agriculture story in marathi, farmer women producer company of Bormani, Dist. Solapur under YASHASWINI brand doing successful business in pulsed & vegetable commodities. | Agrowon

डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’ ८८५ महिलांचा सहभाग 

सुदर्शन सुतार
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

पंतप्रधानांची शाब्बासकी 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी व्हिडिओ कॅान्फरन्सद्वारे देशभरातील शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यात महाराष्ट्रातून महिला शेतकरी कंपनीची अध्यक्ष म्हणून सौ. माळगे यांना पंतप्रधानांशी बोलण्याची संधी मिळाली. त्यांनी सुमारे २० मिनिटे संवाद साधला. पंतप्रधान मोदींनी त्यांचे कौतुक करून सौ. माळगे यांना शाब्बासकी दिलीच. शिवाय कृषी विकासात शेतकरी कंपन्यांची भूमिका किती महत्त्वाची ठरते आहे, याकडे लक्ष वेधले. 

बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५ शेतकरी महिलांनी एकत्र येत यशस्विनी ॲग्रो फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली आहे. त्याद्वारे स्वउत्पादीत विविध डाळी, प्रक्रियायुक्त पदार्थांना विविध बाजारपेठांचे स्त्रोत मिळवले आहेत. त्यातूनच अल्पावधीत कंपनीने चार कोटींची उलाढाल करण्यापर्यंत झेप घेतली आहे. अनिता माळगे यांच्या पुढाकारातून उभारलेली राज्यातील ही बहुधा पहिलीच महिला शेतकरी उत्पादक कंपनी असावी. 

सोलापूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरपासून १५ किलोमीटरवर असलेले बोरामणी हे भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध गाव आहे. पडवळ, दोडका, हिरवी मिरची, टोमॅटो आदींच्या भरघोस उत्पादनात गावचा हातखंडा आहे. हैदराबाद, मुंबई, पुणे येथील बाजारपेठांत येथील भाज्यांनी ओळख तयार केली आहे. गावातील सौ. अनिता माळगे या प्रयत्नवादी महिला शेतकरी आहेत. परिसरातील महिलांना संघटित करून त्यांनी शेतकरी गटाची स्थापना केली. ‘आत्मा’चे तत्कालीन प्रकल्प संचालक विजयुकमार बरबडे, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॅा. एल. आर. तांबडे, नाबार्डचे सरव्यवस्थापक प्रदीप झिले, तत्कालीन जिल्हा पणन अधिकारी सतीश वाघमोडे, आत्माचे तालुका व्यवस्थापक विक्रम फुटाणे यांनी या कामात मोठी मदत केली. त्यातून १० गट तयार झाले. त्यांना गटाचे महत्त्व, सामूहिक शेती, विक्री व्यवस्था आदी विषयांवर तज्ज्ञांची चर्चासत्रे घेतली. अर्थात महिलांमध्ये हे परिवर्तन घडवण्यासाठी मेहनत घ्यावी लागली. 

गटाचा प्रवास 

 • दहा गटांच्या स्थापनेनंतर १०० हून अधिक महिला जोडल्या गेल्या. त्यामुळे उत्साह वाढला. 
 • सन २०१४ मध्ये ‘आत्मा’ तर्फे गटांना प्रात्यक्षिकासाठी ज्वारी, तूर बियाणे वाटप 
 • एकत्रितपणे निविष्ठा खरेदी केली. 
 • मोफत बियाणे आणि अन्य निविष्ठांच्या एकत्रित खरेदीमुळे आर्थिक बचत. 

शेतकरी कंपनीची उभारणी 
पाहाता पाहाता सन २०१५ मध्ये गटांची संख्या १८ वर पोचली. त्या वेळी सुमारे साडेतीनशे महिलांचे संघटन झाले होते. त्यातूनच शेतकरी कंपनीची संकल्पना पुढे आली. अर्थात ही गोष्ट सोपी नव्हती. 
आराखडा, उद्दीष्ट, स्वभांडवल अशा अनेक अडचणी होत्या. अखेर हिंमतीने सर्वातून मार्ग काढत 
यशस्विनी ॲग्रो फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी उभी राहिली. 

मिळाली प्रेरणा, वाढला आत्मविश्वास 
बोरामणी येथील सौ. अनिता माळगे या कंपनीच्या अध्यक्ष आहेत. त्यांनी आपल्या सदस्य महिलांना 
प्रोत्साहन देण्यास सुरवात केली. त्यासाठी सोलापूर, पुणे, मुंबई, बारामती या भागातील प्रदर्शने, चर्चासत्रे, प्रयोगशील शेतकऱ्यांकडे अभ्यास सहली आयोजित केल्या. निर्यातदार कंपन्यांसोबत भेटी घडवून आणल्या. शेतमाल उत्पादन, मार्केटिंग या पातळ्यांवरील वस्तुस्थिती आणि संधी महिलांना जवळून अनुभवता आली. यातील काही महिला पूर्वी फारशा घराबाहेर पडल्या नव्हत्या. त्यांच्यासाठी हा अनुभव प्रेरणा देणारा ठरला. 

प्रक्रिया उद्योगाचा विचार 
कंपनीने प्रक्रिया उद्योगावर भर दिला. डाळमिल, क्लिनिंग, ग्रेडिंग यंत्रणा उभारण्याचे ठरले. 
एकूण सुमारे १८ लाख रुपयांचा आराखडा होता. स्वभांडवलासाठी गटातील सदस्यांचे 
चार लाख रुपये भांडवल होते. महाराष्ट्र स्पर्धाक्षम प्रकल्पाच्या माध्यमातून कंपनीचे कार्य सुरू झाले. 
प्रतितास अडीच टन ग्रेडिंगची तर प्रतिदिन दीड टनांपर्यंत डाळमिलची क्षमता आहे. 

महिलांची कंपनी- दृष्टिक्षेपात 

 • बोरामणी परिसरातील १२ गावांतून एकूण ४५ गट तयार झाले 
 • कंपनीच्या सदस्य महिला - ८८५ 
 • एवढ्या मोठ्या संख्येने महिलांनी महिलांसाठी सुरू केलेली ही पहिलीच शेतकरी उत्पादक कंपनी असावी. 
 • उत्पादने- तूर, मूग, उडीद, हरभरा डाळ तसेच मका, सोयाबीन, गहू, बाजरी यावरही प्रक्रिया 
 • सुमारे ३६ उत्पादने- यात कडक भाकरी, मसाले, लोणची, पापड, शेवया आदींचाही समावेश. 
 • ब्रॅंड- यशस्विनी 
 • गावातील भाजीपाला विक्रीतही सक्रिय 
 • कामांची जबाबदारी 
 • प्रत्येक गटातील महिला विविध मालांचे उत्पादन घेतात. शिवाय शेतकऱ्यांकडून मालाची खरेदी होते. 
 • त्याचीही जबाबदारी महिलाच स्वीकारतात. 
 • कंपनीचा वाढता व्याप आणि सर्व महिलांचा सहभाग यातून कामांची विभागणी. 
 • त्यासाठी शासकीय योजना समन्वय समिती, मार्केटिंग, विक्री, सामाजिक अशा समित्या. 
 • याद्वारे प्रत्येकीला कामाची संधी. कंपनीच्या संचालक मंडळावरही शेतकरी गटनिहाय संचालक. 
 • कामांची विभागणी केल्याने कोणावरही ताण पडत नाही. 
 • डाळींचे उत्पादन (टन) 
 • २०१७-१८ 
 • तूर--५ टन 
 • हरभरा - ३ टन 
 • २०१८-१९- 
 • तूर - ६ टन 
 • हरभरा - ५ टन 
 • उडीद - ७० क्विंटल 

 विक्री व्यवस्था 
 पुणे, मुंबई भागातील विविध प्रदर्शने, महोत्सव आणि थेट ग्राहकांना स्वच्छ, दर्जेदार डाळी व धान्य पुरवठा होतो. कोणत्याही प्रकारच्या पॅालिशिंगशिवाय डाळ तयार केली जाते. त्यामुळे बाजारातील दरांपेक्षाही प्रति किलोमागे २० ते ३० रुपये जास्तीचे मिळतात. सध्या एक ग्रेडच्या तुरीला १२० रुपये प्रति किलो तर बाकी ग्रेडला ७० ते ९० रुपये, हरभरा डाळीला ८० रुपये तर उडीद डाळीला १०० रुपये दर मिळाला आहे. 
 नुकताच आघाडीच्या मॅालशी करार. भाजीपाला, शेंगाचटणी, मसाले पदार्थ, चटण्या, धान्य आदींचा होणार पुरवठा 

सकाळच्या तनिष्का व्यासपीठाचा फायदा 
कंपनीच्या अध्यक्षा सौ. अनिता माळगे यांच्यासह अनेक महिला सकाळच्या तनिष्का व्यासपीठाच्या सदस्य आहेत. या माध्यमातून आम्हाला उद्योगाचे प्रशिक्षण मिळाले. आम्ही आत्मनिर्भर झालो 
अनेक संधी मिळाल्याचे सौ. माळगे यांनी सांगितले. तनिष्काच्या माध्यमातून मेक्सिको येथील अभ्यासक मिस मारियाना यांनीही भेट दिल्याचे त्यांनी सांगितले. 

संपर्क - सौ. अनिता माळगे - ९८८१९९८११२ 

 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
पूरकउद्योग अन् शेती विकासात श्री भावेश्...बेलवळे खुर्द (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील श्री...
शाश्वत ग्राम, शेतीविकासाची 'जनजागृती'औरंगाबाद येथील जनजागृती प्रतिष्ठान या स्वयंसेवी...
कमी खर्चातील गांडूळखतनिर्मिती तंत्राचा...अंबेजोगाई (जि. बीड) येथील शिवाजी खोगरे यांनी कमी...
आरोग्यदायी अन्ननिर्मितीबरोबरच जपली...धानोरा- भोगाव (जि. हिंगोली) येथील दादाराव राऊत आठ...
वेळूकरांनी एकजुटीने दूर केली पाणीटंचाईसातारा जिल्ह्यातील वेळी गावाने एकजुटीने...
अर्थकारण उंचावण्यासाठी मोसंबीसह पेरू,...अस्मानी, सुलतानी संकटे आली तरी त्यातून मार्ग काढत...
सिंचनाची गंगा अवतरली बांधावरयवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर नोव्हेंबरमध्ये...
मराठवाड्याच्या मोसंबीची पुण्यात मोठी...मोसंबी हे पीक मराठवाडा, विदर्भ व नगर जिल्ह्यात...
सुशिक्षित तरुणाने शोधला मधमाशीपालनातून...बीएससी. मायक्रोबायोलॉजीपर्यंत शिक्षण झालेल्या...
शेतीला दिली मधमाशीपालनाची जोडएखादा पूरक व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असेल तर...
मिरची पिकात प्रमोद पाटील यांनी तयार...सावळदा (ता. जि. नंदुरबार) येथील प्रमोद हिरालाल...
आंबा निर्यातीत नाव कमावलेले दामले कुटुंबतीनहजारांहून झाडांच्या चोख व्यवस्थापनातून...
गायकवाडवाडी झाली पेरू बागांसाठी प्रसिद्धपुणे शहरापासून सुमारे बारा किलोमीटरवरील...
ज्ञानाचा व्यासंग केल्यानेच...मुर्शीदाबादवाडी (जि. औरंगाबाद) येथील संजय पवार...
ट्रॅक्टरचलित कौशल्यपूर्ण अवजारांची...पिलीव (जि. सोलापूर) येथील सुनील सातपुते या अवलिया...
चार एकर शेततळ्यात आधुनिक पद्धतीने...नाशिक जिल्ह्यातील पुतळेवाडी येथील धारणकर...
निसर्ग अन् लोकसंस्कृतीतून ग्रामविकासाला...भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळाच्या...
शेतीला मिळतोय मधमाशीपालनाचा मोठा आधारकेवळ अडीच एकर शेतीला उदरनिर्वाहासाठी...
भाजीपाला, फुलशेतीतून गटाने दिली नवी दिशाटिके (जि. रत्नागिरी) गावातील नवलाई आणि पावणाई या...
अॅग्री बीटेक’ तरुणाचा धिंगरी मशरूम... ‘ॲग्रिकल्चर बीटेक’ची पदवी घेतलेल्या अनंत...