agriculture story in marathi, Farmers of Akole Taluka, Dist. Nagar are doing conservation of Kalbhat variety of rice. | Page 2 ||| Agrowon

काळभाताचे होतेय संवर्धन, तयार होतेय ‘मार्केट’ही

शांताराम काळे
मंगळवार, 6 जुलै 2021

नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील कळसूबाई डोंगररांगांच्या पट्ट्यातील अनेक शेतकरी काळभात या देशी, सुवासिक भातवाणाचे संवर्धन करीत आहेत. घरी खाण्यापुरता ठेवून बाजारपेठांचा शोध घेत विक्री व्यवस्था उभारण्याचेही शेतकऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील कळसूबाई डोंगररांगांच्या पट्ट्यातील अनेक शेतकरी काळभात या देशी, सुवासिक भातवाणाचे संवर्धन करीत आहेत. घरी खाण्यापुरता ठेवून बाजारपेठांचा शोध घेत विक्री व्यवस्था उभारण्याचेही शेतकऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील पश्‍चिम भाग हा आदिवासी दुर्गम समजला जातो. इथल्या कळसूबाई डोंगरपट्ट्यात मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे उताराला आडवी पायऱ्यांची शेती केली जाते. भातखाचरे तयार करून आदिवासी पूर्वापार शेती करीत आला आहे. नाचणी, वरई, भादली, सावा आदी पिकेही घेतली जातात. या पट्ट्यात विविध पिकांच्या देशी व दुर्मीळ जातींचे संवर्धन करणारे शेतकरी पाहण्यास मिळतात. काळभात हा त्यापैकीच एक आहे. बारी, कुमशेत, शिरपुंजे, सोमलवाडी, बिताका, गुहिरे, धामणवन, शिरपुंजे अशा गावांतील शेतकऱ्यांनी या भाताचे अस्तित्व टिकवून धरले आहे. इथले भौगोलिक पर्यावरण वैशिष्ट्यपूर्ण असते. उंच डोंगरावर पावसाबरोबरच थंडीचेही प्रमाण अधिक असते. मोठ्या प्रमाणात धुके असते.

शेतकऱ्यांचे अनुभव
धामणवन येथील बाळू बारामते आपला अनुभव सांगताना म्हणाले, की आई-वडील, पत्नी व मुले असे आमचे कुटुंब आहे. तीन एकरांतील शेतीपैकी एक एकरांत दरवर्षी काळभात असतो. सुमारे २० वर्षांपासून हे देशी वाण टिकवले आहे. तो चवीला व आरोग्यालाही चांगला आहे. त्याला इंद्रायणीसारखा सुगंध येतो. उत्पादन संकरित वाणापेक्षा कमी आहे. मात्र पाऊसमान व हवामान पोषक ठरल्यास एकरी १० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळू शकते. ग्राहकांकडून मागणी असते. नोकरदार व्यक्ती घेऊन जातात. राजूरच्या बाजारपेठेतही विक्री करतो. किलोला ३५ रुपये (साळीचा) त्यास दर मिळतो. बी फोकून रोपे तयार केली जातात. सुमारे २२ दिवसांनी त्याची पुनर्लागवड केली जाते. साधारण १५० ते १५५ दिवसांत तो पक्व होतो. कणगीत साठवून पुढील वर्षी बियाणे म्हणून उपयोगात आणला जातो.

संपर्क- बाळू बारामते, ९४२३२०८७१४

घोडे यांचे अनुभव
बारी जहागीरदारवाडी येथील बाळू घोडे हे शेतकरी देखील काळभाताचे उत्पादक म्हणून प्रसिद्ध आहेत. कळसूबाई शिखराच्या पायथ्याशीच ते राहतात. पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा त्यांचा आग्रह असतो. त्यांचे क्षेत्र तुकड्यात असते. पूर्वी त्यांचे आजोबा हा भात घ्यायचे. काही काळानंतर मग उत्पादन थांबले. आता पाच-सहा वर्षांनी घोडे यांनी पुन्हा लागवडीवर भर दिला आहे. तेही रोपे तयार करूनच पुनर्लागवड करतात. या भाताचे महत्त्व सांगताना घोडे म्हणतात, की दोन वर्षांपूर्वी दुष्काळ पडला. अशावेळी संकरित किंवा अन्य प्रचलित वाणांपेक्षा देशी वाण चांगले तगून राहिले. त्यापासून काही तरी उत्पादन निश्‍चित हाती येते.

विक्री व्यवस्था
पोपट यांनी काळभातासाठी विक्री व्यवस्था उभारली आहे. कृषी प्रदर्शनांमधून स्टॉल उभारून थेट ग्राहकांना विक्री करतात. बारामती, नागपूर, मुंबई येथे त्यांचे ग्राहक आहेत. तेथे पार्सलद्वारेही भात पाठवला जातो. साळीपासून तांदूळ तयार करण्यासाठी त्यांनी २०१४ मध्ये ३५ हजार रुपयांना चक्की घेतली. त्यामुळे बाहेरून प्रक्रिया करून घेण्याची गरज भासत नाही. किलोला काही वेळा १०० रुपयांपर्यंत थेट ग्राहक दरही मिळविण्यात यशस्वी झाल्याचे पोपट सांगतात.

डांगी गोपालन भाताला पूरक
पोपट सांगतात, की माझ्याकडे सुमारे ३० ते ३५ डांगी गायी आहेत. त्यांच्यापासून मिळणाऱ्या शेणापासून जिवामृत तयार करून भातशेतीत वापर होतो. जनावरे डोंगरावर चरत असली तरी भाताचा चाराही जनावरांच्या उपयोगात येतो. गोऱ्हे, कालवडी यांचीही गरजेनुसार विक्री होते.

संपर्क-  पोपट घोडे, ७३७८८४४५५०

काळभात संवर्धनाचे प्रयत्न
भाताच्या साळीचे (वरचे आवरण) काळ्या रंगाचे असते. दाणा मात्र पांढरा असतो. भात शिजवल्यानंतर मऊ व सुवासिक असतो. वनराई संस्थेच्या माध्यमातून त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातही वाण जपला जात आहे. मूळच्या अकोले येथील असलेल्या व सध्या नाशिक येथे वास्तव्य असलेल्या निलीमा जोरवर यांच्या पुढाकारातून कळसूबाई मिलेट्‌स शेतकरी उत्पादक कंपनी अलीकडेच स्थापन झाली. त्या माध्यमातून या भाताला विक्रीचे व्यासपीठ मिळवण्याचा प्रयत्न आहे.

बळीराजा कंपनीने दिले मार्केट
संगमनेर भागातील लोकपंचायतसारखी संस्था काही वर्षांपासून अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांसोबत काळभात संवर्धनासाठी कार्यरत आहे. संस्थेच्या बळीराजा कृषक उत्पादक कंपनीने गाव पातळीवरच सामूहिक भात खरेदी सुरू केली. स्थानिक व्यापारी १५ रुपये प्रति किलो दराने खरेदी करायचे. त्यासाठी राजूर किंवा कोतूळ येथे माल न्यावा लागे. ‘बळीराजा’ने रास्त भाव देत त्याची किंमत ३० रुपयांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. आजमितीस १५ गावांतील सुमारे १३० शेतकऱ्यांकडील सहा टन काळभाताला बळीराजा कंपनी विक्रीची हमी देत आहे. सात वर्षांपूर्वी १५ ते २० शेतकरी हा भात पिकवायचे. मजल दरमजल करीत १५० पेक्षा अधिक शेतकरी विक्रीतून चार पैसे कमावत आहेत. देशभरातील विविध ठिकाणी काळभात पोहोचला आहे.

काळभाताचा पेंढा
एकरी सरासरी १५ क्विंटलपर्यंत प्रति एकर पेंढा मिळतो. तो व्यवस्थित साठवून ठेवल्यास दोन वर्षे तरी वापरता येतो. काळभात मूल्यवर्धन कामाला लोकपंचायतीच्या महाराष्ट्र जनुक कोश कार्यक्रमाद्वारे गती आली. काळभाताच्या हातसडी तांदळाला बाजारपेठेतून मागणी यायची. मात्र घरगुती उखळात मुसळाने कांडल्यास तांदळाचे तुकडे व्हायचे. जास्त कणी तयार व्हायची. हातसडी तांदूळ तयार करण्याचे कमी ऊर्जेवर चालणारे यंत्र आता पाबळ जि. पुणे येथील विज्ञान आश्रमाच्या आधारे विकसित झाले आहे.


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
उत्कृष्ट व्यवस्थापनातून जोपासलेली नारळ...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळे (ता. वेंगुर्ला)...
तंत्र व चोख व्यवस्थापानातून वाढवली...दीडशे दिवस पीक कालावधी, टोकण पद्धतीची लागवड, ठिबक...
पंचवीस वर्षांपासून सीताफळाची जोपासनासांगली जिल्ह्यात अंजनी (ता.. तासगाव) येथील...
उस्मानाबादी शेळ्यांचा यशस्वी जोपासलेला...परभणी शहरापासून नजीक पारवा शिवारात सतीश रन्हेर व...
जल प्रदूषण मुक्तीसाठी ‘गोदावरी नदी संसद...नांदेड जिल्ह्यात ‘गोदावरी नदी संसद’ ही जलसंवर्धन...
भाजीपाला, पूरक उद्योगातून गटांची प्रगतीरत्नागिरी जिल्ह्यातील महिला बचत गटातील सदस्यांनी...
संत्रा रसापासून पावडर; विद्यापीठाने...अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
खोडवा उसाची अधिक उत्पादनक्षम शेती.महाराष्ट्र- कर्नाटक राज्याच्या सीमेवरील सिदनाळ (...
कृषीसह पिंपळगावाने केले वसुंधरेलाही...नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत गावाचा कृषी...
वर्षभर वांगी उत्पादनाचे गवसले तंत्रपुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील योगेश तोडकरी...
बोलके यांचे दर्जेदार संत्रा उत्पादनकचारी सावंगा (ता. काटोल, जि. नागपूर) येथील आशिष...
पोल्ट्री व्यवसायातून कुटुंब झाले आर्थिक...फळबागायती आणि भातशेती सामायीक. त्यामुळे मालगुंड (...
श्रीराम गटाचे पावडरीद्वारे हळदीचे...लाख (रयाजी) (ता. दिग्रस, जि. यवतमाळ) येथील...
पीक नियोजनातून बसविले आर्थिक गणितपुणे जिल्ह्यातील केंदूर (ता. शिरूर) येथील संदीप...
प्रतिकूल परिस्थितीवर सुनंदाताईंनी केली...माणूस संकटाच्या काळात धीर सोडत असला तरी त्या...
औषधी वनस्पती प्रयोगासाठी ‘शेवंतामाता’...नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातील निवघा बाजार...
पदवीधर तरूणाचा ‘काकतकर’ ब्रँडसिंधुदुर्ग जिल्ह्यातील न्हावेली रेवटेवाडी येथील...
पोल्ट्री उद्योगात विट्याची दमदार ओळखसांगली जिल्ह्यातील विटा शहराची ओळख...
कमी खर्चिक किफायतशीर कापूस पीक...घाडवेल (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील देवेंद्र...
तंत्रज्ञान, व्यवस्थापनासह टोमॅटो...नाशिक जिल्ह्यातील दरी येथील सतीश, सचिन व नितीन या...