agriculture story in marathi, farmer producer company of Raghohivre, Dist. Nagar has set up implements bank & started mechanized farming. | Agrowon

‘शनेश्‍वर’ शेतकरी कंपनीने उभारली अवजारे बॅंक, वीस शेतकऱ्यांनी सुरू केली यांत्रिक शेती

सूर्यकांत नेटके
बुधवार, 10 जून 2020

राघोहिवरे (ता. पाथर्डी, जि. नगर)) या दुष्काळी गावातील शनेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीतील सदस्यांनी शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकीकरणाचा आधार घेतला आहे. सुमारे वीस सदस्यांनी मशागतीपासून ते काढणीपर्यंतच्या विविध नऊ यंत्रांची सुविधा व वापर सुरू केला आहे.

राघोहिवरे (ता. पाथर्डी, जि. नगर)) या दुष्काळी गावातील शनेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीतील सदस्यांनी शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकीकरणाचा आधार घेतला आहे. सुमारे वीस सदस्यांनी मशागतीपासून ते काढणीपर्यंतच्या विविध नऊ यंत्रांची सुविधा व वापर सुरू केला आहे.
 
नगर जिल्ह्याच्या पूर्व भागातील पाथर्डी हा दुष्काळी तालुका आहे. भागातील अनेक गावांत सिंचनाचा अभाव आहे. तालुक्यातील राघोहिवरे येथील अनेक शेतकरी कापसाचे उत्पादन घेतात. गावातील अण्णासाहेब होंडे, सचीन काठमोळे, हरिभाऊ झरेकर, कुंडलिक दहिफळे, रामदास नरवडे, भगवान नरवडे, विलास गायकवाड विशाल नरवडे, दिपाली नरवडे, सुजानाबाई होंडे हे दहा शेतकरी कापसाचे बियाणे खरेदी करण्यासाठी एकत्र आले. सन २०१२-१३ मध्ये जय श्रीराम शेतकरी गटाची स्थापना त्यातून झाली. मासिक बचत, एकत्रित बियाणे, खते व अन्य निविष्ठा खरेदी आदी बाबीतून गट कार्यरत झाला. जमा झालेल्या रकमेतून एकमेकांना मदत होऊ लागली. गटाचे नियमित लेखापरीक्षण होऊ लागले.

शेतकरी वळले यांत्रिकीकरणाकडे

  • याच गटाचे रूपांतर आता शनेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीत झाले आहे. तीन वर्षांपूर्वी कृषी विभागाच्या गटशेती प्रोत्साहन सबलीकरण योजनेसाठी निवड झाली. गटशेतीत सुमारे शंभर एकर क्षेत्र होते.
  • सध्या मजूरबळाची असलेली गंभीर समस्या लक्षात घेऊन यांत्रिकीकरण करण्याचा व त्यासाठी अवजारे बॅंक करायचा निर्णय या शेतकऱ्यांनी घेतला.
  • भांडवलाची व्‍यवस्था करून सध्या दोन ट्रॅक्टर्स, रोटावेटर, पेरणीयंत्र, नांगर, सरी पाडण्याचे यंत्र,
  • मळणीयंत्र, जमिनीत खड्डे पाडणारे यंत्र, मुरघासासाठी चाऱ्याची कुट्टी करणारे यंत्र आणि मालवाहतुकीसाठी ट्रेलर असे सुमारे पंधरा लाखांचे साहित्य आज या कंपनीकडे आहे.
  • वीस शेतकऱ्यांत सुमारे १०० एकरांत त्याचा वापर होतो. गटातील शेतकरी ट्रॅक्टरसाठी लागणारे डिझेल आणि चालकांचा खर्च करतात.

सुरुवातीला तीन वर्षे प्रति महिन्याला शंभर रुपये व त्यानंतर पाचशे रुपये बचत सुरू केली. त्यातून पंधरा गुंठे जमीन २९ वर्षे करारावर घेतली. तेथे कार्यालय बांधले. माल साठवणीसाठी सात लाख रुपये खर्च करुन पन्नास टन क्षमतेचे शेड उभारले. तेथे डाळमील युनिट बसवले आहे. दिवसाला तीनशे टनांपर्यंत प्रक्रियेची क्षमता असली तरी मालाच्या उपलब्धतेनुसार सध्या २५ ते ५० टनांपर्यंत प्रक्रिया होते. कंपनीच्या सदस्यांसह अन्य शेतकऱ्यांना दहा रुपये प्रति किलो दराने डाळ तयार करून दिली जाते. त्यातून कंपनीला प्रती किलो दोन ते तीन रुपये नफा मिळतो. दोन पॉलिशिंग करणारी यंत्रे, धान्याचे ‘ग्रेडींग’ करणारी दोन यंत्रे असून कुकूट खाद्यासाठी कांडी पेंड तयार करणाऱ्या यंत्राचीही आगाऊ मागणी नोंदवली आहे.

पाॅलीहाऊस, शेळीपालन

राघोहिवरेच्या या शेतकऱ्यांनी अवजारांबरोबरच उच्च तंत्रज्ञानाचीही कास धरली आहे. कृषी विभागाच्या मदतीने गटशेतीमधील वैयक्तिक लाभाच्या योजनेतून पंधरा जणांनी प्रत्येकी वीस गुंठ्याची शेडनेटस उभारली आहेत. त्यात गुलाबाची लागवड केली आहे. एकाने दूध व्यवसाय सुरू केला आहे. कंपनीचे अध्यक्ष
अण्णासाहेब होंडे यांनी शेळीपालन सुरु केले आहे. त्यांच्याकडे सुमारे १५० गावरान शेळ्या आहेत. गटशेतीमधून तीन शेतकऱ्यांनी मागेल त्याला शेततळे योजनेतून शेततळे उभारले आहे. पाऊसपाणी ठीक राहिले तर त्याचा दुष्काळात फायदा होत आहे.

मुरघासासाठी कुट्टी करणाऱ्या यंत्राचा आधार
कंपनीतील प्रत्येकाकडे जनावरे आहेत. त्या अनुषंगाने चाराटंचाई लक्षात घेऊन मुरघासासाठी शेतातच चाऱ्याची कुट्टी करणारे यंत्र खरेदी केले आहे. मागील वर्षी अनेक शेतकऱ्यांनी मुरघास केला. त्याचा गेल्यावर्षीच्या दुष्काळात चांगला फायदा झाला. जनावरे जगवता आली. गेल्यावर्षी दुष्काळात छावणी चालकांना यंत्र भाडेतत्वावरही काही काळ दिले. त्यातून कंपनीला पंचवीस हजारांचा आर्थिक फायदा झाला.

यांत्रिकीकरणातून अशी होतेय बचत
कंपनीचे अध्यक्ष अण्णासाहेब होंडे म्हणाले की अलीकडील काळात बैलांची संख्या कमी होत चालली आहे. साहजिकच ट्रॅक्टरचलित यंत्रांचा वापर वाढू लागला आहे. मात्र गटाद्वारे तुम्ही यंत्रांची सुविधा केली तर उत्पादन खर्चात मोठा फायदा होतो असे आढळले आहे. एक एकरांवर प्रचलित पद्धतीने नांगरणी करायची तर १५०० रुपये खर्च होतो. पाच एकर क्षेत्र असेल तर हाच खर्च ७५०० रुपयांवर जातो. आम्ही नांगरणीसाठी घेतलेल्या यंत्राचा वापर सुरू केला तर हाच खर्च एकरी १०५० रूपयांवर येतो. म्हणजेच एकरी ४५० रुपयांची बचत तर पाच एकरसाठी २, २५० रूपयांची बचत होते.
रोटावेटरच्या तसेच पेरणीसाठीच्या खर्चातही साधारण याच स्वरूपात बचत होते. आम्ही सदस्यांकडून
यंत्राच्या देखभालीसाठी विशिष्ट रक्कम घेतो. आम्हांला हंगामासाठी त्यासाठी ३० हजार रुपये खर्च येतो.

खड्डे खोदण्याच्या यंत्राने वाचवले पैसे
होंडे म्हणाले की शेडनेटस उभारण्यासाठी आम्हाला खड्डे खोदावे लागतात. आम्ही हेच काम बाहेरून करून घेतले असते तर खर्च वाढला असता. त्यावर उपाय म्हणून ९५ हजारांचे यंत्र आम्ही खरेदी केले. त्यासाठी ४५ हजार रुपयांचे अनुदान मिळाले.

संपर्क- अण्णासाहेब होंडे-९०४९७५५४६१


फोटो गॅलरी

इतर टेक्नोवन
कमी खर्चातील सौर ऊर्जा आधारीत...ग्रामीण भागातील लोक पिण्याच्या पाण्यासाठी...
जांभूळ प्रक्रिया उद्योगासाठी आवश्यक...औषधी गुणधर्म असूनही व्यावसायिक तत्त्वावरील लागवड...
यंत्राद्वारे कमी खर्चात भात पेरणी शक्यभाताची रोपवाटिका करणे, जगवणे, रोपांची वाहतूक,...
एका कुटुंबासाठी स्वयंपूर्ण शिवार वसाहतअर्धा एकर शेतजमीन (दोन हजार चौ.मी. सूर्यप्रकाश) व...
कोरडवाहू सोयाबीनसाठी नावीण्यपूर्ण पेरणी...कोरडवाहू परिस्थितीत सोयाबीनच्या लागवडीसाठी जोळओळ...
सुधारीत वाण, एकात्मिक तंत्रज्ञानातून...तेलबियांचे घटते क्षेत्र, उत्पादकतेची समस्या...
यंत्राद्वारे भात रोपांची लावणीभात लावणी यंत्राचे वॉकिंग टाईप आणि रायडींग टाईप...
भात पेरणीसाठी सुधारित यंत्रेभात लागवडीसाठी सुधारित यंत्राचा वापर फायदेशीर...
पेरणी यंत्राद्वारे पेरणी करताना...प्रशिक्षित ट्रॅक्‍टरचालक हवा    ...
जनावरांतील निदानासाठी क्ष-किरण तपासणीक्ष-किरण तपासणीद्वारे जनावरांतील जठराचा दाह,...
कामाच्या स्वरूपानुसार करा ट्रॅक्टरची...आज बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे व क्षमतेचे...
रासायनिक खतातील भेसळ कशी ओळखाल?खरीप हंगामातील पेरणीला सुरवात होणार असून, शेतकरी...
‘शनेश्‍वर’ शेतकरी कंपनीने उभारली अवजारे...राघोहिवरे (ता. पाथर्डी, जि. नगर)) या दुष्काळी...
पीक व्यवस्थापनामध्ये ड्रोन...पीक व्यवस्थापन, कीडनाशकांची फवारणी, सिंचन,...
काजूबोंडावरील प्रक्रियेसाठी आवश्यक...काजू हे कोकणातील मुख्य पीक आहे. कोकणात काजूपासून...
आव्हाने जाणून उतरा गूळ उद्योगातगुळाची मागणी गेल्या काही वर्षामध्ये वाढू लागली...
स्प्रेअरची निवड करताना राहा जागरूकपारंपरिक पाठीवरील पंपापासून अत्याधुनिक स्प्रेअरचा...
नेमकेपणाने फवारणी करण्यासाठी यंत्रमानव...सध्या पुणे येथील टाटा टेक्नॉलॉजी या संस्थेमध्ये...
कृषी उत्पादनांच्या विक्रीसाठी सामाजिक...छोट्या उद्योगापासून बहुराष्ट्रीय कंपन्यापर्यंत...
लसूण प्रक्रिया उद्योगासाठी पेस्ट अन्‌...हाताने लसूण सोलण्यासाठी वेळखाऊ व कष्टदायक ठरू...