agriculture story in marathi, Eknath Salve a progressive farmer has done farm mechanization in 90 acres field. | Agrowon

स्वयंचलित ठिबकासह ९० एकरांत यांत्रिकी शेतीचा वसा

माणिक रासवे
बुधवार, 26 ऑगस्ट 2020

परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील कृषी पदवीधर व प्रगतिशील शेतकरी एकनाथराव साळवे यांनी बंधू सुंदरराव यांच्या जोडीने सुमारे ९५ एकरांत प्रयोगशील शेती घडवली आहे. त्यासाठी मशागतीपासून ते काढणीपश्‍चात कामांपर्यंत शेतीचे यांत्रिकीकरण केले आहे. स्वयंचलित ठिबक सिंचनाद्वारे अधिकाधिक जमीन सिंचनाखाली आणली आहे. त्याद्वारे मातीची व व्यावसायिक पिकांची एकरी उत्पादकता व गुणवत्ता वाढवली आहे.

परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील कृषी पदवीधर व प्रगतिशील शेतकरी एकनाथराव साळवे यांनी बंधू सुंदरराव यांच्या जोडीने सुमारे ९५ एकरांत प्रयोगशील शेती घडवली आहे. त्यासाठी मशागतीपासून ते काढणीपश्‍चात कामांपर्यंत शेतीचे यांत्रिकीकरण केले आहे. स्वयंचलित ठिबक सिंचनाद्वारे अधिकाधिक जमीन सिंचनाखाली आणली आहे. त्याद्वारे मातीची व व्यावसायिक पिकांची एकरी उत्पादकता व गुणवत्ता वाढवली आहे.

परभणीपासून नजीक असलेल्या सिंगणापूर येथील एकनाथराव साळवे यांनी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातून १९८९ मध्ये उद्यानविद्या पदवी संपादन केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची फौजदारपदाची पूर्वपरीक्षा ते उत्तीर्ण झाले. पुढे ते शेतीतच रमले. त्यांचे एक बंधू मधुकर महावितरण कंपनीमध्ये अभियंता तर दुसरे बंधू डॉ. सुधीर पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. चुलत बंधू सुंदरराव एकनाथरावांसोबत शेती व्यवस्थापन पाहतात.

साळवे यांची प्रयोगशील शेती

 • एकत्रित कुटुंबाची सिंगणापूर, इटलापूर, आमडापूर या तीन गावांच्या शिवारात ९५ एकर शेती
 • खरीप, रब्बी पिके, घरच्यापुरता गहू, अनेक वर्षांपासून कांदा बीजोत्पादन
 • लिंबू, संत्रा, पेरू, सीताफळ (४ एकर), केळी (१० एकर), ऊस (२० एकर), हळद (५ एकर),
 • आले, ढोबळी मिरची, चारा पिके (१५ एकर)

सिंचन व्यवस्थेचे बळकटीकरण
अनियमित पावसामुळे सातत्याने दुष्काळाला सामोरे जावे लागे. साळवे यांची शेती जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात असली तरी दरवर्षी धरण भरण्याची खात्री नसते. त्यामुळे पाणी आवर्तनाबाबत अनिश्चितता असते. क्षेत्रात विविध ठिकाणी ८ विहिरी आहेत. मात्र उन्हाळ्यात पाणी कमी पडते. मग ३६ बोअर्स घेतले. काही दीड हजार फूट खोल घेतले. मात्र एका बोअरला चांगले पाणी लागले. अशावेळी दोन ठिकाणी अनुक्रमे साडेतीन कोटी लिटर आणि सव्वा कोटी लिटर क्षमतेची शेततळी घेतली. कालव्यावरून पाइपलाइन केली आहे. सर्व जलस्रोतांचे पाणी शेततळ्यांत एकत्रित करता येते. पाणी उपसणारे पंप थर्माकोलचा वापर करून तरंगते ठेवले आहेत. पाण्याबरोबर पंपही खोल जातात.

स्वंयचिलत ठिबक सिंचन प्रणाली

पूर्वी प्रवाही पद्धतीने पाणी देताना जेमतेम निम्मे क्षेत्र हंगामी बागायती होते. पाण्याचा अपव्यय व्हायचा.
सिंचनासाठी वेळही जास्त लागायचा. मजुरांची गरज जास्त भासायची.

आज ९० एकरांपैकी ४५ एकरांत इस्रायली कंपनीची २० लाखांची यंत्रणा बसवली. यात १० व्हॉल्व्हज आहेत.
-विविध तज्ज्ञांच्या मदतीने २० एकरांत ‘असेंब्लिंगॅ’ पद्धतीने म्हणजे जोडणी करून स्वयंचलित यंत्रणा उभारली. त्यासाठी दोन लाख रुपये खर्च. यात ८ व्हॉल्व्हज कार्यरत.

शेततळ्यातील पाणी तीन पंपांद्वारे उपसून ते वितरण प्रणालीव्दारे पिकांना देण्यात येते.

अन्य यंत्रांची सुविधा

 • क्षेत्र मोठे असल्याने मजुरबळावर यांत्रिकीकरणाचा पर्याय वापरला
 • १८ एचपी, २७ एचपी व ४७ एचपी क्षमता असे तीन ट्रॅक्टर्स
 • पेरणी यंत्र, बीबीएफ यंत्र, रोटाव्हेटर, नांगर, बेड तयार करणे, जनरेटर, शेणस्लरी देणारे, ब्लोअर, हळद पॉलीशिंग , पॉली मल्चिंग
 • अंथरणे, मोगडा, तिऱ्ही, पंजी, व्ही पास आदी सामग्री
 • तीस मजूर वर्षभर तैनात. पैकी २० मजूर कायमस्वरूपी.

शेणस्लरीचा वापर
यंत्रांची सुविधा असली तरी पोळासणाच्या पूजेसाठी तसेच काही शेतीकामांसाठी बैलजोडी आहे. देशी तसेच संकरित गायी, म्हशी मिळून लहान मोठी ३० ते ३५ जनावरे आहेत. सुसज्ज मुक्तसंचार व बंदिस्त गोठा आहे. हिरव्या चाऱ्यासाठी मका तसेच मुरघास तयार केला जातो. दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीनचा वापर होतो. जनावरांचे शेण आणि मूत्र हौदात संकलित होते. त्यापासून स्लरी तयार करून मडपंप व ट्रॅक्टर चलित यंत्राव्दारे फळपिकांना दिली जाते.

उत्पादन वाढले, गुणवत्ता वाढली

 • ठिबक सिंचन व एकूणच आधुनिक तंत्रज्ञान, जोडीला चोख व्यवस्थापन यातून पिकांचे एकरी उत्पादन, गुणवत्ता व मातीच्या सुपीकतेत वाढ
 • उत्पादन प्रातिनिधिक- (एकरी)
 • पूर्वहंगामी ऊस- ५० टन
 • केळी- ३० ते ३५ टन
 • हळद- २५ क्विटंलपर्यंत (सुकवलेली)
 • आले- ८० ते १०० क्विटंलपर्यंत
 • टोमॅटो- २५ ते ३० टनांपर्यंत
 • खुल्या शेतात ढोबळी मिरचीचे पाच वर्षांपासून उत्पादन.
 • यंदा कलिंगड निघाल्यानंतर त्याच मल्चिंगवर ढोबळी
 • पाच एकरांत १०० टन कलिंगड उत्पादन
 • केळीचे झाड जमिनीवर वाकू नये यासाठी बांबूपासून तयार केलेल्या साधनांचा वापर
 • पाच वर्षांपासून कांदा बीजोत्पादन- एकरी ४ ते पाच क्विंटल. बियाण्याला प्रति क्विंटल किमान दर १० हजार रुपये तर कमाल दर ५० हजार रुपयांपर्यंत मिळाला आहेत.
 • वैविध्यपूर्ण पद्धतीतून उत्पन्नाची जोखीम कमी झाली.
 • कुटुंबाचे अर्थकारण सक्षम झाले.

कंपनीची स्थापना
एकनाथराव, विलास बाबर, भुजंगराव धस आदींनी एकत्र येत प्रभावती शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली आहे. त्यातर्फे अद्ययावत डेअरी सुरू करण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडील दूध संकलन करून प्रक्रिया उत्पादने तयार करून ब्रॅण्डने विक्री केली जाणार आहे.

एकनाथराव साळवे-९८६०७९१८५८


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
आवळा प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेआपल्या गुणकारी, औषधी गुणधर्मामुळे अनेक आयुर्वेदीय...
वितरणासाठी ड्रोन तंत्रज्ञानाला गोदाम...सध्या केवळ ड्रोनच्या वापरातून उत्पादने...
अत्याधुनिक लायसीमीटर आधारित सिंचन...पिकाच्या सिंचनाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी...
दूध काढण्यासाठी फिरती घडवंची, तिपाईदुग्ध व्यावसायिकांच्या अडचणी लक्षात घेऊन अखिल...
प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतील...हिरव्या वनस्पती किंवा पिकांद्वारे सूर्यप्रकाशाचे...
हायड्रोपोनिक्स पद्धतीने मिळवा चाराहायड्रोपोनिक्स म्हणजे माती विरहित किंवा केवळ...
चाऱ्यासाठी कमी किमतीचे हायड्रोपोनिक्स...अल्प भूधारक पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता...
अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर...अक्षय ऊर्जा स्रोतांमध्ये सूर्यप्रकाश, वारा,...
स्वयंचलित ठिबकासह ९० एकरांत यांत्रिकी...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील कृषी पदवीधर व...
सुपारी प्रक्रियेसाठी आवश्यक यंत्रेसुपारी हे कोकणातील व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाचे...
पिकातील सूक्ष्महवामान मोजणारी उपकरणेया वर्षी महाराष्ट्राच्या अनेक विभागात...
यांत्रिक पद्धतीने भात रोपलागवडीचा...सांगे (जि. पालघर) येथील कृषिभूषण व अभ्यासू शेतकरी...
विरळणी, तण काढणी करा झोपून!अत्यंत आरामदायी स्थितीमध्ये तणनियंत्रणासारखी काम...
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
योग्य प्रकारे करा ट्रॅक्टर,अवजारांचा...ट्रॅक्‍टरची सर्व निगा व देखभाल केल्यास सुगीमध्ये...
आले पिकासाठी सुधारित अवजारेवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने हळद आणि...
श्रम कमी करणारी सुधारित अवजारेमहिलांचे शेतीकामातील श्रम लक्षात घेऊन सुधारित...
ट्रॅक्टरचलित मडपंपाद्वारे शेणस्लरी...साखर कारखान्यातील मोठ्या पदावरून स्वेच्छानिवृत्ती...
आरोग्यदायी गूळ बनविण्याचे आधुनिक तंत्रदेशामध्ये दर्जेदार आणि आरोग्यदायी गूळ बनविण्याचे...