agriculture story in marathi, farmers from Daulatabad area of Aurangabad Dist. has succeed the fig farming of local variety & have raised economics through it. | Agrowon

कमी पावसाच्या प्रदेशात रुजल्या अंजिराच्या बागा

संतोष मुंढे
गुरुवार, 4 जून 2020

औरंगाबाद जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या
गावांच्या शिवारात अनेक वर्षांपासून अंजीर बागा रुजल्या आहेत. अब्दीमंडी येथील एकाने अफगाणिस्तानातून आणलेल्या रोपट्याचा हा विस्तार झाल्याचे जाणकार सांगतात. पावसावर आधारीत शेती असलेल्या इथल्या शेतकऱ्यांचे अर्थकारण कमी पाणी लागणाऱ्या अंजिराने सक्षम केले आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील इतिहास प्रसिद्ध दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गावांच्या शिवारात अनेक वर्षांपासून अंजीर बागा रुजल्या आहेत. अब्दीमंडी येथील एकाने अफगाणिस्तानातून आणलेल्या रोपट्याचा हा विस्तार झाल्याचे जाणकार सांगतात. पावसावर आधारीत शेती असलेल्या इथल्या शेतकऱ्यांचे अर्थकारण कमी पाणी लागणाऱ्या अंजिराने सक्षम केले आहे.
 
औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद हे ठिकाण ऐतिहासिक किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इथली काही गावांमध्ये अनेक वर्षांपासून रुजलेल्या अंजीर बागांसाठी देखील हा भाग नावारूपाला आला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अब्दिमंडी येथील नसीब खा युसुफ खा पठाण इथल्या अंजीर संस्कृतीचा इतिहास उलगडतात. ते सांगतात की आजोबा आलम खा पठाण यांनी अंजिराचे कलम थेट अफगाणिस्तानातून औरंगाबादेत आणले. विविध फळपिकांची विविधता आपल्या बागेत असावी हा उद्देश होता. वडिलांनी हा वसा जपला. आता ३४ वर्षांपासून तो पुढे चालवीत आहोत.

क्षेत्र विस्तारले 
आता दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अब्दीमंडीलसह, दौलताबाद, केसापुरी, रामपुरी, जांभाळा, माळीवाडा, फतियाबाद, वंजारवाडी, शरणापुर, आप्पाचीवाडी आदी गाव, वाड्या, वस्त्यांच्या शेतशिवारात दीडशे हेक्‍टरहून अधिक क्षेत्र विस्तारले असल्याचा अंदाज अंजीर उत्पादक व्यक्त करतात.

संकटातही जपली अंजिराची गोडी
या भागातील हवामान अंजीरासाठी अनुकूल आहे. शिवाय पावसावर आधारीत शेती असल्याने कमी पाणी लागणाऱ्या या फळाचा विस्तार होण्यास वेळ लागला नाही. अन्य ठिकाणच्या तुलनेत या भागातील अंजिराची गोडी, त्याचा भरीवपणा, वजन, गोल आकार ग्राहकांना भूरळ पाडल्याशिवाय राहवत नाही. येथील अंजीर उत्पादकांना फळपीक विम्याचा आधार नाही. एखादा-दुसरा अपवाद वगळता दुष्काळात बागा गेल्या तरी अनुदानरुपी मदत मिळाली नाही. तरीही उत्पादन खर्चाच्या तुलनेत मिळणारे दर व अर्थकारणाला मिळत असलेले बळ यातून बागा जपण्याचे शर्थीचे प्रयत्न इथल्या अंजीर उत्पादकांनी केले आहेत.

उत्पादन
प्रातिनिधीक उदाहरण घ्यायचे तर नारायणअप्पा लिंभारे यांना वीस वर्षांचा अंजीर शेतीचा अनुभव आहे. अनेकवेळा पाण्याभावी बाग वाळणे, ती काढणे, पुन्हा लावणे हे प्रकार सुरू असतात. सध्या त्यांची दोन वर्षे वयाची सुमारे एकहजार झाडे आहेत. तीन वर्षांपुढील वयाची बाग प्रति झाड २०, ३० किलोपासून ते कमाल ५० किलोपर्यंत उत्पादन देते. एकूण विचार केल्यास एकरी दोन टनांपासून ते तीन टनांपर्यंत उत्पादन मिळते. आमच्या भागात जलसंधारणाचे कोणतेही स्रोत नाहीत. काहीजणांकडे शेततळी आहेत. मात्र पाऊस झाला तरच पाणी उपलब्ध होते.

रोजगार व विक्री व्यवस्था
परिसरातील दीडशे ते दोनशे जणांना विक्रीच्या माध्यमातून रोजगार देण्याचे काम इथली अंजीर शेती करते आहे. औरंगाबाद हे मार्केट आहे. त्याचबरोबर अनेक व्यापारी जागेवर येऊन खरेदी करतात. त्याची औरंगाबाद, नाशिक व अन्य शहरांमध्ये विक्री करतात. किलोला २५, ३५ ते ४० व कमाल ६० रुपये दर मिळतो. खर्च जाऊन वर्षाला सुमारे दोन लाख रुपये हाती येतात.

दौलताबाद अंजीर शेती- ठळक बाबी

 • पूर्वी १५ बाय १५ फूट लागवड, आता १८ बाय १८ फूट, १० बाय १० फूट असेही प्रयोग
 • -आब्दिमांडी येथे ८ ते १० जण कलम निर्मितीत व्यस्त. सुमारे २० ते २५ रुपये प्रति कलम दर.
 • जालना, नाशिक आदी जिल्ह्यांमध्ये इथल्या कलमांना मागणी
 • नसीब खा पठाण यांच्याकडून वर्षाला ३० ते ३५ हजार कलमांची निर्मिती
 • ते म्हणाले की पूर्वी कलम तयार होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागायचा. काडी कट करून बुरशीनाशकाची प्रक्रिया केली जायची. यात ३० ते ५० टक्क्यापर्यंत कलमांची शाश्वती असायची. आता नवी माहिती घेत व कल्पकतेतून कमी वेळेत कलमे तयार करण्याचं तंत्र अवगत केलं. शिवाय रोपे जगण्याचं प्रमाणही वाढलं आहे. .
 • -खट्टा व मीठा असे दोन्ही बहार घेण्यावर भर.

अंजीर उत्पादकांच्या अपेक्षा

 • नवतंत्रज्ञान उत्पादकांपर्यंत पोचावे
 • अंजीर क्लस्टर निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावे
 • विमा संरक्षण मिळावे
 •  परिसरात जलसंधारणाची कामे व्हावी
 • आर्थिक आधार मिळावा

प्रतिक्रिया 
आमच्या भागातील अंजिराची गोडी अति उत्तम आहे. आतून भरीव असलेल्या या फळाला ज्यूस सेंटर व्यावसायिकांकडून मोठी मागणी असते.
विठ्ठल विष्णूजी धनाईत
अंजीर उत्पादक, अब्दीमंडी

माझी ३६ गुंठे बाग आहे. बाग जपण्यासाठी कायम पाणी संकटाला तोंड द्यावे लागते. या पिकातील नवे संशोधन व तंत्रज्ञान आमच्यापर्यंत पोचले तर आम्हाला अजून प्रगती करता येईल.
- सुनील लिंभारे, अब्दिमंडी

पाच वर्षांपासून अंजिराची शेती करतो. या पिकामुळे दौलताबाद व अब्दी मंडी परिसरातील अनेकांना रोजगार मिळाला आहे. शेतकरी एवढ्या कष्टातून जपत असलेल्या बागांचे क्लस्टर निर्माण होणे गरजेचे आहे.
- विलास खंडागळे- ९४०३१२५६१९, अब्दीमंडी

संपर्क- नारायण अप्पा लिंभारे- ९८६०४४७३३५
नसीब खा युसुफ खा पठाण- ८३२९०९८८३९

 


फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...
दुग्ध व्यवसाय ठरतोय शेतीला आधारपनवेल येथील बांधकाम व्यावसायिक अनिल लक्ष्मण...
‘रायरेश्‍वर ’ गटाचा; सेंद्रिय हळदीचा...नाटंबी (ता. भोर, जि. पुणे ) येथील श्री. रायरेश्वर...
दुग्धप्रक्रिया उद्योगातून कमावला...सांगली येथील माळी कुटुंबीय गेल्या काही...
कांदा बीजोत्पादनातून मिळवली शिवापूर...अकोला जिल्ह्यातील शिवापूर गावाने कांदा...
वर्षभर विविध भाज्यांची चक्राकार...अवर्षणग्रस्त असलेल्या सालवडगाव (ता. नेवासा, जि....
संकटांशी सामना करीत टिकवली प्रयोगशीलतादाभाडी (ता.मालेगाव, जि. नाशिक) येथील धनराज निकम...
पॉलीहाऊसमध्ये फुलला दर्जेदार पानमळाकोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव (ता.शिरोळ) येथील...
फिरत्या प्रक्रिया उद्योगाची राबवली...लोकांसाठी उपयुक्तता, गरज यांचा विचार करून वर्धा...
पोल्ट्रीसह खाद्यनिर्मितीतून व्यवसायात...परभणी येथील प्रकाशराव देशमुख यांनी केवळ शेती...
पूरक व्यवसायांची शेतीला जोड देत सावरले...अल्प शेतीला एकात्मिक पद्धतीने पूरक उद्योगाची जोड...
थेट भाजीपाला विक्रीतून शेती झाली सक्षमथेट ग्राहकांना शेतीमाल विक्रीसाठी शेतकरी स्वतःहून...
जीएम पिके- भारतात धोरण कोंडी कधी फुटणार?भारतात बीजी थ्री, एचटीबीटी कपाशी, बीटी वांगे या...
तांदूळ, भाजीपाला थेट विक्रीतून शाश्वत...खानू (ता. जि. रत्नागिरी) येथील प्रयोगशील शेतकरी...
पांढऱ्या अंड्यांसह तपकिरी अंड्यांना...धोलवड ( जि. पुणे) येथील गीताराम नलावडे चार...
जलसंधारणातून शिवार फुलले, समाधानाचे...मामलदे (जि.जळगाव) गावाने शिवारातील पाण्याची टंचाई...
बीबीएफ तंत्रासह प्रयोगशीलतेतून साधली...बुलडाणा जिल्ह्यात मेहकरपासून २५ किलोमीटरवरील अति...
सेंद्रिय भाजीपाला, केळीसह मूल्यवर्धित...कोल्हापूर जिल्हा म्हटलं की ऊस आणि भात शेती समोर...
विदर्भामध्ये कडधान्य, फळबाग, भाजीपाला...विदर्भात कापूस, सोयाबीन, संत्रा या पारंपरिक...
सिंधुदुर्गात काजू लागवड, प्रक्रिया...डोंगर-उताराची जमीन, पोषक वातावरण, काजू बीचे...