अॅपलबेरचे निर्यातक्षम उत्पादन.

पुणे जिल्ह्यातील खानापूर (ता. जुन्नर) येथील रामभाऊ वाळुंज सुमारे सहा वर्षांच्या अनुभवातूनॲपल बेर पिकातील कुशल शेतकरी झाले आहेत. सुमारे साडेतीन एकरांतील बागेतूनएकरी १५ टनांची उत्पादकता मिळवली आहे. ८० ते १०० ग्रॅम वजनाच्या रसरशीत, टपोऱ्या, हिरव्या आकर्षक रंगाची ॲपलबेर दरवर्षी परदेशांत निर्यात करण्यात त्यांनी यश मिळवले आहे.
निर्यातक्षम अॅपलबेर
निर्यातक्षम अॅपलबेर

पुणे जिल्ह्यातील खानापूर (ता. जुन्नर) येथील रामभाऊ वाळुंज सुमारे सहा वर्षांच्या अनुभवातून ॲपल बेर पिकातील कुशल शेतकरी झाले आहेत. सुमारे साडेतीन एकरांतील बागेतून एकरी १५ टनांची उत्पादकता मिळवली आहे. ८० ते १०० ग्रॅम वजनाच्या रसरशीत, टपोऱ्या, हिरव्या आकर्षक रंगाची ॲपलबेर दरवर्षी परदेशांत निर्यात करण्यात त्यांनी यश मिळवले आहे.​   पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील खानापूर येथे रामभाऊ वाळुंज यांची पारंपरिक १० एकर शेती आहे. फुले, भाजीपाला, टोमॅटो, कोबी, फ्लॉवरचे ते नियमित उत्पादन घेतात. तीन एकरांत पारंपरिक हापूस आंब्याची लागवड केली होती. बाग जुनी झाल्याने तेथे नव्या पर्यायी पिकाची लागवड करण्याचा शोध सुरू होता. यामध्ये पेरू, वॉटर ॲपल, फणस यांचा विचार सुरू होता. ॲपलबेरचीही चर्चा होती. इंदापूर तालुक्यात त्यांनी काही बागांना भेटी दिला. लागवड, बाजारपेठ आदींची माहिती घेतली. अखेर हेच पीक निश्‍चित केले. सुरुवातीचे नियोजन वाळुंज यांनी २०१४ मध्ये साडेतीन एकरांवर लागवडीचा निर्णय घेतला. नाशिक जिल्ह्यातील खडक ओझर येथील रोपवाटिकेतून थायलंड ॲपलबेर वाणाची चार महिने वयाची रोपे आणली. एकरी ४०० रोपांची लागवड असे नियोजन केले. १२ बाय ८ फुटांवर लागवड झाली. दोन बाय दोन फूट खड्ड्यात कंपोस्ट भरून पाणी व अन्नद्रव्ये देण्यासाठी ‘फर्टिगेशन’ची सोय केली. आजमितीला सुमारे १३६५ झाडे संगोपनाखाली आहेत. व्यवस्थापनातील ठळक मुद्दे

  • वाळुंज सांगतात, की अनेक शेतकरी मेमध्ये छाटणी करतात. मी मात्र दीड ते दोन महिने आधी खोडापासून साधारण १५ सेंटिमीटरवर झाडाची छाटणी करतो. या काळात उन्हाचा त्रास असतो. फुले- फळगळीचा धोका असतो. मात्र पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन चोख ठेवावे लागते. बाजारात लवकर फळे आणता येतात. त्यामुळे दरही चांगले मिळतात. पाणी देण्यात येते. छाटणीनंतर १५ दिवस पाणी दिले जात नाही. फुटवे सुरू झाल्यावर ८ ते १० दिवसांनी प्रति झाड ४० लिटर पाणी ठिबकने देण्यात येते. ड्रीपरचा डिस्चार्ज ८ लिटर प्रति तास आहे.
  • जमिनीचा चढ-उतार असला तरी सर्व झाडांना समप्रमाणात पाणी देणाऱ्या ड्रीपरची निवड केली आहे.
  • फळांचे वजन पेलण्यासाठी तार काठीला बांधणी
  • सप्टेंबरच्या दरम्यान उत्पादन सुरु होते. ते जानेवारीपर्यंत (पाच महिने) राहते.
  • सुरुवातीच्या शाकीय वाढीत १९-१९-१९, फुटवे अवस्थेत १२-६१-०, फुलोरा अवस्थेत १३-४०-१३, सेटिंग व फळधारणा काळात ०-५२-३४, कॅल्शिअम, बोरॉन, मॅग्नेशिअम, सल्फर 
  • व काढणीवेळा नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित ०-९-४६ अशी खते देण्यात येतात.
  • कचरा, पालापाचोळा यांचे व्यवस्थापन करून बाग स्वच्छ ठेवली जाते. किडी-रोगांचा प्रादुर्भाव कमी केला जातो. गरजेनुसार कीटकनाशके, बुरशीनाशकांची फवारणी १५ दिवसांच्या अंतराने होते.
  • फळे काढणीच्या शेवटच्या टप्प्यात अवशेष राहणार नाहीत अशी काळजी घेण्यात येते.
  • उत्पादन एकरी साधारण १५ टनांपर्यंत, तर साडेतीन एकरांत ५० टनांपर्यंत उत्पादन मिळत असल्याचे वाळुंज सांगतात. सुरुवातीला निर्यातक्षम फळाला किलोला ४० रुपये व कमाल दर ५५ ते ५८ रुपये देखील मिळाला आहे. पुढे दर २० रुपयांपर्यंतही खाली येतो. एकरी दीड लाख रुपयापर्यंत खर्च होतो. टक्केवारीत सांगायचे, तर ६० टक्क्यांपर्यंत नफा मिळतो. ज्या वर्षी वादळ, अवकाळी पाऊस झाले, त्या वेळी फळगळ होऊन मोठे नुकसानही झाले. कमी माल हाती लागला. तरीही खचून न जाता दरवर्षी चांगले उत्पादन घेण्यासाठी व्यवस्थापन चोख ठेवण्याचा वाळुंज यांचा प्रयत्न असतो. विक्री व्यवस्था विक्री प्रामुख्याने मुंबई बाजार समितीत होते. आखाती देशांमध्ये निर्यात करणारे निर्यातदार वाळुंज यांच्याकडील ॲपलबेरची खरेदी करतात. एक निर्यातदार लंडनलाही माल पाठवत असल्याचे वाळुंज सांगतात. यंदा सातशे किलोपर्यंतही मागणी आली होती. परदेशात माल पाठवायचा तर रासायनिक कीडनाशकांचा वापर अवशेष राहणार नाही या पद्धतीने करावे लागते. ॲपलबेरचे ८० ते १०० ग्रॅम व काही वेळा १२५ ग्रॅमपर्यंत वजन, चमक आणि हिरवा आकर्षक रंग पाहून निर्यातदारांची मागणी होऊ लागली. सहा वर्षे झाली. आजही ती कायम आहे. ७५ टक्के माल निर्यातदार खरेदी करतात. तर २५ टक्के माल बाजार समितीमधील किरकोळ विक्रेते, पथारी व्यावसायिक खरेदी करतात. बॉक्सचे लक्षवेधी पॅकिंग उत्पादनाबरोबर त्याचे पॅकिंगदेखील आकर्षक असेल तर बाजारपेठेत माल लवकर उचलला जातो व त्यास चांगला दर मिळतो असा अनुभव वाळुंज यांना आला. मुंबई बाजार समितीत काही वेळा किराणा माल विक्रेत्यांकडील तेलाच्या, साबणाच्या बॉक्समधून माल यायचा. ते पाहून वाळुंज यांनी आर. बी. डब्ल्यू (रामभाऊ बबन वाळुंज) या ब्रॅण्डची छपाई केलेल्या १० किलो दर्जेदार कोरूगेडेट बॉक्समधून माल पाठवण्यास सुरुवात केली. हे बॉक्स खरेदीदारांसाठी लक्षवेधी ठरले आणि मागणी वाढली. या पॅकिंगसाठी प्रति बॉक्स २० रुपये खर्च येतो. सर्व लेखाजोखा लिखित वाळुंज यांनी प्रत्येक पिकाचा लेखाजोखा एखाद्या सनदी लेखापालासारखा अद्ययावत ठेवला आहे. दैनंदिन खर्च, विक्रीच्या नोंदी, कोणत्या व्यापाऱ्याला किती माल दिला, किती दर मिळाला याची तारखेनिहाय इत्थंभूत आकडेवारी त्यांच्याकडे आहे. त्याबाबत ते म्हणतात, की शेती व्यवसाय म्हणून केली तरच फायदेशीर ठरते. यासाठी जमा-खर्चाचा दरवर्षीचा तपशील अत्यंत उपयोगी ठरतो. कोणत्या व्यापाऱ्यांकडे चांगला दर मिळाला याचेही विश्‍लेषण करता येते. मग कर्जाचा बोजा होत नाही. संपर्क- रामभाऊ वाळुंज, ९८६०८५५३१७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com