कोल्हापूर : महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या
अॅग्रो विशेष
‘हायड्रोपोनिक’ तंत्रज्ञानावर आधारित दर्जेदार भाजीपाला
नांदेड शहरापासून जवळच असलेल्या पुयणी (ता. नांदेड) शिवारात विवेक व सुमीत या धूत चुलतबंधूंनी हायड्रोपोनीक अर्थात मातीविना शेतीचा प्रकल्प उभारला आहे. शेडनेट, पॉलिहाऊस, ‘ग्रोईंग बॅग्ज’, ‘न्यूट्रीयंट फिल्म टेक्निक व जोडीला मातीतील पिके अशा रचनेतून तीसपर्यंत देशी व परदेशी भाजीपाला येथे घेतला जात आहे. शहरातील ग्राहकांना मासिक सदस्यत्व देत
विक्री व्यवस्थाही उभारली आहे.
नांदेड शहरापासून जवळच असलेल्या पुयणी (ता. नांदेड) शिवारात विवेक व सुमीत या धूत चुलतबंधूंनी हायड्रोपोनीक अर्थात मातीविना शेतीचा प्रकल्प उभारला आहे. शेडनेट, पॉलिहाऊस, ‘ग्रोईंग बॅग्ज’, ‘न्यूट्रीयंट फिल्म टेक्निक व जोडीला मातीतील पिके अशा रचनेतून तीसपर्यंत देशी व परदेशी भाजीपाला येथे घेतला जात आहे. शहरातील ग्राहकांना मासिक सदस्यत्व देत
विक्री व्यवस्थाही उभारली आहे.
नांदेड येथील वाणिज्य शाखेचे पदवीधर विवेक धूत व त्यांचे चुलतबंधू व अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर सुमीत यांनी उच्च तंत्रज्ञान शेतीत करिअर करण्यास सुरवात केली आहे. नांदेड शहरवासीयांना पोषणमुल्यांनी भरपूर अशा देशी व परदेशी भाजीपाल्याचा पुरवठा त्यामाध्यमातून करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. नांदेड शहरासाठी नवा प्रयोग असलेल्या या शेतीला शहरातील ग्राहकांसह परिसरातील शेतकरीही भेट देऊन पाहणी करीत आहेत. नांदेड तालुक्यातील पुयणी शिवारात ‘विगन फार्म’ची स्थापना धूत बंधूंनी केली आहे. यात मातीविना म्हणजे हायड्रोपोनीक तंत्राचा आधार घेताना कोकोपीट व धानाच्या टरफलाचा (राइस हस्क) भुश्शाचा वापर केला आहे. नर्सरीत गुणवत्तापूर्ण रोपे प्राप्त होतात. सुरवातीला घराच्या छतावर दीड हजार चौरस फुटात शेड उभारून त्यात बावीस प्रकारच्या
भाजीपाल्यांचे उत्पादन घेतले. चांगले उत्पादन आल्याने प्रेरणा मिळाली. त्यानंतर चार एकर जागेत
विस्तार करण्याचे ठरवले.
असा आहे प्रकल्प
- चार एकरांपैकी साडेतीन एकर लागवड क्षेत्र
- चार पॉलीहाऊसेस एका एकरात
- दोन शेडनेटस एका एकरात
- हायड्रोपोनीक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन. काही पिके या तंत्रज्ञानाच्या तुलनेत मातीत चांगल्या प्रकारे येतात. त्यामुळे तशीही पध्दत.
- हायड्रोपोनीक तंत्रात ‘न्यूट्रीयंट फिल्म टेक्निक’ (एनएफटी) चा वापर
- एकूण सुमारे ३० प्रकारच्या भाजीपाला पिकांचे उत्पादन
- अमेरिकन सॅलड कुकुंबर, लेट्यूस, रोमन लेट्यूस, ऑरेंज कॉली फ्लॉवर, यलो बेलपेपर, रेड
- बेलपेपर, बेसिल, केल, पॉकचाय, चेरी टोमॅटो तर देशी भाजीपाल्यांमध्ये टोमॅटो, हिरवी मिरची, भरताचे व भाजीचे वांगे
- शेडनेटमध्ये कोबी, फ्लॉवर, चायनीज व रेड कॅबेज. खुल्या जागेत गाजर, मुळा, मेथी, कोथिंबीर,
- पालक, भेंडी, कारले, दोडके, दुधीभोपळा आदी.
- एकात्मिक व्यवस्थापनाद्वारे किडीचे नियंत्रण. रासायनिक कीडनाशकांच्या तुलनेत
- ट्रायकोडर्मा, मेटारायझियम, बिव्हेरिया, व्हर्टीसिलीयम, कडुनिंब आधारित घटकांचा वापर
- पाण्याचा सामु, इसी वेळोवेळी तपासण्यात येतो.
- व्यवस्थापनासाठी पाच महिला, तीन पुरुष व दोन पर्यवेक्षक आहेत.
- ठिबक सिंचनाचाही वापर केला जातो.
पाण्याची व्यवस्था
दोन विहीरी, शेततळे तसेच दोन विंधनविहिरी आहेत. ठिबक व हायड्रोपोनिक तंत्रात पाणी तुलनेने
कमी लागते. ‘एनएफटी’ पध्दत ही पालेभाज्यांसाठी खास वापरली जाते. यात पॉलीट्यूब्समध्ये
हायड्रोस्टोन्स व पाइपच्या माध्यमातून अन्नद्रव्ये देण्याची व्यवस्था केली आहे.
हायड्रोपोनीक तंत्रात प्रत्येकी तीनहजार लिटरच्या सहा टाक्या तर एनएफटी पद्धतीत एकहजार लिटरची टाकी आहे. पाण्यात विद्राव्य खतांचा संतुलित पद्धतीने वापर होतो.
सदस्य पद्धतीने विक्री
नांदेड शहरात तिमाही, सहामाही अशा प्रायोगिक पद्धतीने ग्राहकांचे सदस्यत्व तयार करण्यास सुरवात केली आहे. दहा किलो देशी व दोन किलो परदेशी असे पॅकिंग केले आहे. महिन्याला असे चार पॅक्स सदस्यांना मागणीनुसार पुरवले जातात. कुटुंबातील सदस्य संख्येनुसार प्रति पॅक दर निश्चित केला आहे. सध्या १०० पर्यंत ग्राहकांचे नेटवर्क तयार केले आहे. साधारण ६० बाय ४० फूट आकाराचे पॅकहाऊस असून प्रतवारी व पॅकिंग केले जाते. तर १२ बाय १२ फूट आकाराचे कोल्डस्टोरेजही उभारले आहे.
भांडवल उभारणी
सुमारे चार एकरांतील या प्रकल्पासाठी ६० लाख रुपयांपर्यंत भांडवल अपेक्षित असल्याचे धूत सांगतात. अर्थात शेडनेट व पॉलिहाउससाठी त्यातील ३० लाख रुपये खर्च आला आहे. ‘एनएफटी’ची दोन मजल्याची उभारणी करण्यासाठी प्रति ५० चौरस फुटासाठी ५० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो.
संपर्क- विवेक धूत - ९८२३१२३६७६
सुमीत धूत - ९८९०६८८०३३
फोटो गॅलरी
- 1 of 696
- ››