ड्रोण करणार परागीकरण

परागीकरण करणारा ड्रोण
परागीकरण करणारा ड्रोण

मोठ्या फळबागांमध्ये परागीकरण करण्यासाठी अमेरिकेतील एका कंपनीने खास ड्रोण विकसित केला आहे. या ड्रोणच्या चाचण्या चेरी, बदाम आणि सफरचंदाच्या बागांमध्ये घेण्यात आल्या. गेल्या तीन वर्षांपासून कंपनीने या फळपिकांमध्ये परागीकरण करण्यासाठी ड्रोणच्या चाचण्या घेतल्या. यामध्ये असे दिसून आले की, योग्य परागीकरणामुळे बदाम आणि चेरीच्या फळधारणेत वाढ झाली. काही प्रमाणात सफरचंदाच्या दर्जेदार फळांचे उत्पादन वाढण्यास मदत मिळाली. परागीकरण करताना अनुकूल वातावरण असेल तर चेरी आणि बदामाच्या परागीकरणामध्ये साठ टक्के यश मिळाले आहे. यामुळे बागेत मधमाश्‍यांची पुरेशी संख्या नसेल किंवा कडक थंडीचा कालावधी असला तरी ड्रोनच्या साहाय्याने परागीकरण करणे फायदेशीर ठरणार आहे. त्यातून अपेक्षित फळधारणा शक्य होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com