Agriculture story in marathi, disease control in wheat crop | Agrowon

गहू पिकावरील रोग नियंत्रण

डॉ. भानुदास गमे, डॉ. बबनराव इल्हे, डॉ. सुरेश दोडके
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019

यंदाचा हंगाम आतापर्यंत गहू पिकासाठी अत्यंत पोषक राहिलेला आहे. हंगामातील किमान तापमान मागील महिन्यात अनेक ठिकाणी ५ अंश सेल्सिअसपेक्षाही कमी राहिले. निरभ्र आकाशामुळे भरपूर सूर्यप्रकाश मिळून गहू पिकाची वाढही चांगली झालेली आहे. साधारण आता गहू पोटरीत आहे किंवा नुकताच निसवलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये गहू पिकाची उत्पादकता कमी करण्यामध्ये तांबेरा आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव हेच मुख्य कारण राहू शकते. त्याच्या नियंत्रणाकडे विशेष लक्ष द्यावे.

यंदाचा हंगाम आतापर्यंत गहू पिकासाठी अत्यंत पोषक राहिलेला आहे. हंगामातील किमान तापमान मागील महिन्यात अनेक ठिकाणी ५ अंश सेल्सिअसपेक्षाही कमी राहिले. निरभ्र आकाशामुळे भरपूर सूर्यप्रकाश मिळून गहू पिकाची वाढही चांगली झालेली आहे. साधारण आता गहू पोटरीत आहे किंवा नुकताच निसवलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये गहू पिकाची उत्पादकता कमी करण्यामध्ये तांबेरा आणि इतर रोगांचा प्रादुर्भाव हेच मुख्य कारण राहू शकते. त्याच्या नियंत्रणाकडे विशेष लक्ष द्यावे.

रोगाचा प्रादुर्भाव
आपल्या राज्यात दोन प्रकारच्या तांबेरा रोगांचा गव्हावर प्रादुर्भाव होतो. सुरवातीच्या काळात नारंगी तांबेरा व नंतरच्या काळात म्हणजेच तापमान वाढल्यानंतर साधारण फेब्रुवारी महिना संपत असताना काळा तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होतो. गहू पिकामध्ये तांबेरा प्रादुर्भाव झाल्यानंतर दुर्लक्ष केल्यास ८० ते १०० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. सध्या मध्येच येणारे ढगाळ हवामान, वातावरणात भरपूर आर्द्रता अशा वातावरणामध्ये तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. गहू पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना प्रादुर्भाव झाल्यास गव्हाच्या दाण्यांवर सुरकुत्या पडून त्याचे नुकसान होते.
नारंगी किंवा पानावरील तांबेरा
रोगकारक बुरशी ः पक्सीनिया ट्रीटीकी
प्रसार ः हवेद्वारे वाहून आलेल्या बुरशीच्या बिजाणुंमुळे.
अनुकूल वातावरण ः १५ ते २५ अंश सेल्सिअस तापमान व पानावर किमान ३ तास दव साठल्यास प्रादुर्भाव वाढतो.

लक्षणे
प्राथमिक अवस्थेत नारंगी तांबेरा प्रामुख्याने पानाच्या वरच्या भागावर दिसून येतो. रोगाची लागण झाल्यावर पानावर गोलाकार ते अंडाकृती आकाराचे लहान लहान ठिपके दिसून येतात. अनुकूल हवामानात ठिपक्यांच्या जागी असंख्य बीजाणू तयार होऊन ठिपक्यांचा रंग नारंगी ते गर्द नारंगी दिसू लागतो. अशा रोगग्रस्त पानावरून बोट फिरवल्यास नारंगी रंगाची पावडर बोटावर दिसून येते. फुलोऱ्यापूर्वीच्या अवस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात ८० टक्क्यांपर्यंत, तर बाल्यावस्थेत प्रादुर्भाव झाल्यास १०० टक्क्यांपर्यंत घट येते.

काळा किंवा खोडावरील तांबेरा
रोगकारक बुरशी ः पक्सीनिया ग्रामिणी ट्रीटीकी
प्रसार ः हवेद्वारे वाहून आलेल्या बिजाणुंमुळे
अनुकूल वातावरण ः पानावर किमान ६ ते ८ तास ओलावा किंवा दव साचलेले असल्यास व तापमान १५ ते २४ अंश सेल्सिअस असल्यास रोगाची लागण होते. मात्र तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत गेल्यावर रोगाचा प्रादुर्भाव खूपच झपाट्याने वाढतो. काळा तांबेराच्या वाढीसाठी नारंगी तांबेरापेक्षा साधारण ५.५ अंश सेल्सिअस जादा तापमानाची गरज असते. हा बुरशीजन्य रोग आपल्या देशात मध्य, पूर्व व दक्षिण भागात विशेषतः हिवाळ्यातील तापमान उत्तर भागाच्या तुलनेत जास्त असलेल्या ठिकाणी आढळून येतो.
लक्षणे ः या रोगाचा प्रादुर्भाव पानाच्या खालच्या व वरच्या बाजूवर होतो. मात्र अनुकूल हवामानात रोगाचा प्रादुर्भाव खोडावर, देठावर, ओंबीवर तसेच कुसळावर देखील आढळून येतो. पानावर रोगाचा प्रादुर्भाव होताच अंडाकृती ते लंब वर्तुळाकार आकाराचे हरीतद्रव्य नष्ट झालेले लहान ठिपके दिसून येतात. कालांतराने त्या ठिकाणी विटकरी रंगाच्या बुरशी बीजाणूची पावडर दिसून येते. रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर काळा तांबेराचा प्रादुर्भाव ओंबी व कुसळांवरही दिसू लागतो. अनुकूल हवामानात पिकाच्या बाल्यावस्थेत रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास मोठ्या प्रमाणात नुकसान होते. गव्हाच्या दाण्यांना सुरकुत्या पडून त्याच्या झिऱ्या होतात. १०० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते.

रोगाचे व्यवस्थापन

  • तांबेरा रोगास प्रतिकारक्षम गहू वाणांची पेरणी करावी. त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून प्रसारित वाण ः फुले समाधान, नेत्रावती, त्र्यंबक, एन.आय.ए.डब्लू. ३४, गोदावरी, पंचवटी.
  • शिफारसीइतक्याच पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. गव्हाला जास्त पाणी दिल्यास पिकात सतत ओलावा टिकून राहतो व आर्द्रतेमुळे रोगाचे प्रमाण वाढते. विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणेच रासायनिक खतांच्या मात्रा (नत्र १२० ः स्फुरद ६० ः पालाश ४० किलो) द्याव्यात. युरिया खताचा वापर शिफारशीपेक्षा जास्त प्रमाणात केल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.
  • तांबेरा रोगास बळी पडणाऱ्या वाणावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. असा प्रादुर्भाव दिसताच फवारणी प्रति लिटर पाणी
  • मॅन्कोझेब ३ ग्रॅम
  • आवश्यकता भासल्यास पुढील फवारणी पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने करावी. 

इतर तृणधान्ये
बाजरी मूल्यवर्धनातून वाढवा नफाबाजरीच्या पिठाचा वापर इतर पिठात मिसळून केल्यास...
आरोग्यदायी नाचणीनाचणीमध्ये कॅल्शियमबरोबरीने लोह, नायसीन, थायामीन...
असे करा ज्वारीवरील खोडकिडीचे नियंत्रण..ज्वारी हे मानवी खाद्य आणि पशुखाद्यासाठी कडबा अशा...
असे करा गव्हावरील तांबेरा रोगाचे...गहू पिकाचा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटून गेले...
असे करा ज्वारी, गव्हावरील खोडमाशीचे...रब्बी हंगामातील ज्वारी व गहू पिकावर खोडमाशीचा...
कृषी सल्ला : तूर, हरभरा, ज्वारी, कांदा...तूर शेंगा पक्वतेची अवस्था शेंग माशी, घाटे अळी...
असे करा गहू पिकावरील खोडमाशी व मावा...गहू पिकात बुटक्या आणि मध्यम बुटक्या वाणांचा...
उशिरा गहू पेरणीसाठी जाती व नियोजनया वर्षी परतीच्या पावसाने अधिक काळ मुक्काम...
नियोजन गव्हाच्या उशिरा पेरणीचे बागायत उशिरा पेरणीची शिफारस १६ नोव्हेंबर ते १५...
गहू पिकावरील किडींचे वेळीच करा नियंत्रणगहू पिकांच्या उत्पादनात घट येण्यामध्ये किडींचा...
आहारात असावी आरोग्यदायी बाजरीगहू खाण्याचे प्रमाण वाढत गेल्याने ज्वारी, बाजरी,...
मित्रबुरशींच्या संवर्धनातून लष्करी...सध्या राज्याच्या विविध भागात अनुकूल हवामानामुळे...
पेरणी पद्धतीने भात लागवडभाताची लागवड १५ जुलै पर्यंत पूर्ण करावी. दोन...
ज्वारी वाणाची विविधता : मूल्यवर्धनातून...कित्येक वर्षांपासून शेतकऱ्यांनी ज्वारीचे विविध...
मका लागवड तंत्रज्ञानपेरणी     खरीप हंगाम ः १५...
तयारी खरिपाची : भात लागवडीचे सुधारित...भारतातील सुमारे २/३ लोकांच्या दररोजच्या आहारात...
आहारात असावी आरोग्यदायी ज्वारीज्वारीमध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. ॲनिमियाचा...
गहू पिकावरील रोग नियंत्रणयंदाचा हंगाम आतापर्यंत गहू पिकासाठी अत्यंत पोषक...
गहू पिकावरील कीड नियंत्रणगहू पिकावर सध्या मावा, तुडतुडे, कोळी अशा किडींचा...
गहू पिकावरील मावा, तुडतुडे किडींचे...गहू पिकावरील मावा आणि तुडतुडे या किडींवर वेळीच...