Agriculture story in marathi, Fig processing | Agrowon

पौष्टिक अंजिराचे प्रक्रियायुक्त पदार्थ

डॉ. रवींद्र काळे, विठ्ठल चव्हाण
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

अंजिरामध्ये आहारमूल्याबरोबरच औषधी गुणधर्म मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्यापासून तयार केलेल्या पदार्थांना खूप महत्त्व आहे. अंजिरापासून सुकवलेले अंजीर, जॅम, पोळी, हवाबंद डब्यातील अंजीर (कॅनिंग), बर्फी, आरटीएस (सरबत), पावडर इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात.
 
अंजीर फळाचा आकार, रंग व गोडी ही जातीनुसार बदलते. अंजीर हे बद्धकोष्टतेवर गुणकारी आहे. अंजिरामधून शरीराला मुबलक प्रमाणात लोह मिळते. वात कमी होण्यास मदत होते. मुबलक तंतुमय पदार्थामुळे पोट साफ होते. अंजीर हे ताजे किंवा वाळवून पण खाता येते. वाळवलेल्या अंजिरापेक्षा ताजे अंजीर हे जास्त पौष्टिक असतात.

अंजिरामध्ये आहारमूल्याबरोबरच औषधी गुणधर्म मुबलक प्रमाणात असल्यामुळे त्यापासून तयार केलेल्या पदार्थांना खूप महत्त्व आहे. अंजिरापासून सुकवलेले अंजीर, जॅम, पोळी, हवाबंद डब्यातील अंजीर (कॅनिंग), बर्फी, आरटीएस (सरबत), पावडर इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात.
 
अंजीर फळाचा आकार, रंग व गोडी ही जातीनुसार बदलते. अंजीर हे बद्धकोष्टतेवर गुणकारी आहे. अंजिरामधून शरीराला मुबलक प्रमाणात लोह मिळते. वात कमी होण्यास मदत होते. मुबलक तंतुमय पदार्थामुळे पोट साफ होते. अंजीर हे ताजे किंवा वाळवून पण खाता येते. वाळवलेल्या अंजिरापेक्षा ताजे अंजीर हे जास्त पौष्टिक असतात.

अंजिराचे प्रक्रियायुक्त पदार्थ
१) सुके अंजीर

  • पिकलेली चांगली फळे निवडावीत, त्याचा टीएसएस १६-१८ टक्के असावा. निवडलेली फळे स्वच्छ पाण्याने धुवून मसलीन कापडामध्ये बांधून १ टक्के केएमएसच्या द्रावणामध्ये २०-३० मिनिटे ठेवावित.
  • फळे थंड करून ड्रायरमध्ये एकसमान पसरून ५५-६५ अंश सेल्सिअस तपमानाला दोन दिवस ठेवावीत.
  • फळातील पाण्याचे प्रमाण १५-२० टक्के झाल्यास फळे सुकली आहेत असे समजावे.
  • सुकलेली फळे काढून थंड करून ती दाबून घ्यावीत. प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक करावीत.
  • एक किलो ताज्या अंजिरापासून साधारणतः २५०-३०० ग्रॅम सुके अंजीर मिळतात.

२) पोळी

  • पिकलेली चांगली निरोगी फळे निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत.
  • फळांची देठे काढून बारीक फोडी करून मिक्सरमधून बारीक करून घ्याव्यात.
  • मिक्सरमधून काढलेला गर मसलीन कापडामधून गळून घ्यावा.
  • एक किलो गरामध्ये १५०-२०० ग्रॅम साखर व ५ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून मंद आचेवर १५-२० मिनिटे शिजवावे.
  • शिजवलेले मिश्रण ट्रेमध्ये एकसमान पसरून वळवण्यासाठी ठेवावे.
  • वाळलेली अंजीर पोळी तुकडे करुन प्लॅस्टिकच्या पिशव्यामध्ये भरून ठेवावी.

३) जॅम

  • ४५ टक्के अंजीर गराचा टीएसएस ६८ टक्के असतो आणि यामध्ये ०.५ -०.६ टक्के आम्ल असते.
  • एक लिटर गाळून घेतलेल्या गरामध्ये ७५० ग्रॅम साखर आणि ५-६ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून स्टिलच्या पातेल्यामध्ये मंद आचेवर शिजवावे.
  • मिश्रण विरघळेपर्यंत आणि घट्ट द्रव होईपर्यंत हलवत राहावे. घट्ट झालेले मिश्रण चाचणी करुण निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरून सीलबंद करावे.

४) आरटीएस

  • १० टक्के अंजीर गराचा टीएसएस १० टक्के असतो आणि यामध्ये ०.१ -०.३ टक्के आम्ल असते.
  • एक लिटर गाळून घेतलेल्या गरामध्ये १ किलो साखर आणि १-३ ग्रॅम सायट्रिक आम्ल व ९ लिटर पाणी मिसळून घ्यावे.
  • बनवलेले मिश्रण मंद आचेवर ५ मीनिटे गरम करून थंड करून घ्यावे थंड केलेले आरटीएस निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये भरुन फ्रीज मध्ये ठेवावे.

संपर्क ः डॉ. रवीद्र काळे, ८६६८८३७३५६
(एम.जी.एम. अन्नतंत्र महाविद्यालय, औरंगाबाद) 

टॅग्स

इतर कृषी प्रक्रिया
काजू बोंडापासून प्रक्रियायुक्त पदार्थमहाराष्ट्रात विशेषतः कोकणात काजूपासून बी व काजू...
आरोग्यदायी कलिंगडकलिंगडात जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात असून...
फळे व पालेभाज्यांचे कॅनिंगफळे व पालेभाज्या प्रक्रिया आणि निर्जंतुकीकरण...
बचतगटाच्या महिलांनी नव्या ग्राहकांसह...कोरोनाच्या नव्याने उद्भवलेल्या परिस्थितीमुळे...
अन्नधान्य साठवणुकीच्या पद्धतीशेतीमालाच्या साठवणुकीच्या काही पारंपरिक पद्धती या...
फळे आणि भाज्या निर्जलीकरणाच्या विविध...मागील भागात आपण छोट्या प्रमाणावर उद्योग करणाऱ्या...
फळे, भाज्या निर्जलीकरणाच्या विविध पध्दतीफळे व भाज्यांमध्ये असणारी नैसर्गिक आर्द्रता कमी...
असे तयार करा कारल्यापासून चिप्स, रसकारले चवीने कडू असले तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर...
फळे, पालेभाज्यांचे निर्जलीकरण ठरते...निर्जलीकरण प्रक्रियेमध्ये फळे, पालेभाज्यांमधून...
साठवणूक हळद बेण्याची...निवडलेले बेणे जातिवंत आणि चांगले असेल तर उत्पादन...
आरोग्यदायी हळदस्वयंपाकात तसेच कोणत्याही धार्मिक कार्यात हळद फार...
औषधी, आरोग्यवर्धित द्राक्षद्राक्षाचे आरोग्यदायी दृष्टीने अनेक फायदे आहेत....
महत्त्व‘प्रोबायोटीक’ खाद्यपदार्थांचे...शरीरातील आतड्यांमध्ये आढळणारे लॅक्टोबिसीलस आणि...
गुलकंद अन सुगंधी तेलनिर्मितीदर नसल्याने फेकून द्याव्या लागणाऱ्या किंवा वाया...
खरबुजाचे मूल्यवर्धित पदार्थखरबुजामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन...
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...
भाजीपाल्याची योग्य हाताळणी महत्वाचीपॅकेजिंगमुळे भाजीपाला हाताळण्यास सोपा जातो....
गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे...सेंद्रिय शेतीला सध्याच्या काळात मोठे महत्व आले...
बागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे...सध्या वेलीवरील द्राक्ष मण्यांचे बेदाणे करण्याची...
केळीपासून प्युरी, पावडरकेळी फळाचा साठवण कालावधी कमी असतो. त्यामुळे...