agriculture story in marathi, flower market in Jalgaon is now in flourished due to Ganpati Festival. | Agrowon

जळगावच्या बाजारात फुलांना बारमाही उठाव, गौरी-गणपती उत्सवात फुलला बाजार 
चंद्रकांत जाधव 
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

जूनमध्ये लाल झेंडूची अर्धा एकरात लागवड केली. सध्या दररोज ४० ते ४५ किलो फुले मिळत असून दर ७० ते ८० रुपये प्रतिकिलो आहेत. गणपती, गौरीच्या उत्सवात फुलांना उठाव कायम असतो. 
-गजनान जाधव, ९५७९७४३१४२ 

जळगावचा फूलबाजार पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. विविध प्रकारची व रंगांची आकर्षक फुले व फीलर्स यांना येथे बारमाही मागणी व उठाव असतो. विदर्भासह, गुजरातेतील बडोदा, सुरत येथेही मोठे खरेदीदार फुलांची बारमाही पाठवणूक करतात. मोगरा, गुलाब, झेंडू, निशिगंधच्या फुलांचे दर वर्षभरापासून टिकून असून गौरी-गणपतीचा हंगाम तर खानदेशातील फूल उत्पादकांसाठी आर्थिक लाभ देणाराच ठरतो. 

जळगाव शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अखत्यारीत वल्लभदास वालजी (गोलाणी) व्यापारी संकुलात सुमारे ३५ वर्षांपासून भरणारा फूलबाजार खानदेशात प्रसिद्ध आहे. सध्या गौरी-गणपतीच्या सणाची सर्वत्र मोठी धामधूम आहे. या धर्तीवर हा फूलबाजार उत्साहाने व विविध रंगांच्या आकर्षक फुलांनी भरून गेला आहे. 

जळगाव जिल्ह्यातील फूलशेती 
जळगाव तालुक्‍यातील शिरसोली, आसोदे, तरसोद, विदगाव, चोपडा, पारोळा, एरंडोल, भुसावळ तालुक्यातील कुऱ्हे पानाचे, तळवेल आदी भागांत गुलाब, झेंडू, निशिगंध, लिली, मोगरा यांची लागवड झाली आहे. सुमारे दोन हजार हेक्‍टरपर्यंत झेंडू, सुमारे २०० ते ३०० हेक्‍टर गुलाब तर निशिगंध, मोगरा, शेवंती, फिलरमधील बिजनी (स्थानिक नाव), गोल्डन रॉड, लिली आदी मिळून सुमारे ३०० हेक्‍टरपर्यंत लागवड जळगाव जिल्ह्यात असावी असा जाणकारांचा अंदाज आहे. फूल उत्पादनासाठी तालुक्‍यातील शिरसोली प्रसिद्ध आहे. येथे जरबेरा, झेंडूसह विविध फुले, फिलर्सची लागवड होते. मागील वर्षभर खानदेश व लगतच्या भागात दुष्काळी स्थिती असल्याने अनेक फुलांचे नुकसान झाले. त्याचा परिणाम यंदा काहीसा झाला. 

अशी होते आवक 

 • बहुतांश फुलांची आवक बारमाही. हंगाम व मागणीनुसार त्यात बदल 
 • ऑगस्टपासून गुलाब, निशिगंध, झेंडू, मोगरा, लिली यांची चांगली आवक. ती हिवाळ्यापर्यंत टिकून. 
 • झेंडूची सर्वाधिक तर त्यापाठोपाठ गुलाबाची आवक. 
 • जळगाव जिल्ह्यात जरबेरा क्षेत्र कमी असल्याने उन्हाळ्यात ही मागणी अडतदार पुणे येथून पूर्ण करतात. ग्लॅडिओलस, ऑर्कीड आदींची मागणीही पुणे, नाशिक भागातूनच पूर्ण होते. 
 • गुलाब, झेडू, निशिगंध, शेवंती यांचा फारसा तुटवडा जाणवत नाही. 
 • जळगाव व्यतिरिक्त नाशिक, धुळे, औरंगाबद, बुलडाणा येथूनही आवक. 
 • औरंगाबाद येथून मोगरा, पिवळा झेंडू व लिली तर धुळे येथून झेंडूची अधिक आवक. 

गुजरात, विदर्भातून मागणी 
पुष्पगुच्छासाठी आवश्‍यक फिलर्सचा तुटवडा शक्यतो दिसून येत नाही. कारण शिरसोली व आसोदे येथील शेतकरी बारमाही बिजनी, गोल्डन रॉड आदींचे उत्पादन घेऊ लागले आहेत. त्यांची आवक काही वेळेस गरजेपेक्षा अधिक होते. जरबेरा, गुलाबाला गुजरातहून अधिक मागणी असते. त्यामुळे दोन-तीन आडतदार गुलाब आणि जरबेराची बारमाही खरेदी करतात. उन्हाळ्यात नागपूर येथे गुलाब, निशिगंध, मोगरा यांना मागणी असते. अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशीम, नंदुरबार, धुळे येथे सर्व फुलांची पाठवणूक जळगावच्या फूलबाजारातून होते. 

जळगाव फूलबाजार- ठळक बाबी 

 • गोलाणी व्यापारी संकुलात २३ फूल भांडार. संकुलानजीक विसनजीनगर, नवीपेठेतही फूलभंडार. 
 • सुमारे १० आडते आहेत. 
 • काही फूल विक्रेते किंवा भंडारचालकांकडून थेट शेतकऱ्यांकडून खरेदी. 
 • बाजारात प्रति महिना सुमारे ९० ते ९५ लाख रुपयांची उलाढाल मागील दोन महिन्यांपासून. 
 • गेल्या दोन वर्षांत वार्षिक उलाढाल सुमारे नऊ ते १० कोटी पर्यंत. 
 • गौरी-गणपती, दसरा व दिवाळीच्या वेळेस अधिक उलाढाल 

आवक, हंगाम व दर (प्रति किलो) 
झेंडू 

 • एप्रिल ते जून - ५५ ते ६० क्विंटल 
 • ऑगस्ट ते नोव्हेंबर - ९० ते १०० क्विंटल 
 • डिसेंबर ते फेब्रुवारी आवक कमी अधिक. 
 • एप्रिल ते जूनदरम्यान कमाल दर - ९० ते १०० रु. 
 • सध्याचे दर - ८० रु. 
 • मागील दोन वर्षांतील दर - ५० ते ६० रु. 

गुलाब 

 • मार्च ते जून- प्रतिदिन सरासरी ३० हजार फुलांची आवक. 
 • उन्हाळ्यात कमाल ३०० रुपये प्रति शेकडा दर. ऑगस्ट ते डिसेंबर - दर - २०० ते १५० रू. 

निशिगंध 

 • बारमाही कमी आवक. 
 • एप्रिल ते जून - आवक दीड क्विंटल, ऑगस्ट ते नोव्हेंबर- साडेतीन क्विंटल 
 • उन्हाळ्यात २५० ते ३०० रुपये प्रति किलो दर. तर पावसाळा, हिवाळ्यात २०० ते २५० रुपये दर. 
 • सन २०१७ व २०१८ मध्ये २०० रुपये प्रति किलो सरासरी दर. 

लिली 

 • आवक- प्रति दिन सात ते आठ गोणी- (प्रति गोणीत प्रत्येकी ४० फुलांची २०० बंडल्स) 
 • एप्रिल ते जून मुख्य आवक. 
 • ऑगस्टपासून ते नोव्हेंबर - प्रतिदिन सरासरी १५ गोणी आवक. 
 • उन्हाळ्यात प्रतिबंडल १० ते २० रुपये तर पावसाळा व हिवाळ्यात १० ते १५ रुपये दर. 

मोगरा 

 • उन्हाळ्यात प्रतिदिन दीड क्विंटल तर ऑगस्ट ते नोव्हेंबरदरम्यान प्रतिदिन सरासरी अडीच क्विंटल आवक. 
 • गेल्या उन्हाळ्यात किमान १२०० तर कमाल २००० रुपये प्रति किलो दर. 
 • पावसाळा व हिवाळ्यात हाच दर ७५० ते १२०० रु. 
 • मागील दोन वर्षांत १००० ते १२०० रुपये दर 

जरबेरा 

 • नाशिक, पुणे, नगर येथून अधिक आवक. 
 • मार्च ते जूनदरम्यान सरासरी २०० बंडल्स ( प्रति बंडल १० फुले) आवक. 
 • ऑगस्ट ते नोव्हेंबर- ३०० ते ४०० बंडल्स आवक. 
 • उन्हाळ्यात कमाल १०० रुपये तर पावसाळ्यात कमाल ८० रुपये प्रति बंडल दर. 
 • मागील दोन वर्षांत हेच दर ६० ते ७० रुपये. 

 मोगरा, निशिगंध यांचे बारमाही चांगले असतात. त्यामुळे त्यांच्या शेतीवर शेतकऱ्यांचा अधिक भर असतो. झेंडूची लागवड जूनमध्ये करण्यावर शेतकऱ्यांचा भर दिसतो. 

प्रतिक्रिया 
गुलाबाचे चार वर्षांपासून एक एकरात उत्पादन घेतो. उन्हाळ्यात २०० ते ३०० रुपये प्रति शेकडापर्यंत दर मिळतात. 
- सुनील बारी, ९८९०८५८३०६ 

फुलांना स्थानिक भागाबरोबरच गुजरात, मध्य प्रदेशातही चांगली मागणी आहे. त्यादृष्टीने परराज्यातही इथून 
फुलांची निर्यात होते. 
संजय जगन्नाथ बारी, अडतदार 

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
सरकी ढेपेचे दर कडाडल्याने दूध उत्पादक...अकोला : दुधाळ जनावरांना पोषक खाद्य म्हणून खाऊ...
लष्करी अळीपासून कपाशीला धोका नाहीः कृषी...पुणे: राज्याच्या कापूस पिकाला अमेरिकन लष्करी...
खानदेशातही कापसावर लष्करी अळीजळगाव  : खान्देशात जळगाव, धुळे जिल्ह्यांतील...
विधानसभेचा बिगुल वाजलामुंबई: चौदाव्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे...
कांदा दरस्थिती आढाव्यासाठी केंद्राचे...नाशिक : कांदा दर, आवक स्थितीचा आढावा...
पापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...
बाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...
अमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल ! (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...
नावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...
औरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...
कोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी  : कोकणात व्यावसायिक...
नगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
पावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव  ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...
नागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्‍यावरील अमेरिकन लष्करी...
राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः  कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...
श्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...
शेतकऱ्यांच्या ‘महारोषा’चे काय?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...
खानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव  ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...