मराठवाडा विभागातील हवामानानुसार पिकांचे नियोजन

मराठवाडा विभागातील हवामानानुसार पिकांचे नियोजन
मराठवाडा विभागातील हवामानानुसार पिकांचे नियोजन

तीस वर्षांच्या हवामान घटकाच्या अभ्यासावरून मराठवाड्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६३०.३ मि.मी. असून सरासरी पावसाचे पर्जन्यदीन ३८ आहेत. तर वार्षिक पावसात जवळपास ७.८ टक्के तफावत आढळते आणि ४९.३ मि.मी. पावसाच्या प्रमाणात घट अथवा वाढ दिसून (दोलायमानता) येते. या परिस्थीतीत शास्रीय दृष्टिकोनातून पिकांचे नियोजन करणे आवश्यक आहे. मराठवाडयात मोसमी पाऊस २४ व्या कृषिहवामान आठवड्यात दाखल होतो, तर मोसमी पावसाची माघार ४२ व्या कृषिहवामान आठवड्यात होते. मॉन्सूनची सुरुवात आणि अखेर यात जिल्हानिहाय एक ते दीड आठवड्याचा फरक पडतो. पर्जन्यकल मराठवड्यातील सर्व जिल्ह्यात सरासरी मासिक पर्जन्यमान सर्वाधिक जुलै महिन्यात पडतो, तसेच जुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने मराठवाड्यात सर्वत्र सर्वाधिक पावसाचे आहेत आणि त्यानंतर सप्टेंबर महिना आणि जून महिना अशा उतरत्याक्रमाने पावसाचे प्रमाण आहे. मराठवाड्यातील पर्जन्यकल अभ्यासला असता सरासरी ७८ टक्के तालुक्यात कोणताही बदल झाला नसल्याचे आढळते. परंतु, औरंगाबाद व नांदेड या जिल्ह्यांतील काही तालुक्यांत नकारात्मक बदल झाला असल्याचे आढळून येते. तसेच नांदेड, लातूर व परभणी जिल्ह्यांतील बहुतांश व हिंगोली, बीड व जालना जिल्ह्यांतील काही तालुक्यात सकारात्मक बदल झालेला दिसून येतो. वार्षिक सरासरी पावसाचे पर्जन्यदीनामध्ये जास्त काही सकारात्मक किंवा नकारात्मक बदल झाला नसल्याचे दिसते. जालना, लातूर व बीड जिल्ह्यांतील बहुतांश तालुक्यात पर्जन्यदीनामध्ये सकारात्मक बदल झाला असल्याचे दिसते व मराठवाड्यातील काही तालुक्यांत नकारात्मक बदल झाल्याचे दिसते. कमाल तापमान मागील तीस वर्षांतील कमाल तापमानाचा अभ्यास केला असता मराठवाडा विभागाचे सरासरी वार्षिक कमाल तापमान ३२.९ अंश सेल्सिअस आहे असे आढळते तर मराठवाड्यातील जिल्हावार सरासरी वार्षिक कमाल तापमान पाहता ३२.४ अंश सेल्सिअस (औरंगाबाद), ३२.८ अंश सेल्सिअस (जालना), ३३.२ अंश सेल्सिअस (लातूर), ३२.७ अंश सेल्सिअस (नांदेड), ३२.५ अंश सेल्सिअस (उस्मानाबाद) ३३.० अंश सेल्सिअस (बीड) आणि ३३.७ अंश सेल्सिअस (परभणी) आढळते. सरासरी कमाल तापमान सर्वाधिक मे महिन्यात ४१.३ अंश सेल्सिअस परभणी जिल्ह्यात आढळून येते तर सर्वात कमी कमाल तापमान जानेवारी महिन्यात २८.७ अंश सेल्सिअस नांदेड जिल्ह्यात आढळते. किमान तापमान मराठवाडा विभागाचे सरासरी वार्षिक किमान तापमान १९.५ अंश सेल्सिअस आहे असे आढळते तर मराठवाड्यातील जिल्हावार सरासरी वार्षिक किमान तापमान पाहता १९.१ अंश सेल्सिअस (औरंगाबाद), २०.० अंश सेल्सिअस (जालना), २१.७ अंश सेल्सिअस (लातूर), १८.५ अंश सेल्सिअस (नांदेड), १८.७ अंश सेल्सिअस (उस्मानाबाद) १८.९ अंश सेल्सिअस (बीड) आणि १८.८ अंश सेल्सिअस (परभणी) आढळते. सरासरी किमान तापमान सर्वाधिक कमी डिसेंबर महिन्यात १०.९ अंश सेल्सिअस परभणी जिल्ह्यात आढळते. सकाळची सापेक्ष आर्द्रता मराठवाडा विभागाची सरासरी वार्षिक सकाळची सापेक्ष आर्द्रता ६७ टक्के असून मराठवाड्यातील जिल्हावार मासिक सकाळच्या सापेक्ष आर्द्रतेचा अभ्यास केला असता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरी सकाळची सापेक्ष आर्द्रता सर्वाधिक आढळते तर जालना जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात सर्वाधिक कमी सरासरी सकाळची सापेक्ष आर्द्रता एप्रिल महिन्यात आढळते. दुपारची सापेक्ष आर्द्रता मराठवाडा विभागाची सरासरी वार्षिक दुपारची सापेक्ष आर्द्रता टक्के असून मराठवाड्यातील जिल्हावार मासिक दुपारची सापेक्ष आर्द्रतेचा अभ्यास केला असता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वाधिक आढळते तर सर्व जिल्ह्यात सर्वाधिक कमी सरासरी सकाळची सापेक्ष आर्द्रता एप्रिल महिन्यात आढळते. बाष्पीभवन बाष्पीभवनामध्ये मार्च महिन्यापासून वाढ होण्यास सुरुवात होते ते मे महिन्यापर्यंत त्यात वाढ होत जाते. सर्वाधिक बाष्पीभवन मे महिन्यात होते. परिणाम

  • तापमानाचा व पाण्याचा ताण बसल्यास पिकांच्या वाढीवर आणि पीक फुलो­ऱ्यावर विपरीत परिणाम होतो.
  • तापमानात ३.५ अंश सेल्सिअस वाढ झाल्यास गहू पिकाच्या उत्पादनात २ ते ६ टक्के घट होते.
  • तापमानवाढीचा विविध पिकांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. मातीतील सेंद्रिय पदार्थ व सुपीकतेवर परिणाम होतो.
  • तापमानात चढ उतार झाल्यास कीड व रोगाचा प्रादुर्भाव होण्यास मदत होते.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com