agriculture story in marathi, Datir family from Nagar district has succeed in carrot farmig. | Agrowon

गाजराने दिले उत्पन्नासह चाराही

शांताराम काळे
गुरुवार, 15 एप्रिल 2021

गणोरे येथील अल्पभूधारक शेतकरी तुकाराम दातीर यांनी १० ते २० गुंठ्यांत गाजराची शेती फुलवली आहे. यंदा त्यांनी १० गुंठ्यांत २५ हजार रुपयांचे उत्पन्न व त्याचबरोबर जनावरांसाठी उन्हाळ्यात चारा असा दुहेरी फायदा मिळवला आहे.

नगर जिल्ह्यात अकोल तालुक्यातील गणोरे येथील अल्पभूधारक शेतकरी तुकाराम दातीर यांनी १० ते २० गुंठ्यांत गाजराची शेती फुलवली आहे. यंदा त्यांनी नोव्हेंबरमध्ये घेतलेल्या प्रयोगातून १० गुंठ्यांत २५ हजार रुपयांचे उत्पन्न व त्याचबरोबर जनावरांसाठी उन्हाळ्यात चारा असा दुहेरी फायदा मिळवला आहे.

नगर जिल्ह्यातील अकोले तालुका हा दुर्गम आणि निसर्गाची विहंगम रूपे लाभलेला तालुका आहे. एका टोकाला दोन ते तीन हजार मिलिमीटरपेक्षा जास्त, तर दुसऱ्या टोकाला ५०० मिलिमीटरपर्यंत पाऊस पडतो अशी परिस्थिती आहे. शेतीच्या विविध पद्धती तालुक्यात पाहण्यास मिळतात. एकीकडे भात पिकवणारा तालुका ही ओळख असली, तरी दुसऱ्या बाजूला बाजरीसारख्या कोरडवाहू पिकांमधून तालुक्‍याने ओळख जपली आहे. पारंपरिक पीक पद्धती, लहरी हवामान व पर्जन्यमान यामुळे अनेक वेळा नव्या प्रयोगांवर मर्यादा येतात. परंतु प्रतिकूल परिस्थितीतही काही पिकांमध्ये वा प्रयोगांमध्ये सातत्य ठेवणारे शेतकरीही पाहण्यास मिळतात.

गाजराची शेती
तालुक्यातील गणोरे येथील तुकाराम दातीर यांची सुमारे ७५ गुंठे शेती आहे.बागायती- कोरडवाहू शेती हाच त्यांचा जीवन चरितार्थ चालवण्याचा आधार आहे. अर्धांगिनी
अलकादेखील पतीच्या खांद्याला खांदा लावून शेतीत कार्यरत आहेत. ऊस मका, चारा आदी पिके ते घेतात. परिसरातील गावांमध्ये देशी गाजराची शेती अनेक वर्षांपासून केली जाते. साहजिकच तुकारामदेखील दरवर्षी खरिपात सुमारे १० ते २० गुंठ्यांत देशी गाजराची शेती करतात. सन १९९० पासून त्यांना या शेतीचा अनुभव आहे. गाजराबरोबर त्याच्या पाल्यापासून दुधाळ जनावरांना मिळणारा चारा हा दुहेरी फायदा त्यांना होतो. सुमारे १० गुंठ्यांत १० क्विंटलपर्यंत उत्पादन त्यांना मिळते. खर्च वजा जाता त्यांना २० हजार रुपये नफा त्यातून उरतो.

यंदाचा नोव्हेंबरमधील प्रयोग
यंदाच्या वर्षी तुकाराम यांनी नोव्हेंबरच्या हंगामात गाजर घेण्याचा प्रयोग केला. त्यासाठी देखील १० गुंठे क्षेत्र निवडले. अहमदाबाद येथील वाण त्यांना प्रयोगासाठी मिळाले. गाजर तसे तुलनेने कमी खर्चात व कमी भांडवलात येणारे पीक आहे. तुकाराम यांनी तयार केलेल्या शेतात घरचेच दोन ट्रॉली शेणखत पसरवून दिले. सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीनंतर पीक काढणीस तयार झाले. त्यातून त्यांना १० क्विंटल उत्पादन व २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. थेट विक्री करून किलोला ३० ते ४० रुपये दर त्यांना मिळाला आहे.

चाऱ्याचा मोठा फायदा
शेतीला पूरक दुग्ध व्यवसाय असल्याने त्यासाठी लागणारा चारा तुकाराम गाजर पिकातून मिळवतात. चारा अत्यंत पौष्टिक असून त्यामधून मिळणारे जीवनसत्त्व व खनिजे दूध उत्पादनात वाढ घडवून आणतात असा त्यांचा अनुभव आहे. गाजर हे जमिनीखाली वाढणारे पीक असल्याने जमीन भुसभुशीत व भरपूर सेंद्रिय पदार्थ युक्त असली पाहिजे. त्याप्रमाणे यंदाच्या प्रयोगातही काळजी घेतली. गाजराची लांबी सुमारे एक फुटापर्यंत झाली होती. चवीला अत्यंत गोड असलेले हे गाजर आकाराने मोठे असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर मागणी होती. तुकाराम यांनी केलेल्या प्रयोगाला परिसरातील शेतकऱ्यांनाही भेट दिली आहे. तुकाराम सांगतात, की काढणीनंतर पुढे एक महिनाभर तरी दोन गायींना पुरेल इतका चारा देणे उन्हाळ्यात शक्य झाले आहे.

पारंपरिक पिकांमधून म्हणावे तसे उत्पन्न येत नाही. गाजरासारख्या कमी श्रमाच्या व शाश्‍वत उत्पन्न देणाऱ्या पिकाची निवड त्यासाठी केली. शेतीतून आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्याबरोबरच मुलांना चांगले शिक्षण दिले. पक्के घर आणि जनावरांसाठी गोठा बांधू शकलो याचे समाधान आहे.
- तुकाराम दातीर, 
संपर्क- ८८८८९४००२०


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
फळबागेतून शेती झाली फायद्याची..उरळ बुद्रुक (जि.अकोला ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वलनगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी...