केंद्राईमाता’ कंपनीकडून ज्यूट, पॉलिमर कांदा बॅग निर्मिती

शेेतकरी कंपनीने तयार केलेल्या कांदा भरणीसाठाीच्या बॅग्ज
शेेतकरी कंपनीने तयार केलेल्या कांदा भरणीसाठाीच्या बॅग्ज

पुणे जिल्ह्यातील केंदूर येथील केंद्राईमाता शेतकरी उत्पादक कंपनी ज्यूट व पॉलिमर बॅगांच्या निर्मितीत उतरली आहे. त्यासाठी लागणारी सर्व यांत्रिकीकरण सुविधा कार्यान्वित केली आहे. कांदा पॅकिंग करून दोन हजार तीनशे टन कांद्याची विक्री परराज्यात व मॉलमध्ये कंपनीने साध्य केली. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून दिला आहे.   पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात केंदूर हे पंधरा हजार लोकवस्तीचे बारा वाड्यांत विखुरलेले गाव आहे. बहुतांशी भाग जिरायत असून हंगामी पिके येथे घेतली जातात. गाव परिसरातील शेतकरी प्रयोगशील व प्रयत्नवादी विचारांचे आहेत. त्यातूनच महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. सुमारे २२ गटातील एकूण ४६२ शेतकऱ्यांना एकत्र घेत जुलै, २०१५ मध्ये शेतकरी कंपनी स्थापन केली. केंद्राईमाता ॲग्रो फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी असे नामकरण झाले. ज्यूट व पॉलिमर बॅगनिर्मिती गावात मोठ्या प्रमाणात कांद्याचे क्षेत्र आहे. दरवर्षी येथील शेतकरी शिक्रापूर, पुणे, चाकण, कोरेगाव येथून किरकोळ विक्रेत्यांकडून कांदा बॅगा घ्यायचे. यात त्यांचे मोठ्या प्रमाणात पैसे खर्च व्हायचे. त्यातच गोण्या भरल्यानंतर कांदा व्यापाऱ्यांना विक्री केल्यानंतर ते गोण्या परत देत नसत. म्हणजेच बारदान, वाहतूक, भरणी असे शेतकऱ्यांचे खर्च होते. हीच संधी कंपनीने शोधली. ज्यूट व पॉलिमरच्या बॅगा स्वतःच तयार करण्याचे ठरवले. यातून शेतकऱ्यांच्या खर्चात तसेच श्रम व वेळ यातही बचत शक्य होईल असे उद्दिष्ट होते. यासाठी कंपनीने १८ लाखांचा व्यवसाय आराखडा तयार केला. त्यात १३ लाख, ५० हजार रुपये शासकीय अनुदान व साडेचार लाख रुपये शेतकरी हिस्सा होता. दीड हजार स्क्वेअर फूट जागा कंपनीने काही वर्षांच्या तत्त्वावर भाडेकराराने घेतली. ग्रेडिंग, पॅकिंग मशिनरी, कांदा बारदाना तसेच सफाई यंत्र, वजन काटे, संगणक, रॅक, टेबल, खुर्च्या असे साहित्य खरेदी केले. यांत्रिक सुविधा कांदा बॅगा तयार करण्यासाठी आवश्‍यक यंत्रांची माहिती करून घेतली. पुण्यातील काही व्यावसायिकांकडे त्यांचा शोध घेतला. मित्र परिवारात चर्चा केली. त्यातून मुंबई येथे विविध प्रकारची यंत्रे उपलब्ध असल्याचे कळले. त्यानुसार ती खरेदी करण्यास सुरुवात केली. यांत्रिक ‘सेटअप’

  • सध्या घेतलेली बहतांश यंत्रे ‘इलेक्ट्रिक’
  • यात ज्यूट क्लॉथचा रोल मिळतो. त्याचे कटिंग करणारे यंत्र (१५ हजार रु.)
  • बॅग धाग्यांनी वरून बंद करणे (क्लोज करणे) (१० हजार रु.)
  • तसेच ज्यूट बॅग पॉलिमरयुक्त लाल बॅग शिलाई यंत्र (प्रत्येकी ७५ हजार रु.)
  • बॅग तयार करण्यासाठी ज्यूटच्या धाग्यापासून तयार केलेला व पॉलिमरचा असे दोन रोल महत्त्वाचे असतात. या कच्च्या मालाची नाशिक येथून खरेदी. साधारणपणे ३५० किलोचा ज्यूटचा रोल सुमारे साडे ३५ हजार रुपयांना मिळतो.
  • लाल पॉलिमर बॅग्जचे पाच, दहा, वीस आणि पन्नास किलो आकारानुसार कटिंग.
  • तर ज्यूच बॅग्जचे ५० व ५५ किलो या आकारानुसार कटिंग. ग्राहकांच्या मागणीनुसार आकारावर निर्मिती.
  • बॅगा तयार करण्यासाठी कुशल मजुरांची अत्यंत आवश्यकता असते. सुरुवातीला त्यांची अडचण आली. मात्र हळूहळू गावातीलच मजूर तयार करण्यात आले.
  • उत्पादनक्षमता व रोजगार

  • प्रति यंत्र ५०० बॅग्ज यानुसार दोन यंत्रांद्वारे दररोज १००० बॅग्ज निर्मिती
  • हातशिलाईद्वारे प्रति मजूर ३०० यानुसार तीन मजुरांकडून दर महिन्याला सुमारे २७ हजार बॅग्ज निर्मिती.
  • या व्यवसायातून कंपनीने एकूण मिळून सुमारे २५ जणांना रोजगार उपलब्ध केला आहे.
  • आत्तापर्यत ज्यूटच्या ८१ हजार बॅग्ज तर पॉलीमरच्या साधारणपणे ५० हजार बॅग्ज बनविल्या आहेत.
  • धाग्याचा वापर बॅगा तयार करण्यासाठी पॉलिमर धाग्याचा वापर होतो. त्यामुळे चांगल्या प्रकारची शिलाई होऊन बॅगा लवकर फाटत नाहीत. हा धागा पुणे, शिक्रापूर, शिरूर अशा ठिकाणी उपलब्ध असतो. साधारणपणे ९० रुपये प्रति किलो दराने तो मिळतो. ज्यूटच्या बॅगांसाठी लागणारी सुतळीदेखील किरकोळ दुकानांमध्ये ७० रुपये प्रति किलो दराने प्रमाणे उपलब्ध असते. बॅगांची विक्री कंपनी शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करते. त्याचबरोबर त्याची बॅगांमधून विक्री करते. आत्तापर्यंत आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू आदी राज्यांत कंपनीने दोनहजार टन कांद्याची विक्री केली आहे. तसेच ३०० टनांपर्यंत कांदा माॅ लला पाठवला आहे. सन २०१५ मध्ये बाजारात किलोला पाच ते सहा रुपये दर सुरू असलेला तीनशे टन कांदा कंपनीने सात रूपये दराने विकून किलोला एक रुपये नफा शेतकऱ्यांना मिळवून दिला. शिल्लक बॅगांची विक्रीही शेतकऱ्यांना केली जाते. भविष्यातील योजना

  • कांद्यावर प्रक्रिया करणे.
  • कांदा चाळी उभारणे.
  • कांदा निर्यात करणे.
  • -विक्रीसाठी परराज्यात विक्री केंद्र सुरू करणे.
  • पुरस्कार

  • गौरव पुरस्कार
  • आदर्श शेतकरी कंपनी पुरस्कार (कृषी विभाग)
  •  प्रतिक्रिया कांदा भरण्यासाठी बॅग्ज दुसऱ्या गावावरून आणाव्या लागायच्या. आता कंपनीनेच हे काम सोपे केले आहे. त्यातीन वेळ, पैसा यात बचत होत आहे. -कृष्णाजी सुक्रे, शेतकरी कांदा बॅग निर्मितीतून कंपनीने रोजगार निर्माण झाला. शेतकऱ्यांचाही फायदा होत असून सदस्यांना चांगले उत्पन्न मिळू लागले आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार बॅग्ज बनविल्या जातात. त्यांचा दर्जा चांगला असल्यामुळे मागणी वाढत आहे. -मंगेश गावडे, अध्यक्ष, ‘केंद्राईमाता शेतकरी कंपनी’ सुभाष साकोरे, संचालक सध्या आम्हाला मलेशियात कांदा निर्यात करण्यासाठी ३०० टन कांद्याची ऑर्डर आली आहे. ही आमच्या कंपनीसाठी मोठी संधी आहे. दर अद्याप ठरलेले नाहीत. त्याबाबत बैठक घेऊन मगच पुढे जाण्याचा विचार आहे. -संदीप सुक्रे, सचिव, संपर्क- ९०११९९९७७६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com