agriculture story in marathi, Dandale family have achieved sustanity in Ginger farming by adoption of good farming practices. | Agrowon

आले पिकाने दिली आर्थिक सक्षमता 

गोपाल हागे
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व कुसुमबाई या दंदाले दांपत्याने आले पिकाच्या शेतीत सातत्य टिकवले आहे. दरवर्षी सुमारे एक ते दीड एकरातील हे पीक एकरी १४० ते १५० क्विंटलपर्यंत उत्पादन त्यांना देऊन जाते. बांधावरच व्यापारी खरेदी करीत असल्याने विक्रीचा प्रश्‍न सोडवला आहे. मजूरटंचाईची समस्या लक्षात घेता कपाशीपेक्षा याच पिकाने आर्थिक सक्षमता दिल्याचे दंदाले सांगतात.
  

बुलडाणा जिल्ह्यात खल्याळ गव्हाण येथील दिनकर व कुसुमबाई या दंदाले दांपत्याने आले पिकाच्या शेतीत सातत्य टिकवले आहे. दरवर्षी सुमारे एक ते दीड एकरातील हे पीक एकरी १४० ते १५० क्विंटलपर्यंत उत्पादन त्यांना देऊन जाते. बांधावरच व्यापारी खरेदी करीत असल्याने विक्रीचा प्रश्‍न सोडवला आहे. मजूरटंचाईची समस्या लक्षात घेता कपाशीपेक्षा याच पिकाने आर्थिक सक्षमता दिल्याचे दंदाले सांगतात.
  
बुलडाणा जिल्ह्यात देऊळगावराजा तालुका मुख्यालयापासून १८ किलोमीटरवर खल्याळ गव्हाण गाव आहे. साधारणतः दोन हजार लोकवस्तीचे हे गाव खडकपूर्णा प्रकल्पामुळे पुनर्वसित झाले आहे. या प्रकल्पामुळे बरेच शेतकरी भूमिहीन तर अनेकजण अत्यल्पभूधारक झाले. गावातील दिनकरराव दंदाले हे सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षक आहेत. खडकपूर्णा प्रकल्पात त्यांची जमीन गेल्यानंतर २००१-०२ मध्ये १.२३ हेक्टर जमीन विकत घेत पत्नी सौ. कुसुमबाई यांच्या नावे केली. कुसुमबाईंनाही शेतीची आवड असल्याने नवे काही करून दाखविण्याची जिद्द बाळगत त्यांनी पारंपरिक पिकांतून भरघोस उत्पादन घेतले. 

कुटुंब वळले आले पिकाच्या शेतीकडे 
साधारण २०१४-१५ च्या दरम्यान हे कुटुंब आले पिकाच्या लागवडीकडे वळाले. यापूर्वी कपाशी हे त्यांचे मुख्य पीक होते. मात्र या पिकात मजूरटंचाईची मोठी समस्या होती. 
गावातील शेतकरी आले पिकाकडे वळत होते. दंदले यांनीही या पिकाचा अभ्यास करून त्यात उतरावयाचे ठरवले. सुरवातीला ७० हजार रुपयांचे सात क्विंटल बेणे विकत आणले. पहिले आश्‍वासक उत्पादक मिळाले. उत्पन्नही चांगले मिळू लागले. मग या पिकातील रुची वाढत गेली. 

लागवडीत सातत्य 
गेल्या सहा वर्षांपासून दंदले यांनी आले लागवडीत खंड पडू दिलेला नाही. दरवर्षी सुमारे एक ते दीड एकरात आल्याची लागवड असते. या सहा वर्षात दरात चढ-उतार झाले. परंतु नुकसान फारसे झेलावे लागलेले नाही. सातत्यामुळे काही वेळा वाढीव दराचही फायदा झाला आहे. आले शेतीत दंदाले दांपत्याचा मुलगा दीपक कृषी पदवीधर आहे. साहजिकच त्यांच्या तांत्रिक ज्ञानाचा मोठा फायदा होतो. दीपक हे कृषी सहायक असून त्यांचे नोकरीचे ठिकाण १८ किलोमीटरवर आहे. सुटीच्या दिवशी तेही घरच्या शेतीचे व्यवस्थापन सांभाळतात. यावर्षी त्यांनी व्यापाऱ्यांना जागेवरच ८६०० रुपये प्रतिक्विंटल दराने व्यवहार केला आहे. ०.६० हेक्टर क्षेत्रात किमान २०० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा आहे. सध्या ही काढणी सुरू झाली आहे. यावर्षी लागवड क्षेत्रात वाढ केली आहे. 

आले शेती व्यवस्थापन- ठळक बाबी 

 • लावणीपासून ते काढणीपर्यंत प्रत्येक स्तरावर तंत्रशुद्ध व्यवस्थापन. 
 • वाण- माहीम. 
 • आल्याची काढणी केल्यानंतर बियाण्यासाठी चांगल्या दर्जाचे आले व्यवस्थित निवडतात. 
 • लागवडीपूर्वी संयुक्त बुरशीनाशकाची बेणेप्रक्रिया. 
 • गादीवाफ्याचा (बेड) वापर. बेडवर डवऱ्याच्या साह्याने दोन चर पाडून त्यामध्ये चरात प्रत्येक २० सेंटिमीटरवर ३० ते ३५ ग्रॅम वजनाचे कंद लावले जातात. 
 • जूनच्या पहिल्या पंधरवड्यात लागवडीची वेळ साधतात. 
 • लागवडीपूर्वी दरवर्षी एकरी सहा ते सात ट्रॉली शेणखताचा वापर. घरची सुमारे ८-९ जनावरे. 
 • त्यामुळे खत पुरेसे उपलब्ध होते. 
 • उगवण होण्यापूर्वी तणनाशकाचा वापर. 
 • एकरी ७५ किलो डीएपी खताची मात्रा देऊन मातीची भर. 
 • लागवडीनंतर दोन महिन्यांनी खताचा दुसरा डोस. या वेळी अमोनियम सल्फेट अधिक सिंगल सुपर फॉस्फेट अधिक पोटॅशचा वापर. 
 • तिसरा डोस पीक चार महिन्यांचे झाल्यानंतर. १२ः३२ः१६ एकरी दोन बॅग आणि चौथा डोस सहा महिन्यांनी १०ः२६ः२६ एकरी ३ बॅग. 
 • गरजेनुसार विद्राव्य खते. उदा. १९ः१९ः१९, १२ः६१ः०. कंदाची फुगवण होण्यासाठी ०ः५२ः३४ आणि गुणवत्ता वाढीसाठी ०ः०ः५०. 
 • अझोस्पिरीलम, स्फुरद विरघळवणारे जीवाणू यांचा वापर. 
 • कंदकुज टाळण्यासाठी प्रतिबंधकात्मक ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाचे ड्रेंचिंग. तसेच कॉपर ऑक्सी क्लोराईड बुरशीनाशकाचाही पर्याय. 

मार्केटचा अभ्यास करून काढणी 
आले पिकाचे मार्केट सातत्याने बदलत असते. वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये असलेल्या दरांचा अंदाज घेऊन दंदाले आल्याची काढणी करण्याचे नियोजन करतात. दीपक दंदाले म्हणाले की, गावात सुमारे १०० आले उत्पादक असतील. साहजिकच क्षेत्र वाढल्याने व्यापाऱ्यांना एकाच ठिकाणी अधिक माल उपलब्ध होतो. त्यामुळे जागेवर येऊन खरेदी करण्याला ते पसंती देतात. काढणी करणे, आले धुणे, स्वच्छ करणे आदी कामे त्यांच्याकडे असतात. हा खर्च व त्यातील श्रमांमध्ये बचत होते. केवळ काढणी केलेल्या मालाचे वजन करणे व पैसे घेणे एवढे काम सोपे होऊन जाते. 

आल्यातून प्रगती 
दीपक म्हणाले की, दरवर्षी आल्याचे एकरी १४० ते १५० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. यंदा क्विंटलला ८६०० रुपये दराने विक्री केली. यापूर्वी ५९००, ४००० ते २५०० रुपये अशा दरानेही विक्री केली आहे. अर्थात हा दर बांधावर मिळतो. एकरी खर्च वजा जाता सुमारे दोन ते अडीच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न हे पीक देऊन जाते. या पिकाच्या भरवशावर प्रगती साधता आली. 
दीपक यांनी नवीन कार कर्जाऊ घेतली. मात्र पुढील वर्षीच आले पिकातील उत्पन्नातून कार कर्जमुक्त केली. गेल्या हंगामात आलेल्या उत्पन्नातून साडेपाच लाख रुपये खर्च करून विहीर खोदली. शेतात एक लाख रुपये खर्च करीत गाळ टाकला. देऊळगावराजा शहरात चार खोल्यांचे घर घेणे शक्य झाले आहे. 

संपर्क- दीपक दंदाले- ७५८८६८९१८८, ८८०५९००५६४  


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
निर्यात न करणाऱ्या कारखान्यांच्या साखर...कोल्हापूर : देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ६८...मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री...
राज्यात उन्हाचा चटका कायम पुणे : राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत....
‘पीएम-किसान’ योजनेत शेतकऱ्यांना ५१ हजार...नवी दिल्ली: केंद्र सरकारने गेल्या वर्षी पंतप्रधान...
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांचा गदारोळ मुंबई: शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने एकही आश्वासन...
खारपाणपट्ट्यात पिकले गोड अॅपेल बोरअंधेरा कितना भी घना क्यू ना हो, दिया जलाना कहाँ...
कृषी शिक्षणाचा खर्चही आता लाखाबाहेर पुणे : राज्यातील खासगी कृषी शिक्षण संस्थांच्या...
निवृत्त जवानाचा अनुकरणीय शेळी-...सुर्डी (जि. सोलापूर) येथी हिरोजीराव शेळके यांना...
कर्जमाफीची पहिली यादी आज होणार जाहीर :...मुंबई : आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर...
राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र...मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत...
कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची...मुंबई : आजपासून (ता. २४) सुरू होणारे अर्थसंकल्पी...
अकरा लाख टन रिफाइंड पामतेल आयातीला...नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड पामतेलाची...
कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू...नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी...
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाजपुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व...
‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढपुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन...
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...