agriculture story in marathi, The farmer from Nim shirgaon, of Kolhapur Dist. has done experiment of betelvine farming in polyhouse. | Agrowon

पॉलीहाऊसमध्ये फुलला दर्जेदार पानमळा

राजकुमार चौगुले
बुधवार, 8 जुलै 2020

कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव  येथील श्रीकांत जिनगोंडा पाटील यांनी २० गुंठे पॉलीहाऊसमध्ये खाऊच्या पानाची शेती करण्यास सुरुवात केली आहे. या तंत्रज्ञानानुसार पानाचा आकार व गुणवत्ता यात वाढ होऊन दरही चांगला मिळत असल्याचा अनुभव  आला आहे. 

कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव (ता.शिरोळ) येथील अल्पभूधारक शेतकरी श्रीकांत जिनगोंडा पाटील यांनी मागील वर्षापासून २० गुंठे पॉलीहाऊसमध्ये खाऊच्या पानाची शेती करण्यास सुरुवात केली आहे. या तंत्रज्ञानानुसार पानाचा आकार व गुणवत्ता यात वाढ होऊन दरही चांगला मिळत असल्याचा अनुभव पाटील यांना आला आहे. उसाच्या पट्ट्य़ात हा आश्‍वासक प्रयोग म्हणावा लागेल.

कोल्हापूर- सांगली महामार्गाजवळ निमशिरगाव (जि. कोल्हापूर) हे छोटेखानी गाव आहे. शिरोळ तालुका बागायती पट्ट्यात असला तरी निमशिरगावला नदी नसल्याने त्याचा समावेश कोरडवाहू भागात होतो. गावातील श्रीकांत पाटील यांची सुमारे अडीच एकर शेती आहे. त्यात दोन एकर ऊस, काही गुंठे पेरु आहे.

पॉलीहाऊसमध्ये पानमळा
पाटील अलीकडील काळात वेगळे काही करण्याच्या प्रयत्नात होते. पॉलीहाऊसमध्ये जरबेरा फुले घेण्याचा प्रयत्न होता. मध्यंतरी कर्नाटक राज्यातील चिकोत्री शिरगाव भागात त्यांनी पॉलीहाऊसमध्ये केलेली पानमळ्याची शेती पाहिली. त्यातून मिळणारे गुणवत्तापूर्ण उत्पादन व दर या बाबी त्यांना भावल्या.
जिल्ह्यात पान मळ्याचे क्षेत्र फारसे नाही. पॉलीहाऊसमध्ये तर क्वचित पाहायला मिळेल. हा प्रयोग करून पाहण्याचे ठरवले. मागील वर्षी नागपंचमीला २० गुंठे पॉलीहाऊसमध्ये लागवडही केली.
त्यासाठी १४ लाख रुपये भांडवल उभारले. कृषी विभागाच्या कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमातून
नऊ लाख रुपयांचे अनुदान मिळाले.

पानमळा रचना व व्यवस्थापन

 • मुरमाड जमिनीवर लागवड. साडेचार फुटी सरी
 • एकूण ६० सऱ्या
 • प्रत्येकी दीड फुटावर एक वेल
 • बहुतांश वाण देशी. काही रोपे बनारसी पानांची.
 • एकूण सुमारे २६०० रोपे
 • दररोज एक तास ठिबकने पाणी
 • दर पंधरा दिवसांनी साठ लीटर गोमूत्र ठिबकद्वारे
 • वर्षातून एकदा शेंगपेंड, निंबोळी वा करंजी पेंड यांचा प्रत्येकी चार ते साडेचार पोती वापर
 • महिन्यातून एकदा वेलबांधणी व खुडणी
 • लावणीनंतर सात महिन्यांनी उतरण व चुंबळ
 • तापमान नियंत्रण करण्यासाठी फॉगर
 • वेल बांधणी व पानांच्या खुडणीसाठी दोन मजूर. सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पानांची काढणी. त्यानंतर तातडीने बाजारपेठेत नेली जातात

उत्पादन व अर्थकारण

 • दररोज सुमारे सात ते आठ डाग काढणी. प्रति डाग ३५०० पानांचा.
 • इचलकरंजी व परिसरातील व्यापाऱ्यांना विक्री
 • प्रति डागास एकहजारापासून ते कमाल १७००, २१०० पर्यंतही दर मिळाला.
 • मागील वर्षी सर्व खर्च वजा जाता उत्पन्न दीड लाख रुपये
 • दररोज ताजा पैसा

पॉलीहाऊस तंत्राच्या वापराचा फायदा

 • तापमान व अन्य बाबी नियंत्रित वातावरणात. त्यामुळे पानांचा आकार व दर्जा चांगला. त्यातच
 • सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन असल्याने पानांना वेगळी चव, तजेलदारपणा व ग्राहकांकडून मागणी.
 • साहजिकच खुल्या पानमळ्यातील पानांपेक्षा चांगला दर
 • पानपट्टी व्यावसायिकांकडून बनारसी पानाला खास पसंती.
 • पानपट्टी चालक स्वत: पानमळ्यात येऊन खरेदी करतात. दररोज जागेवर तीन रुपयाला एक पान या प्रमाणे चारशे ते पाचशे पानांची विक्री. दररोज दीड हजार रुपयापर्यंतचे उत्पन्न

लॉकडाऊनच्या संकटाशी सामना
या भागात पॉलीहाऊसमधील पानमळे फारसे नसल्याने पाटील यांच्याकडील पानांची ओळख हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यातील बाजारपेठांत झाली आहे. मात्र कोरोना संकटात पानमळ्यासही फटका बसला. एकेकाळी प्रति डाग किमान एकहजार रुपये असलेले दर मागणीअभावी ३०० रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत. तरीही पाटील यांनी धीर सोडलेला नाही. ज्या गावांतून मागणी तसे काढणीचे नियोजन करून त्यांनी विक्री व शेती सुरू ठेवली आहे. आता बाजारपेठा खुल्या होत असल्याने मागणीत वाढ होत आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा एकदा चांगल्या दरांची अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

संपर्क- श्रीकांत पाटील- ९८८१२५८८०१


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
शेळीपालन, श्‍वान, देशी कोंबडीपालनातून...शेळीपालन, मग श्‍वानपालन व आता देशी कोंबडीपालन अशी...
कलिंगड, भातशेतीसोबत ब्रॉयलर पक्षांची...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पेंडूर कनकवाडी येथील दीपक...
शेतकरी नियोजन- कपाशीच्या पिकाला खत...सध्या माझे कापसाचे पीक ६० दिवसांचे झाले असून...
उमाताईंनी मिळवली आयुष्याची भाकरी गाडीवर फिरून ज्वारीच्या कडक भाकरीची विक्री करत...
गुणवत्ता अन् विश्वासाचा ब्रॅण्ड ः...प्रथम गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार सीताफळ उत्पादक...
संजीवनी गटाचे रास्त दरात खात्रीशीर...नाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील तरुण...
शेतकऱ्यांसाठी ‘दीपस्तंभ’ ठरलेली...मानोरी (ता. राहुरी, जि. नगर) येथील कृषीभूषण डाॅ....
पिराचीवाडी झाली उपक्रमशील गावकोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे...
प्रयोगशीलतेला प्रयत्नवादाची जोड फळबाग...पुणे जिल्ह्यात धालेवाडी (ता. पुरंदर) येथील संदीप...
बारमाही भाजीपाला शेतीतून आर्थिक बळकटीमेहू (जि.जळगाव) येथील अनिल अर्जून पाटील यांनी २१...
गोठवलेले शहाळ्यातील पाणी... तेही...शहाळ्यातील पाणी आपण नेहमी पितो. मात्र, तेच...
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
कीडनाशकांवरील बंदी- शेतकऱ्यांसाठी तारक...केंद्रीय कृषी मंत्रालयाने २७ कीडनाशकांवर बंदी...
कुक्कुटपालन, भात रोपवाटिका व्यवसायातून...विंग (ता. खंडाळा,जि.सातारा)  गावातील तेरा...
सोयाबीनच्या बीजोत्पादनाचा ‘मृदगंध’सोलापूर जिल्ह्यात पांगरी (ता.बार्शी) येथील मृदगंध...
खपली गहू बिस्किटे, हळद पावडर उद्योगात...दसनूर (जि.जळगाव) येथील वैशाली प्रभाकर पाटील यांनी...
एकात्मिक शेतीतून वरूडकरांची शाश्‍वत...हंगामी पिकांसह फळबागा, पूरक उद्योगांची जोड,...