agriculture story in marathi, Dulat family with their integration has developed multiple crop farming.g | Agrowon

पाच भावांच्या एकीतून पुढारलेली व्यावसायिक शेती

संतोष मुंढे
शनिवार, 15 फेब्रुवारी 2020

ब्राह्मणी गराडा (जि. औरंगाबाद) येथील दुलत कुटुंबातील पाच भावांची एकत्रित शेती समस्त शेतकऱ्यांसाठी आदर्श आहे. आपल्या ३६ एकरांत वर्षभर विविध भाजीपाला पिके, हंगामनिहाय त्यांचे उत्कृष्ट नियोजन, सर्वांचे एकत्रित बळ, पाणी, मजूर व्यवस्थापन, भाडेतत्त्वावर शेती घेणे आदी विविध वैशिष्ट्यांमधून दुलत यांनी शेतीतून संपन्न समृद्धी निर्माण केली आहे.

ब्राह्मणी गराडा (जि. औरंगाबाद) येथील दुलत कुटुंबातील पाच भावांची एकत्रित शेती समस्त शेतकऱ्यांसाठी आदर्श आहे. आपल्या ३६ एकरांत वर्षभर विविध भाजीपाला पिके, हंगामनिहाय त्यांचे उत्कृष्ट नियोजन, सर्वांचे एकत्रित बळ, पाणी, मजूर व्यवस्थापन, भाडेतत्त्वावर शेती घेणे आदी विविध वैशिष्ट्यांमधून दुलत यांनी शेतीतून संपन्न समृद्धी निर्माण केली आहे.

ब्राह्मणी गराडा (जि. औरंगाबाद) येथील शिवसिंग दुलत यांची भरतसिंग, धरमसिंग, पदमसिंग, प्रतापसिंग व रामधन ही पाच विवाहित मुले. शिक्षणाची इच्छा असूनही परिस्थिती जेमतेम असल्याने दहावी- बारावीपुढे कुणाला शिक्षण घेणे शक्‍य झाले नाही. पण कायम एकत्र राहून शेतीतच मोठं करिअर घडविण्याचा निर्णय सर्व बंधूंनी घेतला.

२७ जणांचं एकत्रित कुटूंब
वडील शिवसिंग व आई रूख्मनबाई यांनी पाचही भावांना किंवा संपूर्ण कुटूंबाला एकत्र बांधून ठेवलं आहे.
सर्वजण एकाच घरात गुण्यागोविंदाने राहतात. एकमेकांच्या समन्वयाने निर्णय घेतात.

कुटूंबाची शेती

 • वडिलोपार्जित साडेसहा एकर शेती आहे. मोठ्या कष्टाने १९८० ते २०१० दरम्यान शेतीतील उत्पन्नातूनच थोडी-थोडी शेती खरेदी करत क्षेत्र ३६ एकरांवर पोचविले. 'एकीचे बळ' लक्षात आल्याने विस्तारलेल्या या शेतीला दहा वर्षांपासून २५ एकर ठोक्‍याच्या शेतीची जोड दिली आहे.
 • सुमारे १९९५ पर्यंत पारंपरिक पिके घेतली जायची. शेती अधिक उत्पन्नक्षम होण्यासाठी
 • पीकबदल करायचा निर्णय घेतला.

सध्याची पीकपद्धती

मुख्य पीक आले

 • - सन २००० पासून एक एकरापासून सुरू केलेली लागवड आता ८ ते १० एकरांवर
 • एकरी १२० ते १५० क्‍विंटल उत्पादन
 • भाजीपाला केंद्रित शेती
 • टोमॅटो - जूनमध्ये आठ ते दहा एकर, ऑगस्ट - ७ ते ८ एकर व
 • फेब्रुवारीत ५ ते ६ एकर.
 • दरवर्षी तीन टप्प्यात असल्याने जवळपास वर्षभर उत्पादन
 • त्यातून दरांची जोखीम कमी होते.
 • त्याचे एकरी उत्पादन - १४०० ते १५०० क्रेट
 • भरताचे जांभळे वांगे
 • एप्रिल लागवड - सात ते आठ एकर - उत्पादन- ३० ते ३५ टन
 • सप्टेंबरमध्ये दुसरी लागवड - (८ ते १० एकर)- उत्पादन- ४० टनांपर्यंत
 • एप्रिलमध्ये किलोला १५ ते २० रुपये दर, सप्टेंबर हंगामात ते तुलनेने कमी. मात्र
 • उत्पादकता जास्त मिळत असल्याचा फायदा
 • शेवगा- - पहिल्यांदाच दहा एकरांवर केलेले शेवग्याचे पीक वांग्यानंतर दुसरे पसंतीचे पीक.
 • वीस एकरांपर्यंत विस्तार. एकरी दहा ते बारा टनांपर्यंत उत्पाद.
 • १० पासून ते ६० रुपये प्रति किलोपर्यंत दर मिळतात.
 • डांगर
 • दोन एकरांपासून सुरू केलेले हे पीक ५ ते ७ एकरांपर्यंत
 • एकरी १५ ते २० टन उत्पादन. ५ ते १० रुपये प्रति किलोपर्यंत दर
 • टोमॅटो काढणीपूर्वी दोडका व कारले
 • उन्हाळी टोमॅटोच्या काढणीआधी एक महिना त्याच शेतात चार एकरांत दोडका तर दोन एकरांत कारले
 • दोडक्‍याचे एकरी ४०० क्रेट (१५ किलोचा क्रेट) तर २० ते५० रुपये प्रति किलो दर
 • कारल्याचे एकरी ४०० ते ५०० क्रेट उत्पादन. २५ ते ३० रुपये दर
 • मिरची
 • एप्रिलमध्ये पाच ते सात एकर. एकरी ८ ते १० टन उत्पादन.
 • कलिंगड, कांदा
 • सन २०१८ प्रथम पाच एकरांत कलिंगड. त्यातून एकरी दहा टन उत्पादन
 • सन २००३ पासून कांदा घेण्यास सुरुवात. दरांत चढउतार होत असले तरी साठवणुकीसाठी २०१६ १०० टन क्षमतेची कांदाचाळ तयार केली. 
 • सिंचनाच्या सुविधा

संपूर्ण शेती सिंचनाखाली आणण्यासाठी वडिलोपार्जीत शेतीतील दोन विहिरींना २०१५ नंतर तीन विहिरींची जोड दिली. सन २०१२ च्या दुष्काळात तीन बोअरवेल्स, एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे घेतले. तीव्र उन्हाळ्याच्या दोन महिन्यांच्या काळात त्याचा वापर होतो. एका विहिरीतील पाणी दुसऱ्या विहिरीत वा शेततळ्यात नेता येईल तसेच शेततळ्यातील पाणी विहिरीत गरजेनुसार नेता येईल, अशी पाइपलाइनची व्यवस्था केली. करारशेतीतही पाण्याची व्यवस्था असेल अशाच क्षेत्रावर भर दिला. पाण्याचे महत्त्व ओळखून संपूर्ण क्षेत्र ठिबकखाली आणले.

बाजारपेठ व्यवस्था
स्थानिकसह सुरतसह मुंबईच्या वाशी मार्केटला भाजीपाला जातो. सुमारे २५ वर्षांपासून टोमॅटो घेणारे दुलत बंधू पूर्वी अन्य शेतकऱ्यांसोबत आपला माल भाड्याने केलेल्या वाहनातून पाठवायचे. आता त्यांनी स्वत:ची दोन वाहने घेतली आहेत. भरताच्या वांग्यांची लागवड केल्यापासून अलीकडील सहा वर्षांत वाशी मार्केटमधील व्यापाऱ्यांशी ‘लिंक’ जोडली गेली. ज्या शेतकऱ्याचे हे वांगे पाहून दुलत बंधू त्याकडे वळले त्यानेच त्यांना हे मार्केट व संबंधीत व्यापाऱ्याशी जोडणी करून दिली. आता बहूतांश माल वाशी मार्केटलाच जातो.

दुलत यांच्या शेतीची अन्य वैशिष्ट्ये

 • दोन ट्रॅक्‍टर्स व त्यावर चालणारी यंत्रे
 • छोटा ट्रॅक्‍टरचलित ब्लोअर
 • प्रतवारी व बॉक्‍स पॅकिंगचा वापर
 • शिक्षण घेणारी घरची मुलेही वेळेनुसार करतात शेतीत काम

पहाटे साडेचार वाजता दिवस सुरू
पद्मसिंग सांगतात की माझा दिवस पहाटे साडेचार वाजता सुरू होतो. आम्ही पाचही बंधू संध्याकाळी
आठ वाजेपर्यंत शेतीकामांमध्येच व्यस्त असतो. अन्य कोणत्याही रिकाम्या चर्चेत वा कामांत वेळ वाया घालवत नाही. आम्हाला कसलेही व्यसन नाही. केवळ काम हेच व्यसन आम्हाला लागले आहे.

संपर्क : पद्मसिंग दुलत - ९४२२५४५८६३

 


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
कर्जमाफीची पहिली यादी आज होणार जाहीर :...मुंबई : आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर...
राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र...मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत...
कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची...मुंबई : आजपासून (ता. २४) सुरू होणारे अर्थसंकल्पी...
अकरा लाख टन रिफाइंड पामतेल आयातीला...नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड पामतेलाची...
कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू...नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी...
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाजपुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व...
‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढपुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन...
विदर्भात पावसाची शक्यतापुणे: पूर्व आणि पश्चिमेकडील वाऱ्यांचा संगम होत...
सांगली जिल्ह्यातून सव्वादोन हजार टन...सांगली ः दुष्काळ, अवकाळी आणि अतिवृष्टीच्या...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
ई-पीक पाहणी प्रकल्पाची प्रायोगिक...सिल्लोड : हंगामनिहाय किती क्षेत्रावर कोणत्या...
अठ्ठेचाळीस कृषी महाविद्यालयांची...पुणे : विद्यार्थ्यांकडून लक्षावधी रुपये शुल्क...
सिंधुदुर्गच्या पूर्व पट्ट्यात आंब्याला...सिंधुदुर्ग: फेब्रुवारी महिना संपत आला तरी...
पशुधनाचे मार्चमध्ये होणार लसीकरणपुणे ः गाई, म्हशी, शेळ्या, कालवडी आजारी पडू नये...
निर्धारित निर्यातीनंतरच बफर स्टॉकवरील...नवी दिल्ली: देशातील ज्या साखर कारखान्यांनी...
खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी...अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण...
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...