agriculture story in marathi, farmers has learned the marketing skills to sell their produce direct to the costumer. | Page 2 ||| Agrowon

विक्री तंत्रांमध्ये होतोय बदल

संदीप नवले
बुधवार, 1 जुलै 2020

शेतकऱ्यांच्या नव्या पिढीने उत्पादनासह विक्रीतही आघाडी घेतली आहे. प्रक्रिया उद्योगानाही चालना मिळाल्याने पूर्वीच्या तुलनेत शेती व्यवसाय फायद्यात येत असल्याचे चित्र आहे.

शेतकऱ्यांच्या नव्या पिढीने उत्पादनासह विक्रीतही आघाडी घेतली आहे. प्रक्रिया उद्योगानाही चालना मिळाल्याने पूर्वीच्या तुलनेत शेती व्यवसाय फायद्यात येत असल्याचे चित्र आहे.
 
शेतीतील नव्या पिढीने पीक उत्पादनाबरोबरच विक्री व्यवस्थेचाही बारकाईने अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. त्यास कृषी विभाग, सहकारी व खाजगी क्षेत्रातील संस्थांनी मदत करत चालना देण्याचे काम केले. बाजाराची स्थिती व ग्राहकांची गरज ओळखून शेतमालाचे उत्पादन, सेंद्रिय शेतीला येत असलेले महत्त्व, प्रतवारी, पॅकिंग, शेतमाल प्रक्रिया याबाबत शेतकऱ्यांत जागृती झाली. युवा शेतकऱ्यांनीही चांगला प्रतिसाद देत शेतात सुधारीत तंत्र वापरण्याबरोबर सोशल मिडीया व ऑनलाइन पद्धतीने विक्रीचे तंत्र आत्मसात केले.

गटांचा पुढाकार
राज्यात अनेक शेतकरी गट तयार झाले. त्यांचे समूहामध्ये रूपांतर होऊन हळूहळू शेतकरी कंपनी व त्यानंतर राज्यपातळीवर सर्व शेतकरी कंपन्यांची मिळून ‘महाएफपीसी’ ची स्थापना झाली.
सध्या राज्यात एक लाखांहून अधिक शेतकरी गट तर ४०० ते ५०० शेतकरी कंपन्या आहेत. पुणे, मुंबई यासह अन्य शहरांतील गृहनिर्माण सोसायट्यांतील ग्राहकांना त्यांच्यामार्फत शेतमालाची विक्री केली जात आहे. शहरी ग्राहकांची गरज ओळखून शेतकऱ्यांनी प्रतवारी व पॅकिंगमध्ये आकर्षक बदल करण्यास सुरुवात केली. कोरूगेटेड बॉक्सचा अवलंब केला जाऊ लागला. शिरूर येथील केंद्राई माता शेतकरी कंपनी, पुरंदर येथील पुरंदर नॅचरल, जुन्नरमधील बळीराजा अशा विविध शेतकरी कंपन्यांनी पॅकिंग करण्यावर भर दिला आहे. त्याला ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे. शेतमालाला प्रति किलोमागे पाच ते दहा रुपयांचा अधिक दर त्यातून अधिक मिळू लागला आहे. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे.

प्रक्रियायुक्त मालाला मागणी
उत्पादित मालाला अपेक्षित दर मिळत नसल्याने नुकसान टाळण्यासाठी प्रक्रिया करून शेतमालाचे मूल्यवर्धन करण्याकडे शेतकरी वळले. त्यातून कुटुंबाची आर्थिक घडी बसविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पुणे, नाशिक, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर यासह मराठवाडा व विदर्भातील अनेक शेतकरी
अंजीर, पेरू, सीताफळ, टोमॅटो, कांदा अशा मालांच्या प्रक्रियेकडे वळला आहे. न्हावरे (ता. शिरूर, जि. पुणे) येथील प्रयोगशील उद्योजक गीताराम कदम यांनी तर फळे व भाजीपाला निर्जलीकरण अर्थात
‘डीहायड्रेशन’ करून प्रक्रियायुक्त माल सहा ते एक वर्षांपर्यंत टिकवण्याचे तंत्र अवलंबिले आहे.

लॉकडाऊनमध्ये थेट विक्रीचे महत्त्व वाढले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लाँकडाऊनमध्ये शेतमाल विक्रीचे आवाहन तयार झाले.
अशावेळी शेतकरी गट, कंपन्यांनी पुढाकार घेतला. त्यातून शेतकरी व ग्राहक अशा दोघांचाही चांगला फायदा झाला. काही गटांनी आपली वेबसाईट सुरू करून ऑनलाइन मागणी नोंदवत विक्री सुरू केली.
त्या माध्यमातून अनेक ग्राहक जोडले गेले आहेत. याशिवाय व्हॉटस ॲप, फेसबूक तसेच अन्य सोशल मिडीयाचा आधार घेतला. या काळात मळद (ता. बारामती) येथील प्रल्हाद वरे यांनी सोशल मिडीयाद्वारे जवळपास पाच ते सहा एकरांतील कलिंगड, खरबुजांची थेट विक्री केली आहे. सुशिक्षित तरुणांनी पुढाकार घेतल्याने शेतमाल विक्रीचे तंत्र बदलू लागले आहे. येत्या काळात थेट शेतमाल विक्रीच्या क्षेत्रात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.


इतर यशोगाथा
आदर्श कामांच्या उभारणीतून ठसा उमटवलेले...द्राक्ष, डाळिंब,कांद्यासाठी जगभर प्रसिद्ध नाशिक...
कुडावळेमध्ये `शत प्रतिशत भात लागवड'...गाव आणि शेतीचा शाश्वत विकास करायचा असेल तर...
यांत्रिक पद्धतीने भात लागवड ठरतेय...चांदखेड (ता. मावळ जि. पुणे) परिसरातील वाढत्या...
युवा शेतकऱ्याची वीस एकर व्यावसायिक करार...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गडमठ (ता.वैभववाडी) येथील...
एकनाथ खडसेंच्या शेतीत सीडलेस जांभूळ,...राजकीय वर्तुळात चर्चेत असलेला चेहरा म्हणजे एकनाथ...
काजूगर निर्मितीचा स्वयंचलित अत्याधुनिक...रत्नागिरी जिल्ह्यात गव्हाणे येथे रत्नागिरी कृषी...
संयमवृत्तीनेच होते नफावृध्दी व...जनावरे मग ती दुभती असोत की नको असलेली, योग्य...
दूग्ध, रेशीम व्यवसायातून अर्थकारण केले...परभणी शहरानजीक शेती असलेल्या ढगे कुटुंबाने शेतीला...
शेतकरी नियोजन- कापूसमाझ्या शेतातील कपाशीचे पीक सध्या जवळपास ३५ ते ४२...
पीक नियोजनातून बसवले कुटुंबाचे आर्थिक...बाभूळसर (ता. शिरूर) येथील रामचंद्र नागवडे व...
महिला बचतगटाचा ‘जय भोलेनाथ’ ब्रॅण्डभेंडा बुद्रूक (ता. नेवासा,जि.नगर) येथील वीस...
हिरवे हिरवेगार गालिचे, हरित तृणांच्या...हिरवे हिरवेगार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे......
यांत्रिकी पद्धतीने मूरघास निर्मिती...सध्या दुग्धव्यवसायात मूरघास ही अत्यंत महत्त्वाची...
कृषीसंपन्नता, आरोग्य, पर्यावरण हेच...कोटमगावाने (ता. जि. नाशिक) कृषीसंपन्न, आरोग्य व...
द्राक्ष, पेरूतून प्रगतीकडे कृषी...कृषी पदविका घेतल्यानंतर त्याचा योग्य वापर करीत...
कोकणात प्रयत्नावादातून दिली...कोकणात दुग्धव्यवसाय म्हणावा तसा विकसित झालेला...
खरीप पिकांतील तण नियंत्रण व्यवस्थापनजगात सर्वांत जास्त वापर तणनाशकांचा (४३.६ टक्के)...
अतीव संघर्ष, धैर्यातून साधली उल्लेखनीय...उस्मानाबाद जिल्ह्यातील अणदूर येथील वैशाली घुगे...
चिकाटी, आर्थिक नियोजनातून पोल्ट्री...वांजोळी (जि. नगर) येथील ३८ वर्षे वयाच्या अमोल...
जलसंधारण,शिक्षण अन् कृषी विकासाचा रचला...सुदृढ, आत्मनिर्भर समाज घडविणे या उद्देशातून जळका...