Agriculture story in marathi feeding management of poultry | Agrowon

वयानुसार पुरवा कोंबड्यांना संतुलित खाद्य

प्रा. के. एल जगताप, प्रा. तडवी फारूक रुबाब, डॉ. ए. के किनखेडकर
मंगळवार, 4 फेब्रुवारी 2020

कुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७० टक्के खर्च हा खाद्यावर होत असतो. म्हणून कोंबड्यांसाठी संतुलित खाद्याच्या व्यवस्थापनाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण गरजेचं आहे.

कोंबड्यांच्या वयानुसार त्यांना खाद्याचा पुरवठा करावा लागतो. एक आठवड्यापर्यंतच्या पिलांना दिल्या जाणाऱ्या खाद्याला चिक मॅश म्हणतात. नऊ ते १८ आठवड्यापर्यंतच्या कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्याला ग्रोवर मॅश म्हणतात. १८ आठवड्यानंतरच्या कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्याला लेअर मॅश म्हणतात.

कुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७० टक्के खर्च हा खाद्यावर होत असतो. म्हणून कोंबड्यांसाठी संतुलित खाद्याच्या व्यवस्थापनाकडे जाणीवपूर्वक लक्ष देण गरजेचं आहे.

कोंबड्यांच्या वयानुसार त्यांना खाद्याचा पुरवठा करावा लागतो. एक आठवड्यापर्यंतच्या पिलांना दिल्या जाणाऱ्या खाद्याला चिक मॅश म्हणतात. नऊ ते १८ आठवड्यापर्यंतच्या कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्याला ग्रोवर मॅश म्हणतात. १८ आठवड्यानंतरच्या कोंबड्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्याला लेअर मॅश म्हणतात.

कोंबड्यांच्या खाद्यातील घटक
साधारणपणे कोंबड्यांच्या शरीरात २१ टक्के प्रथिने असतात, ४ टक्के खनिज पदार्थ व ९ टक्के स्निग्ध पदार्थांचा समावेश असतो; तर ६६ टक्के पाण्याचे प्रमाण असते. कोंबड्यांच्या खाद्यामध्ये कार्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीनवसत्त्वे, पाणी, खनिजे यांचा समावेश करावा.

कार्बोहायड्रेट्स
कोंबड्यांच्या खाद्यामध्ये याचे प्रमाण हे ६० - ७० टक्के असावे लागते. या घटकामुळे कोंबड्यांना शक्ती आणि शरीरास ऊर्जा मिळण्यास मदत होते. ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ व मका इत्यादीपासून वरील घटक मिळण्यास मदत होते.

प्रथिने
खाद्यामध्ये याचे प्रमाण हे १६-२२ टक्के असावे लागते. या घटकामुळे कोंबड्यांची चांगल्या प्रकारे वाढ होण्यास मदत होते. त्याचबरोबर मांस व अंड्याचे उत्पादन वाढते. सोयाबीनची पेंड, शेंगदाण्याची पेंड, सूर्यफूल पेंड, मासळीची भुकटी, रक्ताची पावडर इत्यादीपासून वरील घटक मिळण्यास मदत होते.

स्निग्ध पदार्थ
खाद्यामध्ये याचे प्रमाण अतिशय कमी असावे लागते. या घटकामुळे कोंबड्यांना कार्बोदकांची २.५ टक्के ऊर्जा मिळण्यास मदत होते. वेगवेगळ्या प्रकारचे तेल व चरबीपासून वरील घटक मिळण्यास मदत होते.

जीवनसत्त्वे
जीवनसत्त्व अ, ड, ई, क ही पाण्यात न विरघळणारी जीवनसत्त्वे आहेत, तर ब आणि सी ही पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे तेल व चरबीपासून वरील घटक मिळण्यास मदत होते.

पाणी
कोंबड्यांना स्वच्छ व ताजे पाणी पुरवावे. दूषित पाण्यामुळे कोंबड्यांमधील आजाराचे प्रमाण वाढते.

खनिजे
या घटकामुळे कोंबड्यांची हाडे बळकट होतात. अंड्यांच्या कवचाची निर्मिती होण्यास मदत होते. शारीरिक वाढीसाठी कोंबड्यांना कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, आयोडीन, क्लोरीन, सेलेनियम इ. खनिज पदार्थांची गरज असते. हाडांची भुकटी, शिंपल्यांची पूड, चुनखडी, खनिज मिश्रणातून वरील घटकांचा पुरवठा होतो.

खाद्यातील घटकांचे प्रमाण

प्रकार वय (आठवडे) स्निग्ध पदार्थ (टक्के) प्रथिने (टक्के) तंतुमय पदार्थ (टक्के) स्फुरद (टक्के रोज प्रत्येकी (ग्रॅम)
चिक मॅश १-८ ३.४ २२ ३.४- ०.६ ३५
ग्रोवर मॅश ८-२० ३.४ १८ ४.५ ०.६ ८०
लेअर मॅश २०-७२ ३.४ १७ ५.६ १.२ ११०

संपर्क ः प्रा. के. एल जगताप, प्रा. के. एल जगताप, ९८८१५३४१४७
(लेखक पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषी विज्ञान केंद्र खामगाव, जि. बीड आणि कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर येथे कार्यरत आहेत.) 


इतर कृषिपूरक
हिरव्या चाऱ्याच्या पूर्ततेसाठी मुरघास...हिरव्या चाऱ्याच्या व्यवस्थापनावर उपाययोजना म्हणून...
वाहतूक शेळ्या, मेंढ्यांची...तापमानात जास्त वाढ झाल्यास, शेळ्यांना शरीराचे...
व्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणीभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली. सर्व बचत...
कृषी पर्यटन ः आव्हानात्मक पूरक व्यवसायवसंताच्या मनातील कृषी पर्यटनाच्या विचाराला...
ऋतुमानानुसार म्हशीतील प्रजनन व्यवस्थापनअधिक दूध उत्पादनाकरिता म्हशीमधील प्रजनन सक्षम...
जैवपुंज निर्मितीसाठी विविध कार्बन स्रोतपाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू...
जनावरांच्या आहारामध्ये पोषकद्रव्ये...दुधाळ जनावरांच्या शरीराची प्रसूतिदरम्यान झालेली...
मेंढ्यांची संवाद साधण्याची पद्धतमेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात...
मत्स्यशेतीसाठी पाण्याची गुणवत्ता...मत्स्यशेती यशस्वी होण्यासाठी मत्स्य टाक्यांची...
वयानुसार पुरवा कोंबड्यांना संतुलित खाद्यकुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७०...
फळबागेला दिली शेळीपालनाची जोडअजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश...
जनावरांतील गोचीड तापगोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच...
जाणून घ्या ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी...
शेळ्यांना द्या समतोल आहार शेळीच्या प्रजननक्षमता वाढीस आहाराचे...
मेंढीपालनाचे वार्षिक वेळापत्रकगाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नवजात...
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
आरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...