सेंद्रिय धान्य महोत्सवातून हक्काची बाजारपेठ

सेंद्रिय धान्य महोत्सवात ठेवलेले विविध पदार्थ
सेंद्रिय धान्य महोत्सवात ठेवलेले विविध पदार्थ

तीन-चार वर्षांपासून कृषी विभागातर्फे पुणे येथे सेंद्रिय धान्य महोत्सवाचे आयोजन होत आहे. ग्राहकांचा त्यास भरभरून प्रतिसाद मिळत. यंदा उलाढाल ५० लाख रुपयांपर्यंत पोचली. त्याद्वारे सेंद्रिय बाजारपेठेची क्षमता व मागणी लक्षात येऊन शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळण्यास मदत झाली आहे.   राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत परंपरागत कृषी विकास योजनेमध्ये सेंद्रिय शेती योजना राज्यामध्ये २०१५-१६ पासून सुरू करण्यात आली. सेंद्रिय शेतकऱ्यांची समिती स्थापन करणे, सामूहिक प्रमाणीकरण करणे व ग्राहकाला सेंद्रिय शेतमाल उपलब्ध करून देणे, हा योजनेचा मुख्य उद्देश होता. योजनेत सहभागी शेतकऱ्यांचे गट स्थापन करून त्यांना प्रशिक्षण, अभ्यासदौरे, यासह विक्रीपर्यंतचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात गट स्थापना

  • पुणे जिल्ह्यात योजनेंतर्गत प्रथम टप्प्यात ५० एकरांचा एक याप्रमाणे एकूण ४० गटांची स्थापना
  • यात १८९२ शेतकऱ्यांनी घेतला सहभाग
  • त्या अंतर्गत एकूण दोन हजार एकरांवर सेंद्रिय शेती करण्यात येत आहे.
  • त्यास पीजीएस ग्रीन प्रमाणपत्र उपलब्ध झाले आहे.
  • दुसऱ्या टप्प्यांत जिल्ह्यात एकूण २२ नव्या गटांची स्थापना. त्यात ७०३ शेतकऱ्यांचा सहभाग
  • त्याचे क्षेत्र ११०० एकर.
  • धान्य महोत्सवाचे व्यासपीठ दरवर्षी पुणे शहरातील कृषी भवनाच्या परिसरात भरवण्यात येणारा धान्य महोत्सव या योजनेचाच भाग आहे. त्याला शेतकरी व ग्राहक अशा दोघांचाही भरभरून प्रतिसाद लाभला आहे. गेल्यावर्षी सर्व गटांनी उत्पादित केलेल्या सेंद्रिय शेतमालाची थेट विक्री झाली. त्यामध्ये इंद्रायणी व अन्य वाणांची मिळून ४० टनांपर्यंत विक्री झाली. मावळ, भोर, वेल्हे भागांत सेंद्रिय इंद्रायणी तांदूळ उत्पादनासाठी आत्मा व कृषी विभागाकडून १५ शेतकरी गटांना उद्युक्त करण्यात आले होते. मोठ्या उत्साहाने त्यांनी सेंद्रिय निकष पाळून त्या प्रतिचा तांदूळ उत्पादित केला. प्रयोगशाळेत तपासणी करून नंतरच तो विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला. यंदा ४२ गटांचा सहभाग यंदाचा महोत्‍सवही नुकताच पार पडला. त्यात ४२ गटांनी भाग घेतला. एकूण ३० स्टॉलमध्ये धान्याची विक्री थेट करण्यात आली. इंद्रायणी, आंबेमोहोर, फुले समृद्धी, कोलम, रायभोग या वाणाच्या तांदळाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. गहू, त्यातही खपली गहू, कडधान्ये, डाळी, सेंद्रिय गूळ, काकवी, हळद, प्रक्रियायुक्त पदार्थ, फळे व भाजीपाला आदी माल रास्त दरात ग्राहकांना उपलब्ध झाला. उलाढाल वर्ष -        ठिकाण --   विक्री (टन) ----   उलाढाल २०१७-१८   पुणे          ५५               ३५ लाख  रू. २०१८-१९   बारामती     २५              १८ लाख रु. २०१९-२०  पुणे            ७५              ५० लाख रु.

    यंदाची आकडेवारी

  • सुमारे ७५ टन शेतमालाची खरेदी
  • त्याद्वारे अंदाजे ५० लाख रुपयांची उलाढाल (महोत्सवाच्या चार दिवसांमध्ये)
  • विक्री
  • माल                  टन       रुपये
  • तांदूळ -- -          ४५      २९ लाख 
  • फळे, भाजीपाला   ७      २ लाख ५०                                       हजार 
  • धान्ये        २३           १८ लाख ५०                                        हजार 
  • शेतकरी प्रतिक्रिया सेंद्रिय धान्य महोत्सव उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. तो वर्षातून दोन ते तीन वेळा राबविण्यात यावा, असे उपक्रम सुट्टीच्या दिवशी राबविले तर अधिक फायदा होऊ शकतो. महोत्सवात आम्ही तांदूळ व शेतमाल विक्रीसाठी ठेवला होता. त्यातून गटातील शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत झाली. -दादासाहेब सदाशिव पवार अध्यक्ष, स्वामी समर्थ सेंद्रिय शेती गट, खोपी, ता. भोर चार वर्षांपासून यात सहभागी होत आहे. मोठ्या प्रमाणावर ग्राहकांनी प्रतिसाद दिला आहे. नवे उद्योजक तयार होण्यासाठी या महोत्सवाचा चांगला फायदा होत आहे. रासायनिक अवशेषमुक्त धान्य ग्राहकांना देता येत असल्याचे समाधान आहे. -नंदा पांडुरंग भुजबळ अध्यक्ष, कृषिकन्या सेंद्रीय बचत गट, शिक्रापूर, ता. शिरूर सेंद्रिय मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महोत्सवाचे आयोजन केले जाते. त्यातून झालेली सुमारे ५० लाख रुपयांपर्यंतची उलाढाल समाधानकारक आहे. -राजेंद्र साबळे प्रकल्प संचालक, आत्मा, पुणे संपर्क- ९९२२६६६७७७ आगामी काळात वर्षातून दोन ते तीन वेळा असे महोत्सव भरवता येतील का? याचा विचार सुरू आहे. -बाळासाहेब पलघडमल, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, पुणे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com