agriculture story in marathi, Folane family has achieved success in dairy farming with ideal management. | Page 3 ||| Agrowon

दुग्धव्यवसायातून संयुक्त फोलाने कुटुंबाची प्रगती

सूर्यकांत नेटके
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

नगर जिल्ह्यात कुकाणे येथील संयुक्त फोलाने परिवाराने पाच म्हशीपासून दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. दुधाची गुणवत्ता जोपासत ग्राहकांचा विश्वास बळकट करीत म्हशीच्या संख्येत व दुग्धउत्पादनात वाढ केली. आज ‘जय किसान दूध’ ब्रॅन्ड तयार केला असून या व्यवसायातून कुटुंबाने लक्षणीय प्रगती साधली आहे.

नगर जिल्ह्यात कुकाणे येथील संयुक्त फोलाने परिवाराने पाच म्हशीपासून दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. दुधाची गुणवत्ता जोपासत ग्राहकांचा विश्वास बळकट करीत म्हशीच्या संख्येत व दुग्धउत्पादनात वाढ केली. आज ‘जय किसान दूध’ ब्रॅन्ड तयार केला असून या व्यवसायातून कुटुंबाने लक्षणीय प्रगती साधली आहे.
 
नगर जिल्ह्यात कुकाणे (ता. नेवासा) येथे माजी उपसरपंच व आदर्श शेतकरी भाऊसाहेब किसन फोलाने यांचा एकत्रित परिवार नांदतो. बाळासाहेब, अरुण, संदीप असे त्यांना बंधू आहेत. वडिलोपार्जित त्यांची ३५ एकर एकत्रित शेती आहे. ऊस, केळी, आणि जनावरांसाठी चारा पीके अश पीक पद्धती आहे. सध्या साधारण वीस एकर ऊस, चार एकर केळी आणि पाच एकरांवर चारापिके आहेत. अलिकडे एकत्रित कुटुंबपद्धतीचा अभाव पहायला मिळतो. मात्र फोलाने परिवारातील सतरा सदस्याचा गोतावळा निश्‍चित अनुकरणीय आहे. परिवारला एकसंध ठेवण्यामध्ये ज्येष्ठ सदस्य आई चंद्रभागा व मालनबाई यांचे बहुमोल योगदान आहे.

पाच म्हशींपासून सुरवात
परिवारातील ज्येष्ठ सदस्य भाऊसाहेबांनी १९९८ मध्ये शेतीला जोड म्हणून भाकड म्हशी घेत व्यवसाय सुरू केला. वेताला जवळ आल्यावर परिसरात, बाजारात विक्री ते करीत. हरियाणा व अन्य भागातून म्हशी आणत. मात्र त्यात तोटा अधिक होत असल्याचे लक्षात आले. हरियाणा येथून आणलेल्या व वेतासाठी जवळ आलेल्या मुऱ्हा, म्हैसाण जातीच्या पाच म्हशी न विकता त्यांच्याच आधारे २००० मध्ये दुग्धव्यवसायाला सुरवात केली. सुरूवातीला पन्नास लिटर दूध संकलन व्हायचे. कुकाण्यात हाॅटेलला विक्री तसेच ग्राहकांनाही दर्जेदार दुध देण्यावर भर दिला.

दुधाचा बनविला ब्रॅंड
हळूहूळ दुधाला मागणी वाढू लागली. टप्प्याटप्प्याने म्हशींच्या संख्येत वाढ केली. सध्या ८० पर्यंत म्हशी असून ५० दुभत्या आहेत. दररोज कुकाणे येथे सुमारे २०० लिटर दूध हाॅटेलला तर २०० लिटर दुधाची थेट ग्राहकांना विक्री होते. कुकाणे ग्रामपंचायतीसमोर थेट विक्री केंद्रातून सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजता दुधाची ६० रुपये प्रती लिटर दराने विक्री होते. अवघ्या तासातच संपूर्ण दूध विकले जाते. जय किसान दुध हा ब्रॅण्ड त्यासाठी विकसीत केला आहे. कोजागिरी अथवा अन्य सणांच्या काळात लोक आगाऊ मागणी नोंदवतात. मागणी जास्त व पुरवठा कमी अशी अवस्था होऊन जाते. कोरोना काळातही थेट ग्राहकांसाठी विक्री थांबवली नाही. मात्र हॉटेलला पुरवठा होणाऱ्या दुधात आर्थिक तोटा सोसावा लागला.

दूध संकलन केंद्र
दुग्धव्यवसायावर भरभरुन प्रेम करणाऱ्या फोलाने परिवाराने तीन वर्षांपासून एचएफ संकरीत गायींचेही पालन सुरु केले आहे. सध्या १५ गायी आहेत. दररोज शंभर लिटरपर्यंत दूध संकलन होते. फोलाने यांनी गावात दूध संकलन केंद्रही सुरु केले आहे. घरच्या दुधासह अन्य शेतकऱ्यांचे मिळून ६०० ते ७०० लिटर दूध संकलन होते. गायींसाठी ५० हजार रुपये खर्च करुन मुक्त गोठा व शेड उभारले आहे.

व्यवस्थापनातील बाबी

  • गोठा व्यवस्थापनाला पहाटे चार वाजता सुरवात. दोन मजुरांसह घरातील अरुण व संदीप बंधू यांच्यावर व्यवस्थापन जबाबदारी. दूध हाॅटेलला पोच करण्यासह थेट विक्रीपर्यंत हे कामकाज.
  • पहाटे चार चे पाच वाजता दूध काढणीनंतर गोठ्याची साफसफाई. त्यानंतर प्रति गायी- म्हशीला १० किलो चारा. दुभत्या जनावरांसाठी दोन वेळा अडीच किलो तर भाकड, गाभण जनावरांसाठी एक किलो दोन वेळा भिजलेली सरकी पेंड, वालीस भुसा.
  • दररोज एकदा म्हशी-गाई धुतल्या जातात. दुपारी चार वाजता पुन्हा चारा व खुराक मिश्रण व त्यानंतर दूध काढणी.
  • वर्षातून चार वेळा लसीकरण.
  • वासरांना दररोज सकाळी सकाळी व संध्याकाळी प्रति दोन किलो चारा.
  • नख्यांची झीज होऊ नये म्हणून सुरवातीपासून रबरी मॅटचा वापर.
  • गोठ्यात गोचिड व अन्य त्रासदायक बाबी होऊ नयेत यासाठी पन्नास कोंबड्याचे अंतर्गत पालन.

शेणखताने उत्पादनात वाढ
दुध व्यवसायाने परिवाराला आर्थिक बळकटी दिलीच. पण वर्षभरात सुमारे ४०० ते पाचशे टन शेणखत उपलब्ध होते. स्वतःकडील ऊस, केळी, चारापिकांत त्याचा वापर होतो. वर्षभरातील सुमारे तीन लाखांपेक्षा अधिक रक्कमेच्या रासायनिक खतांवरील खर्चात त्यातून बचत होते. कुकाणे परिसर पाणी उपलब्धतेचा आहे. चार किलोमीटरवर साखर कारखाना असल्याने बहुतांश ऊसशेतीच आहे. फोलाने यांनी शेणखताच्या वापरातून जमिनीचा पोत सुधारला आहे. चाळीस वर्षांपासून ते ऊस घेतात. पूर्वी एकरी पन्नास ते ५५ टन मिळणारे उत्पादन आता ८० टनांपर्यत पोचले आहे. केळी उत्पादनातही एकरी १० टनाने वाढ झाली आहे. म्हशी धुतल्यानंतर तसेच गोठ्याची स्वच्छता केलेले पाणीही शेतीला देण्याची व्यवस्था केली आहे.
 
संपर्क- भाऊसाहेब फोलाने, ९४२०९४७०७१,
बाळासाहेब फोलाने, ९४२०९४७०८२


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
जातिवंत जनावरांसाठी दर्यापूरचा बाजारअमरावती जिल्ह्यात दर्यापूर येथील जनावरांचा बाजार...
‘त्रिवेणी नॅचरल गुळाला’ राज्यभर बाजारपेठपरभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील डॉ.मोहनराव देशमुख...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या...
बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळ...पुणे : अंदमान समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र...
कापसाचे दर काहीसे स्थिरावलेपुणे ः वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी बाजारात...
मुसळधार पावसाने दाणादाण पुणे ः राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने कोकण, पश्‍चिम...
फळपीक विमा योजनेवर बहिष्काराचा निर्णयअमरावती ः आंबिया बहर फळपीक विमा योजनेच्या...
द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्याने...नाशिक : प्रतिकूल परिस्थितीत प्रयोगशीलतेने...
देशांतर्गत बाजारात साखर विक्रीचे आव्हानकोल्हापूर : देशांतर्गत बाजारात साखरेचे दर कमी...
ऊस वाहतूकदरासाठी हवाई अंतराचा निकष लावापुणे ः दोन साखर कारखान्यांमध्ये स्पर्धा...
कोल्हापुरात ऊसतोडणी थांबलीकोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून...
जलसंधारणाचा ‘हायवे’ पॅटर्नलातूर ः मराठवाड्यात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन...
जलसंधारण, शाश्‍वत तंत्राद्वारे...मान्हेरे (ता. अकोले, जि. नगर) या गावासह...
कापूस उत्पादकांचा बळी नकोकापसाचे दर वाढल्यामुळे कापूस प्रक्रिया...
सोयाबीन, कापसावर संसदेत चर्चा व्हावीसोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचा...
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात...पुणे : राज्यात सुरू असलेला पाऊस कमी होण्याची...
रब्बी पिकांसह फळबागांना फटकापुणे ः राज्यात मागील तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण...
ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत गेल्या काही...
ऊस वाहतूक दरासाठी टप्पा पद्धतीला...पुणे ः उसाची तोडणी व वाहतूक दर ठरवताना आधीची...
आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची सरकारकडे...नवी दिल्ली : कृषी कायदे रद्द करण्यासाठी झालेल्या...