agriculture story in marathi, Farmer Nivrutti Ghule from Jalna Dist. is doing farming with precise use of technology. | Agrowon

प्रयोगशीलतेला दिली तंत्रज्ञानाची जोड

संतोष मुंढे
बुधवार, 10 नोव्हेंबर 2021

प्रयोगशीलता आणि तंत्रज्ञान वापर या दोन बाबी शेतीत अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वखारी (ता. जि. जालना) येथील निवृत्ती घुले यांनी खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सुधारित तंत्र प्रकल्पात सहभाग घेतला. त्यातून शेती व्यवस्थापनात बदल करून त्यानुसार किफायतशीर शेती करणे त्यांना शक्य झाले आहे.

प्रयोगशीलता आणि तंत्रज्ञान वापर या दोन बाबी शेतीत अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वखारी (ता. जि. जालना) येथील निवृत्ती घुले यांनी खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या सुधारित तंत्र प्रकल्पात सहभाग घेतला. त्यातून शेती व्यवस्थापनात बदल करून त्यानुसार किफायतशीर शेती करणे त्यांना शक्य झाले आहे.
 
वखारी (ता. जि. जालना) येथील निवृत्ती रंगनाथ घुले यांची वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. त्यात पूर्वी कपाशी, मूग, बाजरी आदी पिके व तीही पारंपरिक पद्धतीनुसार घेतली जायची. सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब सुरू केल्यानंतर पीक पद्धती व एकूणच शेती व्यवस्थापनात बदल करणे त्यांना शक्य झाले. कपाशी, भुईमूग, सोयाबीन व विविध भाजीपाला पिकांचे बीजोत्पादन ते घेतात. सिंचनासाठी दोन विहिरी व बोअर असे स्रोत आहेत. कपाशीचे अपेक्षित उत्पादन घेण्यात हातखंडा असलेले शेतकरी म्हणून निवृत्तीरावांनी ओळख मिळवली आहे.

सुधारित तंत्राचा अवलंब
सुमारे २० वर्षांपूर्वी शेतीत उतरलेल्या निवृत्तीरावांनी कपाशी पीक कायम ठेवले. मात्र लागवडीची पद्धत बदलली. पूर्वीची चार बाय चार फूट अंतरावरील लागवड चार बाय सव्वा फूट व त्यानंतर पाच बाय सव्वा फुटांवर आणली. गुलाबी बोंड अळीचे आक्रमण होऊ लागल्यापासून कपाशीचे क्षेत्र तीन एकरांहून कमी करून ते दीड एकरावर आणले आहे.

बीजोत्पादन व तंत्रज्ञान
सन २०१८ पासून दोडका, भोपळा, वांगी, भेंडी आदी फळभाज्यांचे बीजोत्पादन निवृत्तीराव बारमाही घेतात. दहा गुंठ्यांपासून सुरू केलेला हा प्रयोग आता जवळपास चार एकरांपर्यंत पोहोचला आहे. कपाशीची फरदड न घेता डिसेंबरनंतर त्या क्षेत्रात बीजोत्पादन घेण्यात येते. दोन फूट रुंद, एक फूट उंच गादीवाफ्यावर (बेड) शेणखत, बेसल डोस, ठिबक, त्याद्वारे खते व मल्चिंग असे नियोजन असते. एकूण व्यवस्थापनातून उत्पादनात २० ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत वाढ होत असल्याचे ते सांगतात.

प्रकल्पात सहभाग
सन २०१२ च्या दरम्यान निवृत्तीरावांनी ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू’ संस्थेच्या ‘बेटर कॉटन इनिशिएटिव्ह (बीसीआय) या प्रकल्पात सहभाग घेतला. खरपुडी (जालना) कृषी विज्ञान केंद्राच्या समन्वयातून हा प्रकल्प राबवण्यात आला. गावातील अन्य शेतकरीही त्यात सहभागी झाले. त्या अंतर्गत स्वयंचलित हवामान यंत्र, ‘ड्रीप ऑटोमेशन सुविधा बसविण्यात आल्या आहेत.

तंत्रज्ञान स्वीकाराचे झालेले फायदे

 • किडी-रोगांची आगाऊ सूचना मिळाल्याने नियंत्रण उपाय वेळेत करणे शक्य झाले.
 • फवारण्यांत बचत झाली.
 • पाऊस किती पडला हे समजल्याने रब्बी हंगामाचे नियोजन करता आले.
 • लागवड पद्धतीत बदल झाला.
 • पूर्वी गोण्यांच्या प्रमाणात खत न देता त्यांच्या मात्रा जाणून घेऊन प्रमाणशीर वापर सुरू केला.
 • किडी-रोगांची ओळख व आर्थिक नुकसान पातळी ओळखून शिफारशीत कीडनाशकांचा वापर सुरू केला.
 • ठिबकच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर होऊ लागला.
 • कोणत्याही ठिकाणी असताना पिकाच्या गरजेनुसार मोबाईलमधील ‘ॲप’चा वापर करून सिंचनाचे नियोजन करता आले.
 • जमिनीचे आरोग्य सांभाळण्याची सवय लागली.
 • कपाशीची केवळ शाकीय वाढ महत्त्वाची नाही तर फळफांद्या, बोंडांची संख्या याकडे विशेष लक्ष दिले.
 • सन २०१९ पासून केव्हीकेतर्फे राबविल्या जाणाऱ्या एकात्मिक कीडनियंत्रण कार्यक्रमांतर्गत
 • वखारी गावात जवळपास २०० एकरांवर एकरी १६ कामगंध सापळे लावण्यात आले.
 • ‘मास ट्रॅपिंग’चा हा प्रयोग गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी करण्यात आला.

हवामान केंद्रांची उभारणी
जालना जिल्ह्यातील २०९ गावांमध्ये शाश्‍वत पद्धतीने कापूस शेती प्रकल्पासंदर्भात काम सुरू आहे. या अंतर्गत हवामानाचा लहरीपणा, पावसातील अनियमितता आदी आव्हानांवर उपाय शोधण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून स्वयंचलित हवामान केंद्रे जिल्ह्यातील १९ गावांमध्ये बसविण्यात आली आहे. त्याद्वारे पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता आदी घटकांची माहिती तसेच पुढील सात दिवसांचा अंदाज शेतकऱ्यांना देण्यात येतो. या सेवेचा लाभ २०९ गावातील सुमारे ४० हजार शेतकऱ्यांना होत आहे.

स्वयंचलित सिंचन यंत्रणा
जिल्ह्यातील सुमारे १०० शेतकऱ्यांकडे ‘ड्रीप ऑटोमेशनचे प्रात्यक्षिकरूपी मॉडेल कार्यान्वित करण्यात आले आहे. त्या आधारे शेतकरी सिंचन व्यवस्थापन करतात. शेतकऱ्यांना वीज पंप सुरू करण्यासाठी रात्री शेतात जाण्याची गरज भासत नाही. मजूर आणि वेळेचीही बचत होते आहे.

ॲपची सुविधा
प्रकल्पांतर्गत ‘कॉटन डॉक्‍टर जालना’ ॲप विकसित केले आहे. त्यासाठी ४० हजार शेतकऱ्यांच्या शेताचे ‘जिओ टॅगिंग’ केले आहे. प्रत्येक शेतकऱ्याला त्याचा ‘लॉग इन आयडी’ दिला आहे.त्यानुसार जमिनीचे आरोग्य, ओलावा, कीड- रोगांची परिस्थती, हवामान अंदाज, बाजारभाव आदी माहिती पाहता येते. ‘टेक्‍स्ट’, व्हॉइस मेसेज, छायाचित्रे, व्हिडिओ यांच्या माध्यमातून शंका
विचारून तज्ज्ञांकडून त्यावर उत्तरे मिळवता येतात. .....

संपर्क- निवृत्ती घुले, ९९२३३८९५८४
सचिन गायकवाड, ८६६८७१०१६२

(बीसीआय’ प्रकल्प व्यवस्थापक, जि. जालना)


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...
Top 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
उन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...
पावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...
येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार?पुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
डीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...
लोकाभिमुख उपक्रमांतून लोणीच्या विकासाला...परभणी जिल्ह्यातील लोणी बुद्रूक गावात लोकाभिमुख...
धुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...
खतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....
खांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...
‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...
खाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...
प्रसिद्ध लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट...पुणे ः प्रसिद्ध लेखक आणि समाजसेवक डॉ. अनिल अवचट...
सोलापुरात कांद्याची दहा हजार टन आवकसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कांदा बीजोत्पादन संकटातखामखेडा, जि. नाशिक : चालू वर्षीच्या सततच्या...
Weather Alert : थंडीची लाट 'या'...देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन दिवस...
भारताच्या गहू निर्यातीची घोडदौड वेगात दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशियातील वाढत्या...
Top 5 News: वऱ्हाडात तुरीची आवक वाढली1. देशातल्या वायव्य भागात थंडी अजून दोन ते तीन...
ज्वारीच्या राखणीसाठी कणसाला संरक्षण नेवासे, जि. नगर : रब्बी हंगामातील ज्वारी आता...
मध्य प्रदेशात जैविक नियंत्रकाद्वारे जल...पाण्याचे स्रोत आणि जलाशयांमध्ये वेगाने वाढणाऱ्या...