agriculture story in marathi, Durgavali family has raised their income through poultry business. | Page 2 ||| Agrowon

पोल्ट्री व्यवसायातून कुटुंब झाले आर्थिक स्वयंपूर्ण

राजेश कळंबटे
मंगळवार, 24 ऑगस्ट 2021

फळबागायती आणि भातशेती सामायीक. त्यामुळे मालगुंड (जि. रत्नागिरी) येथील दीपक दुर्गवळी यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कुकुटपालन व्यवसाय सुरू केला. लेअर पक्षी व पुढे ब्रॉयलर पक्षांचे संगोपन सुरू केले.  

फळबागायती आणि भातशेती सामायीक. त्यामुळे मालगुंड (जि. रत्नागिरी) येथील दीपक दुर्गवळी यांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कुकुटपालन व्यवसाय सुरू केला. सुरूवातीला लेअर पक्षी व पुढे ब्रॉयलर पक्षांचे संगोपन सुरू केले. चिकाटी व सातत्य ठेवत स्वतःचे चिकन सेंटरही सुरू केले. आज सर्व सदस्यांच्या एकत्रित कामांमधून हे कुटुंब या व्यवसायातून आर्थिक स्वयंपूर्ण झाले आहे.
 
रत्नागिरी जिल्ह्यात व एकूणच कोकणात आंबा, काजू, सुपारी व नारळ या फळपिकांबरोबर प्रक्रिया उद्योगातही बागायतदार कार्यरत आहेत. मालगुंड (ता. जि. रत्नागिरी) हे असेच रत्नागिरी जिल्ह्यातील गाव आहे. येथील दीपक प्रकाश दुर्गवळी यांची पंधरा गुंठे भातशेती, दहा गुंठ्यात नाचणी आणि सोबत पन्नास आंब्याची कलमं अशी सामायिक शेती आहे. ते विद्यमान सरपंचही आहेत. पूर्वी गावातच छोटे व्यवसाय करीत मालवाहतुकीसाठी त्यांनी रिक्षा घेतली. केवळ शेतीवर उदरनिर्वाह करणे आर्थिक दृष्ट्या शक्य नव्हते. त्यामुळे पूरक व्यवसायात लक्ष घातले. कृषी विभागाच्या सल्ल्याने पंचायत समितीच्या शंभर टक्के अनुदानातून २०१५ मध्ये लेअर पक्षांच्या माध्यमातून कोंबडीपालनास सुरवात केली. कावेरी जातीच्या एक दिवसीय ४० पिल्लांचे संगोपन सुरू झाले. त्यासाठी घराजवळच ५० बाय २० फूट आकाराचे शेड उभारले. अंडीविक्रीतून उत्पन्न सुरू झाले.

व्यावसायवृध्दी
व्यवसाय स्थिर होत असतानाचा दीपक यांच्या एक गोष्ट लक्षात आली. पंचक्रोशीत ब्रॉयलर कोंबड्यांना मागणी असून चिकन सेंटर चालक त्या बाहेरुन विकत घेतात हे लक्षात आले. बाजारपेठेचे अधिक सर्वेक्षण करुन या कोंबडीपालनातही उतरायचे त्यांनी ठरवले. गावातील बंड्या साळवी, सोनल पवार यांच्या सहकार्याने अण्णाभाऊ साठे योजनेतून दहा लाखांचे कर्ज बँकेकडून मिळाले. रत्नागिरी तालुक्यातील नरबे येथून प्रति नग ४० रूपये दराने एक दिवसांची पिल्ले आणली. आज अंडी व चिकन अशा दोन्ही हेतूंनी पोल्ट्री व्यवसायाची वृध्दी करून उत्पन्नात वाढ करणे शक्य झाले आहे.

व्यवस्थापनातील बाबी

 • एक दिवसाच्या पिल्लाला पाण्यातून ग्लुकोजचा डोस
 • पाण्यातून २५ दिवस टॉनिक
 • उष्णतेसाठी १०० पक्षांमागे २०० वॅटचा बल्ब. पिल्लांसाठी २४ तास व त्यानंतर रात्री बल्बची व्यवस्था.
 • पाण्यासाठी स्वयंचलित पध्दतीची व्यवस्था. दिवसातून तीन वेळा पिण्याचे पाणी.
 • दररोज पाणी बदलले जाते.
 • कावेरी पक्षांच्या वर्षातून दोन बॅचेस घेतल्या जातात. महिन्याला २०० ते कमाल २५० पर्यंत अंडी मिळतात. प्रति अंडे ८ ते १० रूपये मिळतात.
 • ब्रॉयलर कोंबड्यांची एकहजार पक्षांची बॅच असते. ती सुमारे ४० दिवसांत पूर्ण होते. सुमारे दोन ते अडीच किलो वजनाच्या पक्षाची विक्री होते. त्यास किलोला ८०, ९० रूपये व काहीवेळा त्यापुढील दर तर पूर्ण वाढ झालेल्या कोंबड्याची विक्री केल्यास ४०० ते ५०० रुपये दर मिळतो.
 • वर्षातून सुमारे आठ ते नऊ बॅचेस होतात.
 • अंडी विक्रीमधून महिन्याला अडीच हजार रुपये किंवा त्यापुढे उत्पन्न मिळते.
 • व्यवसायात एकही मजूर ठेवलेला नाही. सर्व जबाबदारी दीपक, पत्नी सौ. दिप्ती आणि आई प्रतिभा असे कुटुंबातील सर्व सदस्यच सांभाळतात.
 • प्रति हजार पक्षांसाठी महिन्याला स्टार्टरचे मक्याचे खाद्य ४० बॅग्ज एवढे लागते. तीन वर्षांपूर्वी पन्नास किलोच्या बॅगची किंमत १३५० रुपये होती. आता ती २१०० रुपये झाली आहे. प्रति बॅचचा सरासरी खर्च सव्वा लाख रूपयांपर्यंत जातो. सरासरी ३० हजार ते ३५ हजार रुपये प्रति बॅचमधून मिळतात.
 • एकूण व्यवसायातून वर्षभर २५ टक्के नफा उरत असल्याचे दीपक सांगतात.

विक्री व्यवस्था
गणपतीपुळे, निवेंडी, भगवतीनगर, मालगुंड या गावांची मालगुंड येथे बाजारपेठ आहे. साहजिकच ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणात असतो. दर्जेदार चिकन या ठिकाणी मिळते. दीपक व्यावसायिक चिकन सेंटरना कोंबड्या पुरवतात. येथे अशी पाच विक्री केंद्रे आहेत. आता तर आपलेही छोटेखानी सेंटर दीपक यांनी सुरु केले आहे. त्यामुळे प्रति पक्षामागे ३० ते ४० रूपये नफा वाढल्याचे ते सांगतात. कोकणात गटारी अमावास्या, गौरी सण, शिमगोत्सव आणि ३१ डिसेंबर या कालावधीत चिकनला मोठी मागणी असते. हा विचार करुन उत्पादन व विक्रीचे नियोजन केले जाते. महिन्याला चारशे ते पाचशे कोंबड्यांची चिकन सेंटरमध्ये गरज असते. एक कामगारही नियुक्त केला आहे. उत्पन्नात अजून वाढ व्हावी यासाठी दीपक यांचे बंधू यांनी चायनीज फूड विक्री सेंटरही सुरू केले आहे. तेथेही पोल्ट्रीतील उत्पादनांना चांगला उठाव होतो. मालगुंडजवळच काजूची १०० व हापूस आंब्याच्या ७० कलमांची लागवडही केली आहे.

प्रतिक्रिया
शेतीपूरक व्यावसायामधून उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करण्याची पूर्वीपासून इच्छा होती. पोल्ट्री व्यावसायाने दिशा दिली आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळाली. आमचे आठ सदस्यांचे एकत्रित कुटुंब आहे. मालगुंडसारख्या गावात व्यवसाय आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण करून कुटुंबाचे जीवनमान उंचावले आहे.

संपर्क- दीपक दुर्गवळी- ९४२००५२०१५


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
रोपवाटिका व्यवसायासाठी ‘मॅट पॉट’...प्रगत देशामध्ये पर्यावरणपूरक पेपरपॉट निर्मितीसाठी...
जातिवंत दुधाळ गाई,म्हशींच्या पैदाशीसाठी...तामखडा (ता.फलटण,जि.सातारा) येथील प्रयोगशील...
गुलाबामध्ये तुळशीचे आंतरपीक ठरतेय...कोरोना संकट ही संधी समजून कवडी माळवाडी (ता. हवेली...
तीस वर्षांपासून फळपिकांमध्ये सातत्य...भोसे (ता. पाथर्डी, जि. नगर) येथील कृषी पदवीधर डॉ...
वन्यप्राणी, संवर्धन, जनजागृतीसाठी ‘...मानव आणि वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वर्धा...
बटण मशरूमचा ‘कॅम्बीअम गोल्ड’ ब्रँडमूळचे जमालपूर (बिहार) येथील नीलकमल झा यांनी...
सेंद्रिय गुळाचा ‘यादवबाग’ ब्रॅण्ड !घरची वर्षानुवर्षांची ऊसशेती. मात्र मिळणाऱ्या कमी...
केळी, कापूस, जलसंधारणात झाली जळके...जळके (ता.जि. जळगाव) गावाने जलसंधारणात भरीव काम...
नागपूरला फुलला सीताफळाचा बाजारनागपूर येथील महात्मा फुले मार्केट सीताफळाने फुलले...
‘मार्केट डिमांड’नुसार देशी वांग्यांची...देशी वांग्याला अस्सल चव असल्याने...
पाचट कुट्टी यंत्राचा वापर ऊसशेतीत ठरला...ऊसशेतीतील वेळ, खर्च व मजूरबळ कमी करून उत्पादन...
शेळी, कोंबडीपालनात युवा शेतकऱ्याची...बुलडाणा जिल्ह्यातील आडविहिर येथील युवा शेतकरी...
राधानगरीच्या दुर्गम भागात रेशीम शेतीचे...पारंपरिक ऊस, भात य पारंपरिक शेतीपेक्षा थोड्या...
बीजोत्पादनातून साधली कुटुंबाची भरभराटसुरेश हुसे यांना वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती....
सोनपेठ तालुक्यातील शेतकरी महिलांचा...परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे महिला आर्थिक विकास...
दुग्ध व्यवसायातून उंचावले शेती-...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवजे (ता. कुडाळ) येथील...
भाजीपाला निर्जलीकरण, मसालानिर्मितीलातूर जिल्ह्यातील वासनगाव येथील ‘सावित्रीबाई फुले...
शेतीसह पर्यावरणाचे संवर्धनमान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) येथील तुकाराम भोरू...
एकोप्यातून पानोलीकरांचा ग्रामविकासात...गावकऱ्यांचा एकोपा, लोकसहभाग, श्रमदान आणि गावांतील...
गणेशोत्सवात आंबा, काजू मोदकांनी खाल्ला...गणेशोत्सवामध्ये मोदकांना चांगली मागणी असते. हे...