agriculture story in marathi, farmer Santosh Akhade set his identity & get expertise in Kahariff & Rabbi Onian farming. | Agrowon

उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे यशस्वी उत्पादन 
गोपाल हागे
मंगळवार, 16 जुलै 2019

मेहकरमध्ये वाढतेय कांदा क्षेत्र 
मेहकर तालुक्यात कांद्याचे क्षेत्र विस्तारत आहे. डोणगाव, विश्वी, मादनी, घाटबोरी, शहापूर, दूधा, ब्रह्मपूरी, देऊळगाव साकरशा आदी गावांमध्ये दीडशे हेक्टरपर्यंत या पिकाचे क्षेत्र राहते. रब्बीत सुमारे ३०० हेक्टरपर्यंत लागवड होते. कांद्याचे बीजोत्पादन देखील या भागात मोठ्या प्रमाणात होते. कांदा पिकाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी तीन वर्षांपूर्वी कृषी विभागाने कार्यशाळा घेतली. चितेगाव येथे येथे प्रशिक्षणही देण्यात आले. कांदा चाळीही योजनेतून उभारण्यात आल्या. 

बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने बहुवीध पीक पध्दतीवर भर दिला आहे. संतोष हा कुटूंबातील प्रयोगशील युवा शेतकरी आहे. दरवर्षी खरीप आणि रब्बीतही कांदा, त्याचा सखोल अभ्यास, त्याद्वारे उत्कृष्ठ पीक व्यवस्थापन या आधारे ते एकरी १० ते १४ टन उत्पादन ते घेतात. आर्थिक सक्षमता मिळवण्यासह या पिकातील कुशल शेतकरी म्हणूनही संतोष यांनी ओळख तयार केली आहे. 
 
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका कांदा पिकासाठी प्रसिध्द आहे. तालुक्यातील डोणगाव येथील आखाडे कुटूंब कांद्यासह विविध पिकांचे प्रयोग करण्यात प्रसिध्द आहे. कुटूंबातील युवा शेतकरी संतोष हे अत्यंत अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. सातत्याने ज्ञान घेत शेतीत पारंगत होण्याची त्यांची सवय असते. 

कांद्याविषयी प्रशिक्षण 
संतोष यांनी २०१३-१४ मध्ये मेहकर कृषी विभागामार्फत खरीप कांदा लागवडीबाबत चितेगाव (नाशिक) येथील ‘एनएचआरडीएफ’ संस्थेत तीन दिवसांचे प्रशिक्षण घेतले. खरीप कांदा लागवडीसाठी रोपवाटीका, 
लागवड पद्धत, बियाणे निवड याबाबत त्यांनी ज्ञान घेतले. कांदाचाळीचे प्रात्यक्षिकही पाहिले. या ज्ञानाचा तंतोतंत वापर करीत त्यांनी प्रत्यक्ष शेतात त्याचा वापर सुरू केला. 

कांदा शेती व व्यवस्थापन 

  • सुमारे सहा वर्षांचा या पिकातील अनुभव 
  • खरीप व रब्बीत प्रत्येकी तीन-साडेतीन एकर ते चार एकरांवर नियोजन 
  • सुरूवातीला चितेगाव फार्मवरून डार्क रेड तसेच खरीपासाठी अनुकूल वाणांची लागवड. ब्रीडर बियाणे देखील आणले. 
  • गादीवाफ्यावर रोपे तयार करतात. या भागात दरवर्षी जोरदार पाऊस होऊनही रोपांचे नुकसान होत नाही. प्रशिक्षणातून ही तंत्रशुद्ध पध्दत अवलंबिली. 
  • आगामी काळातील दर लक्षात घेता या हंगामात तीन एकंरात लागवडीचे नियोजन. यंदा एल ८८३ या नव्या वाणाची निवड. तीन एकरांसाठी पाच किलो बियाण्यापासून रोपे तयार केली जात आहेत. 
  • रोपनिर्मिती सुरू असताना हिरवळीचे खत म्हणून धैंच्याची लागवड 
  • रोप ४५ दिवसांचे झाल्यानंतर चार फूट रुंदीचे गादीवाफे (बेड) तयार करून पुर्नलागवड 
  • नऊ बाय चार इंचावर लागवड 
  • लागवडीनंतर तणनाशक फवारणी व एकदा निंदणी. 

रब्बीतही खात्रीशीर उत्पादन 
रब्बी हंगामात राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून एन २-४-या वाणाचे बियाणे आणले जाते. ब्रीडर वाणही आणले आहे. त्याचाच पाच वर्षांपासून वापर होत आहे. सोयाबीननंतर हा कांदा घेतला जातो. 

साठवणुकीसाठी कांदा चाळ 
कांदा काढणीच्या वेळेत बाजारपेठेत दर चांगलेच राहतील याची शाश्‍वती नसते. यामुळे दर वाढेपर्यंत साठवणूक करून ठेवली जाते. त्यासाठी दोन कांदाचाळी उभारल्या असून त्यात ४५० क्विंटल एवढी साठवणूक करता येते. साठवलेल्या कांद्याची ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये नवीन कांदा येण्याच्या आधी विक्री होत असल्याने चांगला दर पदरात पडतो. 

आखाडे यांचे कांदा उत्पादन दृष्टीक्षेपात 

रब्बी हंगाम 
वर्ष             एकरी उत्पादन       सरासरी दर 
१०१२-१३           ११०                     १२०० ते १८०० 
२०१४० १५         १३०                   १००० ते १२०० 
२०१६-१७       १३५                   ८०० ते १२ 
२०१८-१९           १३०                  १००० ते १६०० 

-सरासरी उत्पादन खर्च- एकरी- किमान ५० हजार रू. 

खरीपातील उत्पादन- एकरी १०० ते १४० क्विंटलपर्यंत 

आखाडे यांची प्रयोगशील शेती 
आखाडे यांची एकत्रित ४४ एकर शेती आहे. सर्व शेतीत सिंचनाची सोय केली आहे. यासाठी चार बोअरवेल, दोन विहिरी आणि एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे आहे. सुमारे १३ एकरांत नागपुरी तसेच किनो संत्रा बाग आहे. अर्ध्या एकरात शेडनेट घेत त्यात नर्सरी सुरु केली आहे. यामध्ये संत्रा, पेरू, आंब्याची रोपे तयार केली जात आहेत. नागपूर येथील राष्ट्रीय लिंबूवर्गीय पीक संंशोधन केंद्राकडील नव्या रूटस्टॉकचा वापर करून संत्रा, मोसंबी, किनोची दर्जेदार रोपे तयार करण्याचे काम सुरू आहे. 

संपर्क- संतोष जगदेवराव आखाडे- ८३०८१९१०१४ 

इतर अॅग्रो विशेष
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...
मंदीचा मारगेल्या वर्षभरापासून आर्थिक मंदीचे चटके देशाला बसत...
समस्यांच्या गर्तेत हरवलेली शेतीकाही वर्षांपूर्वी उत्तम शेती असण्याची अनेक कारणे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
मार्केट केंद्रित शेडनेटची उत्कृष्ठ शेती अभ्यासवृत्ती, कायम नवे शिकण्याची आस, बाजारपेठांचा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...