्याच्या पाच, १५ आणि २५ तारखेला असे प्रत्येक दहा दिवसांनी पेमेंट शेतकऱ्यांना बॅंक खात्यात किंवा रोख स्वरूपात दिले जाते. 
  • पॅकिंगमधील दुधाचा प्रतिलिटर ३४ रुपये, दही ४० रुपये प्रतिलिटर तर तुपाचा साडे ५०० रुपये प्रतिकिलो दर. 
  • मशिनरींची हाताळणी, शीतकरण, दूध संकलन, पॅकिंग, वाहनचालक आदी स्वरूपात परिसरातील ११ तरुणांना रोजगार. 
  • कष्टाची तयारी आणि प्रामाणिकपणा या दोन मुख्य अटी नोकरीसाठी पाहिल्या जातात. त्यांना कामाच्या स्वरूपानुसार दोन आकडी पगार. 
  • पाण्याची बऱ्यापैकी उपलब्धता असल्याने दुग्धव्यवसाय सांभाळून ऊस व चारा पिके घेतली जातात. 
  • उसाचे एकरी ४५ ते ५० टन उत्पादन घेतले जाते. 

संपर्क- बापूसाहेब तरटे-९८२२४६८८३४

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
प्रतिकूलतेतून मेघाताईंची शेतीत भरारीपरभणी जिल्ह्यातील झरी (ता. परभणी) येथील...
सोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक सोलापुरात हिरव्या मिरचीचा बाजार कडक ! गेल्या...
कुक्कुटपालनातून मिळाली स्वयंपूर्णतापरिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वळके...
शेतमाल प्रक्रिया उद्योगातून मिळाला...नांदेड जिल्ह्यातील बहाद्दरपुरा (ता. कंधार) येथील...
बुके, हारांसह फूल ‘डेकोरेशन’ झाला सक्षम...नाशिक जिल्ह्याने फूल सजावटीच्या व्यवसायातही आघाडी...
निर्यातक्षम गुणवत्तेच्या पेरूचे उत्पादनसातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील कृषिभूषण मनोहर...
तीर्थपुरी गावाची होतेय मोसंबी पिकात ओळखतीर्थपुरी (ता. घनसावंगी, जि. जालना) भागातील...
प्रयोगशील, प्रगतिशील शेतीतील ‘एकता’मळद (जि. पुणे) येथील एकता शेतकरी गटाने सेंद्रिय...
दुष्काळातही दुग्ध व्यवसाय टिकवण्याची...अलीकडील वर्षांत कायम दुष्काळी स्थिती अनुभवणाऱ्या...
गटशेतीतून मिळाली कृषी विकासाला चालनाविरगाव (ता. अकोले, जि. नगर) येथील २० शेतकऱ्यांनी...
'सीआरए’ तंत्राने तगली दुष्काळातही...प्रतिकूल हवामानावर मात करणारे सीआरए (क्लायमेट...
शेती, आरोग्य विकास अन् पर्यावरण...नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी लोकांचे आरोग्य आणि...
प्रक्रियेतून साधली आर्थिक प्रगतीछोटीशी सुरवात आर्थिक परिवर्तनाचे निमित्त ठरते,...
नाचणी, वरईची सुधारित तंत्राने शेती अतिशय दुर्गम, आदिवासी अशा कोरतड (जि. पालघर) येथील...
गाजर उत्पादन, बियाणे निर्मितीत तयार...बाजारपेठेतील मागणी लक्षात घेत गेल्या पाच...
बहुवार्षिक चारापिकांचा कृषी...परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
जळगावच्या बाजारात फुलांना बारमाही उठाव...जळगावचा फूलबाजार पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. विविध...
अकोली गावाने रेशीम व्यवसायातून गुुंफले...यवतमाळ जिल्ह्यात उमरखेड तालुक्‍यातील अकोली हे...
अधिक क्षारयुक्त जमिनीत प्रयोगशील शेती,...क्षारांचे प्रमाण जास्त असलेल्या शेतात विविध...
नैसर्गिक शेतमालाला जागेवरच तयार केले...लोहारा (जि. लातूर) येथील शाम चंदरराव सोनटक्के...