agriculture story in marathi, Deme Brothers from Girgaon, Dist. Hingoli gaining good returns from multi cash crop farming system | Page 2 ||| Agrowon

सिंचन बळकटीकरणासह नगदी पिकांतून उंचावले अर्थकारण 

माणिक रासवे
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

भाजीपाला पिकांकडे कल 
विविध कारणांनी सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. त्यामुळे तुलनेने कमी पाणी लागणाऱ्या पिकांकडे वळण्यावर देमे यांनी भर दिला आहे. हळद व ऊस ही पिके उन्हाळ्याच्या तोंडावरच निघून जातात. त्यामुळे पुढे केळीसाठीच पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते. आता बाजारपेठेतील मागणी व दर यांचा अंदाज घेऊन मिरची, फ्लाॅवर, कारले, दोडके या भाजीपाला पिकांचे उत्पादन घेण्यास सुरवात केली आहे.

हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील गिरगाव येथील तरुण प्रयोगशील शेतकरी मारोती व गोविंद या देमे बंधूंनी हळद, केळी, ऊस आदी नगदी पिकांच्या शेतीवर भर देत आपले अर्थकारण उंचावले आहे. परिसरात धरणाचा आधार असला तरी बेभरवशाच्या पर्जन्यमानामुळे शेततळ्याच्या उभारणीतून संरक्षित पाण्याची सुविधा निर्माण केली. यंदाच्या वर्षापासून देमे भाजीपाला पिकांकडे वळले आहेत. त्यांना त्यातून चांगल्या उत्पादनाची खात्री आहे. 
 
हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील गिरगाव गावाचे शिवार उर्ध्वपैनगंगा प्रकल्प तसेच सिद्धेश्वर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येते. गावात केळी, हळद या नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेण्यात येते. गावातील तरुण शेतकरी मारोती देवराव देमे यांनी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून कृषी पदवी संपादन केली. त्यानंतर दोन वर्षे आघाडीच्या खत उत्पादक कंपनीत नोकरीचा अनुभव घेतला. त्यानंतर २००९ मध्ये गावातच कृषी सेवा केंद्र सुरु केले. त्यासोबतच घरच्या शेती व्यवस्थापनाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. 

पीक व्यवस्थापन 

  • शेतीची मुख्य सूत्रे बंधू गोविंद यांच्याकडे. मारोती नियोजन व व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष देतात. 
  • कुटुंबात दोघे बंधू, आई, वडील असे एकूण नऊ सदस्य. 
  • गिरगाव शिवारात दोन ठिकाणी मिळून १० एकर शेती. खोल काळी भारी जमीन. 
  • दोन विहिरींची सुविधा. सिद्धेश्वर प्रकल्पाच्या कालव्याचा लाभ. 
  • दहा एकरांत प्रत्येकी दोन एकर क्षेत्रावर हळद, केळी, ऊस अशी नगदी पिकांची व्यवस्था. 
  • उर्वरित क्षेत्रावर कपाशी, सोयाबीन 

पाण्याचे नियोजन 
अलीकडील काही वर्षापासून या भागात अनियमित, अवेळी पडणारा पाऊस, त्यामुळे कमी झालेले पावसाचे प्रमाण यामुळे पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. सिद्धेश्वर धरणातही पुरेशा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होत नसल्यामुळे कालव्याच्या पाणी आवर्तनाची खात्री राहिलेली नाही. विहिरींचे पाणी जेमतेम जानेवारी- मार्चपर्यंत पुरते. बारमाही सिंचनाची सुविधा राहिली नाही. अशा परिस्थितीत हळद, केळी या नगदी पिकांचे संवेदनशील अवस्थेत पाणी कमी पडून नुकसान होते. ते टाळण्यासाठी उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करण्यासाठी दहा वर्षांपासून दहा एकरांवर ठिबक सिंचनाचा अवलंब केला जात आहे. 

शेततळ्याची सुविधा 
मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत २०१७ मध्ये ३० बाय ३० मीटर आकाराचे शेततळे खोदले. 
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांत शेततळ्याला प्लॅस्टिक अस्तरीकरण केले. त्यातून ६० लाख लिटर पाणीसाठवण क्षमता निर्माण झाली. ऑक्टोबरपर्यंत विहिरीच्या पाण्यावर शेततळे भरून घेतले जाते. त्यातून थेट तसेच गरजेनुसार शेततळ्यातील पाणी पुन्हा विहिरीत सोडून पाइपलाइनद्वारे अन्य ठिकाणच्या शेतात नेले जाते. गेल्या वर्षी शेततळ्यातील पाण्यावर खरबुजाचे उत्पादन घेतले. यंदा विहिरींचे पाणी लवकर संपले. परंतु एप्रिलमध्ये सिद्धेश्वर कालव्याला सोडण्यात आलेल्या पाणी आवर्तनावेळी शेततळ्यात पाणी भरून घेण्यात आले. 

यंदा वेळेवर लागवड 
यंदा या भागात जूनच्या शेवटच्या आठवड्यानंतर पावसाचे आगमन झाले. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांकडे हळद, केळी लागवडीस उशीर झाला. परंतु देमे यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रत्येकी दोन एकर हळद आणि केळी यांची वेळेवर लागवड केली. यंदा कारले आणि दोडके यांची लागवड केली आहे. शेततळ्यात सध्या पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे पावसाच्या खंड काळात सिंचन करता येणार आहे. 

विहीर पुनर्भरण 
शेताजवळून वाहणाऱ्या ओढ्याचे पाणी पाइपद्वारे विहिरीत सोडले. त्यामुळे त्यातील पाणीपातळीत जलद वाढ होण्यास तसेच पाणी टिकून राहण्यासाठी मदत होत आहे. 

भाजीपाला पिकांकडे कल 
विविध कारणांनी सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी होत आहे. त्यामुळे तुलनेने कमी पाणी लागणाऱ्या पिकांकडे वळण्यावर भर दिला आहे. हळद व ऊस ही पिके उन्हाळ्याच्या तोंडावरच निघून जातात. त्यामुळे पुढे केळीसाठीच पाण्याचे व्यवस्थापन करावे लागते. आता बाजारपेठेतील मागणी व दर यांचा अंदाज घेऊन मिरची, फ्लाॅवर, कारले, दोडके या भाजीपाला पिकांचे उत्पादन घेण्यास सुरवात केली आहे. एक बैलजोडी, सालगडी, ट्रॅक्टर आहे. घरातील बहुतांश सदस्य शेतीत मदत करतात. गरजेनुसार मजुरांची गरज घेतली जाते. 
विविध पिकांच्या लागवडीपासून ते बाजारपेठेत विक्रीसाठी नेईपर्यंतचा खर्च, उत्पन्न यांचा हिशेब ठेवला जातो. या नोंदीमुळेच आर्थिक तसेच पीक नियोजनातील बदल करता येतात. 

उत्पादन 
केळी हे देमे यांचे पारंपरिक पीक आहे. ग्रॅंड नैन जातीच्या केळीची मृग बहार लागवड केली जाते. एकरी २५ ते ३० टन उत्पादन मिळते. पूर्वी घडांच्या परिपक्वतेच्या काळात विहिरींचे पाणी कमी पडून उत्पादनात घट येत होती. मात्र शेततळ्यामुळे महत्त्वाच्या अवस्थेत पाणी देणे शक्य झाले आहे. व्यापारी जागेवरच खरेदी करतात. हळदीच्या सेलम वाणाची गादीवाफा पद्धतीने लागवड होते. एकरी वाळलेल्या हळदीचे २५ ते ३० क्विंटलपर्यंत तर उसाचे एकरी ४० ते ६० टनांपर्यंत उत्पादन मिळते. हळदीची वसमत येथील मार्केटमध्ये विक्री होते. ऊस साखर कारखान्याकडे पाठवला जातो. 

जमीन सुपीकता वाढीसाठी प्रयत्न 
अलीकडील काळात जमिनीचा सामू विम्ल झाला आहे. त्यामुळे पिकांना अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होत आहे. अशा परिस्थितीत जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्यासाठी दरवर्षी शेणखताचा वापर केला जातो. गांडूळ खतावर भर देण्यात येणार आहे. जमिनीची सुपीकता टिकून ठेवण्याचा देमे यांचा प्रयत्न आहे. 

संपर्क- मारोती देमे- ९८८१४८३३२९  


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
आदिवासी शेतकऱ्यांच्या जीवनात झाला बदलटाटा ट्रस्ट `सेंट्रल इंडिया`च्या माध्यमातून...
‘हापूस'च्या नऊ हजार पेट्यांची ...हंगाम तोंडावर आला असतानाच कोरोनाने देशभरात पाय...
सबसरफेस ठिबक तंत्राच्या वापरातून यशस्वी...अभ्यासूवृत्ती, प्रयोगशीलता, प्रयत्नवाद, बागेतील...
बचतगटाच्या महिलांनी नव्या ग्राहकांसह...कोरोनाच्या नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे...
विक्री कौशल्य, हुशारी पणास लावून ३४ टन...पातूर तालुक्यातील विवरा (जि. अकोला) येथील हरीष व...
दुर्गम खैरगावात शोधला कलिंगड विक्रीचा...यवतमाळ जिल्ह्यात खैरगाव देशमुख (ता. पांढरकवडा)...
‘ई-कॉमर्स' तंत्राद्वारे शेतीमालाची...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी (ता.दिंडोरी) येथील...
मंदीतही शंभर टन गव्हाची थेट ग्राहकांना...कोरोना लॉकडाऊन काळ हा काहींसाठी अडचणीचा ठरत असला...
तब्बल २३०० टन ताज्या शेतमालाची विक्रीकोरेगाव कृषी विभागाचा उपक्रम कोरोना संकटाच्या...
बारामतीतील भेंडीची थेट युरोपात निर्यातपुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या...
ताजा शेतमाल, कांदा विक्रीतून...पुणे शहरातून जवळ असलेल्या केंदूर (ता. शिरूर, जि....
पाच जिल्ह्यांत विकली तब्बल ३०० टन...ओझर मिग (जि. नाशिक) येथील जय बाबाजी भक्त...
नवले यांनी जोपासलेली सेंद्रिय...नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील इंदोरी येथील...
आरोग्यवर्धक उत्पादनांची वाढवली बाजारपेठ...सांगली कायम दुष्काळ असलेल्या प्रतिकूल परिस्थितीत...
सीताफळातून लाभले आर्थिक स्थैर्यपांगारे (ता.पुरंदर,जि.पुणे) येथील प्रयोगशील...
नारायणगावची कलिंगडे पोहोचली काश्‍मीर...कोरोना टाळेबंदीत शेतीमालाची पुरवठा साखळी खंडीत...
"कृषीसमर्पण’ कडून लॉकडाऊनमध्ये १२१ टन...कोरोना व लॉकडाऊनच्या संकटात औरंगाबाद स्थित ‘...
संकटातही हापूस आंब्याच्या सातशे...ऐन हापूस हंगाम सुरू होतानाच कोरोनामुळे देशात...
कमी भावात केळी देण्यापेक्षा लढवली शक्कल...कोरोना विषाणू व लॉकडाऊनच्या संकटातच कळंब (ता....
निर्यातक्षम बारा टन द्राक्षांची थेट...लॉकडाऊन सुरू झाला तेव्हा नगर जिल्ह्यात माहेगाव...