बुके, हारांसह फूल ‘डेकोरेशन’ झाला सक्षम व्यवसाय

लग्न समारंभात फुलाांची सजावट
लग्न समारंभात फुलाांची सजावट

नाशिक जिल्ह्याने फूल सजावटीच्या व्यवसायातही आघाडी घेतली आहे. विविध सण, विशेष दिन, महोत्सव यांच्या निमित्ताने विविध प्रकारचे बुके, हार, डेकोरेशनसाठी वर्षभर विविध फुलांना मागणी येऊ लागली आहे. शेतकऱ्यांबरोबरच फूल व्यावसायिक, कुशल कलाकार यांनाह त्यातून रोजगाराच्या संधी तयार झाल्या आहेत. राज्यभरातील शेतकऱ्यांना बदलत्या ट्रेंडनुसार व्यावसायिक संधी मिळवणे शक्य होणारे आहे. नाशिक जिल्ह्याची गुलाब शेतीत वेगळी ओळख होती. मात्र मार्केटिंग, अन्य सुविधा, हवामान आदी कारणांनी फूल उत्पादक तोट्यात आला. गुलाब शेती संक्रमणात सापडली. पण काळानुसार फुलांचे प्रकार, व्यवसायाचे मूल्यवर्धन यातून जिल्ह्यातील फूलशेतीत आशादायक चित्र तयार झाले. फूल सजावट अर्थात डेकोरेशनसाठी मागणी वाढू लागली आहे. त्यातूनच जिल्ह्यातील जानोरी, मोहाडी, अक्राळे, मखमलाबाद, महिरावणी, ओढा या परिसरात जरबेरा, ऑर्किड, गुलाब, शेवंती, अस्टर या फुलांची लागवड वाढण्यास मदत झाली. त्याचबरोबर सजावटीत वापरल्या जाणाऱ्या कामिनी, विविध डेझी या फिलर्सच्या लागवडीलाही चालना मिळाली आहे. सर्वांना तयार झाला रोजगार नाशिक शहरात या व्यवसायात काही वर्षांपासून कार्यरत असलेल्यांचे अनुभव महत्त्वाचे आहेत.संदीप नाटकर आपला अनुभव सांगतात, की फूल व्यवसायात कार्यरत असताना १९८४ मध्ये वेगळ्या पद्धतीने कामास सुरुवात केली. देशी व परदेशी फुलांचे बंच तयार करून १० रुपयांपासून विक्री सुरू केली. सुरुवातीला प्रतिसाद अत्यल्प होता. मात्र नाशिक शहरातील ग्राहक वर्गाकडून पसंती मिळत गेली. काळाप्रमाणे नवीन कलाकृती व प्रकार बदलत गेले. पुष्पगुच्छ व सजावटींसाठी बुके व डेकोरेशनच्या ऑर्डर्स मिळू लागल्या. सजावटीचे नवे प्रकार ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध करून दिले. ग्राहकांच्या मागणीमुळे परिसरात फुलशेती वाढली. त्यांच्याकडून फुलांचा पुरवठा होऊ लागला. त्यातूनत फूल उत्पादक, व्यावसायिक आणि त्याबरोबरच कलाकृती तयार करणारे कुशल कारागीर किंवा कलाकार यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या. त्यातून व्यवसायाचे अर्थकारण उंचावण्यास मदत झाली. फुलांची सजावट हा थोडा वेगळा आणि कलात्मक व्यवसाय आहे. कल्पकतेने एखादी कलाकृती बनविल्यास ग्राहक पसंती देतात. व्यवसायाचे स्वरूप बदलले सुनील माळी म्हणाले, की फूल व्यवसायात आमची आज तिसरी पिढी काम करते आहे. पूर्वी फुलांचे पुडे व छोटे हार तयार करून लोकांच्या घरोघरी पोचविणे असे व्यवसायाचे स्वरूप होते. पुढे फुलांचे विविध पद्धतीने मूल्यवर्धन केले. बुके, हार, सजावट करू लागलो. दोन पैसे अधिक मिळू लागले. आज आमचे स्वतंत्र दालन आहे. ग्राहक नव्या डिझाइनप्रमाणे ऑर्डर्स देतात. बदलत्या काळात वेबसाइट, कामांचे प्रकार यांची सूची ग्राहकांसमोर देत असल्याने व्यवसायाला वेगळेपण आले आहे. एके काळी रस्त्यावर थांबून फुलांचे हार २ ते ३ रुपयांना विकायचो. आज व्यवसायाचे स्वरूप बदलल्याने व्यवसायातील मालक झालो आहे. संपर्कातील शेतकऱ्यांनाही त्यातून विक्रीचे व्यासपीठ मिळाले आहे. दीपक नाईकवाडे म्हणाले, की आजोबा, वडील फूल व्यवसायात होते. तगर, खुरासणी फुले आदी मर्यादित फुले व त्यामुळे मर्यादित ग्राहक होते. फुलमाळांमधून परतावा थोडाफारच होता. फूल सजावटीमध्ये काम सुरू केल्यानंतर वेगवेगळ्या फुलांच्या डिझाइन्स बनवू लागलो. त्यातून कामे मिळत गेली. आज वेगवेगळ्या शहरांत काम करतो. यामध्ये वेळ द्यावा लागतो. ग्राहकांच्या मागणीनुसार सेवा पुरवाव्या लागतात. कष्ट आहेत, मात्र कामाचे समाधान आहे. असे आहे मार्केट

  • ग्राहकांचे जाळे निर्माण करून ऑर्डर्स मिळविल्या जातात. त्यांच्या मागणीनुसार सजावट.
  • थेट फोनद्वारेही ऑर्डर्स
  • अधिक माहितीसाठी वेबसाइटनिर्मिती
  • ऑनलाइन बुकिंग व्यवस्था
  • फेसबकु, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून व्यवसायाचे प्रमोशन
  • फूल मूल्यवर्धनास का मागणी?

  • थंड व पर्यावरणपूरक शहर म्हणून नाशिकची ओळख
  • याच अनुषंगाने विविध समारंभ, विविध सोहळे, परिषदा, प्रदर्शने शहरात मोठ्या प्रमाणावर
  • अनेक प्रशस्त व तारांकित हॉटेल्स. त्यामुळे सजावटीला नेहमी वाव मिळतो.
  • शहरात अनेक औद्योगिक कंपन्या. त्यामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यावसायिकांची वर्दळ असते.
  • शहर व परिसरात २०० हून अधिक प्रशस्त हॉल्स उपलब्ध. त्यामुळे कार्यक्रमांची सतत रेलचेल.
  • नाशिक हे द्राक्षशेती व ॲग्रो टुरिझमसाठीही देशात लौकिक मिळवत आहे. ‘डेस्टिनेशन वेडिंग’ म्हणूनही मोठी संधी निर्माण करत आहे.
  • ‘डेकोरेशन’साठी या फुलांना संधी गुलाब, जरबेरा, ऑर्किड, ग्लॅडिओलस, पॉलिहाउसमधील शेवंती, कार्नेशन, निशिगंध, अँथ्युरिएम, लिली फिलर्स- गोल्डन रॉड, कामिनी, मच्छिपत्ता, फायकस, सफेद व निळ्या रंगाच्या डेझी व्यवसायातील महत्त्वाच्या बाबी :

  • आर्थिक व्यवहार व फुलांच्या उपलब्धतेनुसार आकर्षक सजावट
  • प्रासंगिक मेहनतीची तयारी
  • फुलांची टिकवणक्षमता मर्यादित असल्याने काळजीपूर्वक वाहतूक व हाताळणी
  • कामासाठी वेळेचे बंधन महत्त्वपूर्ण
  • कामानुसार मजुरांची उपलब्धता
  • नवीन प्रकारची सजावट व कलाकृती साकारण्याचे कौशल्य
  • भांडवलाची उपलब्धता व आर्थिक गुंतवणूक
  • फुलांची साठवणूक करण्यासाठी वातानुकूलित कक्ष
  • वाहतूक व्यवस्था
  • बुके प्रकार -बंच बुके - वनसाइड बुके, हाफ राउंड बुके, राउंड बुके, फुल्ल राउंड बुके, पॉट बुके - वनसाइड पॉट, राउंड पॉट, कॉन्फरन्स पॉट यांसह बांबूच्या वेष्ठनात विविध आकाराचे टेबल बुके. तसेच व्हीआयपी बुके. हारांचे प्रकार महाराजा, सफारी, बॉबी, राजाराणी, पट्टी, कंठी, तिरंगा हार व मागणीनुसार अन्य या काळात ग्राहकांकडून अधिक पसंती नवीन वर्ष, महापुरुषांच्या जयंती, गणेशोत्सव, गौरी गणपती, नाताळ, लग्नसराई, विविध दिनविशेष उदा. व्हॅलेंटाइन डे, शिक्षण दिन, मदर्स दे, फादर्स डे. असे आहेत दर हार : २० रुपये ते १० हजार रुपये पुष्पगुच्छ : ५० रुपये ते १८ हजार रुपये कार डेकोरेशन : २ हजार रुपये ते ४० हजार रुपये इव्हेंट डेकोरेशन : ३ हजार रुपये ते १५ लाख रुपये साखरपुडा, लग्न यांसाठी गुलाबाच्या विविध रंगांच्या पाकळ्या सुट्या करून त्यांच्यासह विविध प्रकारची हिरवी पाने, मोगरा, तगर फुले ओवून मोहक निर्मिती केली जाते. विविध राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांमध्येही पक्षीय कार्यकर्त्यांच्या मागणीप्रमाणे विविध रंगाची फुले वापरून मोठ्या आकाराचे हार सत्कारासाठी बनविण्याचा ट्रेंड प्रचलित झाला आहे. संपर्क दीपक नाईकवाडे, पुष्प सजावट व्यावसायिक ८८८८८८९५२  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com