agriculture story in marathi, forward market for agriculture commodities | Agrowon

कापसाच्या किमतीत वाढीचा कल
डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 27 जुलै 2018

या सप्ताहात कापूस व हरभरा वगळता सर्वच पिकांत वाढ झाली. सर्वात अधिक वाढ हळदीत (३.२ टक्के) होती. सर्वात अधिक घट कापसात (१.६ टक्के) झाली. सर्व खरीप पिकांचे नजीकचे व्यवहार सध्या ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यांच्या डिलिव्हरीसाठी सुरू झाले आहेत. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन व कापसात घट होईल. इतरांचे भाव वाढतील.
 

या सप्ताहात कापूस व हरभरा वगळता सर्वच पिकांत वाढ झाली. सर्वात अधिक वाढ हळदीत (३.२ टक्के) होती. सर्वात अधिक घट कापसात (१.६ टक्के) झाली. सर्व खरीप पिकांचे नजीकचे व्यवहार सध्या ऑक्टोबर – नोव्हेंबर महिन्यांच्या डिलिव्हरीसाठी सुरू झाले आहेत. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन व कापसात घट होईल. इतरांचे भाव वाढतील.
 
या सप्ताहातसुद्धा माॅन्सूनने चांगली प्रगती केली आहे. १ जूनपासून २४ जुलैपर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा केवळ २ टक्क्यांनी कमी आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस आता उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान व रायलसीमा येथे झालेला आहे. इतरत्र तो सरासरी इतका किंवा अधिक झाला आहे. पुढील सप्ताहात राजस्थान, मध्य प्रदेश व उत्तराखंड येथे चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. या वर्षी एकूण पाऊस सरासरी गाठेल हा अंदाज बरोबर ठरेल असे दिसते. सर्व खरीप पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र व उत्पादन त्यामुळे वाढेल. पुढील वर्षी मागणीसुद्धा वाढेल असा अंदाज आहे. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे शासनाचे प्रमुख धोरण राहील. बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक राहावेत, यासाठी शासन प्रयत्नशील राहील. सोयाबीन पेंडच्या निर्यातीवरील सवलत वाढवलेली आहे. हळदीच्या चीन व बांगलादेशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल अशी अपेक्षा आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका
रबी मक्याच्या (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात घसरत होत्या (रु. १,२५४ ते रु. १,१८३). या सप्ताहात त्या २.१ टक्क्यांनी वाढून रु. १,२९० वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,२०५ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ मधील फ्यूचर्स किमती रु. १,३५४ वर आहेत. उत्पादन वाढलेले आहे; पण मागणीसुद्धा वाढती आहे. खरीप मका (सांगली) चा नोव्हेंबर २०१८ डिलिव्हरी भाव १,३३१ आहे. नवीन हमीभाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता).

साखर
साखरेच्या (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात वाढत होत्या (रु. २,८९३ ते रु. ३,११०). या सप्ताहात त्या ०.१ टक्क्यांनी घसरून रु. ३,२१७ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,२०० वर स्थिर आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. डिसेंबर (२०१८) च्या फ्यूचर्स किमती रु. ३,२१७ वर आल्या आहेत.

सोयाबीन
सोयाबीन फ्यूचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जून महिन्यात वाढत होत्या (रु. ३,३१७ ते रु. ३,४७१). नंतर त्या घसरू लागल्या. या सप्ताहात त्या ०.२ टक्क्यांनी वाढून रु. ३,३५२ पर्यंत आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,५३६ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८, डिसेंबर २०१८, जानेवारी २०१९ व फेब्रुवारी २०१९ च्या किमती अनुक्रमे रु. ३,३२८, रु. ३,३७८, रु. ३,४०५ व रु. ३,४२४ आहेत. जागतिक व भारताचे या वर्षीचे उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन हमीभाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). ऑक्टोबरनंतर सोयाबीन हमीभावापेक्षा अधिक राहण्याची अपेक्षा आहे.

हळद
हळदीच्या फ्यूचर्स (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात रु. ७,०९२ व रु. ७,५२८ दरम्यान चढउतार अनुभवत होत्या. या सप्ताहात त्या ३.२ टक्क्यांनी वाढून रु. ७,३७४ वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,४२० वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ च्या फ्यूचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.४ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,५२२). आता आवक कमी होऊ लागली आहे. स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. मात्र, पाउस चांगला होत असल्याने उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे.

गहू
गव्हाच्या (ऑगस्ट २०१८) किमती १३ जूननंतर वाढत होत्या (रु. १,७९१ ते रु. १,८४८). या सप्ताहात त्या २.९ टक्क्यांनी वाढून रु. १,९७२ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,९३७ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ मधील फ्यूचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा २.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,९८९). पुढील दिवसात वाढ अपेक्षित आहे.

गवार बी
गवार बीच्या फ्यूचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जून महिन्यात वाढत होत्या. (रु. ३,७३८ ते रु. ३,९९८). या महिन्यातसुद्धा तोच काल कायम आहे. गेल्या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी वाढून रु. ४,१८१ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.१ टक्क्यांनी वाढून रु. ४,१८६ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती ०.४ टक्क्यांनी वाढून रु. ४,१०२ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा नोव्हेंबर २०१८ मधील फ्यूचर्स किमती २.८ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,२१८).

हरभरा
हरभऱ्याच्या फ्यूचर्स (ऑगस्ट २०१८) किमती जून महिन्यात रु. ३,३५३ रु. ३,६३५ यादरम्यान होत्या. गेल्या सप्ताहात त्या ९.१ टक्क्यांनी वाढून रु. ४,२११ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या ०.९ टक्क्यांनी घसरून रु. ४,१७५ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,२३९ वर आल्या आहेत. ऑक्टोबर २०१८ मधील फ्यूचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ०.१ टक्क्यांनी अधिक आहेत. (रु. ४,२४३). आयातीवरील वाढत्या नियंत्रणामुळे व वाढत्या मागणीमुळे हरभऱ्यात वाढ अपेक्षित आहे.

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्यूचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती १२ जूननंतर घसरत आहेत (रु. २४,११० ते रु. २२,८००). गेल्या सप्ताहात मात्र त्या १.३ टक्क्यांनी वाढून रु. २३,७९० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.६ टक्क्यांनी घसरून २३,४०० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २३,०७७ वर आल्या आहेत. नोव्हेंबर व डिसेंबर २०१८ च्या फ्यूचर्स किमती अनुक्रमे रु. २३,०१० व रु. २२,९०० आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी अजूनतरी कापसाखाली लागवड कमी आहे. त्यामुळे किमतींत वाढीचा कल राहील. (सर्व किमती प्रतिक्विंटल; कापसाची किमत प्रति १४० किलोची गाठी).

arun.cqr@gmail.com

 

इतर अॅग्रोमनी
शेतमालाच्या किमतीत स्थिरतेचा कलचीनकडून शेतमालाची आयात अजून वाढलेली नाही....
कृषी अर्थव्यवस्थेसाठीही मार्गदर्शक...ज्यांचे मोठेपण त्यांच्या हयातीतच समाजाला प्रतीत...
देशात मक्याची ७५ लाख हेक्टरवर लागवड नवी दिल्ली ः मागील आठवड्यात दक्षिण आणि मध्य...
सोयाबीन, हळद, गव्हाच्या फ्युचर्स...सोयाबीन फ्युचर्स किमती या सप्ताहात ५ टक्क्यांनी...
देशात कापूस लागवड क्षेत्रात वाढमुंबई ः चांगल्या पाऊसमानामुळे देशातील कापूस...
घरात काटकसर, पीक उत्पादनामध्ये...सांगली जिल्ह्यातील खटाव (ता. पलूस) येथील तात्यासो...
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलहळदीच्या नोव्हेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती...
एचटी कापूस वाण परवानगीची बियाणे...नागपूर ः शेतकऱ्यांकडून अवैधरीत्या तणाला सहनशील (...
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
कागलचा शाहू कारखाना देशात सर्वोत्कृष्टनवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या...
पोल्ट्रीला धान्य पुरवठ्यासाठी...पुणे : विविध कारणांमुळे तोट्यात चाललेल्या लेअर...
स्फुरद, पालाशयुक्त खतांसाठी अनुदान दर...नवी दिल्ली : स्फुरद व पालाशयुक्त रासायनिक...
ऊस बियाणे विक्रीसह भाडे तत्त्वावरील...उसाच्या बियाणे प्लॉटच्या माध्यमातून एकरी तीस ते...
उत्तर प्रदेशात ५१४ कोटींचा ‘पेप्सिको’चा...नवी दिल्ली : अन्न आणि शीतपेय उत्पादनात मोठी...
मका, गहू, हरभऱ्याच्या किमतीचा वाढीचा कलपुढील महिन्यात रब्बी मका, गहू आणि हरभरा यांचे भाव...
ओढकामाच्या बैलांवर येतेय गदा ट्रॅक्टरच्या वाढत्या प्रमाणामुळे ओढकामाच्या...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
बांधावरचा शेवगा देतो भरघोस उत्पन्न पुणे जिल्ह्यातील केळवडे (ता. भोर) येथील...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
बाजारात हळदीचे दर दबावातसांगली ः देशात हळद उत्पादनाला पोषक वातावरण...