शेतमालाच्या विपणनातील अडचणी अन् उपाययोजना

शेतमालाला चांगला दर मिळविण्यासाठी गोदाम सुविधा वाढविणे अावश्‍यक अाहे.
शेतमालाला चांगला दर मिळविण्यासाठी गोदाम सुविधा वाढविणे अावश्‍यक अाहे.

शेतमालाच्या विपणनातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नियमन बाजार, सुधारीत गोदाम सुविधा, विपणन संशोधन अाणि वाहतूक सुविधा सुधारणे अावश्‍यक अाहे. याशिवाय सुधारीत गोदाम सुविधा, कोल्ड स्टोरेजची सुविधा सुधारणे अाणि करार शेतीतून शेतमालाच्या विपणनातील अडचणी दूर करणे शक्य अाहे. काढणीनंतर शेतमाल बाजारात विक्रीसाठी नेण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामध्ये वाहतूक सुविधांचा अभाव, गोदाम सुविधेचा अभाव, अपुरी साठवण सुविधा इ. समस्यांसोबतच अशा अनेक समस्या अाहेत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. शेतमालाच्या विपणनातील समस्या

  • वाहतूक सुविधांचा अभाव : शेती उत्पादनांच्या विपणनासाठी मुख्य समस्या म्हणजे वाहतूक, ग्रामीण क्षेत्र रस्त्यांशी प्रभावीपणे जोडलेले नाही, मोठ्या प्रमाणात उत्पादनाची नासाडी होते.
  • उत्पादनाची खराब गुणवत्ता : ही एक विपणनामधील प्रमुख अडचण आहे. उत्पादनाच्या खराब गुणवत्तेला विविध घटक कारणीभूत आहेत जसे की, हलक्या गुणवत्तेचे बी-बियाणे, लागवडीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या पारंपरिक पद्धती, कीड आणि रोग नियंत्रनाचा अभाव, तसेच हेतुपुरस्सर भेसळ करणे इत्यादी मुळे उत्पादनाची गुणवत्ता खराब होते.
  • मध्यस्थ : शेतकरी आणि उपभोक्ता यांच्यामध्ये वेगवेगळी मध्यस्थ आहेत, त्यामुळे मध्यस्थी माणूस जास्तीत जास्त नफा मिळ्वण्यामध्ये यश संपादन करतो तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्नदेखील कमी करतो.
  • ग्रेडिंगचा अभाव : वस्तूंची विक्री करण्यासाठी काही प्रमाणात ग्रेडिंग करण्यात येते.
  • अपुरी कजर् सुविधा : शेतकऱ्यांना जेवढे पाहिजे तेवढे गरजेनुसार कजर् देण्यासाठी बँकिंग सिस्टिम कमी पडते. त्यामुळे खासगी व्यक्ती आणि सावकार शेतकऱ्यांची आर्थिक शोषण तसेच लूट करतात याला सरकारची आर्थिक धोरणे तसेच बँक अधिकाऱ्यांची शेतकऱ्यांप्रती वागणूक कारणीभूत ठरते.
  • संकलन उत्पन्न समस्या : विपणन प्रक्रियेसाठी हे प्रमुख अडथळे आहेत ज्यामध्ये बाजारात प्रवेश करण्याची क्षमता असते. लहान शेतक-याहून उत्पादन घेणे हे व्यपाऱ्यांना महागडे तसेच अवघड ठरते.
  • गोदाम सुविधेचा अभाव : सरासरी शेतकऱ्यांकडे योग्य स्टोरेज सुविधा नसते. बाजारपेठेमध्ये गोदामांची सुविधासुद्धा उपलब्ध नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना आपले उत्पादन काढणीनंतर लवकरात लवकर मार्केटमध्ये नेऊन विकावे लागते, यामुळे जो भेटेल तेवढा भाव शेतकऱ्यांच्या पदरात पडतो, अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त नुकसान होते.
  • अपुरी कोल्ड स्टोरेज सुविधा ः सध्या शीतगृहांची उपलब्धता १०३.५ लाख टन आहे
  • एकूण कोल्ड स्टोरेज युनिट ३४४३ आहेत, या आकडेवारीनुसार लक्षात येते की कोल्ड स्टोरेज सुविधेचा मोठ्या प्रमाणावर अभाव शेतकऱ्यांचे नुकसान करतो, हे टाळण्यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून जास्तीत जास्त यांचा प्रचार प्रसार करून ती शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली गेली पाहिजे, त्यामुळे नुकसान कमी करण्यास मदत तर होईलच सोबत रोजगाराचा ही प्रश्न कमी होईल.
  • बाजारपेठांची माहिती : बाजारपेठेतील बाजाराची स्थिती, बाजाराची स्थिती आणि किंमत ठरविण्याबाबत शेतकरी अज्ञात असतात ही वस्तू स्थिती आहे, त्यामुळेच शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची खरी किंमत भेटतच नाही त्यामुळे नफा मिळ्वण्यामध्ये शेतकरी कमी पडतो.
  • नाशवंत गुणधर्म : नाशवंत अन्न पदार्थांच्या गुणधर्मामुळे शेतकरी त्यांच्या शेतमाल तसेच अन्न पदार्थ बाजार मध्ये नेऊन विक्री करतो.
  • सक्तीची विक्री : खरीप तसेच रब्बी पिकांचा कालावधी संपल्यानंतर बँकांची तसेच सावकार, खासगी व्यक्ती, हातावर घेतलेले पैसा लवकरात लवकर त्याची परतफेड करावी लागते, त्यामुळे शेतकऱ्यांना भेटेल त्या दरामध्ये शेतमाल व्यपाऱ्यांना, तसेच बाजारपेठांमध्ये विकावा लागतो, त्यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच परंतु कष्टाने पिकवलेल्या शेतमालापासून आर्थिक फायदा ही घेता येत नाही, त्यामुळे आर्थिक देणी देण्यासाठी मनाविरुद्ध सक्तीने शेतमालाची विक्री करावी लागते.
  • शेतमालाच्या भावातील अस्थिरता : शेतमालाच्या भाव अतिशय अस्थिर आहे आणि त्यामुध्ये अनियंत्रीत चढ-उतार त्यामध्ये होत असतात. किंमत काढमीनंतरच्या महिन्यादरम्यानच कमी होते तसेच त्यानंतर एक वरर्षानंतर त्यामध्ये वाढ होते.
  • शिक्षण : शेतमालाच्या उत्पादनांच्या विपणनात शेतकऱ्यांना शिक्षित करणे आवश्यक आहे, जेणेकरून ते आवश्यक फायदा मिळवू शकतील.
  • अनियंत्रित बाजार : बेकायदा मार्केटमध्ये चुकीचे वजन, ग्रेडिंग इत्यादीचा अभाव असल्यामुळे ही मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
  • उपाययोजना

  • नियमन बाजार
  • सुधारीत स्टोरेज सुविधा
  • मार्केट यार्डचा विस्तार
  • सहकारी विपणन
  • बाजारपेठाच्या जाळ्यांचा विस्तार
  • कोल्ड स्टोरेजची सुविधा सुधारणे
  • करार शेती
  • बाजार सुधारणा
  • एमएसपीद्वारे किंमत स्थिरता
  • पायाभूत सुविधा आणि संशोधन आणि विकासाच्या सुविधा
  • विपणन संशोधन
  • विपणन माहिती
  • वाहतूक सुविधा सुधारणे .
  • संपर्क ः गणेश शिंदे, ८३२९१२८४०४. (अन्न व्यपार व व्यवसाय व्यवस्थापन विभाग, के. के. वाघ अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com