agriculture story in marathi, a farm labour Sanjan Vagh, from haranshikar, tahsil Malegaon, Dist. Nasik now became progressive farmer with the help of hard working & best farming management. | Agrowon

कष्ट अन् जिद्दीतून सालगडी झाला प्रगतशील शेतकरी 
मुकूंद पिंगळे
मंगळवार, 9 जुलै 2019

कष्टाचे चीज झाले 
वडिलोपार्जित शेतीत नव्याने भर घालत वाघ यांनी आपली शेती १८ एकरांपर्यंत नेली आहे. आठ जोडपी त्यांच्याकडे वर्षभर काम करतात. त्याद्वारे सजन मजुरांसाठी ‘रोजगारदाते’ झाले आहेत. 
वडील मार्गदर्शकाच्या भूमिकेत आल्याने सर्व जबाबदारी त्यांनी आता मुलांवर सोपवली दिली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील हरणशिकार (ता. मालेगाव) येथील सजन वाघ वीस वर्षे दुसऱ्यांच्या शेतात ‘सालगडी म्हणून राबले. ध्येय होते स्वतः प्रयोगशील शेतकरी व्हायचे. अत्यंत कष्ट करीत, एकेक रुपया जमवत जिद्दीने आपली नऊ एकर शेती विकसित करण्यास सुरवात केली. पीक, पाणी व्यवस्थापन व बाजारपेठेचा आढावा घेत फळबागकेंद्रित शेती उभारली. आज परिसरात त्यांनी प्रगतशील बागायतदार म्हणून स्वतःची ओळख तयार केली आहे. 
 
नाशिक जिल्ह्यातील हरणशिकार (ता. मालेगाव) येथील सजन वाघ यांचा जीवनप्रवास कष्टप्रद व संघर्षमय असाच आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने २० वर्षे त्यांनी दुसऱ्यांच्या शेतात सालगडी म्हणून काम केले. पुढे वडिलोपार्जित ९ एकर शेती वाट्याला आली; पण ती अविकसित, टेकडीवर व झाडाझुडपांनी व्यापलेली होती. एकीकडे सालगडी म्हणून राबताना दुसरीकडे आपली शेतीही विकसित करण्यास सुरवात केली. सर्व झाडेझुडपे तोडली. टिकाव, फावडे घेऊन खांदणी केली. अविरत कष्ट सुरू ठेवले. शेती लागवडीयोग्य झाली. 

पण मशागतीसाठी साधने नव्हती. बैलांची अन् अवजारांची मदत घेऊन मशागती केल्या. त्यातून गहू, बाजरी, भुईमूग, मूग, मठ, कुळीथ अशी पिके घेण्यास सुरवात केली. पण त्यातून आर्थिक सक्षमता मिळत नव्हती. पाणी उपलब्ध आहे तर लाल कांदे करून पाहू असाही विचार आला; पण पाणी उपसण्यासाठी साधन नव्हते. मग खिशातील काही पैसे व उसनवारी करून वीजपंप खरेदी केला. लागवड केली. कांद्याला भाव सापडला. यातून विकासाला चालना मिळाली. 

डाळिंब पिकातून साधले : 
नाजूक आर्थिक परिस्थिती व कामाच्या जबाबदाऱ्या लवकर अंगावर आल्याने मुले पंकज व विष्णू यांना शिक्षणापासून मुकावे लागले. ती शेतीत हाताखाली आली. आता प्रयोग म्हणून डाळिंबाबाबत माहिती घेऊन २००६ मध्ये सहा एकरांत लागवड केली. दर्जेदार उत्पादनासह दरही चांगले मिळाल्याने डाळिंबाने मोठा आर्थिक आधार दिला. 

पीकपद्धतीत बदल, अभ्यासपूर्ण नियोजन 
पुढे काही दिवसांत डाळिंबावर तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव झाला. मग २०११ मध्ये बाग काढावी लागली. अचूक निर्णयक्षमतेचा वापर करीत पीकपद्धतीत बदल केला. पुढील चार-पाच वर्षे टोमॅटो, काकडी, टरबूज ही पिके घेतली. उत्पन्नाचा आढावा घेत पीकबदल करताना २०१६ मध्ये तीन एकर शेवगा लागवड केली. 

व्यवस्थापनातील बाबी 
शेवगा 

 • पीक फेरपालट, एकात्मिक खत व्यवस्थापन व सेंद्रिय निविष्ठांचा अधिक वापर हे सूत्र जपले. 
 • दुबार छाटणी करून शेवग्याचे दोन बहरांत उत्पादन घेण्यास सुरवात केली. बिगरहंगामात शेवग्याला मागणी चांगली असल्याने दरही चांगला मिळतो. व्यापारी थेट बांधावर खरेदी करतात. हा माल वाशी मार्केटला पाठवला जातो. काही निवडक माल निर्यातही होतो. 
 • शेवग्याचे एकरी सरासरी १० ते ११ टन उत्पादन मिळते, त्यास किलोला ४० रुपयांपर्यंत दर मिळतो. 
 • क्वचितप्रसंगी हा दर १०० रुपयेही मिळाला आहे. 

वांगी उत्पादन : 
उत्पन्नाचा तुलनात्मक अभ्यास करून २०१६ पासून शेवग्याच्या जोडीला वांगी पीक निवडले. त्यातील बारकावे समजून घेतले. पहिल्या वर्षी उत्पादन खर्च सुटेल एवढेच उत्पन्न मिळाले. मात्र, गेल्या दोन वर्षांत सातत्यपूर्ण अभ्यास व नियोजनातून त्यात चांगला जम बसला आहे. तोडणी झाल्यानंतर 
प्रतवारी केल्याने दरांत निश्‍चित फरक पडतो. 

‘शिवकरी’ नावाने ओळख 
सुरत (गुजरात) बाजारात ‘देशी रवैया’ या वांग्याच्या वाणाला मागणी अधिक असते. गुजराती बांधव त्यास अधिक पसंती देतात. ही गोष्ट हेरून गेल्या तीन वर्षांपासून या वाणाची लागवड केली जाते. वांगी थेट सुरत मार्केटला पाठवली जातात. वाघ यांनी पहिल्या शेताला ‘शिवकरी’ हे नाव दिले आहे. या नावाने पाठवलेला माल ‘शिवकरी बैंगन’ नावाने सुरत बाजारात प्रसिद्ध आहे. 
वांग्याला प्रति १८ ते २० किलोच्या क्रेटला ७०० ते ८०० रुपये दर मिळतो. चालू वर्षी दोन एकरांत वांग्याची लागवड करण्यात आली असून, एकरी ३० टन उत्पादन अपेक्षित असल्याचे वाघ सांगतात. 

 • पाण्याचे अचूक व्यवस्थापन : 
 • हरणशिकार, गाळणा व लुल्ला अशा तीन ठिकाणी शेती 
 • हरण शिकार येथे पाणी उपलब्ध असल्याने दुष्काळात पाच एकरांवर लक्ष दिले. 
 • या ठिकाणी १०० फूट बोअरवेल, त्यास अडीच इंच पाणी. 
 • उपलब्ध पाण्याचे नियोजन करून पाच एकरांत इनलाइन पद्धतीने ठिबक सिंचन 
 • त्यातून शेवगा व वांगी दुष्काळात जगविली. त्यापासून भरघोस उत्पादन. 
 • शेवग्याचा पाला, उसाचे पाचट यांचे मल्चिंग. वांग्यासाठी प्लॅस्टिक मल्चिंग. 

शेतीची ठळक वैशिष्ट्ये : 

 • शेती अवजारे व साधनांची उपलब्धता 
 • पीकसंरक्षणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर 
 • अधिकाधिक प्रमाणात मालाची थेट बांधावर विक्री 
 • मिळालेल्या उत्पन्नाची शेतीविकासासाठी पुनर्गुंतवणूक 
 • जमीन कोरडवाहू व खडकाळ असल्याने गाळ वापरून जमिनीचा पोत सुधारून सुपीक केली. 
 • विहिरी खोदून सिंचन व्यवस्था बळकट 
 • नव्या फळबागा लागवडीचे नियोजन अंतिम टप्प्यात. शेवगा, डाळिंब, सीताफळ व लिंबू यांची निवड. 

संपर्क - विष्णू वाघ : ९७६५६५९५०१ 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची...बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीने (जि. पुणे)...
चित्रकलेसह पूरक व्यवसायात भरले यशाचे...नगर जिल्ह्यात माका (ता. नेवासा) येथील सुरेश गुलगे...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
‘ए ग्रेड’ शेवगा पिकविण्यातील मास्टर ठिबक, मल्चिंग, गादीवाफा व बाजारपेठेतील तुटवडा...
सेवानिवृत्तीनंतरही प्रयोगशील शेतीची...सेवानिवृत्तीनंतरही प्रयोगशील शेतीची अखंड सेवा...
काटेकोर व्यवस्थापनातून बहुविध पीक...नायगाव (ता. मुक्ताईनगर, जि. जळागाव) येथील अशोक व...
दहा एकरांतील जांभूळवनातून समृद्धी नगर जिल्ह्यात उंबरी बाळापूर येथील नावंदर...
विना कंत्राट, विना अनुदान  शिवार रस्ते...नाशिक जिल्ह्यात कोळवण नदीच्या काठी वसलेल्या...
दुष्काळाशी झुंजत साधला एकात्मिक शेतीचा...नगर जिल्ह्यातील आखतवाडे येथील बाळासाहेब सोनवणे...
परिश्रम, सूक्ष्म नियोजनातून शोभिवंत...नवे प्रयोग करण्याची वृत्ती, मेहनत, सूक्ष्म नियोजन...
कष्ट अन् जिद्दीतून सालगडी झाला प्रगतशील...नाशिक जिल्ह्यातील हरणशिकार (ता. मालेगाव) येथील...
सुमारे ३२ ग्रेडमधील प्रक्रियायुक्त काजू...जागतिक बाजारपेठ ओळखून रत्नागिरी येथील परांजपे...
मुखवासनिर्मितीतून अर्थकारणाला बळ बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन जळगावमधील अनिता दगा...
पुसद वन विभागाचा हायटेक  दर्जेदार...कमी कालावधी, कमी मनुष्यबळ, कमी जागेत आधुनिक...
अडीच एकर क्षेत्राला मोगरा, लिलीचा मोठा...परभणी जिल्ह्यातील करंजी (ता. मानवत) येथील मधुकर...
पाणी व्यवस्थापनातून दुष्काळातही...कल्पकता आणि साधनांचा व्यवस्थित वापर केला तर पाणी...
आदर्श संत्रा व्यवस्थापनासोबत फ्लॉवरची...संत्रा बागेत भाजीपाला लागवडीत सातत्य ठेवत त्या...