Agriculture story in marathi, dom drayer for fruit and vegetable drying | Agrowon

फळे, भाजीपाला वाळवणीसाठी ‘डोम ड्रायर’
योगेश कुलकर्णी, रणजित शानबाग
मंगळवार, 29 जानेवारी 2019

बाजारपेठेतील गुणवत्तापूर्ण उत्पादनांची मागणी पाहता शास्त्रीय पद्धतीने अन्नपदार्थ वाळवणे गरजेचे आहे. यामुळे नैसर्गिक रंग, चव, स्वाद आणि अन्नघटक टिकवता येतात. यासाठी डोम ड्रायर फायदेशीर ठरतो.
 
फळे-भाजीपाल्याच्या उत्पादनापैकी सुमारे ३० ते ३५ टक्के उत्पादन अयोग्य हाताळणी, साठवणूक आणि वितरणामुळे वाया जाते. शेतमालाच्या नासाडीमुळे शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य मोबदला मिळत नाही, त्याचबरोबरीने राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि बहुमोल अन्नद्रव्यांची हानी होते.

बाजारपेठेतील गुणवत्तापूर्ण उत्पादनांची मागणी पाहता शास्त्रीय पद्धतीने अन्नपदार्थ वाळवणे गरजेचे आहे. यामुळे नैसर्गिक रंग, चव, स्वाद आणि अन्नघटक टिकवता येतात. यासाठी डोम ड्रायर फायदेशीर ठरतो.
 
फळे-भाजीपाल्याच्या उत्पादनापैकी सुमारे ३० ते ३५ टक्के उत्पादन अयोग्य हाताळणी, साठवणूक आणि वितरणामुळे वाया जाते. शेतमालाच्या नासाडीमुळे शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य मोबदला मिळत नाही, त्याचबरोबरीने राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि बहुमोल अन्नद्रव्यांची हानी होते.
फळे-भाजीपाल्याचे निर्जलीकरण करून ते जास्त दिवस साठवण्याची पद्धत जुनी आहे. उन्हाळ्यात बटाट्याचा किस, काही पालेभाज्या वाळवून साठवून वर्षभर वापरल्या जातात. गेल्या काही वर्षांत फळे-भाजीपाला वाळवून विक्री करणे, हा मोठा व्यवसाय तयार झाला आहे. वाळवलेली फळे, भाजीपाला जास्त दिवस टिकून विविध प्रकारच्या अन्नपदार्थामध्ये वापरता येतात. बाजारपेठेतील गुणवत्तापूर्ण उत्पादनांची मागणी पाहता शास्त्रीय पद्धतीने अन्नपदार्थ वाळवणे गरजेचे आहे. यामुळे नैसर्गिक रंग, चव, स्वाद आणि अन्नघटक टिकवता येतात.
 
असा आहे डोम ड्रायर 

  • आपल्याकडे मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध असल्याने सौरऊर्जेचा उपयोग करून, शेतीमालाचे निर्जलीकरण करणे फायदेशीर आहे. यासाठी कमीत-कमी खर्चात उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन मिळविण्यासाठी योग्य गुणवत्तेचे वाळवणी यंत्र वापरावे लागेल.
  • विज्ञान आश्रमामध्ये सौरऊर्जेचा प्रभावी वापर करून फळे-भाजीपाला वाळवण्यासाठी डोम ड्रायरची निर्मिती करण्यात आली आहे. बाजारातील इतर ड्रायरपेक्षा हा ड्रायर पूर्णपणे वेगळ्या आकाराचा आहे. हा ड्रायर अर्धघुमटाकार आकाराचा म्हणजे डोम रचनेचा आहे.
  • विशिष्ट आकारामुळे दिवसभर डोमला सूर्यप्रकाश मिळतो. सूर्याची स्थिती दिवसभर बदलत असल्याने इतर आकाराच्या ड्रायरमध्ये मर्यादित काळातच ड्रायरवर सूर्यप्रकाश पडतो. मात्र डोम आकाराच्या ड्रायरमध्ये सर्वात जास्त सूर्यप्रकाश ग्रहण होतो. डोम आकाराला सर्व बाजूंनी साधारणपणे सारखाच सूर्यप्रकाश मिळतो. ड्रायरची कमीत कमी बाजू सावलीत राहते.
  • वाळवण्यासाठीच्या जागेचा विचार केला, तर तुलनात्मकदृष्ट्या डोमला कमी पृष्ठभाग लागतो. त्यामुळे डोम ड्रायरला कमी पत्रा लागतो. त्यामुळे कमी सामानामध्ये ड्रायर तयार होतो.
  • एखादी गोष्ट वाळवण्यासाठी जास्त तापमान मिळवण्यासाठी जास्त सूर्यप्रकाश ग्रहण करणे महत्त्वाचे असते. तसेच वाळवणी यंत्रामध्ये हवेचा प्रवाहदेखील खूप महत्त्वाचा असतो. या दृष्टीने ड्रायरचा अर्धगोलाकार जास्त फायद्याचा ठरतो. ड्रायरमध्ये सर्व बाजू सारख्या असल्याने हवा सर्व बाजूने सारखीच वाहते. त्यामुळे काही भागामध्ये उष्णता कमी पडणे किंवा बाष्प अडकून राहणे यासारख्या समस्या येत नाहीत. असा फायदा चौकोनी, त्रिकोणी किंवा इतर कोणत्याही आकाराच्या ड्रायरमध्ये मिळत नाही. शंकू आकाराच्या ड्रायरमध्ये हा फायदा मिळाला तरी, सौरऊर्जेचा प्रभावीपणे वापर करता येत नाही.
  • ड्रायरमध्ये तापमान जास्त झाले तर पदार्थाचा रंग उडून जाण्याचा किंवा वास, चव बदलण्याचा धोका असतो. त्यामुळे डोम ड्रायरमध्ये सौर फॅन बसविलेला आहे. तापमानानुसार फॅनचा वेग स्वयं नियंत्रित होतो.

डोम ड्रायर वापरण्याचे प्रयोग 

  • डोम ड्रायरमध्ये कांदा, मेथी, पुदिना, शेवग्याची पाने, डाळिंबाचे दाणे वाळवण्याचे प्रयोग करण्यात आले.
  • ड्रायरमध्ये २५ किलो कापलेला कांदा १२ तासांमध्ये पूर्णपणे वाळवता येतो. प्रतिकिलो ओल्या कांद्यापासून १०० ग्रॅम कांदा पावडर बनते. त्यासाठी १३.६ रुपये इतका खर्च येतो. भांडवली गुंतवणूक आणि प्रतिकिलो वाळवण क्षमतेचा विचार केल्यास बाजारातील इतर ड्रायरच्या तुलनेत डोम ड्रायर हा किमान ५० टक्के किफायतशीर आहे.
  • विद्युत ड्रायर किंवा मोठे ड्रायर वापरणाऱ्या उद्योजकांसाठी पूर्व वाळवणी प्रक्रियेसाठी हा ड्रायर उपयुक्त ठरतो.
  • साधारणपणे २५ किलो क्षमता असणाऱ्या डोम ड्रायरची किंमत सुमारे ७५,००० रुपये आहे.

संपर्क ः योगेश कुलकर्णी, ९७३०००५०१६
(विज्ञान आश्रम, पाबळ, जि. पुणे) 

इतर टेक्नोवन
खवा बनविण्याची सुधारित पद्धतपारंपरिक पद्धतीमध्ये खवा बनविण्यासाठी सातत्याने...
यंत्राने करा पेरणी, आंतरमशागतसध्या खरीप हंगामातील पेरणी सुरू झाली आहे. काही...
गुळासाठी नवीन ऊस वाण : फुले ०९०५७ गूळ निर्मिती योग्य ऊस जातीची लागवड, वेळेवर तोडणी...
लेट्यूस पिकासाठी स्वतः शिकणारी यंत्रेकृत्रिम बुद्धीमत्तायुक्त तंत्रज्ञान किंवा यंत्रे...
पशुखाद्यामध्ये सागरी वनस्पती करतील...पशुपालनाद्वारे उत्सर्जित होणाऱ्या मिथेनचे प्रमाण...
बायोगॅसने दिली विविध यंत्रांना ऊर्जाबीड जिल्ह्यातील महाजनवाडी येथील जगदाळे कुटुंबाने...
काजू प्रक्रिया लघू उद्योगकाजू प्रक्रियेमध्ये उद्योजकतेच्या मोठ्या संधी...
सोयाबीन पेरणीसाठी बीबीएफ तंत्र फायदेशीररुंद वरंबा सरी पद्धतीत सोयाबीन पेरणी वरंब्यावर...
नियंत्रित तापमानामध्ये प्रयोग करणे झाले...विविध प्रकारच्या तापमानाचे पिकांवरील परिणाम...
मखना लाह्यानिर्मिती प्रक्रियेचे केले...बिहारसह पू्र्वेकडील राज्यांमध्ये तलावामध्ये...
कमी खर्चिक, बंदिस्त पद्धतीचे शेतमाल...कोल्हापूर येथील निसर्ग मित्र परिवार संस्थेने...
दूध संकलन केंद्रासाठी आवश्यक उपकरणेदूध व्यवसायाच्या संकलन, प्रक्रिया व विक्री या तीन...
लसणाच्या साठवणीसाठी कमी खर्चाची साठवण...राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये लसूण हे पीक...
मधुमक्यावरील प्रक्रियामधुमक्याच्या काढणीनंतर पुढील प्रक्रिया या त्वरीत...
सुधारित पेरणी यंत्रांमुळे वाचतील कष्टखरीप हंगामातील ज्वारी, कापूस, सोयाबीन, तूर, मूग,...
मलमूत्र प्रक्रियेतून विद्युतनिर्मितीचे...बायोइलेक्ट्रिक शौचालय हे मायक्रोबिअल इंधन सेल...
यंत्राने काढा जांभळाचा गरकृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागाने जांभूळ गर...
शेती नियोजनामध्ये हवामान सल्‍ला उपयुक्‍तकृषी हवामान सल्‍ल्‍याचा उपयोग...
यंत्रावर तयार करा हातसडीचा तांदूळहातसडी तांदळाविषयी वाढणारी जागरूकता आणि मागणीचा...
पीक लागवडीसाठी इन्कलाइंड प्लेट प्लांटरपारंपरिक पद्धतीच्या पेरणीमुळे रोपांच्या विरळणीचा...