विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात राहिली मागणी, पुणे बाजार समितीत १५ कोटींची उलाढाल

आम्ही वर्षभर विविध रंगांच्या शेवंतीची लागवड करतो. जुलै ते ऑगस्ट, ऑक्टोबर नोव्हेंबर आणि जानेवारी- फेब्रुवारी असा हंगाम असतो. गणपती उत्सव आणि दसऱ्याचे नियोजन करून चार एकर पांढरी शेवंती घेतली आहे. गणपती उत्सवात एक टन विक्री केली. त्यास किलोला ६० ते कमाल २०० रुपयांपर्यंत दर मिळाला. -विलास दोरगे दोरगेवाडी, यवत, जि. पुणे संपर्क- ९९६०४५४६३९
पुणे गुलटेकडी बाजार समितीत विविध फुलांची झालेली आवक
पुणे गुलटेकडी बाजार समितीत विविध फुलांची झालेली आवक

फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही महत्त्वाच्या सणांवेळी ती सर्वाधिक असते. गणेशोत्सवात तीन- चार दिवस आधीपासूनच सुरू झालेली फुलांची व फीलर्सची मागणी अनंत चतुदर्शीपर्यंत म्हणजे सुमारे १५ दिवस असते. याकाळात फुलांचे दरही वाढलेले असतात. यंदा राज्याच्या विविध भागातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीत फुलांच्या उत्पादनाला फटका बसला. याही परिस्थितीत मागणी आणि दर वाढलेले होते. पुणे बाजार समितीमध्ये गणेशोत्सवादरम्यान विविध फुलांची सुमारे १५ कोटींची उलाढाल झाली. त्याचा हा आढावा.   वर्षभरात गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी या महत्त्वाच्या उत्सवांमध्ये विविध फुलांना मागणी असते. यातही गणेशोत्सव काळात सुमारे १५ दिवस हीच मागणी सर्वाधिक असते. पुणे- गुलटेकडी ही अन्य शेतमालांबरोबरच फुलांसाठीही तेवढीच महत्त्वाची बाजारपेठ आहे. साहजिकच येथे होणारी फुलांची आवक, उलाढाल यांना तेवढेच महत्त्व आहे. हार, वेणीच्या फुलांना मागणी फुलबाजार आडते व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आप्पा गायकवाड या अनुषंगाने बोलताना म्हणाले, की गणेशोत्सवाच्या चार दिवस आधी फुलांच्या मागणीस सुरवात होते. यात पुणे शहरासह जिल्हा, उपनगरांमधून विशेष मागणी असते. या काळात लहान मोठ्या हारांना मागणी वाढती असल्याने अनेक विक्रेते हार तयार करून शीतगृहात ठेवतात. कोकणातही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत तेथून मोठी मागणी असते. यात प्रामुख्याने महिलांकडून वेणीच्या फुलांना मागणी असते. या काळात दर सरासरीच्या किमान ५० ते ६० टक्क्यांनी अधिक असतात. पुराचा फटका उत्पादनाला यंदा अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत फुलांचे उत्पादन झाले नाही. येथील फुले मुंबईला रवाना होतात. मात्र, योग्य पुरवठ्याअभावी मुंबईतील व्यापाऱ्यांना पुणे बाजार समितीत येणे भाग पडले. त्यामुळेही फुलांचे दर वाढल्याचे गायकवाड यांनी सांगितले. या फुलांना विशेष मागणी

  • गणेशोत्सव, गौरी आगमनासाठी यांना विशेष मागणी-  झेंडू, शेवंती, गुलछडी, कागडा, ॲस्टर, सुट्टा गुलाब, गुलाब गड्डी, डच गुलाब
  • तर सजावटीसाठी- जर्बेरा, कार्नेशन, ऑर्किडसह विविध पानवर्गीय वनस्पतींना मागणी
  • सरासरी दर रुपये. प्रतिकिलो फूलप्रकार --    - गणेशोत्सवाआधी --- गणेशोत्सवातील शेवंती ---            ८०-१००              १४०-१८० गुलछडी --          ८०-१००              २००-४०० झेंडू -                 १०-३०             ४०-५० कागडा -          १५०-२००             ३००-४०० ......................................................... प्रतिजुडी वा गड्डी ॲस्ट र              १०-१५ -              ३०-४० गुलाब              २०-२५              ५०-६० डच गुलाब         ८०-१००            १२०-१६० जर्बेरा               २०-२५              ४०-६० कार्नेशन          ८०-१२०               १८०-२००   बंगळूरच्या फुलांवर भिस्त उत्सवांच्या काळात सजावटीसाठी आवश्‍यक फुलांसाठी बंगळूरच्या फुलांवर बाजारपेठ अवलंबून असते. यात ऑर्किड, ॲन्थुरियम, बर्ड ऑफ पॅराडाईज ही फुले तर फीलर्समध्ये साँग ऑफ इंडिया, ड्रेसिना, क्लोरोमा (रिबीन), तालपत्ता (टेबल पाम), फायकस, फर्न, ॲस्परॅग स आदींचा समावेश आहे. पानांचा दर जुडीला १० ते १०० रुपयांपर्यत असतो. कण्हेरीची आवक बंगळूर परिसरात कण्हेरीच्या विविध रंगी फुलांचे उत्पादन होते. आकर्षक रंग, वजनाने हलकी आणि टिकवणक्षमता चांगली असल्यामुळे हारांसाठी त्यांचा वापर होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात पांढरी, लाल गडद आणि गुलाबी रंगाचा समावेश आहे. गणेशोत्सवात दररोज सुमारे ५०० किलो फुलांची आवक होऊन प्रतिकिलो २०० ते ४०० रुपये दर मिळाला होता. हाच दर आता ५० ते १०० रुपयांवर आला असून आवक कमी झाली आहे. नवरात्र, दिवाळीत तेजीचा अंदाज मराठवाडा व सोलापूर परिसरात तुलनेने कमी पाऊस असल्याने काही ठिकाणी फुलांचे उत्पादन चांगले आहे. यामुळे मागणी आणि दर चांगले राहतील. आगामी नवरात्र, दिवाळीत चांगले दर राहतील अशी आशा आहे. -अरुण वीर अध्यक्ष, अखिल पुणे फूलबाजार अडते असोसिएशन यंदा गणेशोत्सवाच्या काळात पुणे बाजार समितीमधील फुलांची उलाढाल सुमारे १५ कोटी झाली. फुलांना विशेष मागणी असणाऱ्या प्रमुख तीन सणांत गणेशोत्सव आहे. येत्या सणासुदीतही बाजार तेजीतच राहतील. -प्रदीप काळे फूल विभागप्रमुख बाजार समिती पुणे शेतकरी प्रतिक्रिया आम्ही नियमित गणेशोत्सव आणि नवरात्रीसाठी झेंडू आणि शेवंती लागवडीचे नियोजन करतो. झेंडूची एक एकरात लागवड असून गणपतीमध्ये किलोला ५० ते ७० रुपये दर मिळाला. सुमारे चार टन विक्री झाली. यंदा पाच एकरांत शेवंतीची लागवड केली आहे. -नाना मगर वाघुंडे खुर्द, ता. पारनेर, जि. नगर संपर्क- ९८८११५१९५५ काही फुलांचे उत्पादन लागवड केल्यावर तीन वर्षे सुरू राहते. दीड वर्षांपूर्वी दीड एकरांवर लागवड केलेल्या फुलांचे उत्पादन सध्या सुरू आहे. -बाळासाहेब कुताडे शिर्सुफळ, ता. बारामती. जि. पुणे संपर्क- ९९७०३६८०४६   सध्या दीड एकरांवरील बिजलीचे उत्पादन सुरू असून गणेशोत्सव काळात पहिले पाच दिवस किलोला २०० ते २५० रुपये तर नंतरच्या पाच दिवसांत १०० ते १५० रुपये दर मिळाला. नवरात्रीत दर वाढण्याचा अंदाज आहे. -नीलेश कामठे शिवरी, ता. पुरंदर जि. पुणे संपर्क- ९६२३०७३७१०v

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com