Agriculture story in marathi, diet management in cows and buffaloes | Agrowon

प्रजननक्षमता सक्षम करण्यासाठी जनावरांच्या आहाराचे नियोजन

डॉ. मंजूषा ढगे, डॉ. अनिल पाटील
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

सुयोग्य व समतोल आहारातून जनावरांना ऊर्जा, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, क्षार, जीवनसत्त्वे ही पोषणमूल्ये योग्य प्रमाणात मिळाली पाहिजेत. यामुळे शरीरातील आवश्यक त्या क्रिया पूर्ण केल्या जातात आणि याचाच परिणाम जनावरांची प्रजननक्षमता वाढण्यास मदत होते.
 
पशुप्रजनन सक्षम करण्याकरिता पशुआहार किंवा पशुखाद्याचा महत्त्वाचा सहभाग आहे. आहाराची प्रत, प्रमाण व पद्धत असे एकूण व्यवस्थापन यांचा प्रजननाशी सरळ संबंध आहे.
प्रजनन संस्थेची कार्ये

सुयोग्य व समतोल आहारातून जनावरांना ऊर्जा, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, क्षार, जीवनसत्त्वे ही पोषणमूल्ये योग्य प्रमाणात मिळाली पाहिजेत. यामुळे शरीरातील आवश्यक त्या क्रिया पूर्ण केल्या जातात आणि याचाच परिणाम जनावरांची प्रजननक्षमता वाढण्यास मदत होते.
 
पशुप्रजनन सक्षम करण्याकरिता पशुआहार किंवा पशुखाद्याचा महत्त्वाचा सहभाग आहे. आहाराची प्रत, प्रमाण व पद्धत असे एकूण व्यवस्थापन यांचा प्रजननाशी सरळ संबंध आहे.
प्रजनन संस्थेची कार्ये

  • जनावरांच्या शरीरात विविध शरीर क्रिया चालू असतात जसे की, श्वसन संस्था, पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था व प्रजनन संस्था. सर्वसाधारणपणे प्रजननसंस्था जनावरे वयात आल्यानंतर कार्यरत होते. म्हणजेच माज सुरू होणे, माजाचे चक्र सुरू राहणे, रेतन, जनावरांतील गर्भधारणा इ. होत असते.
  • कालवडीचे वजन २ ते ३ वर्षांच्या आत एकून २५० किलो झाले पाहिजे. समतोल आहाराचा योग्य पुरवठा केल्यास, कालवड १.५ वर्षाला माज दाखवते. दोन माज सोडून द्यावे व तिसऱ्या माजास रेतन करवून घ्यावे.

आहाराचे महत्त्व
प्रजनन क्षमतेच्या वाढीकरिता पशु खाद्याचा महत्त्वाचा वाटा असतो. जनावरांना आहारातून मिळणारे प्रथिने, ऊर्जा, स्निग्ध पद्धार्थ, क्षार, जीवनसत्त्वे ही जनावरांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त घटक आहेत. आहारामध्ये यांची कमतरता झाल्यास प्रजननामध्ये अडथळे निर्माण होतात. जसे की, माजाचे चक्र बंद होणे, माजाची लक्षणे क्षीण होतात, स्त्री बीज सुटत नाही, माजाचा कालावधी कमी होतो, ओजसरसाचे प्रमाण कमी होते, गर्भाशयाची कार्य क्षमता कमी होते, सतत उलटणे व काही वेळा वंधत्व येण्याची शक्यता असते. या व इतर अनेक प्रजनन क्रियेत अडथळे निर्माण होऊ शकतात. पशु आहारातील महत्त्वाच्या घटकाच्या कमतरतेमुळे जनावरांची प्रजनन क्षमता कमी होते. यासाठी जनावरांमध्ये समतोल पुरेसा योग्य प्रमाणात आहार असणे गरजेचे आहे.

पशू आहारातील घटक
१. ऊर्जा : आहारातील ऊर्जेचा व प्रजनन क्रियेचा थेट संबंध लक्षात घेता समतोल आहार देणे गरजेचे असते. ऊर्जायुक्त आहाराचा योग्य प्रमाणात पुरवठा झाल्यास चयापचय क्रिया, शरीराची वाढ, योग्य माज व गर्भधारणा, दूध उत्पादन वाढ योग्य प्रमाणात होते.
२. प्रथिने : आहारामध्ये प्रथिनाचे प्रमाण कमी असल्यास याचा उलट परिणाम प्रजनन क्रियेवरती होतो. प्रजननाचे कार्य सुरळीत चालत नाही. प्रथिनांचे प्रमाण जर आहारात व्यवस्थित राहिले तर स्त्रीबीज सुटण्याची क्रिया सुरळीत होऊन गर्भधारणा व्यवस्थित होते.
३. जीवनसत्त्वे : जनावरातील प्रजनन क्षमता वाढविण्यासाठी आहारात जीवनसत्व अ, ब, ड व ई या जीवनसत्त्वाचा मुख्यत: सहभाग असतो. जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे प्रजनन क्षमता कमी होते. जनावरे लवकर वयात न येणे, गर्भपात इ. परिणाम दिसून येतात. यासाठी आहारमध्ये जीवनसत्त्वांचे असणे गरजेचे आहे. सोबतच हिरवा व वाळलेला चारा योग्य प्रमाणात देणे गरजेचे आहे. प्रजनन व समतोल आहार या दोन्ही बाबी एकंदरीत सतत दूध उत्पादन व वर्षाला वासरू निर्माण करण्याकरिता गरजेचे आहे.
 
संपर्क ः डॉ. अनिल पाटील, ७५८८०६२५५६
(पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर) 


इतर कृषिपूरक
व्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणीभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली. सर्व बचत...
कृषी पर्यटन ः आव्हानात्मक पूरक व्यवसायवसंताच्या मनातील कृषी पर्यटनाच्या विचाराला...
ऋतुमानानुसार म्हशीतील प्रजनन व्यवस्थापनअधिक दूध उत्पादनाकरिता म्हशीमधील प्रजनन सक्षम...
जैवपुंज निर्मितीसाठी विविध कार्बन स्रोतपाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू...
जनावरांच्या आहारामध्ये पोषकद्रव्ये...दुधाळ जनावरांच्या शरीराची प्रसूतिदरम्यान झालेली...
मेंढ्यांची संवाद साधण्याची पद्धतमेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात...
मत्स्यशेतीसाठी पाण्याची गुणवत्ता...मत्स्यशेती यशस्वी होण्यासाठी मत्स्य टाक्यांची...
वयानुसार पुरवा कोंबड्यांना संतुलित खाद्यकुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७०...
फळबागेला दिली शेळीपालनाची जोडअजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश...
जनावरांतील गोचीड तापगोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच...
जाणून घ्या ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी...
शेळ्यांना द्या समतोल आहार शेळीच्या प्रजननक्षमता वाढीस आहाराचे...
मेंढीपालनाचे वार्षिक वेळापत्रकगाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नवजात...
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
आरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...
संगोपनगृहातील रेशीम कीटकांची काळजीसध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...
मत्स्यपालन : तंत्र बायोफ्लॉक उत्पादनाचे...फ्लॉकची इष्टतम पातळी ही संवर्धनयोग्य माश्यांच्या...