agriculture story in marathi, Farmer Suresh Bhosure is doing career in farming after loosing the company job. | Agrowon

नोकरीवर शोधला प्रयोगशील शेतीचा पर्याय

गणेश कोरे
गुरुवार, 29 एप्रिल 2021

पुणे जिल्ह्यातील दुष्काळी केंदूर (ता. शिरूर) गावातील सुरेश भोसुरे या तरुणालाची कोरोना लॉकडाउन काळात नोकरी गेली. मात्र हिंमत न हारता घरच्या शेतीतच त्याने करिअर करण्यास सुरुवात केली आहे. 

कोरोना लॉकडाउन काळात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. पुणे जिल्ह्यातील दुष्काळी केंदूर (ता. शिरूर) गावातील सुरेश भोसुरे या तरुणालाही या संकटाचा फटका बसला. मात्र हिंमत न हारता घरच्या शेतीतच त्याने करिअर करण्यास सुरुवात केली आहे. तीन वर्षांपासून कलिंगडाची शेती करीत शेतीतील आत्मविश्‍वासही त्याने उंचावला आहे.
 
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात केंदूर हे दुष्काळी गाव आहे. येथील तरुण रोजगारासाठी परिसरातील रांजणगाव, शिक्रापूर, कोंढापुरी येथील औद्योगिक वसाहतींमध्ये नोकरी करतात. सुरेश भोसुरे हा ‘मेकॅनिकल’ पदविका असलेला तरुण फुलगाव येथील कंपनीत पाच वर्षांपासून नोकरी करायचा. घरची सात एकर शेती वडील पाहतात. त्यात कांदा, बाजरी, ज्वारी आदी पिके ते घ्यायचे.

कलिंगडाची निवड
सुरेश यांच्या प्रयत्नातून २०१९ पासून कलिंगडाचा प्रथमच प्रयोग सुरू झाला. जानेवारीच्या हंगामात गादीवाफा, ठिबक सिंचन आणि मल्चिंग पेपर या तंत्रज्ञाना आधारे लागवड सुरू केली. चौफुला येथील कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून तांत्रिक मार्गदर्शन घेतले. स्थानिक बाजारपेठेत चालणाऱ्या जतींची निवड केली. पहिल्या वर्षी ग्राहकांना थेट बांधावरच विक्री केली. त्यातून बाजारपेठेत माल नेण्यापर्यंतचा सर्व खर्च वाचला. आता या पिकात तीन वर्षांचा अनुभव तयार झाला आहे.

उत्पादन (एकरी) व सरासरी दर (रु. प्रति किलो)

वर्ष           क्षेत्र -- - उत्पादन --     - दर
२०१९ -- १ एकर --- १८ टन --- साडेसात रु.
२०२० -- २ एकर --- ४० टन --- साडेनऊ रु.
२०२१ --- १ एकर --- २५ टन --- साडेआठ रु.

कोरोना टाळेबंदीत थेट विक्री
सुरेश सांगतात, की गेल्या वर्षी कोरोना टाळेबंदीत बाजार समित्या बंद होत्या. बांधावर खरेदीदार आले नाहीत. मग पर्यायी व्यवस्था उभारण्याचे ठरवले. आई, वडील व मी काढणी करायचो. भोसरीमध्ये माल घेऊन जायचो. दोन भाऊ आणि काका यांनी रस्त्याकडेला बसून ८ ते १० रुपये प्रति किलो दराने विक्री करायचे. या व्यवस्थेत त्रास निश्‍चित झाला. पण पैसेही चांगले मिळाले.

पाणीदार केंदूर मोहीम
केंदूरचे शिवार जलयुक्त झाले आहे. ‘अफार्म’चे सुनहरा पल अभियान, केंदूरचे सुपुत्र सध्या पुणे येथे कार्यरत अतिरिक्त आयकर आयुक्त प्रशांत गाडेकर यांचे सहकार्य त्यासाठी लाभले. त्यासह ‘यशदा’चे समन्वयक सुमंत पांडे, स्थानिक प्रतिनिधी कविता शिंदे यांनी लोकसहभागातून ५४ हजार ५०० हेक्टर क्षेत्र लक्षात घेऊन जलसंधारण आराखडा तयार केला. सात सूक्ष्म पाणलोट क्षेत्रांचे स्रोत मोकळे करण्यासह ओढे, नाले, पाझर तलाव, गावतळी यांची पाणी साठवणक्षमता वाढविण्याचे काम सुरू
आहे. पाणीपातळी दीड मीटरने वाढली आहे. पाण्याबाबत स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने आम्ही सारे ग्रामस्थ प्रयत्नशील आहोत. पहिल्या टप्प्यात यश आले आहे असे उपसरपंच व पाणीदार केंदूर अभियानाचे सदस्य भरत साकोरे यांनी सांगितले.

संपर्क- सुरेश भोसुरे- ९१५६०९७५७


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
फळबागेतून शेती झाली फायद्याची..उरळ बुद्रुक (जि.अकोला ) येथे कनिष्ठ महाविद्यालयात...
रमजान सणासाठी दर्जेदार कलिंगडेयंदा सलग दुसऱ्या वर्षी लॉकडाउनचा फटका शेतकऱ्यांना...
वर्षभर उत्पन्नासाठी पपई ठरली फायदेशीरहणमंगाव (ता. दक्षिण सोलापूर. जि. सोलापूर) येथील...
बांबूलागवडीसह इंधनासाठी पॅलेट्‌सनिर्मितीसराई (जि. औरंगाबाद) येथील कैलाश नागे यांनी साडेनऊ...
खरबूज पिकात मिळवली बोरीबेलने ओळखपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीबेल गाव खरबूज...
अक्षय तृतीयेसाठी सज्ज जाहली आंबा...अक्षय तृतीयेचा सण तोंडावर आला आहे. कोकणची...
ऊसपट्ट्यात निर्यातक्षम केसर आंबामहागाव (ता. जि. सातारा) येथील चार भावांचे एकत्रित...
राहुरीत वैशिष्ट्यपूर्ण संशोधित चारा...अलीकडील काळात चारा उत्पादनांसाठी सुधारित वाणांची...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
वनरोपवाटिकेतून गटाने तयार केली ओळखसांगली जिल्ह्यातील खंडोबाचीवाडी  (ता. पलूस)...
शेती, शिक्षण अन पूरक उद्योगातून शाश्वत...जमीन आरोग्य उपक्रमांबाबत जागृती, आत्महत्याग्रस्त...
उद्योजक वृत्तीतून ‘शिवतेज’ची झळाळीशेती टिकवण्याबरोबरच ती अधिक उद्यमशील करण्यासाठी...
फळप्रक्रिया उद्योजक व्हायचेय? चला...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील फळसंशोधन...
शेततळ्यांद्वारे मिर्झापूरचे शिवार झाले...मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत मिर्झापूर (ता.जि...
ऊसपट्ट्यात दहा एकर दर्जेदार पपईकोल्हापूर जिल्ह्यातील खडकेवाडा (ता. कागल) येथील...
दर्जेदार बियाणे उत्पादनातून ‘वर्णेश्‍वर...वर्णा (जि. परभणी) येथील शेतकऱ्यांनी वर्णेश्‍वर ॲ...
अत्याधुनिक हवामान केंद्रे आता...नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील प्रसिद्ध सह्याद्री...
नगरच्या चिंचेचा बाजार राज्यात अव्वलनगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दरवर्षी...