agriculture story in marathi, Dattatray Dhikle a farmer scientist from Kasbe Sukene, Dist. Nasik has developed Jeevamrut or Cow Dung Slurry filter. | Agrowon

संशोधक शेतकऱ्याने बनविला जीवामृत फिल्टर, ट्रॅक्टरचलित ब्लोअरचीही निर्मिती 

मंदार मुंडले
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

शेतकऱ्यात दडलेला संशोधक
ढिकले यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यात संशोधक दडलेला आहे. स्वतः शेतकरी असल्याने शेतीतील दैनंदिन अडचणी त्यांना ज्ञात आहेत. अनेक समस्यांचा त्यांना दररोज सामना करावा लागतो. 
आपल्यातील सर्जनशील व कल्पक बुध्दीचा वापर करून शेतीतील समस्या दूर करणारे गरजेनुरूप तंत्रज्ञान विकसित करण्याची त्यांची धडपड सुरू असते. घराजवळच त्यांचे छोटे वर्कशॉप आहे. 

नाशिक जिल्ह्यातील पिंपरी सय्यद येथील प्रयोगशील तसेच संशोधक शेतकरी दत्तात्रय ढिकले यांनी कुशल बुध्दी व सर्जनशीलता यांचा वापर करून शेतीला जीवामृत देण्यासाठी आधुनिक फिल्टर तयार केला आहे. शेतीतील श्रम, मजूरबळ, पैसे व वेळ यांची मोठी बचत त्यातून ढिकले यांनी साध्य केली आहे. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतीत येणाऱ्या अडचणी व गरजा लक्षात घेऊन त्यांनी फिल्टरबरोबरच फवारणी पंप व डिझेलच्या खर्चात बचत करणाऱ्या फवारणी गनचीही निर्मिती करून व्यावहारिकदृष्ट्या उपयोगी संशोधनाला चालना दिली आहे. 

नाशिक जिल्हा म्हणजे ‘कृषी पंढरी’ म्हणूनच ओळखली जाते. इथल्या शेतकऱ्यांनी आपल्यातील 
प्रयोगशीलतेचा वेळोवेळी प्रत्यय देत जागतिक बाजारपेठेत आपले नाव कमावले आहे. जिल्ह्यातील पिंपरी सय्यद हे प्रगतिशील द्राक्ष बागायतदारांचे गाव म्हणून प्रसिध्द आहे. येथील दत्तात्रय ढिकले हे देखील प्रयोगशील द्राक्ष बागायतदार आहेत. त्यांची साडेचार एकर शेती आहे. द्राक्ष हेच मुख्य पीक आहे. एकरी १६ टनांपर्यंत ते उत्पादन घेतात. 

प्रत्यक्ष पहा दत्तात्रय ढिकले यांचा जीवामृत फिल्टर.. Video

शेतकऱ्यात दडलेला संशोधक
ढिकले यांचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यात संशोधक दडलेला आहे. स्वतः शेतकरी असल्याने शेतीतील दैनंदिन अडचणी त्यांना ज्ञात आहेत. अनेक समस्यांचा त्यांना दररोज सामना करावा लागतो. 
आपल्यातील सर्जनशील व कल्पक बुध्दीचा वापर करून शेतीतील समस्या दूर करणारे गरजेनुरूप तंत्रज्ञान विकसित करण्याची त्यांची धडपड सुरू असते. घराजवळच त्यांचे छोटे वर्कशॉप आहे. 

स्वगरजेतून तंत्रनिर्मिती
पुरेसे व वेळेवर मजूरबळ उपलब्ध न होणे ही शेतकऱ्यांची आजची गंभीर समस्या आहे. त्यादृष्टीने त्यांचे श्रम, वेळ, पैसे व मजूरबळ यांच्यात बचत होऊन त्यांचा भार कमी व्हावा हे उद्दिष्ट ठेऊन ढिकले यांनी जीवामृत फिल्टरची निर्मिती केली आहे. त्याबाबत ते म्हणाले, की रासायनिक अवशेषमुक्त किंवा सेंद्रिय पध्दतीने मी शेती करतो. त्यामध्ये जीवामृत किंवा शेणस्लरीचा वापर होतो. बागेला पारंपरिक पध्दतीने जीवामृत देणे अत्यंत वेळखाऊ, मजूरप्रधान व खर्चिक काम आहे. यावर उपाय म्हणून स्वतःच्या गरजेसाठी टॅंक व त्याद्वारे जीवामृत फिल्टर करून देणाऱ्या तंत्राची निर्मिती केली. त्याच्या वापरातून काम सुकर होऊ झाले. हा प्रयोग पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी शेताला भेटी देऊ लागले. त्यांनीही अशा प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची मागणी केली. मग त्यांच्या गरजा, अडचणी, सध्याच्या फिल्टरमधील त्रुटी यांचा अभ्यास करून सुधारणा करीत दीपज्योती नावाने आधुनिक फिल्टर उपलब्ध केला आहे. 

दीपज्योती फिल्टरची वैशिष्ट्ये 

 • टॅंकनिर्मितीसाठी एलएलईडीपी या अधिक काळ टिकणाऱ्या व १० मिमी जाडीच्या कठीण प्लॅस्टिकचा वापर. 
 • ट्रीपल कोटेड लेअर या टॅंकची आर्युमर्यादा १२ ते १५ वर्षे.
 • यंत्राचे आकर्षक डिझाईन.
 • टॅंक ठेवण्यासाठी विशिष्ट ॲगलमध्ये ट्रॉली व त्याला व्हील्स (चाके). त्याआधारे फिल्टरची एका ठिकाणाहून दुसरीकडे सहजपणे वाहतूक. एक मनुष्यदेखील ती चालवू शकतो. 
 • ट्रॉलीला गंज चढू नये म्हणून फोर व्हीलर वाहनासाठीचा पेंट वापरला आहे. तो गंजत नाही. सुमारे १० वर्षे ट्रॉली टिकू शकते.
 • फिल्टरची निर्मिती एका साच्यात. (विविध कंपार्टमेंटस नाहीत.)
 • टॅंकच्या तळाला गाळण प्रक्रिया (फिल्टरेशन) होण्याचे मटेरियल.
 • फिल्टर खराब होऊ नये यासाठी तीन मिलिमीटर जाडीचा अनब्रेकेलबल प्लॅस्टिक गार्ड. त्यावर भार आला वा धक्का बसला तरी तुटणे कठीण. 
 • टॅंकमधील जीवामृत वा शेणस्लरी द्रावण हलवण्यासाठी स्टिरर. द्रावण हलवले जाईल तसे त्यातील जीवाणू एकसमान पसरणे शक्य. ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाचाही वापर शक्य. 
 • टॅंकमध्ये ऑक्सिजन पुरवण्यासाठी बबल पंप व त्याची नळी. 
 • दररोज सकाळी व संध्याकाळी एकदा द्रावण ढवळायचे. वापरण्यायोग्य जीवामृत तयार होण्यास चार ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. पंपाला दिलेल्या आऊटलेटमधून सुमारे अर्ध्या तासात हे जीवामृत संकलित होते. त्यानंतर मुख्य व्हॉल्व्ह बंद करावा लागतो. 
 • टाकीच्या बाजूला फ्लश व्हॉल्व. टॅंकच्या वरील मुख्य भागातून पाणी टाकले की त्या व्हॉल्व्हमधून शेण बाहेर काढण्याची सुविधा.
 • दोन बॅक फ्लश. त्यांच्या साह्याने संपूर्ण टॅंक साफ करणे शक्य. याद्वारे पाणी भरणे व काढणेही शक्य.

क्षेत्रनिहाय टॅंकची निर्मिती 

 • अल्पभूधारक ते अधिक जमीनधारक शेतकऱ्यांसाठी विविध पर्याय. 
 • एक ते दोन एकर क्षेत्रासाठी २०० लिटर क्षमतेचा, पाच एकरांसाठी सहाशे लिटर तर १० ते १२ हजार एकरांसाठी एकहजार लिटर क्षमतेचा टॅंक. 
 • १८०० ते २००० लिटर क्षमतेपर्यंतही टॅंक उपलब्ध. 
 • कर्नाटक, गुजरात, राजस्थान आदी राज्यांत आत्तापर्यंत साडेसातशे टॅंकची विक्री करण्यात यश. 

दर 

 • टॅंक किंमत (रू.)
 • २०० लिटर- १२ हजार 
 • ६०० लिटर- २८ हजार 
 • १००० लिटर- ३७ हजार 
 • (कर व वाहतूक शुल्क वेगळे)

सुलभ वापरावयाचा ट्रॅक्टरचलित ब्लोअर 
ढिकले यांनी ट्रॅक्टरचलित फवारणी पंप अर्थात ब्लोअरचीही निर्मिती केली आहे. त्याची वैशिष्ट्ये सांगताना ते म्हणाले, की यामध्ये ३२०० ते ३६०० ‘आरपीएम’ क्षमता असलेला फॅन वापरला आहे. त्याची चेसीस मजबूत आहे. मागील बॉडी मजबूत नसल्यास ती ओढताना चिखलात ट्रॅक्टर झटके मारतो. तसे यात होत नाही. यात बेल्टऐवजी चेन सिस्टीमचा वापर केला आहे. फवारणी टॅंक गंजू नये व अधिक काळ आकर्षक राहावा यासाठी वाहनांसाठी वापरण्यात येणाऱ्या पेंटचा (ऑटोपेंट) वापर केला आहे. 

ब्लोअरची मुख्य वैशिष्ट्ये 

 • ढिकले म्हणाले, की बागेत मी स्वतः ट्रॅक्टर चालवतो. त्यामुळे फवारणी यंत्र चालवण्यात येणाऱ्या प्रत्यक्ष अडचणी माहीत आहेत. सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन, बारकावे शोधूनच फवारणी पंपाचे डिझाईन, फॅब्रीकेशन केले आहे.
 • ब्लोअरमध्ये मिक्सर लावला आहे. त्यामुळे द्रावण सतत फिरवले जाते. कीडनाशकाची पावडर तळाला साठून राहात नाही. 
 • ट्रॅक्टर चालकाच्या उजव्या बाजूलाच ‘कंट्रोल ऑपरेटिंग सिस्टीम’ ठेवली आहे. त्यामुळे कामांसाठी प्रत्येकवेळी ट्रॅक्टरमधून उतरण्याची गरज भासत नाही. 
 • पंपासाठी इटालीयन तंत्रज्ञानाचे नोझल्स वापरले आहेत. अनेकवेळा त्यातून होणारी उच्च दाबाची फवारणी व द्राक्षघड यांच्यातील अंतर कमी असल्याने मण्यांना मार लागतो. त्यांना काळे डाग पडतात. काही वेळा मणीगळही होते. ही समस्या लक्षात घेऊन नोझल्स व घड यांच्यात पुरेसे अंतर राहावे, अशी सुविधा ब्लोअरमध्ये केली आहे. 
 • यात वापरलेल्या तंत्रांमुळे कमीतकमी ताकदीमध्ये हवेचा दाब देता येतो. डिझेलची बचत होते. 
 • ट्रॅक्टरचा घसारा कमी होतो. 
 • कोणत्याही एचपी क्षमतेच्या ट्रॅक्टरला हा ब्लोअर जोडता येतो. 
 • दोनशे लिटरपासून ते १००० लिटर क्षमतेचा ब्लोअर असे पर्याय ठेवले आहेत. टॅंकची क्षमता व सुविधा यांच्यानुसार त्यांची किंमत ३० हजारांपासून ५५ हजार रुपयांपर्यंत आहे. 

फवारणी गनचा पर्याय 
फवारणीच्या अनुषंगाने दिवसभर ट्रॅक्टर शेतात चालवायचा तरी पाच ते सात लिटर डिझेल लागते. त्याचा मजुरी व देखभाल खर्चही वाढतो. अशावेळी व्हेंच्युरीला जोडून बॅटरीवर चालणारी फवारणी गन 
ढिकले यांनी विकसित केली आहे. या उपकरणाला १२ व्होल्टच्या बॅटरीची जोड दिली आहे. 
बॅटरी पूर्णपणे चार्ज असेल तर त्या वेळी चार तासांसाठी दोन ते तीन एकरांत फवारणी करता येते. त्याचा 
फवारा २५० ते ३०० फुटांपर्यंत पसरतो. त्याला सद्य:स्थितीत एकच नोझल आहे. भाजीपाला पिकांत फवारणीसाठी किंवा द्राक्षात खोडे धुण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. सध्या ७० रुपये प्रतिलिटर डिझेलचा दर धरला व दिवसभरात पाच लिटरची गरज लक्षात घेतली तरी ३५० रुपयांच्या डिझेलची बचत या उपकरणाच्या वापरातून होणार आहे. शिवाय ट्रॅक्टरचा घसारा व चालकाची मजुरी वाचेल ही बाब वेगळी. व्हेंच्युरीतून पाणी घेताना ‘चोकअप’न होण्याची सुविधादेखील दिली आहे. 

संपर्क- दत्तात्रय ढिकले- ९९२२३८१४३६, ७५८८५५१११७

 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
लेखाजोखा मोदी सरकारचा! पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे ७२ महिने पूर्ण...
झळाळी पिवळ्या सोन्याची!मराठवाडा, विदर्भाच्या काळ्या मातीत कापूस हे पीक...
कृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेल्या कृषी...
सोयाबीनची उद्यापासून ऑनलाइन नोंदणीमुंबई : खरीप हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत...
हमीभावाने उडीद खरेदीही उद्यापासूनमुंबई : हंगाम २०२०-२१ मधील किमान आधारभूत किंमत...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची...पुणे : गेल्या काही दिवसापासून पावसाने...
राहुरी विद्यापीठाच्या बदली सत्रात...पुणे : महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठात...
परतीचा मॉन्सून उद्या काही भागातून पुढे...पुणे: परतीच्या मार्गावर दोन दिवसापूर्वी निघालेला...
दूध वाहतुकीसाठी रेड्याचा वापर !...वाशीम: काळ बदलला...सोयी सुविधा निर्माण झाल्या......
ऊस तोडणी यंत्र अनुदानालाच खो; तीन...कोल्हापूर : संभाव्य मजूरटंचाईच्या पार्श्वभूमीवर...
नंदुरबारच्या मिरचीला अतिपावसाचा फटका;...नंदुरबार : जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या मिरची...
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
व्यापक धोरणात श्रमिकांचा काय फायदा? चार सप्टेंबर २०२० रोजी राज्य शासनाने...
आव्हानात्मक गळीत हंगाममहाराष्ट्रातील ऊस गाळप हंगाम अगदी तोंडावर येऊन...
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...