उभारलेली कांदा चाळ व कोरोनाच्या काळातही  दक्षता घेऊन पार पडलेली बैठक
उभारलेली कांदा चाळ व कोरोनाच्या काळातही दक्षता घेऊन पार पडलेली बैठक

शेतकऱ्यांसाठी ‘दीपस्तंभ’ ठरलेली मानोरीची कंपनी

मानोरी (ता. राहुरी, जि. नगर) येथील कृषीभूषण डाॅ. दत्तात्रय वने यांच्या पुढाकारातून परिसरातील गावांतील तेवीस शेतकऱ्यांनी दीपस्तंभ शेतकरी गटाची स्थापना केली. शेती तंत्रज्ञान, आर्थिक योजना, पूरक उद्योग आदींमध्ये भरीव उपक्रम राबवत शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांनी पुढचे पाऊल टाकले.

मानोरी (ता. राहुरी, जि. नगर) येथील कृषीभूषण डाॅ. दत्तात्रय वने यांच्या पुढाकारातून परिसरातील गावांतील तेवीस शेतकऱ्यांनी दीपस्तंभ शेतकरी गटाची स्थापना केली. शेती तंत्रज्ञान, आर्थिक योजना, पूरक उद्योग आदींमध्ये भरीव उपक्रम राबवत शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून या शेतकऱ्यांनी पुढचे पाऊल टाकले. काळानुसार शेतीत बदल करीत चाललेली ही कंपनी शेतकऱ्यांसाठी दीपस्तंभ झाली आहे.   कृषीभूषण डाॅ. दत्तात्रय वने (रा. मानोरी, ता. राहुरी, जि. नगर) यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रातील शेतीला परिचित आहे. त्यांच्याच पुढाकाराने २०१२ मध्ये तालुक्यातील मानोरी, आरडगाव, मुसळवाडी, माहेगाव आणि चंडकापुर गावांतील २३ शेतकऱ्यांनी एकत्र येऊन दीपस्तंभ शेतकरी गटाची स्थापना केली. एकत्र येण्यामागील उद्दीष्टे

  • शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा, खर्च व नफा गुणोत्तर वाढवणे
  • जमिनीची सुपीकता वाढवणे, शेतमाल निविष्ठा खरेदी, पाणी नियोजन व कृषी अर्थशास्त्रावर लक्ष केंद्रित करणे
  • शेतकरी आरोग्य विमा, शेतमाल विपणन व साठवणूक
  • शेतकऱ्यांचा शेतीतील आत्मविश्वास वाढवणे
  • गटाची वैशिष्ट्ये व कंपनी स्थापना

  • सभासदांचीच मर्यादा ३० पर्यंतच.
  • सन २०१७ मध्ये दीपस्तंभ शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना
  • कृषी विभाग, आत्मा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था यांची भरीव मदत
  • गट स्थापन झाला त्यावेळी प्रत्येक सदस्यांकडून तीनशे रुपये प्रती महिना बचत.
  • सहा महिन्यानंतर ती पाचशेपर्यंत.
  • जमा बचतीतून बारा टक्के व्याजदराने सभासदांना कर्ज
  • सध्या दरमहा एक हजार रुपये बचत
  • आत्तापर्यत बचतीसह गटातील प्रत्येक सदस्याचे ७१ हजार रुपये तर संपूर्ण गटाकडे २७ लाखांचे भागभांडवल. वैयक्तिक बचतीतून एवढेे भांडवल उभी करणारी उल्लेखनीय शेतकरी कंपनी.
  • मुदत कर्जाचे वाटप

  • कंपनीकडून दोन लाखांपर्यत तीन वर्षाच्या परतफेड मुदतीवर दहा टक्के व्याजदराने मुदत कर्ज
  • आत्तापर्यत पंचवीस जणांना कर्ज
  • नव्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी ‘सोशल मिडीया’ चा वापर. त्यादृष्टीने सभासदांना आठ हजार रुपयांचे बिगर व्याजी मोबाईल कर्ज.
  • प्रति चारशे रूपये हप्त्याने तीस हप्तात वसुली
  • त्यामुळे सदस्यांकडे स्मार्टफोन उपलब्ध
  • कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्रांसह शासनाच्या ऑनलाईन उपक्रमात सहभागी होणे, विविध संदेश मिळवणे त्यामुळे शक्य
  • आरोग्य विमा आरोग्य ही खर्चिक मात्र महत्वाची बाब असल्याने आरोग्य विमा योजना राबवली जाते. प्रत्येक सभासदाला स्वभांडलातून दरवर्षी सहा टक्के व्याजदराने वर्षभराच्या परतफेडीवर पंधरा हजार रुपये उपलब्ध केले जातात. त्यातून शेतकरी कुटूंबाला विमाकवच मिळून आरोग्यावरील खर्चाची चिंता मिटली आहे. असे रावबले यशस्वी उपक्रम

  • गटाने केलेल्या उत्तम आर्थिक नियोजनामुळे अनिकेत जाधव, वैभव वने, अक्षय वने, स्वप्नील गुंड, प्रसाद शेरकर यांना कृषी पदवीचे शिक्षण पूर्ण करता आले.
  • अमोल वने व जयंत जाधव- दूध संकलन केंद्राची उभारणी
  • मनोज साळुंके, बापूसाहेब शेरकर, विजय म्हसे- ट्रॅक्टर व शेती औजारे खरेदी
  • विलास जरे, प्रभाकर जरे- दुधापासून खवा तयार करण्याचे यंत्र घेतले
  • दहा सभासदांसह दत्तात्रय वने यांनी पाच हजार टन क्षमतेची कांदा चाळ उभारली.
  • भास्कर पंडीत- ठिबक व तुषार संच तर शरद पोटे यांनी ऊसतोडणी यंत्र घेतले.
  • सुमारे १३ शेतकरी- दुग्धव्यवसाय
  • रामचंद्र मोरे हार्डवेअर व यंत्रविक्री, संग्राम धुमाळ- रोपवाटीका, शिवाजी थोरात, शंकर सपकाळ यांच्याकडून मुक्तगोठा व परसबागेतील कुकूटपालन
  • भाऊसाहेब खिलारी, रोहिदास तोगे, अतुल करपे, दादासाहेब जाधव- हरभरा बिजोत्पादन
  • गोदाम उभारणी, यंत्र खरेदी मानोरी परिसरात उसासह विविध हंगामी पिके घेतली जातात. दूध, कुकूटपालन केले जाते. त्यामुळे धान्य साठवणुकीसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकरी कंपनीने ३४० टन क्षमतेचे गोदाम उभारले आहे. त्यासाठी वीस लाखांचे कर्ज घेतले असून साडेबारा लाखांचे अनुदान कृषी विभागाने दिले आहे. शेतमाल स्वच्छता व विक्रीसाठी धान्य चाळणीयंत्र, इलेक्ट्राॅनिक वजनकाटा, गोणी शिलाई यंत्रही घेतले आहे. कंपनीचे ठळक उपक्रम

  • कृषी विभागाकडून पन्नास टक्के अनुदानावर मातीपरिक्षण प्रयोगशाळा
  • पीक प्रात्यक्षिक, शेतीशाळा, क्षारपड जमीन विकासासाठी भूमीगत निचरा प्रणाली कार्यक्रम, बिजोत्पादन
  • पाच सभासदांकडून गांडूळ खत प्रकल्प
  • तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी अभ्यासदौरे, प्रशिक्षण. ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, कणेरीमठ, जि. कोल्हापूर, नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री कंपनीला भेटी.
  • बचतीतून आर्थिक नियोजन केल्याबद्दल गटातील सदस्यांचा स्टेट बॅक राहुरीकडून तसेच बाभळेश्वर कृषी विज्ञान केद्रातून उत्कृष्ट शेतकरी गट म्हणून गौरव.
  • कंपनीचे अध्यक्ष डाॅ. दत्तात्रय वने कृषीभूषण असून सचीव संग्राम धुमाळ यांचा आत्मा अंतर्गत उत्कृष्ट शेतकरी म्हणून गौरव
  • भविष्यातील नियोजन

  • गट व कंपनी या समन्वयातून शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देणे
  • आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याला प्रयत्न करणे.
  • निविष्ठा विक्री केंद्र, सेवा व सल्ला देणे.
  • वीषमुक्त शेतमाल निर्मितीबाबत प्रशिक्षण वर्ग सुरु करणे,
  • उत्पादक ते ग्राहक साखळी तयार करणे.
  • कंपनीतील सभासदांसह इतर शेतकऱयांनी पुरक व्यवसाय सुरु करण्यासाठी पुढाकार घेणे.
  • संपर्क- डाॅ. दत्तात्रय वने- ९४२२७५२१०१ संग्राम धुमाळ- ९४२३१७७४९६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com