विविध उपक्रम, सुविधांतून नाव कमावलेले धरणगुत्ती

कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्‍यातील धरणगुत्ती या सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या गावाने विकासकामांत कमालीचे सातत्य राखले आहे. पुढे जाऊन सुविधांत वाढ करून विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात गावाने आघाडी घेतली आहे. आरोग्य, पाणीपुरवठा, रस्त्यांबरोबरच ‘हायटेक’ सुविधांचा अवलंब करीत प्रगती साधली आहे.
धरणगुत्ती ग्रामपंचायतीची विविध सुविधांनी युक्त प्रशस्त बाग
धरणगुत्ती ग्रामपंचायतीची विविध सुविधांनी युक्त प्रशस्त बाग

कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्‍यातील धरणगुत्ती या सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या गावाने विकासकामांत कमालीचे सातत्य राखले आहे. पुढे जाऊन सुविधांत वाढ करून विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात गावाने आघाडी घेतली आहे. आरोग्य, पाणीपुरवठा, रस्त्यांबरोबरच ‘हायटेक’ सुविधांचा अवलंब करीत प्रगती साधली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर या महत्त्वाच्या बाजारपेठेच्या शहराला लागून धरणगुत्ती गाव आहे. बागायती क्षेत्र सुमारे ४६० हेक्टर तर जिरायती क्षेत्र ४५६ हेक्‍टर आहे. मी गैरव्यवहार करणार नाही, आणि तुम्हालाही करू देणार नाही असा शिरस्ताच गावातील लोकप्रतिनिधींनी ठेवला आहे. त्यामुळे धरणगुत्तीकरांचा वचक तालुक्‍यातील प्रशासनावर आहे. यामुळे गावातील लोकप्रतिनिधींना विकासकामे करताना अनेकवेळा संघर्ष करावा लागत असला तरी विकासकामे चांगली होत असल्याचा अनुभव आहे. त्यामुळेच ग्रामपंचायतीने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वी राबविले आहेत. तिमाही पाणीपट्टीतून पाणीबचत पाण्याची बचत विचारात घेऊन ग्रामपंचायतीने गेल्या तीन वर्षांपासून नळधारकांना पुरविण्यात येणाऱ्या नळाला मीटर लावण्यात आलेले आहे. यामुळे अनिर्बंध पाणीवापरावर मर्यादा आणली आहे. असे आहेत पाण्याचे दर

  • ० ते ४५ युनिटपर्यंत पाणी वापर- तिमाही ३०० रुपये
  • ४६ ते ९० युनिट- प्रति युनिट सहा रुपये
  • ९१ ते १५० युनिट- प्रति युनिट ८ रुपये
  • तिमाही बिल आकारणी केल्यानंतर ते पाच दिवसांत भरल्यास त्यावर पाच टक्के सवलत देण्यात येते. वेळेत न भरल्यास १० टक्के दंड करण्यात येतो. तिमाही बिलामुळे ग्रामपंचायतीला ठरावीक कालावधीत रक्कम मिळते. यामुळे पाणी योजनेची विद्युत बिले भरणे ग्रामपंचायतीला सहज शक्‍य होते.   साडेतीन हजार झाडांची प्रशस्त बाग सुमारे अडीच एकर क्षेत्रात डॉ.आप्पासाहेब ऊर्फ सा.रे.पाटील उद्यान उभे केले आहे. सुमारे साडेतीन हजाराहून अधिक झाडांची लागवड या ठिकाणी आहे. विशिष्ट माती वापरून बनवलेला वॉकिंग ट्रॅक, लोकांना बसण्यासाठी बाकडी, खुली व्यायामशाळा, लहान मुलांसाठी झोपाळे येथे आहेत. एरवी एखाद्या महानगरात आढळू शकणारी प्रशस्त बाग धरणगुत्तीने उभारली हे विशेष म्हणावे लागेल. सुसज्ज लिलाव गृह याच बागेत चाळीस लाख रुपये खर्च करून लिलावगृह बांधले आहे. त्यासाठी स्पर्धात्मक कृषी व लोकवर्गणीच्या माध्यमातून निधी संकलित करण्यात आला. आठवडी बाजारादिवशी लिलावगृहात भाजीपाल्याचे लिलाव होतात. प्रशस्त जागा असल्याने खरेदी व विक्री करण्यासाठी शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी ही जागा अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. पाण्यासाठी ‘आरओ सिस्टीम’ ग्रामपंचायतीच्या वतीने पंचगंगा नदीवरून पाणीपुरवठा केला जातो. तिथेही स्वच्छ पाण्याची सोय आहे. परंतु ग्रामस्थांना आणखी स्वच्छ पाणी मिळावे यासाठी ग्रामपंचायतीने सव्वा चार लाख रुपये खर्च करून ‘आरओ सिस्टीम प्लॅन्ट’ बसविला आहे. प्रत्येक कुटुंबाला दररोज वीस लिटर पाणी मिळेल अशी सोय करण्यात आली असून नागरिकांना स्मार्टकार्डस दिली आहेत. सीसीटीव्हीची नजर गावात महत्त्वाच्या सहा प्रमुख रस्त्याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे घडणाऱ्या हालचाली, येणाऱ्या जाणाऱ्यांची माहिती कॅमेऱ्यात कैद होऊन प्रशासनाला परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येते. अनेक गैरप्रकारांना आळा बसतो. लमाणवस्तीतील कॉंक्रीटीकरण गावाला लागून लमाणवस्ती आहे. हातावर पोट असणाऱ्या या लोकांना येजा करणे सोयीचे व्हावे यासाठी कॉंक्रीटचे रस्ते तयार केलेआहेत. .लोकवर्गणीतून श्री संत सेवालाल मंदिराच्या शिखराची उभारणी केली आहे. डिजीटल शाळा चौदाव्या अर्थ आयोगातून गावातील शाळा डिजिटल करण्यात आल्या आहेत. सर्व वर्गांमध्ये संगणक देण्यात आले आहेत. अंगणवाडीमध्येही डिजिटल पद्धतीने वर्ग घेऊन शैक्षणिक कामांध्येही डिजिटल सेवा आणण्यात यशस्वी प्रयत्न ग्रापंचायतीने केला आहे. संगणकाच्या माध्यमातून ऑनलाइन शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते. पंचवीसहून अधिक पुरस्कारांनी गौरव गावाने राबवलेल्या विविध उपक्रमांची दखल म्हणून राज्य, जिल्हा, तालुका पातळीवरील सुमारे पंचवीसहून अधिक पुरस्कारांनी धरणगुत्ती ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला आहे. स्वच्छ सुंदर गाव, यशवंत ग्रामपंचायत, आदर्श ग्रामसभा, ऊस पाचट अभियान, पर्यावरण संतुलीत ग्रामयोजना प्रथम वर्ष, सामाजिक एकता पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना, दलित वस्ती सुधार योजना आदीं उपक्रमांद्वारे गावाने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. गावाचे वैशिष्टयपूर्ण उपक्रम गावातील अन्य प्रमुख विकासकामांमध्ये ग्रामपंचायतीचे ताळेबंद घरपोच करणे, ग्रामपंचायतीची ‘वेबसाइट’, दप्तरांचे वर्गीकरण, कर्मचाऱ्यांची ‘बायोमेट्रीक’ हजेरी, लेक वाचवा अभियान, राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त अभियान, कामधेनू दत्तक ग्रामयोजना, कृषीप्रदर्शने, दत्त साखर कारखान्याच्या सहकार्याने कृषी सुधारणा कार्यक्रम आदी कामे वैशिष्टपूर्ण ठरली आहेत. कडक प्रशासन गावाच्या सुधारणेसाठी प्रशासनातील पारदर्शकता महत्त्वाची ठरते. माजी सरपंच शेखर पाटील यांच्या शिस्तीमुळे गावातील भ्रष्टाचार व गैरप्रकारांना आळा बसला आहे. एखादे काम सुरु झाल्यापासून ते पूर्ण होईपर्यंत कडक देखरेख ठेऊन संबंधित ठेकेदाराला कामांच्या दर्जाबाबत सुनावण्याचे कामही ते करतात. गावचे विद्यमान सरपंच बाबासो करांडे यांनाही त्यांचे मार्गदर्शन मिळतात. शेखर पाटील- ९४२३८४१४१८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com