वयानुसार पुरवा कोंबड्यांना संतुलित खाद्य

कोंबड्यांना ऊर्जायुक्त खाद्याचा पुरवठा करावा.
कोंबड्यांना ऊर्जायुक्त खाद्याचा पुरवठा करावा.

कुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७० टक्के खर्च हा खाद्यावर होत असतो. म्हणून कोंबड्यांसाठी संतुलित खाद्याच्या व्यवस्थापनाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण गरजेचं आहे.

कोंबड्यांच्या वयानुसार त्यांना खाद्याचा पुरवठा करावा लागतो. एक आठवड्यापर्यंतच्या पिलांना दिल्या जाणाऱ्या खाद्याला चिक मॅश म्हणतात. नऊ ते १८ आठवड्यापर्यंतच्या कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्याला ग्रोवर मॅश म्हणतात. १८ आठवड्यानंतरच्या कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्याला लेअर मॅश म्हणतात. कोंबड्यांच्या खाद्यातील घटक साधारणपणे कोंबड्यांच्या शरीरात २१ टक्के प्रथिने असतात, ४ टक्के खनिज पदार्थ व ९ टक्के स्निग्ध पदार्थांचा समावेश असतो; तर ६६ टक्के पाण्याचे प्रमाण असते. कोंबड्यांच्या खाद्यामध्ये कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीनवसत्त्वे, पाणी, खनिजे यांचा समावेश करावा. कार्बोहायड्रेट्स कोंबड्यांच्या खाद्यामध्ये याचे प्रमाण हे ६० - ७० टक्के असावे लागते. या घटकामुळे कोंबड्यांना शक्ती आणि शरीरास ऊर्जा मिळण्यास मदत होते. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ व मका इत्यादीपासून वरील घटक मिळण्यास मदत होते. प्रथिने खाद्यामध्ये याचे प्रमाण हे १६-२२ टक्के असावे लागते. या घटकामुळे कोंबड्यांची चांगल्या प्रकारे वाढ होण्यास मदत होते. त्याचबरोबर मांस व अंड्याचे उत्पादन वाढते. सोयाबीनची पेंड, शेंगदाण्याची पेंड, सूर्यफूल पेंड, मासळीची भुकटी, रक्ताची पावडर इत्यादीपासून वरील घटक मिळण्यास मदत होते. स्निग्ध पदार्थ खाद्यामध्ये याचे प्रमाण अतिशय कमी असावे लागते. या घटकामुळे कोंबड्यांना कार्बोदकांची २.५ टक्के ऊर्जा मिळण्यास मदत होते. वेगवेगळ्या प्रकारचे तेल व चरबीपासून वरील घटक मिळण्यास मदत होते. जीवनसत्त्वे जीवनसत्त्व अ, ड, ई, क ही पाण्यात न विरघळणारी जीवनसत्त्वे आहेत, तर ब आणि सी ही पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे तेल व चरबीपासून वरील घटक मिळण्यास मदत होते. पाणी कोंबड्यांना स्वच्छ व ताजे पाणी पुरवावे. दूषित पाण्यामुळे कोंबड्यांमधील आजाराचे प्रमाण वाढते. खनिजे या घटकामुळे कोंबड्यांची हाडे बळकट होतात. अंड्यांच्या कवचाची निर्मिती होण्यास मदत होते. शारीरिक वाढीसाठी कोंबड्यांना कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, आयोडीन, क्लोरीन, सेलेनियम इ. खनिज पदार्थांची गरज असते. हाडांची भुकटी, शिंपल्यांची पूड, चुनखडी, खनिज मिश्रणातून वरील घटकांचा पुरवठा होतो. खाद्यातील घटकांचे प्रमाण

प्र कार वय (आठवडे) स्निग्ध पदार्थ (टक्के) प्रथिने (टक्के) तंतुमय पदार्थ (टक्के) स्फुरद (टक्के रोज प्रत्येकी (ग्रॅम)
चिक मॅश १-८ ३.४ २२ ३.४- ०.६ ३५
ग्रोवर मॅश ८-२० ३.४ १८ ४.५ ०.६ ८०
लेअर मॅश २०-७२ ३.४ १७ ५.६ १.२ ११०

संपर्क ः प्रा. के. एल जगताप, प्रा. के. एल जगताप, ९८८१५३४१४७ (लेखक पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी विज्ञान केंद्र खामगाव, जि. बीड आणि कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर येथे कार्यरत आहेत.) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com