agriculture story in marathi, Deepak Joshi from Aurangabad dist. is doing no tillage farming in Kharif crops. | Page 2 ||| Agrowon

विना नांगरणी तंत्राने कपाशी, तुरीची शेती

संतोष मुंढे
मंगळवार, 27 जुलै 2021

देवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील, अभ्यासू शेतकरी दीपक जोशी यांनी
कापूस, तूर व ज्वारी या पिकांत शून्य नांगरणी तंत्राचा वापर सुरू केला आहे. मागील वर्षी एकूण सुमारे
१४ एकरांत केलेल्या प्रयोगातून उत्पादन खर्चात एकरी १३ हजार रुपयांपर्यंत बचत साधली. शिवाय
अन्य फायदेही झाले. यंदाही तेवढ्याच क्षेत्राचे नियोजन केले आहे.

देवगाव (ता. पैठण, जि. औरंगाबाद) येथील प्रयोगशील, अभ्यासू शेतकरी दीपक जोशी यांनी कापूस, तूर व ज्वारी या पिकांत शून्य नांगरणी तंत्राचा वापर सुरू केला आहे. मागील वर्षी एकूण सुमारे १४ एकरांत केलेल्या प्रयोगातून उत्पादन खर्चात एकरी १३ हजार रुपयांपर्यंत बचत साधली. शिवाय अन्य फायदेही झाले. यंदाही तेवढ्याच क्षेत्राचे नियोजन केले आहे.
 
प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवत शेतीत टिकून राहणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी नाही. शेतीला नव तंत्रज्ञानाची, पूरक उद्योगांची जोड देत शेती फायद्याची करण्यासाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न आहेत. भातातील लोकप्रिय ‘एसआरटी’ तंत्राचा वापरही औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी करीत आहेत. विना नांगरणी तंत्र, पेरणीसाठी ‘बीबीएफ’, खोडवा तूर असे प्रयोग करून शेतकऱ्यांनी शेतीच गणित फायद्याचा करण्याचा प्रयत्न चालविला आहे.

विना नांगरणी प्रयोग
तीन पिढ्यांपासून शेती हाच उद्योग असलेल्या देवगाव (ता.. पैठण, जि.. औरंगाबाद) येथील दीपक पुरुषोत्तम जोशी हे प्रयोगशील व चिकित्सक शेतकरी आहेत. सन १९८४ मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण संपल्यानंतर ते शेतीकडे वळले. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली २००० पर्यंत शेती केली. त्यानंतर शेतीचा पूर्ण भार त्यांनी सांभाळला. सन २००५ पर्यंत पारंपारिक पद्धतीने शेती केली. परंतु निसर्गात होणारे बदल. बदलती पीकपद्धती, हवामान यामुळे शेतीच्या जमाखर्चाचा ताळमेळ बसेनासा झाला. त्यामुळे दरवर्षी फायदा देणारे उपक्रम व प्रयोग शेतात राबवणे सुरु केले. आता 'विना नांगरणी' च्या अशा प्रयोगावर ते येऊन ठेपले आहेत जो उत्पादन खर्च वाचवीत असल्याने समाधान देवून गेल्याचं ते सांगतात.

तंत्रवापराची सुरवात
सकाळ- ॲग्रोवन तर्फे औरंगाबाद येथे कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी विना नांगरणी विषयातील कोल्हापूर येथील प्रयोगसिद्ध व लोकप्रिय शेतकरी प्रताप चिपळूणकर मार्गदर्शनपर भाषणासाठी आले होते. त्यावेळी जोशी यांना त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त वाटले, त्यांनी चिपळूणकर यांची भेट घेतली. तिथून शेतीची दिशा बदलण्यास सुरवात झाली. 'तण देई धन' हा नवा मंत्र मिळाला. विना नांगरणी तंत्राबाबत अधिक जाणून घेण्यासाठी जोशी चिपळूणकर यांच्याकडे दोन वेळा जाऊनही आले. सन २०१९ मध्ये एक  एकर कपाशी पिकात प्रयोग सुरू झाला. अर्थात पहिलाच अनुभव असल्याने व्यवस्थापन पूर्ण प्रभावी झाले नाही. पण हा प्रयोग पुढील वर्षासाठी महत्त्वाचा ठरला.सन २०२० मध्ये आपल्या २० एकर शेतीपैकी सुमारे १० ते १४ एकर क्षेत्रावर हा प्रयोग करण्याचे नियोजन केले. यात खरिपात कापूस, तूर व रब्बी हंगामात ज्वारीची निवड केली. सुमारे सहा ते सात एकर कपाशीचे क्षेत्र ठेवले. तीन ते चार एकरांवर सलग तूर तर रब्बीत चार ते पाच एकर ज्वारीचे क्षेत्र निश्‍चित केले.

प्रयोगातील ठळक बाबी
ज्या ठिकाणी पीक घ्यायचे ते शेत नांगरले नाही. तूर वा कपाशीत ट्रॅक्‍टरने पाच फुटांवर रेघा पाडत पाच बाय एक फूट पद्धतीने लागवड केली. चोवीस तासाच्या आत पेंडीमिथॅलीन तणनाशकाची फवारणी पिकाच्या ओळीवर दोन्ही बाजूने अर्धा अर्धा फूट अंतरावर केली. पाच फुटांपैकी मध्यल्या तीन फुटांत तण वाढवले. पिकाची ओळ खुरपून स्वच्छ ठेवली. कपाशीत पहिल्या दीड महिन्याने तीन फुटांच्या पट्ट्यातील तणाची कापणी करून ते जागेवर कुजविले. अडीच महिन्यांने पुन्हा वाढलेल्या तणाची कापणी केली. तेही जागेवर कुजविले. सप्टेंबर- ऑक्टोबरच्या दरम्यान कपाशी मोठी असताना पंपाच्या नळीला हूड लावून तणनाशकाची फवारणी केली. कपाशीप्रमाणेच तूर पिकाचेही नियोजन केले. तुरीत दोन वेळा म्हणजे लावणीनंतर दीड महिन्याने व तिसऱ्या महिन्यात शेंडा खुडला. त्यामुळे अतिरिक्त उंच कमी होऊन ‘ब्रॅंचेस’ वाढल्या.

रब्बी ज्वारीत प्रयोग
रब्बीतील ज्वारीसाठीचे क्षेत्र पूर्ण पावसाळाभर पडीक ठेवले. सप्टेंबरमध्ये तणनाशकाची फवारणी केली. पूर्वी ज्वारीची लावणी करताना दोन ओळींतील अंतर ९ ते १८ इंच असायचे. चिपळूणकर यांच्या सल्ल्याने ते २४ इंचांपर्यंत केले. ऑक्‍टोबरमध्ये बीबीएफ यंत्राद्वारे त्यानुसार लावणी केली. पेरणीनंतर आणि उगवणी पूर्वी ॲट्राझीन तणनाशकाची फवारणी केली.

विना नांगरणीचे एकूण झालेले फायदे

  • तण व्यवस्थापन चांगले केल्याने निंदणीसाठी मजूर न मिळण्याचा प्रश्‍न मिटला
  • पाच फुटांतील तीन फुटांचा पट्टा हा तणाचा ठेवल्यामुळे मावा व तत्सम किडी
  • तुलनेने तणांवर पोसले गेले असा जोशी यांचा अनुभव. त्यामुळे फवारणीचे प्रमाण कमी झाले.
  • वाहून जाणाऱ्या मातीला तणांमुळे अटकाव झाला. अर्थात, जमिनीची धूप होण्याचे प्रमाण कमी झाले.
  • नांगरणी, आंतरमशागत, खुरपणी आदी कामे कमी झाली. एकरी एकूण खर्च पाहता १३ हजार रुपयांपर्यंत खर्चात बचत झाली.
  • कोरडवाहू क्षेत्रात एकरी ८ क्‍विंटल पर्यंत कापसाचे, तुरीचे सात क्विंटल तर रब्बी ज्वारीचे ११ ते १२ क्विंटल उत्पादन मिळाले.
  • तण व पिकाचे अवशेष जागेवर कुजवल्याने सेंद्रिय कर्ब वाढवण्यास मदत मिळाली.
  • ज्वारीत दोन ओळींतील अंतर वाढविल्याने हवा खेळती राहून भरपूर सूर्यप्रकाश मिळाला.
  • ज्वारी काढणी मजुरांना सोपी गेली.

प्रतिक्रिया
यंदाही मागील वर्षीप्रमाणेच कापूस, तुरीचे नियोजन तेवढ्याच क्षेत्रात केले आहे. मधल्या पट्ट्यातील तण काढण्यासाठी यंदा ग्रासकटरचा वापर मात्र केला आहे.
रब्बीतही हा प्रयोग कायम असेल.
-दीपक जोशी, ९८५०५०९६९२


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
‘गोकुळ’तर्फे दुभत्या जनावरांना लाखाचा...कोल्हापूर : दुभत्या जनावरांचा कोणत्याही आजाराने...
पितृपक्षामुळे सुकामेव्याला मागणी वाढलीपुणे : पितृपक्षाला प्रारंभ झाल्यानंतर काही...
साखर दरवाढीची गोडी कायमकोल्हापूर : गेल्या महिन्यापासून साखर दरात आलेल्या...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारापुणे : राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी...
प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ मिळाले,...औरंगाबाद : गतवर्षीच्या रब्बी हंगामात आयोजित...
४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे आज...औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे...
पीककर्जाचे ‘वरातीमागून घोडे’पुणे ः शेतकऱ्यांना खरिपासाठी दिल्या जाणाऱ्या पीक...
शेतकरी पुत्रांचा #सोयाबीन ट्रेंडनांदेड : सोयाबीनचे दर ११ हजारांवरून पाच हजार...
कोकणात पावसाचा जोर कायमपुणे : राज्यात गेले काही दिवस पावसाने हजेरी लावली...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
विदर्भ, कोकणात पावसाचा अंदाजपुणे : राज्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर...
पाऊस सुरूच; ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी ः राज्यात आठ दिवसांपासून पावसाचे पुनरागमन...
सेंद्रिय शेतीतून काळ्या आईचे आरोग्य जपा...नाशिक : रासायनिक शेतीचे परिणाम दिसत असल्याने...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...