agriculture story in marathi, Farmer from Ratnagiri Dist. has got reputation in Alfonso Mango Farming & its Export to various countries. | Agrowon

आंबा निर्यातीत नाव कमावलेले दामले कुटुंब

राजेश कळंबटे
शनिवार, 11 जानेवारी 2020

तीनहजारांहून झाडांच्या चोख व्यवस्थापनातून निर्यातक्षम आंबा उत्पादन आणि सातत्याने विविध देशांना निर्यात करण्यात कोळंबे (जि. रत्नागिरी) येथील दामले कुटुंबाने यश मिळवले आहे. काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाची सुविधा, त्याचा सुयोग्य वापर त्यांच्याकडे पाहण्यास मिळतो. पल्पनिर्मिती करून प्रक्रियेतही त्यांनी ठसा उमटवला आहे.

तीनहजारांहून झाडांच्या चोख व्यवस्थापनातून निर्यातक्षम आंबा उत्पादन आणि सातत्याने विविध देशांना निर्यात करण्यात कोळंबे (जि. रत्नागिरी) येथील दामले कुटुंबाने यश मिळवले आहे. काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाची सुविधा, त्याचा सुयोग्य वापर त्यांच्याकडे पाहण्यास मिळतो. पल्पनिर्मिती करून प्रक्रियेतही त्यांनी ठसा उमटवला आहे.

रत्नागिरी शहरापासून सुमारे अर्ध्या तासाच्या अंतरावर कोळंबे गाव आहे. येथील सलील दामले प्रयोगशील आंबा बागायतदार आहेत. त्यांचे वडील नोकरीत होते. गाव परिसरातील वडिलोपार्जित आंबा बाग कराराने देण्यामधूनही उत्पन्नाचा स्त्रोत मिळवला होता. सलील यांनी बीएस्सी केमिस्ट्री व कायद्यातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर घरच्या आंबा शेतीस लक्ष घालण्यास सुरुवात केली. बंधू समीर यांचीही मोठी मदत त्यांना मिळाली. त्यांचा आंबा वाशीसह मुंबईतही विक्रीला जायचा. सुरुवातील एक हजार पेटी आंबा ते राज्यभरात पाठवायचे.

निर्यातीसाठी प्रयत्न
महत्त्वाकांक्षी, प्रगतीपथावर राहण्याची वृत्ती व त्यसाठी मेहनत घेण्याची वृत्ती असलेल्या सलील यांनी आंबा निर्यातीचे प्रयत्न सुरू केले. पणन, कृषी विभागासह या व्यवसायातील तज्ज्ञांशी सल्लामसलत सुरू केली. परदेशात आंबा निर्यात करण्यासाठी आवश्‍यक ग्लोबलगॅप प्रमाणपत्र देखील २००७-०८ मध्ये घेतले. निर्यातक्षम आंबा बागेचे व्यवस्थापन व अन्य सविस्तर नोंदी ठेवणे गरजेचे असते. तज्ज्ञांच्या मदतीने अधिक माहिती मिळवून त्यादृष्टीने त्यांनी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यास सुरुवात केली.

बागेचे व्यवस्थापन
कोळंबे येथील हजारो कलमे असलेल्या बागेची ग्लोबलगॅप प्रमाणपत्रासाठी नोंदणी केली आहे. दरवर्षी जुलैमध्ये बागेची साफसफाई होते. शेणखताचा भरपूर वापर होतो. मृदा परीक्षण करून त्यानुसार खतांचे डोसेस वापरण्यात येतात. हिवाळा सुरू झाला की कीडनाशक फवारणीला सुरुवात होते. निर्यातीची बाग असल्याने बाग रेसिड्यू फ्री ठेवण्याबरोबर कीड-रोगमुक्त ठेवण्याचे नियोजन होते. ठिबकद्वारे पाणी दिले जाते. उत्तम व्यवस्थापन ठेवल्याने बागांचे आयुष्य चांगले राहते.

निर्यातक्षम आंबाबागेच्या ठळक बाबी

घेतलेली प्रमाणपत्रे
ग्लोबलगॅप भौगोलिक निर्देशांक (जीआय) व मॅंगोनेट
प्रक्रियेसाठी हॅसेप व अन्य प्रमाणपत्रे, आयएसओ घेण्याचा प्रयत्न
 

 • क्षेत्र - सुमारे ७० हेक्टर
 • झाडे - ३००० हजारांतून अधिक
 • सर्व बागेची ग्लोबलगॅपसाठी नोंदणी
 • झाडांचे वय - सुमारे २०० वर्षे वयापर्यंत
 • उत्पादन- प्रति झाड- एक टनांपर्यंत
 • वर्षातून तीनवेळा हैदराबाद येथील संस्थेकडून बागपाहणी

आंबा विक्री
दरवर्षी किमान पाचहजार ते सहाहजार पेटी

विक्रीचे नियोजन

 • एकूण बागेतील सुमारे ६० ते ७० टक्के निर्यात
 • अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड
 • मध्यस्थ व आयातदार यांच्या माध्यमातून
 • काही आंबा देशांतर्गत
 • दहा टक्के मॅंगो पल्प निर्मिती
 • त्याचा ‘स्वाद’ ब्रॅण्डनेम
 • भारतभर विक्री
 • किंमत २२० रुपये प्रति ८५० ग्रॅम टीन पॅकिंग

काढणीपश्‍चात सुविधा

 • कोल्ड स्टोरेज - क्षमता - १०० टन
 • स्वतःचे रायपनिंग चेंबर - क्षमता ५०० टन

अशी होते निर्यातीची प्रक्रिया

 • रत्नागिरीतून आंबा वाशी येथे जातो.
 • त्या-त्या देशांना आवश्यक ती प्रक्रिया येथे होते.
 • उदा. अमेरिका - विकीरण
 • जपान व युरोपीय देश- व्हेपर हीट ट्रिटमेंट (उष्णजल प्रक्रिया)
 • विकीरण प्रक्रियेची व्यवस्था प्रारंभी लासलगावला होती. ती आता वाशी येथे झाल्याने फायदा होत आहे.
 • त्यानंतर हवाई मार्गे आंबा निर्यात होतो.

आंब्याची गुणवत्ता
बाजारपेठेत आपल्या आंब्याचे नाव राहावे यासाठी सलील यांनी सातत्याने बदल घडवून आणले. बागेतून आंबा काढला की ए व बी असे ग्रेडेशन होते. निर्यातसाठी आंब्याचे वजन २१० ते २४० ग्रॅमपर्यंत राहील यावर लक्ष असते. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक वजन काट्याचा वापर होतो.

निर्यातीसाठी हे निकष मुख्य पाळतात

 • रेसीड्यू फ्री फळ
 • रंग, स्वाद उत्तम
 • आंब्यावर डाग नसला पाहिजे. स्पॉटलेस मॅंगो
 • त्याला देठ असला पाहिजे.
 • त्यात स्पॉंजी टिश्‍यू अर्थात साक्याची समस्या नसावी.
 • आकर्षक पॅकिंग

निर्यातीसाठी आकर्षक बॉक्सचा वापर होतो. सहा ते बारा आंबे असलेले बॉक्स वापरले जातात. त्याचे साधारण वजन तीन किलोपर्यंत राहील यावर भर असतो. अनेकवेळा बॉक्सला पाणी लागून आंबा खराब होण्याची शक्यता असते. त्यासाठी पाण्याचा प्रभाव होणार नाही अशा बॉक्सचाही वापर होतो. आंबा बॉक्समध्ये भरण्यापूर्वी त्याला आकर्षक वेष्टन वापरले जाते.

प्रतिक्रिया

‘जीआय’ निर्देशांक मिळाल्यामुळे कोकणचा आंबा हापूस या ब्रँण्डखाली विविध देशांमध्ये मी माझ्या आंब्याची विक्री करीत आहे. भविष्यात सेंद्रिय पद्धतीचा सर्वाधिक वापर करणार आहे.
सलील दामले
संपर्क- ९४२२४३२६८७

 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
शेतकऱ्यांना खते, बियाणे अन् महिलांना...शुद्ध पाणीपुरवठा, गावाअंतर्गत सिमेंट रस्ते,...
भाजीपाला शेतीतून पेलल्या साऱ्या...लग्नानंतर अवघ्या तीन वर्षातच पतीच्या निधनामुळे...
वर्षभरात चार हंगामांत फायदा देणारा घेवडासातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात बहुतांशी उसाचे...
पाणीवापराचे तंत्र समजून निर्यातक्षम...सिंचन व्यवस्थापन हा प्रयोगशील व प्रगतिशील शेतीतील...
खारपाणपट्ट्यात पिकले गोड अॅपेल बोरअंधेरा कितना भी घना क्यू ना हो, दिया जलाना कहाँ...
निवृत्त जवानाचा अनुकरणीय शेळी-...सुर्डी (जि. सोलापूर) येथी हिरोजीराव शेळके यांना...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
सेंद्रिय धान्य महोत्सवातून हक्काची...तीन-चार वर्षांपासून कृषी विभागातर्फे पुणे येथे...
प्रयोगशीलतेने घडविली समृद्धी..अवर्षणग्रस्त कर्जत तालुक्यातील पाटेगाव (जि. नगर)...
सेवानिवृत्त पोलिस उपअधीक्षकाची...औरंगाबाद शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवर...
'सोया’ पदार्थांना मिळवली ग्राहकांकडून...अमरावती जिल्ह्यातील दुर्गम अंजनसिंगी (ता. धामणगाव...
दर्जेदार फरसबीचे वर्षभर उत्पादनकमी कालावधीतील पिके वर्षभर टप्प्याटप्प्याने...
तंत्रज्ञान, सहकार, बॅंकिंग क्षेत्रात...जर्मनी हा युरोपातील प्रगत देश. तंत्रज्ञान आणि...
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...
पाच भावांच्या एकीतून पुढारलेली...ब्राह्मणी गराडा (जि. औरंगाबाद) येथील दुलत...
शेतकरी गट ते कंपनी चांगदेवच्या...चांगदेव (जि. जळगाव) येथे शेतकऱ्यांनी सातत्याने...