agriculture story in marathi, Farmer Vaidya from Amaravati Dist. has done farm mechanization to save labor, money & time in Agriculture. | Agrowon

वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसा

विनोद इंगोले
मंगळवार, 4 ऑगस्ट 2020

गरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (ता. धामनगाव रेल्वे, जि. अमरावती) येथील नामदेव वेद्य यांनी पेरणी ते काढणीपर्यंत शेतीचे यांत्रिकीकरण केले आहे. एकूण ८० एकर शेती सांभाळताना विविध यंत्रे वापरत श्रम, वेळ व पैसा यात त्यांनी बचत केली. शिवाय स्वतःच्या शेतीतील गरजेनुसार स्वंशोधन करीत काही यंत्रेही विकसीत केली.

गरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (ता. धामनगाव रेल्वे, जि. अमरावती) येथील नामदेव वेद्य यांनी पेरणी ते काढणीपर्यंत शेतीचे यांत्रिकीकरण केले आहे. एकूण ८० एकर शेती सांभाळताना विविध यंत्रे वापरत श्रम, वेळ व पैसा यात त्यांनी बचत केली. शिवाय स्वतःच्या शेतीतील गरजेनुसार स्वंशोधन करीत काही यंत्रेही विकसीत केली.
 
अमरावती जिल्ह्यातील निंभोरा बोडखा येथील नामदेव वैद्य यांची घरची ५० एकर शेती आहे. दोघे भाऊ, मुले व आईवडील असे हे कुटुंब आहे. आज एकत्रित कुटुंबपद्धतीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. परंतु वैद्य कुटुंब त्याला अपवाद ठरले आहे. नामदेव घरची शेती सांभाळतात तर वासुदेव मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी म्हणून धामनगाव येथे तालुक्याच्या ठिकाणी राहतात. परंतु कुटुंबाचे व्यवहार एकत्रित आहेत.

नामदेव यांचे शेतीतील ‘करिअर’
नामदेव यांनी १९९० ते १९९२ या काळात ‘आयटीआय’ मधून पेंटिंग चा अभ्यासक्रम पूर्ण केला. सुरुवातीला ३० रुपये प्रती दिन पाठ्यवृत्तीवर प्रशिक्षणार्थी उमेदवार म्हणून काम केले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अवघ्या २०० रुपये रोजगारासाठी काही खासगी कंपन्यांत त्यांनी काम केले. मात्र घरची ५० एकर शेती सतत खुणावत होती. त्यामध्येच आपले कर्तृत्व सिद्ध करावे असा निश्‍चय करून नोकरीचा राजीनामा देत ते गावी परतले.

शेतीचा विस्तार
वैद्य कुटुंबाची सुरुवातीला अवघी चार एकर शेती होती. त्यानंतर १५ एकरांपर्यंत क्षेत्र वाढवले. टप्याटप्याने ते 50 एकरांवर दोन्ही भावांनी मिळून नेले. आज घरच्या ५० एकरांबरोबरच मित्राची ३० एकर शेती ते ३५ वर्षांपासून कसत आहेत. नामदेव यांनी गावातील काही शेतकऱ्यांच्या सहकार्याने कास्तकार सोया प्रोड्यूसर कंपनीची उभारणी केली आहे. सुनील बोरकर अध्यक्ष तर नामदेव उपाध्यक्ष आहेत. या माध्यमातून कडधान्यावर प्रक्रिया करण्याचा उद्योग उभारणीचे प्रस्तावित आहे.

यांत्रिकीकरण
नामदेव यांनी शेतीतील यांत्रिकीकरणावर भर दिला आहे. त्यांच्याकडे ट्रॅक्टरचलित खत देणारे यंत्र आहे. सोयाबीन पेरणीच्या सुमारे २० दिवस आधी त्याचा वापर ते करतात. प्रति दिवसाला २५ एकरांपर्यंत खत देणे या माध्यमातून शक्य होते. पारंपरिक पद्धतीत जिथे १५ मजुरांची गरज भासली असती तिथे हे काम अवघ्या तीन मजुरांच्या बळावर शक्य होते. शिवाय जयपूर (राजस्थान) येथून त्यांनी कापूस टोकण यंत्र घेतले आहे. दोनशे ते अडीचशे रुपये प्रति महिला अशी मजूर कापूस टोकणीकामी घेण्यात येते. दहा एकरांसाठी यात १५ मजुरांची आवश्‍यकता भासते. त्याऐवजी या पद्धतीत कमी खर्चात दिवसभरात १० एकरांत कापूस पेरणी करता येते.

यांत्रिकीकरणातील ठळक बाबी

  • सुमारे ८० एकरांत चार विहिरी.
  • -पाण्याचे नियोजनबद्ध वापर व्हावा यासाठी ५० एकरांत तुषार सिंचन
  •  ५० एकरांत सोयाबीन, यातील १५ एकरांत तुरीचे आंतरपीक तर उर्वरित ३० एकरांत कपाशी.
  • या सर्व ८० एकरांवर मजूर उपलब्धतेची मोठी अडचण निर्माण होते. ती पाहता२०१४ मध्ये ट्रॅक्टर खरेदी केला. त्यासोबतच पेरणी यंत्रही मिळाले.
  • गरज वाढल्यानंतर२०१६ मध्ये आणखी एक ट्रॅक्टर खरेदी केला. ट्रॅक्टरच्या वरील बाजूचा टप काढून दोन्ही बाजूंना २५ लीटर क्षमतेचे चिनी बनावटीचे पंप बांधले. त्याद्वारे तुरीवर फवारणी करण्याचा प्रयोग केला.

वैद्य यांच्याकडील अन्य अवजारे
नऊ दात्याचे कल्टिव्हेटर, ट्रॅक्टरचलीत वखरपास, पंजी, तीन पानांची ट्रॅक्टरचलीत तिरी (तूर शेंगा अवस्थेत आल्यावर यंत्राचा वापर होतो. ते जमिनीत खोल जाते. त्यामुळे माती वर येते. तणकटे काढता येतात.) ट्रॅक्टरचलीत यंत्रांचा वापर वाढल्यामुळे यातील काही अवजारांचा वापर आता होत नाही.

यंत्राच्या वापराविषयी काही

  • कटर यंत्र- कपाशीची काढणी झाल्यानंतर त्याची तोडणी करून त्याचे अवशेष शेतातच पसरविले जातात. त्यासाठी या यंत्राचा वापर करतात. यात एक ते दोन इंचाचे अवशेष तयार होतात. कल्टिव्हेटर वापरून ते मातीत मिसळून घेतले जातात. पाऊस पडल्यानंतर ते कुजतात. त्याचे खत तयार होते. खरेदीवेळी यंत्राची किंमत सुमारे सव्वा दोन लाख रुपये होती.
  • कपाशीला खत देणे - कपाशीला खत देताना एक एकरासाठी दोन मजुरांची गरज भासते. त्यानुसार प्रति मजूर २०० रुपये खर्च होतो. पर्याय म्हणून नामदेव यांनी कल्पकतेतून खत देण्यासाठी स्थानिक वर्कशॉपमधून यंत्र तयार करून घेतले. एक बैलजोडी आणि एक मजूर असल्यास दिवसभरात सहा ते आठ एकरांत खते देणे शक्य होते. हेच काम मजुरांमार्फत केल्यास आठ जणांची गरज भासते. त्यावर सुमारे १६०० रुपयांचा खर्च होतो. दोन फुटांचा डवरा, त्याला दोन्ही बाजूंस तिफनीचे दाते, तीन रॉडव्दारे घमेले जमिनीपासून तीन फुटांवर आहे. त्याला व्हॉल्वज आहेत. त्या माध्यमातून खताचे प्रमाणे नियंत्रित होते.
  • मळणी यंत्र- क्षेत्र मोठे असल्याने विविध पिकांची मळणी करण्यावर मोठा पैसा खर्च व्हायचा. त्यामुळे २०१३ मध्ये एक लाख ३५ हजार रुपयांना मळणीयंत्र खरेदी केले. सोयाबीन, हरभरा, तूर, गहू यांच्यासाठी वापर होतो. सुमारे ६० ते ७० क्विटंल मालाची एका दिवसात मळणी होते.

संपर्क- नामदेव वैद्य-९८९७०२३१६१


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
एकत्रित शेतीला यांत्रिकीकरणाची जोडअल्पभूधारकांप्रमाणे मोठ्या क्षेत्रावरील...
देशी गोपालनातून शेती केली शाश्वतकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक...
रेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
ऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोगसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस...
झेंडू ठरलंय हमखास उत्पन्नाचे पीकशहरी बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन मोह (ता.सिन्नर...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
गुणवत्तापूर्ण हळद, डाळींची थेट...सनपुरी (जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी नरेश...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
औरंगाबाद जिल्ह्यात करटोलीची व्यावसायिक...कोकण, पश्‍चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील...
निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात कादे...योग्य नियोजन, व्यवस्थापनाच्या बळावर सुमारे १५ एकर...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...
भात शेतीला मिळाली कुक्कटपालनाची जोडनिवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) येथील मारुती सहदेव...