खोडवा उसामध्ये पाचट आच्छादन, ठिबक सिंचनाच्या वापरामुळे ४५ ते ५० टक्के पाण्याची बचत होते.
खोडवा उसामध्ये पाचट आच्छादन, ठिबक सिंचनाच्या वापरामुळे ४५ ते ५० टक्के पाण्याची बचत होते.

खोडवा उसाला द्या शिफारशीत खतमात्रा

बगला फोडून झाल्यानंतर सेंद्रिय खते सरीमध्ये द्यावीत. नंतर बैल अवजाराने मातीत मिसळावीत. जमिनीचा प्रकार व पहारीच्या साहाय्याने छिद्रे पाडून रासायनिक खते दिल्यास खतांचा कार्यक्षमतेने वापर होऊन उत्पादनात वाढ होते. माती परीक्षणानुसार सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर करावा.   सेंद्रिय खते 

  • खोडवा उसाला हेक्टरी २५ टन कंपोस्ट खत किंवा शेण खत जमिनीत मिसळून द्यावे. साधारणपणे हेक्टरी ५०० किलो शेणखतामध्ये ६० किलो गंधक मिसळून जमिनीत द्यावे. यामुळे नत्र, स्फुरद, पालाश सारखी खते पिकास त्वरित उपलब्ध होतात.
  • खोडवा पिकासाठी पहिल्या हप्त्यात हेक्टरी ४०० किलो सिलिकॉन द्यावे.
  • बगला फोडून झाल्यानंतर सेंद्रिय खते सरीमध्ये द्यावीत. नंतर बैल अवजाराने मातीत मिसळावीत.
  • खोडवा पिकामध्ये हिरवळीची पिके उदा. ताग, चवळी, लसूणघास यांची लागवड करून सेंद्रिय खतांचा पुरवठा करता येतो.
  • सेंद्रिय खतामुळे जमिनीची भौतिक, जैविक व रासायनिक सुपिकता सुधारते.
  • रासायनिक खते  खोडवा पिकास नत्र, स्फुरद व पालाश या अन्नद्रव्याची गरज लागवडीच्या उसाइतकीच आहे. जमिनीचा प्रकार व पहारीच्या साहाय्याने छिद्रे पाडून रासायनिक खते दिल्यास खतांचा कार्यक्षमतेने वापर होऊन उत्पादनात वाढ होते.   पहारीने खत देण्याचे फायदे 

  • खत मुळांच्या सानन्निध्यात दिल्याने त्वरित उपलब्ध होते.
  • रासानिक खतांचा प्रत्यक्ष वातावरणाशी संबंध येत नसल्याने हवेद्वारे खतांचा ऱ्हास कमी होतो.
  • खत मातीने झाकल्याने वाहून जात नाही, खतांचा कार्यक्षम वापर होऊन पिकांच्या गरजेनुसार खते हळूवारपणे उपलब्ध होतात.
  • सर्व ठिकाणी समप्रमाणात खत देणे शक्य होते.
  • सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर 

  • खोडवा पिकात लोह कमतरतेमुळे केवड्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
  • केवडा नियंत्रणासाठी ५ ग्रॅम फेरस सल्फेट, ५ ग्रॅम झिंक सल्फेट, ५ ग्रॅम मॅंगनीज सल्फेट, २५ ग्रॅम युरिया प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. हेक्टरी फवारणीसाठी १००० लिटर पाणी लागते. १० ते १५ दिवसांच्या अंतराने ३ फवारण्या कराव्यात किंवा
  • मल्टिमॅक्रोन्यूट्रियंन्ट आणि मल्टिमायक्रोन्यूट्रियंन्ट द्रवरूप खताचा वापर करावा. पहिल्या फवारणीवेळी (६० दिवसांनी) मल्टिमॅक्रोन्यूट्रियंन्ट ५ लिटर अधिक मल्टिमायक्रोन्यूट्रियंन्ट ५ लिटर हे ५०० लिटर पाण्यात मिसळून संध्याकाळच्या वेळी पानांवर फवारणी करावी. दुसरी फवारणी (९० दिवसांनी) मल्टिमॅक्रोन्यूट्रियन्ट ७.५ लिटर आणि मल्टिमायक्रोन्यूट्रियंन्ट ७.५ लिटर प्रति ७५० लिटर पाण्यात मिसळून प्रतिहेक्टरी संध्याकाळी पानांवर फवारणी करावी.
  • जिवाणू खतांचा वापर 

  • रासानिक खतांना पूरक म्हणून जिवाणू संवर्धकांचा वापर करून खत मात्रेमध्ये बचत करता येते.
  • हेक्टरी २.५ लिटर द्रवरूप अ‍ॅझोफॉस्फो ५०० किलो शेणखतामध्ये मिसळून ऊस तुटल्यावर दुसरे पाणी देण्याच्या आधी सरीत चळी घेऊन द्यावे.
  • शिफारशीनुसार खोडवा ठेवल्यानंतर दोन महिन्यांनी अ‍ॅसिटोबॅक्टर तीन लिटर प्रति ७५० लिटर पाण्यात मिसळून प्रतिहेक्टरी फवारणी करावी.
  • ४५ ते ६० दिवसांनी पीक वाढीसाठी उपयुक्त जिवाणू खत ३ लिटर प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून प्रतिहेक्टरी फवारणी करावी.
  • जमीन सुधारणेसाठी उपयुक्त जिवाणू खत १० लिटर प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून लागवडीच्या वेळी व लागवडीनंतर ४५, ६० व ९० दिवसांनी आणि खोडवा पिकात ऊस तुटल्यानंतर १५ दिवसांच्या आत आणि त्यानंतर ३०, ४५ व ६० दिवसांनी चार वेळा समप्रमाणात सरीमध्ये उसाच्या बुंध्याजवळ आळवणी करावी.
  • पाणी व्यवस्थापन 

  • ऊस तुटून गेल्यानंतर १५ दिवसांच्या आत खताची पहिली खतमात्रा दिल्यानंतर पहिले हलके पाणी द्यावे. त्यामुळे उसाची चांगली फूट होते.
  • पाणी देण्याची पद्धत आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे दर १२ ते १५ दिवसांच्या अंतराने पाण्याची पाळी द्यावी.
  • पट्टा पद्धतीमध्ये जोड ओळीमधील सरीला पाणी द्यावे.
  • खोडवा पिकामध्ये नेहमीच्या पद्धतीने २६ ते २८ पाण्याच्या पाळ्या लागतात. परंतु नवीन तंत्रामध्ये पाचटाचे आच्छादन केल्यास १३ ते १४ पाण्याच्या पाळ्या दिल्यास खोडव्याचे चांगले उत्पादन मिळते.
  • खोडवा उसाचा पाचट आच्छादन केलस दोन पाण्याच्या पाळीतील अंतर दीडपटीने वाढवावे.
  • ठिबक सिंचन पद्धतीचा वापर 

  • लांब-रुंद सरी किंवा जोडओळ लागवड पद्धतीच्या खोडवा पिकामध्ये ठिबक सिंचनाचा वापर करावा.
  • मुळांच्या कक्षेत पाणी, हवा यांचे प्रमाण साधून पीक वाढीच्या अवस्थेनुसार खत व पाणी व्यवस्थापन केल्याने उत्पादनात वाढ होते.
  • पाण्यात विरघळणारी खते (युरिया, फॉस्फोरिक अ‍ॅसिड आणि पांढरा पोटॅश) मुळांच्या सहवासात दिल्याने खतांच्या मात्रेत ३० ते ४० टक्के बचत होते
  • खोडवा पिकात वाफसा राखल्याने गांडूळे आणि उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते. पाचट लवकर कुजून जमिनीची जैविक, रासानिक व भौतिक उपयुक्तता वाढते.
  • खोडवा पिकामध्ये पाचट आच्छादन, ठिबक सिंचनाच्या वापरामुळे ४५ ते ५० टक्के पाण्याची बचत होते.
  • ठिबक सिंचन पद्धतीने पाणी व खताचा काटेकोर वापर करून खोडवा पिकाचे लागवडीच्या उसा इतके किंवा त्यापेक्षा अधिक उत्पादन घेणे शक्य आहे.
  • संपर्क ः पी. व्ही. घोडके, ९८२२०१३४८२ (कृषिविद्या विभाग(कृषिशास्त्र व तंत्रज्ञान) वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी (बु.),जि. पुणे) 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com