फुलांना भेट देणाऱ्या किटकांचा मागोवा घेणे आता नव्या तंत्रामुळे सुलभ होणार आहे. छायाचित्रात टॅचनिड माशी (शा. नाव ः Phasia hemiptera).  (स्रोत ः ओले मार्टिन.)
फुलांना भेट देणाऱ्या किटकांचा मागोवा घेणे आता नव्या तंत्रामुळे सुलभ होणार आहे. छायाचित्रात टॅचनिड माशी (शा. नाव ः Phasia hemiptera). (स्रोत ः ओले मार्टिन.)

फुलांना भेट देणाऱ्या किटकांचे डीएनए पुरावे मिळवणे शक्य

किटकांनी फुलांना भेट दिल्यानंतर तिथे सूक्ष्म असे डीएनए पुरावे राहत असल्याचे आर्हास विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. अशा डीएनए चे पुरावे मिळवण्यासाठी इडीएनए ही खास पद्धत त्यांनी विकसित केली आहे. या पद्धतीने किटक आणि वनस्पतीतील संबंधाचा अभ्यास करणे व नोंदवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. यातून धोक्यामध्ये असलेल्या परागवाहकांबरोबरच (उदा. मधमाशा, फुलपाखरे) वनस्पतींसाठी त्रासदायक ठरणाऱ्या किडींच्या प्रजातींचाही मागोवा घेता येणार आहे. फुलांनी बहरलेल्या गवताळ प्रदेशांमध्ये किटकांच्या शेकडो प्रजाती भेट देत असतात. त्या फुलातील आपले खाद्य गोळा करतात. मात्र, फुलांना भेट दिलेल्या किटकांचा माग ठेवणे सध्या तसे अवघडच ठरते. त्यासाठी डेन्मार्क येथील आर्हास विद्यापीठातील जैवशास्त्र विभागातील सहयोगी प्रो. फिलिप फ्रान्सिस थॉम्सन यांनी इ डीएनए (एन्व्हायन्मेंटल डीएनए) ही पद्धत विकसित केली आहे. त्याद्वारे गुंतागुंतीच्या माती, पाणी नमुन्यातील डीएनएचे सुसूत्रीकरण करणे शक्य होणार आहे. त्यातून पर्यावरणातील प्रजातींच्या वर्तनाची माहिती मिळवणे सोपे होणार आहे. पूर्वी तलाव आणि समुद्रातील पाणी नमुन्यांचे विश्लेषण करताना त्यात किटक, उभयचर, मासे आणि व्हेल माशांचे डीएनए अवशेष वेगळे करावे लागत असे. प्रो. फिलिप फ्रान्सिस थॉम्सन यांच्या विद्यार्थिनी पोस्टडॉक संशोधिका एव्हा एगलिंग सिग्सगार्ड यांनी सात वेगवेगळ्या वनस्पती प्रताजींच्या ५० फुलांचे इडीएनए विश्लेषण केले आहे. त्याविषयी माहिती देताना फिलिप थॉम्सन यांनी सांगितले, की मी गेल्या काही वर्षांपासून पाणी आणि माती नमुन्यातील डीएनएचा अभ्यास करत आहे. आणि आपण जेवढा विचार त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात पर्यावरणामध्ये डीएनए सामान्य स्थितीमध्ये आढळतात. आम्ही या इडीएनए चाचणीद्वारे किटक आणि फुलांतील संबंधांचा अभ्यास केला. निष्कर्ष

  • इडीएनए चाचण्यांचे निष्कर्ष अत्यंत आश्चर्यकारक होते. विश्लेषणात फुलाला किमान १३५ विविध प्रजातींनी भेट दिली. त्यात फुलपाखरे, पतंग, मधमाशा, माश्या, भुंगेरे, मावा, कोळी व अन्य किटकांचा समावेश होता. ही यादी वाढतच जाणारी आहे. त्यामुळे फूल हे डीएनए गोळा करण्याचे एक महत्त्वाचा घटक ठरू शकतो. फुलाला भेट देणाऱ्या किटकांच्या डीएनएच्या अभ्यासातून त्यांच्यातील नेमक्या संबंधाचाही अभ्यास सोपा होणार आहे.
  • हे संशोधन जर्नल इकॉलॉजी अॅण्ड इव्हॅल्युशन मध्ये प्रकाशित झाले आहे.
  • उपयोग

  • किटकांच्या एकूण प्रजातींच्या कार्यक्षम निरीक्षणासाठी
  • विशिष्ट किटक आणि वनस्पती यातील संबंधाच्या अभ्यासासाठी उपयुक्त तंत्र.
  • धोक्यात असलेल्या जंगली परागवाहकांच्या व्यवस्थापनासाठी.
  • पिकांना त्रासदायक ठरणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी. 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com