agriculture story in marathi, farmer Hari Thonbare, from Gadhejalgaon, Dist. Aurangabad has done precise water management & achieved success in hortiulture in drought condition. | Agrowon

जलव्यवस्थापनातील हुशारीतून फुलतेय साडेचार हजार झाडांची फळबाग 
संतोष मुंढे
शुक्रवार, 19 जुलै 2019

असे वाचविले पाणी 
सन २०१८ मध्ये पावसाच्या अवकृपेमुळे शेततळ्यात पाणी साठविता आले नाही. त्याच डिसेंबरअखेर 
दोन्ही शेततळ्यांत प्रत्येकी अर्धे शेततळे भरेल एवढे पाणी होते. उन्हाळ्यात प्रत्येक शेततळ्याद्वारे चार ते साडेचार फूट पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचा अनुभव आला होता. मग दोन्ही शेततळ्यांतील पाणी एकाच शेततळ्यात साठवले. त्यातून बाष्पीभवनाचे प्रमाण कमी केले. हेच वाचनिलेले पाणी आता संकटात उपयोगी पडत असल्याचे हरी सांगतात. 

दुष्काळाशी लढताना औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव येथील युवा शेतकरी हरी ठोंबरे यांनी सहा-सात वर्षांपासून हुशारीने दोन शेततळी व ठिबकच्या तंत्राद्वारे जलव्यवस्थापन केले. यंदा एकही पाऊस झाला नाही, तरीही पाण्याच्या सुयोग्य व्यवस्थापनातून सुमारे ४७ लाख लिटर पाणी त्यांच्याकडे उपलब्ध आहे. डाळिंबाची दोन हजार, तर द्राक्षाची सुमारे २५०० अशी साडेचार हजार झाडांची फळबाग त्यावर फुलते आहे. हेच कौशल्यपूर्ण व्यवस्थापन ठोंबरे यांच्या शेतीचे अर्थकारण बळकट करील, यात शंका नाही. 
 
 बावीस जणांचे कुटुंब 
औरंगाबाद जिल्ह्यातील गाढेजळगाव येथील ठोंबरे कुटुंबाची वडिलोपार्जित बारा एकर शेती. शंभरी गाठलेले आजोबा श्‍यामराव बाबाजी ठोंबरे, आजी सत्यभामाबाई, वडील देविदास, आई सौ. शांताबाई असा वडीलधाऱ्यांचा परिवार आहे. सर्वातं लहान बंधू असलेल्या हरी यांना अंबादास, शिवाजी व गोविंद ही तीन भावंडे. सर्व कुटुंब शेतीच करते. धार्मिक, सात्त्विक ठोंबरे कुटुंबाची शेती २०१२ पर्यंत वडील देविदासराव पाहायचे. त्यानंतर त्यांच्या मुलांनी ही जबाबदारी घेतली आहे. 

शेतीचे नियोजन 
पीकपद्धतीत बदल करताना बाजरी, मका, कापूस, तूर, मूग, उडीद आदी पिकांना फाटा देत ठोंबरे बंधूंनी डाळिंब व द्राक्ष या फळबाग शेतीची निवड केली. पाण्याची उपलब्धता करण्यासाठी शेततळे, पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी ठिबक सिंचनाचा वापर सुरू केला. हळूहळू शेतीत स्थिरता येऊ लागली. मग त्यावरील भार कमी करण्यासाठी डाळिंबातील उत्पन्नातून कृषी सेवा केंद्र, हार्डवेअर मशिनरी व मल्टी सर्व्हिसेस केंद्र या बाबी गाढेजळगाव परिसरात उभ्या केल्या. त्यातून या भावंडांना अर्थार्जनाचे अतिरिक्त माध्यम मिळाले. उत्पन्नाची साधने वाढल्याने कुटुंबाची विस्कटू पाहणारी आर्थिक स्थिती मजबूत झाली. 
याचे समाधान वयाची शंभरी गाठलेल्या ठोंबरे कुटुंबातील आजोबा श्‍यामरावांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येते. 

असे केले जलव्यवस्थापन 

 • आधीच्या दोन विहिरींना जोड म्हणून बोअरवेल. त्याला बऱ्यापैकी पाणी लागले. मग स्वखर्चातून सन २०१२ मध्ये ३३ बाय ३३ फूट आकाराचे शेततळे घेतले. त्याची क्षमता ७२ लाख लिटर आहे. 
 • सन २०१५ एक विहीर व २०१५ मध्ये शासनाच्या योजनेतून ३३ बाय ३३ फूट आकाराचे शेततळे घेतले. याची क्षमता ७६ लाख लिटर आहे. 
 • कुशल व्यवस्थापनातून आज ४० ते ४५ लाख लिटर पाणी उपलब्ध आहे. 
 • सहा वर्षांपासून वीजपुरवठा सुरू असेल त्या वेळी पाणी. 
 • दिवसा ४२ अंश सेल्सिअस तापमानात पाणी न देता रात्रीच्याच वेळी पाणी. तापमान घटल्यानंतर पाणी दिल्यास झाडे अधिक कार्यक्षमपणे अन्नद्रव्ये घेत असल्याचे व वाढत्या तापमानात तगून राहत असल्याचे निदर्शनास आले. 
 • फळबाग लागवडीत पहिल्या वर्षी आंतरपीक घेतल्याने बागेला मोकळेच पाणी. 
 • पूर्वी प्रतिड्रिपर ताशी १६ लिटर पाण्याऐवजी आता प्रतिड्रिपर ८ लिटर पाणी देण्याचे तंत्र. 
 • लागवडीच्या पाचव्या वर्षापासून दोन झाडांतील आठ फूट अंतरात झाडापासून एक फूट अंतर सोडून 
 • पाणी. 
 • झाडाच्या एका बाजूस तीन असे दोन्ही बाजूस मिळून सहा ड्रिपर्सची योजना. 
 • मार्च ते मे यादरम्यान एक दिवसाआड पाणी. 
 • मेनंतर गरजेनुसार दोन दिवसांआड पाणी. 
 • सात एकरांत उसाच्या पाचटाचे मल्चिंग. त्यासाठी वर्षभरासाठी एक लाख रुपयांचा खर्च. 
 • दर वर्षी प्रतिझाड ३० किलो कुजलेले शेणखत, शेणखतासाठी गावरान गायींसह सुमारे आठ जनावरे. 
 • वर्षातून तीन वेळा जिवाणू स्लरीचा वापर 

डाळिंब फुलले, द्राक्षवेली बहरल्या 
सन २०१४ मध्ये डाळिंबाला फळधारणा झाली. त्या वर्षी नातेवाईक व मित्रपरिवाराच्या शिवारातील विहिरींवरून पाण्याची निःशुल्क उपलब्धता झाली. त्यातून एकूण ७८० क्रेट उत्पादन घेतले. दर्जामुळे जागेवरच व्यापाऱ्यांनी ६० रुपये प्रतिकिलोने खरेदी केली. सन २०१५ मध्ये सुमारे ८७५ क्रेट उत्पादन झाले. त्यास किलोला २२ रुपयांपासून ७२ रुपयांपर्यंत दर मिळाला. 
यानंतर आत्मविश्‍वास वाढून आणखी एक हजार झाडे लावली. 

द्राक्षाची लागवड 
सन २०१७ मध्ये द्राक्षाची अडीच हजार झाडे लावली आहेत. एकरी साधारण सात टनांपर्यंत 
उत्पादन मिळाले आहे. त्यास २७ रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. यंदा उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने 
छाटण्या व अन्य नियोजन केले आहे. 

 • सद्यःस्थितीतील झाडे - 
 • डाळिंब - २००० 
 • द्राक्ष - २५०० 
 • एकूण - सुमारे ४५००, क्षेत्र एकूण - सात एकर 

झाडे जगविण्याला प्राधान्य 
सन २०१७ पर्यंत उत्पादनात सातत्य ठेवणाऱ्या ठोंबरे यांनी पुढील वर्षी मात्र पावसाने अवकृपा केल्याने 
डाळिंबाची दोन हजार झाडे जगण्यालाच प्राधान्य दिले. 

ठळक बाबी 

 • विहीर व बोअरचे पाणी कमी पडल्यानंतरच किंवा उन्हाळ्यातच शेततळ्यातील पाण्याचा वापर. 
 • ट्रॅक्‍टरचलित मशागतीची यंत्रे व ब्लोअर्स. 
 • कुटुंबातील प्रत्येकाकडे स्वतंत्र जबाबदारी, कुटुंबासह कायम शेतात वास्तव्य. 
 • व्यापाऱ्यांमार्फत आजवर डाळिंबाची दुबई, बांगलादेश, चेन्नई, पश्‍चिम बंगाल, दिल्ली आदी बाजारपेठेत विक्री. 
 • डाळिंबाचा आकार १५० ते ४०० ग्रॅमपर्यंत. 
 • डाळिंबाचे एकरी १३ ते १६ टनांपर्यंत उत्पादन. 
 • जानेवारीत छाटणी, जुलै, ऑगस्टमध्ये उत्पादन हाती. 

असे वाचविले पाणी 
सन २०१८ मध्ये पावसाच्या अवकृपेमुळे शेततळ्यात पाणी साठविता आले नाही. त्याच डिसेंबरअखेर 
दोन्ही शेततळ्यांत प्रत्येकी अर्धे शेततळे भरेल एवढे पाणी होते. उन्हाळ्यात प्रत्येक शेततळ्याद्वारे चार ते साडेचार फूट पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याचा अनुभव आला होता. मग दोन्ही शेततळ्यांतील पाणी एकाच शेततळ्यात साठवले. त्यातून बाष्पीभवनाचे प्रमाण कमी केले. हेच वाचनिलेले पाणी आता संकटात उपयोगी पडत असल्याचे हरी सांगतात. 

संपर्क- हरी ठोंबरे - ९७६५११८४४२ 
 
 

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
फळबागेतून शेती केली किफायतशीरकनका बुद्रुक (ता. मेहकर, जि. बुलडाणा) शिवारात...
आवळा प्रक्रिया उद्योगातून बनविली ओळखजाचकवस्ती (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील सुमन...
युवा शेतकऱ्याने केले यशस्वी ब्रॉयलर...लातूर जिल्ह्यातील हडोळती येथील महेश गोजेवाड या...
कातळावर लिली; तर टायरमध्ये फुलला...रत्नागिरी जिल्ह्यातील मेर्वी येथील प्रगतिशील...
पिंपळगावकरांनी भाजीपाला शेतीतून साधली... बीड जिल्ह्यात अहमदनगर- अहमदपूर राज्य...
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा,...‘मोडून पडला संसार, तरी मोडला नाही कणा’ ही ज्येष्ठ...
कमी खर्चातील चवळी झाले नगदी पीक नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव गरुडेश्वर येथील संतोष...
भूमिहीन खवले यांनी करार शेतीतून उंचावले...भूमिहीन कुटुंब. मात्र करार पद्धतीने, प्रयोगशील...
गोशाळेतून गवसली आर्थिक विकासाची वाटबीड शहरालगत सौ. उमा सुनील औटे यांनी मुनोत...
ग्रामविकास, शिक्षण अन् शेतीतील दिशान्तरआर्थिक दुर्बल, भूमिहीन व अल्पभूधारक शेतकरी,...
सिंचन बळकटीकरणासह नगदी पिकांतून उंचावले...हिंगोली जिल्ह्यात वसमत तालुक्यातील गिरगाव येथील...
प्रतिकूलतेवर मात करीत बटण मशरूमचा...स्पर्धा परीक्षेतून हुलकावणी, त्यानंतर केळी...
विदर्भात यशस्वी खजूरशेती, दहा...नागपूर येथे स्थायिक झालेले सावी थंगावेल यांनी दहा...
दुष्काळी पळशीने मिळवली निर्यातक्षम...सांगली जिल्ह्यात पळशी हे कऱ्हाड-विजापूर मार्गावर...
संकटातही ऐंशीहजार लेअर पक्षी उत्पादनाची...अमरावती जिल्ह्यात खरवाडी येथे सुमारे ३० ते ३५...
प्रयत्नवाद, सातत्यातून शोधला दुष्काळात...शिक्षणानंतर शेतीची कास धरली, पण दुष्काळानं परवड...
फळबाग शेतीसह बारमाही भाजीपाला पिकांचा...धुळे जिल्ह्यातील चौगाव (ता. धुळे) येथील युवा...
संशोधक शेतकऱ्याने बनविला जीवामृत फिल्टर...नाशिक जिल्ह्यातील पिंपरी सय्यद येथील प्रयोगशील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथशेतीला पूरक उद्योगाची जोड देत वर्षभर उत्पन्नाचा...
‘शेतकरी प्रथम’ प्रकल्पातून उत्पादन,...राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी...