agriculture story in marathi, Dhadke family has done papaya farming successfully. | Agrowon

वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीर

सुदर्शन सुतार
शनिवार, 15 मे 2021

हणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील चिदानंद धडके यांनी ऑस्ट्रेलियन जातीच्या संकरित पपई वाणाची शेती यशस्वी केली आहे. त्यातून वर्षभर उत्पन्न व बाजारभाव मिळत राहावा हा उद्देश त्यांनी जपला.

हणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील चिदानंद धडके यांनी ऑस्ट्रेलियन जातीच्या संकरित पपई वाणाची शेती यशस्वी केली आहे. त्यातून वर्षभर उत्पन्न व बाजारभाव मिळत राहावा हा उद्देश त्यांनी जपला.
 
सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी परिसरात हणमंगाव आहे. भाजीपाला, कांदा या पिकांत या भागाने ओळख तयार केली आहे. सोलापूरची बाजारपेठ हाकेच्या अंतरावर असल्याने भाजीपाला शेतीवर या परिसराने अधिक भर दिला आहे.

शेतीची वाट धरली
गावातील चिदानंद धडके आपले मोठे बंधू विठ्ठल यांच्यासह एकत्र कुटुंब पद्धतीने राहतात. त्यांचे वडील मुरारी हे बैलांचा व्यापार आणि मजुरी करत. त्यांनी दोन्ही मुलांना मोठ्या कष्टाने शिकवले. दोघेही ‘एम.ए. बीएड’ आहेत. विठ्ठल सोलापुरात खासगी महाविद्यालयात शिक्षक आहेत. चिदानंद पुणे येथे खासगी कंपनीत नोकरीस होते. त्या बळावरच थोडी-थोडी करीत वीस वर्षांत तब्बल ४२ एकर शेती त्यांनी घेतली. गेल्या वर्षी कोरोनामुळे लॅाकडाउन सुरू झाला आणि चिदानंद यांनी नोकरीचा राजीनामा देत थेट शेतीची वाट धरली.

शेतीतील प्रयोग
चिदानंद यांना पूर्वीपासूनच शेतीची आवड होती. त्यामुळे नोकरीत असतानाच ते शेतीत सातत्याने वेगवेगळे प्रयोग करीत होते. त्यातूनच २०१२ मध्ये त्यांनी केळीची लागवड केली. चांगल्या व्यवस्थापनावर भर देत दर्जेदार उत्पादन घेऊन केळीची निर्यातही केली. अडीच वर्षांपूर्वी ते पपईच्या प्रयोगाकडे वळले. सुरुवातीला सहा एकर आणि आता नंतर १० एकर अशी सध्या १६ एकरांत त्यांची पपई बाग उभी आहे. त्यातील सहा एकर बाग दीड ते पावणेदोन वर्षे वयाची असून फळावर आहे. त्याची काढणी सुरू आहे.

व्यवस्थापनातील बाबी
धडके यांनी सुरुवातीपासूनच पपईचे व्यवस्थापन चांगले ठेवण्यावर भर दिला. ऑस्ट्रेलियन जातीच्या वाणाची निवड केली. इंदूर (मध्य प्रदेश) येथील नर्सरीतून प्रतिनग ४० रुपये दराने रोपे आणली. सात बाय पाच फूट अंतरावर लागवड केली. एकरी सुमारे एक हजार रोपे लागली. लागवडीनंतर प्रति झाड पाटीभर देशी गाईचे शेण रोपांच्या बुडात टाकले. त्यानंतर झाडांना ताकाची आळवणी केली. तुरीचा भुस्सा झाडाच्या बुडात वापरला. दुसऱ्या महिन्यात गूळ, शेण प्रत्येकी दोन किलो आणि गोमूत्र पाच लिटर या मिश्रणाने २०० लिटर पाण्याची आळवणी केली. तिसऱ्या महिन्यात झाडाच्या बुडात टोपलीभर शेणखत टाकले. चौथ्या महिन्यात जिवामृत ड्रीपमधून दिले. पाचव्या महिन्यात ह्युमिक ॲसिडचा वापर केला. सातव्या महिन्यात ०-५२-३४ या खताचा वापर केला. सातव्या महिन्यापासून फळे पक्व होण्यास सुरुवात झाली. मिलिबगचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कडुनिंबावर आधारित कीटकनाशकाचा वापर केला. दर आठ ते दहा दिवसांतून एकदा किंवा बागेत लक्षणे पाहून फवारणी केली. पाणी व्यवस्थापनात सुरुवातीला एक दिवसाआड अर्धा तास पाणी दिले. त्यानंतर ते तासाभरापर्यंत वाढवण्यात आले.

थेट बांधावरच विक्री
पपईला सोलापूरसह पुणे, मुंबई या बाजारपेठा उपलब्ध आहेत. मात्र व्यापारी थेट शेतावरच खरेदीसाठी येतात. त्यामुळे तिथेच दर निश्‍चित केले जातात. वाहतूक खर्च, आडत-हमाली आणि अन्य खर्च याच बचत होते. गेल्या दोन वर्षांत पपईला किलोला ५ रुपये सरासरी, तर कमाल दर १५ ते १८ रुपये मिळाला. दर दहा दिवसांतून एकदा अशी महिन्यातून साधारण तीन वेळा काढणी होते. पवित्र रमजान महिना सध्या पार पडतो आहे. या काळात फळांना सर्वाधिक मागणी असते. त्याचा मोठा फायदा धडके यांना घेता आला. मागील वर्षी आणि यंदा असे दोन्ही हंगाम त्यांना मिळाले. अर्थात, अन्य महिन्यांपेक्षाही या कालावधीतील बाजाराचे गणित हमखास यशस्वी झाले. मार्केटचा विचार करून धडके यांनी आता स्वतःची रोपवाटिका उभारणी केली आहे.

वाणाचे वैशिष्ट्य
धडके पपईच्या वाणाबाबत म्हणाले, की त्याचा आकार लंबगोलाकार आहे. चवीला खूपच गोड व रंगही लाल आहे. वजन एक ते पावणेदोन किलोपर्यंत भरते. या झाडाला पानांचा संभारही चांगला असल्याने फळांना ‘सनबर्न’चा धोका कमी होतो.

एकत्र कुटुंब ही ताकद
धडके बंधूंच्या शेतीची खरी ताकद एकत्र कुटुंब आहे. विठ्ठल यांच्यासह पत्नी संगीता, मुलगा रविकिरण, विशाल आणि विनीत, तर चिदानंद यांच्या पत्नी रेश्मा, मुलगा सुयश आणि श्रेयश असं हे संयुक्त कुटुंब आहे. नव्या पिढीतील रविकिरण देखील सध्या शेतीची जबाबदारी सांभाळतो आहे. विशालने बी.टेक.ची पदवी घेतली असून, विनीतने ‘डिप्लोमा’चे शिक्षण घेतले आहे. चिदानंद म्हणाले, की पपई व्यतिरिक्त अन्य पिकेही घेतो. यंदा आठ एकरांत सुमारे १४० क्विंटलच्या दरम्यान ज्वारी तर चार एकरांत सुमारे ४० क्विंटल तूर उपलब्ध झाली.

संपर्क- चिदानंद धडके, ९६८९४६०७७७


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...
पदवीधर महिलेची मशरूम निर्मिती ठरतेय...पुणे येथील तृप्ती धकाते यांनी मशरूम (अळिंबी)...
मानवलोक... ग्रामीण पुनर्रचनेसाठी...शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण स्त्रियांसाठी कल्याणकारी...
उत्तर भारतात मॉन्सूनची प्रगती पुणे : उत्तर भारतात मॉन्सूनला प्रगतीसाठी पोषक...
सोमवारपासून पावसाचा प्रभाव कमी होणार पुणे : दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाने...
कृषी परिषदेत संचालक नेमण्यासाठी मुहूर्त...पुणे ः राज्याच्या कृषी संशोधनाला चालना देण्यासाठी...
कोकणात जोरदार पाऊसपुणे : कोकणातील बहुतांशी भागांत पावसाने चांगलेच...
‘एफआरपी’चा अभ्यास सुरू पुणे ः राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या...
‘क्रॉपसॅप’ प्रकल्पात १७ पिकांचा समावेश पुणे ः राज्यात यंदा पिकांवरील कीड-रोग सर्वेक्षण व...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी केंद्राकडून...पुणे ः पशुसंवर्धनाबरोबरच दूध आणि प्रक्रिया उद्योग...
पीककर्ज व्याज सवलत योजनेस ३० जूनपर्यंत...अकोला : शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी पेरणीच्या आधी...
काळ्या भाताच्या लागवडी तथ्य तपासूनच...नाशिक : सध्या राज्याच्या विविध भागांत अनेक शेतकरी...