प्रयोगशील, अभ्यासपूर्ण व्यावसायिक शेतीतील आदर्श

प्रयोगशील, अभ्यासपूर्ण व्यावसायिक शेतीतील आदर्श
प्रयोगशील, अभ्यासपूर्ण व्यावसायिक शेतीतील आदर्श

नारोद (जि. जळगाव) येथील जितेंद्र रामलाल पाटील यांनी फळबाग व भाजीपाला शेतीत अभ्यासू, प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी अशी ओळख मिळवली आहे. निर्यातक्षम उत्पादन घेण्यात त्यांचा हातखंडा आहे. विविध बाजारपेठांचा उत्कृष्ट अभ्यास व शेतकऱ्यांचे तयार केलेले संपर्कजाळे ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. नारोद (ता. चोपडा, जि. जळगाव) हे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले गाव आहे. गूळ नदीचा लाभ गावाला होतो. मध्यंतरी दुष्काळात परिसरात कूपनलिका, विहिरींची पातळी कमी झाली. यंदा मात्र पाण्याची स्थिती चांगली आहे. कापूस पिकासाठी हा भाग प्रसिद्ध आहे. अभ्यासू जितेंद्र यांची शेती

  • गावातील जितेंद्र पाटील हे अभ्यासू, प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांची २४ एकर शेती आहे. पंधरा एकर शेती ते ‘लीज’वर घेतात.
  • चार कूपनलिका व विहिरींची व्यवस्था. चार सालगडी, ट्रॅक्‍टर, दोन बैलजोड्या अशी यंत्रणा.
  • हवामान, बाजारपेठांचा चांगला अभ्यास करून तंत्रज्ञान व व्यवस्थापन यांचा मिलाफ घडवून फळबाग व भाजीपाला अशी व्यावसायिक पीक पद्धतीची रचना त्यांनी आखली आहे. त्यातून शेतीचे अर्थकारण घट्ट केले आहे.
  • व्यावसायिक पीक पध्दती केळी

  • दरवर्षी सुमारे २२ एकरांत लागवड. नवती (मे व जून लागवड) व कांदेबाग (ऑक्‍टोबर लागवड)
  • उतीसंवर्धित व ग्रॅंड नैन वाणाचा वापर
  • निर्यातक्षम उत्पादन. फ्रूटकेअर तंत्रज्ञानाचा अवलंब.
  • नाशिक येथील सह्याद्री शेतकरी कंपनीला प्रति किलो १२ ते १३ रुपये किलो दराने विक्री
  • उत्पादन एकरी २५ ते ३० टन.
  •  पेरू

  • दोन वर्षांपूर्वी पेरूची सघन पद्धतीने साडेतीन एकरांत लागवड
  • गुलाबी गर वाणाची काळ्या कसदार जमिनीत १० बाय पाच फूट अंतरावर लागवड
  • आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून प्रति रोप ७० रुपये दरात रोपांची खरेदी. सध्या अडीचहजार झाडे उत्पादनक्षम.
  • - चांगल्या प्रकारे बहार व्यवस्थापन करीत एकूण क्षेत्रातून आत्तापर्यंत १८ टन उत्पादन.
  • प्रतिझाड सरासरी १७ किलो उत्पादन.
  • सुरत व नाशिक येथे बॉक्‍समधून विक्री. प्रति बॉक्‍स २२ रुपये खर्च. चोपडा येथे
  • क्रेटमधून विक्री.
  • ३५० ते ८०० ग्रॅमपर्यंत पेरूचे वजन.
  • गुलाबी गराची फळे असल्याने सर्वत्र चांगला उठाव राहिला. ज्या व्यापाऱ्यांना सुमारे एक टन माल दिला त्यांनी तो परदेशात निर्यात केल्याचे जितेंद्र यांना सांगितले. त्यासाठी किलोला ५० रुपये दर देऊ केला.
  • एकूण दर कमाल ५० रुपये तर किमान २० रुपये मिळाला.
  • बागेत खत व्यवस्थापनाबाबत काळजीपूर्वक काम. आठवड्यात १६ तास पाणी देण्याचे वेळापत्रक.
  • एप्रिलमध्ये सिंचन बंद करून बागेला ताण देण्याचे नियोजन
  •  टोमॅटो

  • यंदा लागवड नसली तरी या पिकात सात वर्षांपासून हातखंडा. दरवर्षी एकरी ६० टनांच्या पुढे उत्पादन असल्याचे जितेंद्र सांगतात. परिसरातील शेतकऱ्यांनाही तंत्रज्ञान देवाणघेवाणाद्वारे या पिकातून आर्थिक लाभ दिल्याचे ते सांगतात.
  • कारले मागील लागवड हंगामात परिसरात टोमॅटोचे क्षेत्र अधिक असल्याने त्याऐवजी कारले पिकाला पसंती दिली. जानेवारीत लागवड झाल्यास पुढे मार्चमध्ये महाराष्ट्रासहित छत्तीसगढ, मध्य प्रदेशातून कारले येण्यास सुरुवात होते. दरांवर परिणाम होतो. त्यामुळे दोन महिने आधी माल आधी आणण्यासाठी नोव्हेंबर लागवडीची वेळ निवडली. रोपे तयार करून पाच एकरांत लागवड केली. पॉलीमल्चिंग, ठिबक, पाच बाय दोन फूट अंतर असे नियोजन केले. वेलींना बांबूचा आधार दिला. क्रॉप कव्हर व वाणनिवड थंडीत वेलींची वाढ चांगली व्हावी यासाठी क्रॉप कव्हरचा उपयोग केला. त्यातून काही अंश सेल्सिअस तापमान वाढले. कमी कडू, लहान आकाराच्या कारल्याला चांगला उठाव असल्याने तशा वाणाची निवड केली आहे. त्याचा टिकाऊपणा चांगला आहे. ३४ अंश तापमानात झाडाखाली सात दिवसांपर्यंत कारली टिकून राहू शकतात. पिकाचा एकरी उत्पादन खर्च एक लाख रुपये तर त्यात क्रॉप कव्हरचा सुमारे ३५ हजार रुपये आहे. विक्री

  • मध्य प्रदेशातील इंदूर बाजारात पाठवणूक
  • या कारल्याला इंदूरमध्ये ‘चूहा करेला’ म्हटले जाते. त्याची चार इंची लांबी व आकार उंदरासारखा.
  • काढणीसाठी दररोज २४ मजूर लागतात.
  • प्रतवारी करून क्रेटमध्ये भरून पाठविण्यासाठी दोन रुपये प्रतिकिलो वाहतूक खर्च. सध्या दररोज ३० क्विंटल उत्पादन घेतले जात आहे.
  • इंदूरहून नेपाळ, बांगलादेश व उत्तर प्रदेश, दिल्लीपर्यंत कारली जातात. सध्या ३० ते ४० रुपये प्रति किलो दर
  • नर्सरी
  • उत्पन्नाचा हा आणखी एक स्त्रोत
  • दरवर्षी कलिंगड, टोमॅटो, पपई आदी मिळून १५ ते २० लाखांपर्यंत विक्री
  • ५० रुपये प्रति रोप दरात गुलाबी गराच्या पेरू रोपेही विक्रीसाठी तयार
  • शेतकऱ्यांचा संपर्क जितेंद्र यांची प्रयोगशील शेती पाहण्यासाठी सतत शेतकऱ्यांच्या भेटी सुरू असतात. शंभरहून अधिक शेतकरी त्यांच्या नेटवर्कमध्ये कायम आहेत. काही खासगी कंपन्यांही आपल्या बियाण्यांचे प्रात्यक्षिक प्लॉट येथे घेतात. कंपनी अधिकारी व व्यापाऱ्यांशीही जितेंद्र यांचा चांगला संपर्क आहे. ॲग्रोवनचे ते नियमित वाचक आहेत. या सर्व माध्यमातून अभ्यासपूर्ण शेतीत जितेंद्र यांनी ठसा उमटवला आहे. जितेंद्र पाटील- ७९७२५२२७९७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com