agriculture story in marathi, flower market in Ganesh Festival was florished. There were huge demand for flowers in this period. | Page 2 ||| Agrowon

विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात राहिली मागणी, पुणे बाजार समितीत १५ कोटींची उलाढाल
गणेश कोरे
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

आम्ही वर्षभर विविध रंगांच्या शेवंतीची लागवड करतो. जुलै ते ऑगस्ट, ऑक्टोबर नोव्हेंबर आणि जानेवारी- फेब्रुवारी असा हंगाम असतो. गणपती उत्सव आणि दसऱ्याचे नियोजन करून चार एकर पांढरी शेवंती घेतली आहे. गणपती उत्सवात एक टन विक्री केली. त्यास किलोला ६० ते कमाल २०० रुपयांपर्यंत दर मिळाला.
-विलास दोरगे
दोरगेवाडी, यवत, जि. पुणे
संपर्क- ९९६०४५४६३९
 

फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही महत्त्वाच्या सणांवेळी ती सर्वाधिक असते. गणेशोत्सवात तीन- चार दिवस आधीपासूनच सुरू झालेली फुलांची व फीलर्सची मागणी अनंत चतुदर्शीपर्यंत म्हणजे सुमारे १५ दिवस असते. याकाळात फुलांचे दरही वाढलेले असतात.
यंदा राज्याच्या विविध भागातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीत फुलांच्या उत्पादनाला फटका बसला. याही परिस्थितीत मागणी आणि दर वाढलेले होते. पुणे बाजार समितीमध्ये गणेशोत्सवादरम्यान विविध फुलांची सुमारे १५ कोटींची उलाढाल झाली. त्याचा हा आढावा.

 
वर्षभरात गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी या महत्त्वाच्या उत्सवांमध्ये विविध फुलांना मागणी असते. यातही गणेशोत्सव काळात सुमारे १५ दिवस हीच मागणी सर्वाधिक असते. पुणे- गुलटेकडी ही अन्य शेतमालांबरोबरच फुलांसाठीही तेवढीच महत्त्वाची बाजारपेठ आहे. साहजिकच येथे होणारी फुलांची आवक, उलाढाल यांना तेवढेच महत्त्व आहे.

हार, वेणीच्या फुलांना मागणी
फुलबाजार आडते व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आप्पा गायकवाड या अनुषंगाने बोलताना म्हणाले, की गणेशोत्सवाच्या चार दिवस आधी फुलांच्या मागणीस सुरवात होते. यात पुणे शहरासह जिल्हा, उपनगरांमधून विशेष मागणी असते. या काळात लहान मोठ्या हारांना मागणी वाढती असल्याने अनेक विक्रेते हार तयार करून शीतगृहात ठेवतात. कोकणातही गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत तेथून मोठी मागणी असते. यात प्रामुख्याने महिलांकडून वेणीच्या फुलांना मागणी असते. या काळात दर सरासरीच्या किमान ५० ते ६० टक्क्यांनी अधिक असतात.

पुराचा फटका उत्पादनाला
यंदा अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत फुलांचे उत्पादन झाले नाही.
येथील फुले मुंबईला रवाना होतात. मात्र, योग्य पुरवठ्याअभावी मुंबईतील व्यापाऱ्यांना पुणे बाजार समितीत येणे भाग पडले. त्यामुळेही फुलांचे दर वाढल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

या फुलांना विशेष मागणी

  • गणेशोत्सव, गौरी आगमनासाठी यांना विशेष मागणी- झेंडू, शेवंती, गुलछडी, कागडा, ॲस्टर, सुट्टा गुलाब, गुलाब गड्डी, डच गुलाब
  • तर सजावटीसाठी- जर्बेरा, कार्नेशन, ऑर्किडसह विविध पानवर्गीय वनस्पतींना मागणी

सरासरी दर रुपये.

प्रतिकिलो
फूलप्रकार --    - गणेशोत्सवाआधी --- गणेशोत्सवातील
शेवंती ---            ८०-१००              १४०-१८०
गुलछडी --          ८०-१००              २००-४००
झेंडू -                 १०-३०             ४०-५०
कागडा -          १५०-२००             ३००-४००
.........................................................
प्रतिजुडी वा गड्डी

ॲस्टर              १०-१५ -              ३०-४०
गुलाब              २०-२५              ५०-६०
डच गुलाब         ८०-१००            १२०-१६०
जर्बेरा               २०-२५              ४०-६०
कार्नेशन          ८०-१२०               १८०-२००
 
बंगळूरच्या फुलांवर भिस्त
उत्सवांच्या काळात सजावटीसाठी आवश्‍यक फुलांसाठी बंगळूरच्या फुलांवर बाजारपेठ अवलंबून असते. यात ऑर्किड, ॲन्थुरियम, बर्ड ऑफ पॅराडाईज ही फुले तर फीलर्समध्ये साँग ऑफ इंडिया, ड्रेसिना, क्लोरोमा (रिबीन), तालपत्ता (टेबल पाम), फायकस, फर्न, ॲस्परॅगस आदींचा समावेश आहे.
पानांचा दर जुडीला १० ते १०० रुपयांपर्यत असतो.

कण्हेरीची आवक
बंगळूर परिसरात कण्हेरीच्या विविध रंगी फुलांचे उत्पादन होते. आकर्षक रंग, वजनाने हलकी आणि टिकवणक्षमता चांगली असल्यामुळे हारांसाठी त्यांचा वापर होण्याचे प्रमाण वाढले आहे. यात पांढरी, लाल गडद आणि गुलाबी रंगाचा समावेश आहे. गणेशोत्सवात दररोज सुमारे ५०० किलो फुलांची आवक होऊन प्रतिकिलो २०० ते ४०० रुपये दर मिळाला होता. हाच दर आता ५० ते १०० रुपयांवर आला असून आवक कमी झाली आहे.

नवरात्र, दिवाळीत तेजीचा अंदाज
मराठवाडा व सोलापूर परिसरात तुलनेने कमी पाऊस असल्याने काही ठिकाणी फुलांचे उत्पादन चांगले आहे. यामुळे मागणी आणि दर चांगले राहतील. आगामी नवरात्र, दिवाळीत चांगले दर राहतील अशी आशा आहे.
-अरुण वीर
अध्यक्ष, अखिल पुणे फूलबाजार अडते असोसिएशन

यंदा गणेशोत्सवाच्या काळात पुणे बाजार समितीमधील फुलांची उलाढाल सुमारे १५ कोटी झाली.
फुलांना विशेष मागणी असणाऱ्या प्रमुख तीन सणांत गणेशोत्सव आहे. येत्या सणासुदीतही बाजार तेजीतच राहतील.
-प्रदीप काळे
फूल विभागप्रमुख
बाजार समिती पुणे

शेतकरी प्रतिक्रिया
आम्ही नियमित गणेशोत्सव आणि नवरात्रीसाठी झेंडू आणि शेवंती लागवडीचे नियोजन करतो.
झेंडूची एक एकरात लागवड असून गणपतीमध्ये किलोला ५० ते ७० रुपये दर मिळाला. सुमारे चार टन विक्री झाली. यंदा पाच एकरांत शेवंतीची लागवड केली आहे.
-नाना मगर
वाघुंडे खुर्द, ता. पारनेर, जि. नगर
संपर्क- ९८८११५१९५५

काही फुलांचे उत्पादन लागवड केल्यावर तीन वर्षे सुरू राहते. दीड वर्षांपूर्वी दीड एकरांवर लागवड केलेल्या फुलांचे उत्पादन सध्या सुरू आहे.
-बाळासाहेब कुताडे
शिर्सुफळ, ता. बारामती. जि. पुणे
संपर्क- ९९७०३६८०४६

 
सध्या दीड एकरांवरील बिजलीचे उत्पादन सुरू असून गणेशोत्सव काळात पहिले पाच दिवस किलोला २०० ते २५० रुपये तर नंतरच्या पाच दिवसांत १०० ते १५० रुपये दर मिळाला. नवरात्रीत दर वाढण्याचा अंदाज आहे.
-नीलेश कामठे
शिवरी, ता. पुरंदर जि. पुणे
संपर्क- ९६२३०७३७१०v

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
उत्पादन दीडपटीने वाढवणारी कंटूर...कालच्या भागात (ता.२ )आपण यवतमाळ येथील सुभाष शर्मा...
लोकसहभागातून दुष्काळी पिंपरी बनले आदर्श...पुणे-नगर सीमेलगत पारनेर तालुक्यात सुपे गावापासून...
माती, पाणी, पर्यावरण संवर्धनासह बहुविध...अनेक वर्षांपासून नैसर्गिक शेतीचे विविध प्रयोग...
सत्तावीस एकरांतील चंदनासह एकात्मिक...पिंपळनेर (ता. पारनेर, जि. नगर) येथील राजेंद्र...
नारळ, सुपारी, बांबू लागवडीतून शेती केली...कसाल (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) येथील मधुकर...
बिगर हंगामी भाजीपाला पीकपद्धतीतून...लातूर जिल्ह्यात जांब (ता. अहमदपूर) येथील प्रभाकर...
कृषी महाविद्यालयाने उभारले २६ पीक...‘दुर्मीळतेकडून मुबलकतेकडे ही संकल्पना दुर्लक्षित...
शिक्षण, आरोग्य अन् पूरक उद्योगांसाठी...राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील...
देशी कोंबडी, अंडी विक्रीतून मिळवले...सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील तडवळे (...
मुगासाठी प्रसिध्द जळगावची बाजारपेठ,...जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी...
थेट अंडी विक्री व्यवस्थेतून विस्तारला...नाशिक येथील रश्‍मीन मधुकर माळी यांच्या कुटुंबांचे...
पाच भावांच्या एकीचे बळ मिळाले फायदेशीर...‘एकीचे बळ मिळते फळ’ ही म्हण तंतोतंत लागू पडते ती...
स्वच्छता, जल व्यवस्थापनात राज्यात आदर्श...नांदेड जिल्ह्यातील शेळगाव गौरी (ता. नायगाव)...
दूध गुणवत्तेसह प्रक्रिया, थेट विक्री,...अकोला शहरातील विजय दुबे यांनी सुमारे ६० दुभत्या...
पीकबदल, नियोजनातून शाश्‍वत शेतीची कासकेवळ शेती व्यवस्थापनासाठीच अधिकाधिक वेळ देणे,...
फेरपालटातून ऊस, केळी, आल्याची यशस्वी...सांगली जिल्ह्यातील आळसंद येथील युवा शेतकरी विनोद...
रंगबेरंगी फुलांसाठी विशेष प्रसिध्द...तमिळनाडू राज्य विविध फुलांसाठी विशेष प्रसिध्द आहे...
जमिनीच्या सुपीकता वाढीतून साधली चौफेर...शेती अधिक उत्पादनक्षम करण्यासाठी धामणा (जि....
बाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...
पापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...