agriculture story in marathi, forward market for agriculture commodities | Agrowon

कापसाच्या फ्युचर्स किमतीत वाढीचा कल
डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

या सप्ताहात कापूस, सोयाबीन व हळदीच्या किमतींत घट झाली. इतरांचे भाव वाढले. सर्वात अधिक घट हळदीमध्ये (३.५ टक्के) होती. सर्वात अधिक वाढ हरभऱ्यात झाली (३.३. टक्के). सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, खरीप मका व कापूस वगळता इतरांचे भाव वाढतील.

या सप्ताहात कापूस, सोयाबीन व हळदीच्या किमतींत घट झाली. इतरांचे भाव वाढले. सर्वात अधिक घट हळदीमध्ये (३.५ टक्के) होती. सर्वात अधिक वाढ हरभऱ्यात झाली (३.३. टक्के). सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, खरीप मका व कापूस वगळता इतरांचे भाव वाढतील.

या सप्ताहात मान्सूनने चांगली प्रगती केली. त्यामुळे १ जूनपासून १५ ऑगस्टपर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा ९ टक्क्यांनी कमी आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस मुख्यत्वे आसाम, झारखंड, गुजराथ, सौराष्ट्र, मराठवाडा व रायलसीमा येथे झालेला आहे. पुढील सप्ताहात गुजराथ व सौराष्ट्र येथे चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. १० ऑगस्ट रोजी अमेरिकन शेती खात्याने पुढील वर्षासाठी (२०१८-१९) जागतिक उत्पादनाचे सुधारित अंदाज प्रसिद्ध केले. या अंदाजानुसार २०१७-१८ च्या तुलनेने २०१८-१९ मध्ये गहू व कापूस यांच्या जागतिक उत्पादनात घट संभवते; मका व तेलबिया (सोयाबीन सह) यांच्यात वाढ अपेक्षित आहे. भारतातही गहू, कापूस व मका यांच्या उत्पादनात घट तर तेलबियात वाढ होईल असा अंदाज केला गेला आहे. भारतातील सोयाबीनमधील वाढ २९.३ टक्क्याने होईल अशी अपेक्षा आहे. चांगल्या पावसामुळे पुढील वर्षी मागणीसुद्धा वाढेल असा अंदाज आहे. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे भारतातील शासनाचे प्रमुख धोरण राहील. बाजार भाव हमी भावापेक्षा अधिक राहावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील. सोयाबीन पेंडच्या निर्यातीवरील सवलत वाढवलेली आहे. हळदीच्या चीन व बांगलादेशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.

मका
रबी मक्याच्या (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या (रु. १,२०८ ते रु. १,३०३). या सप्ताहात त्या ०.८ टक्क्यांनी वाढून रु. १,३२१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,२५० वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,३६१ वर आहेत. मागणी वाढती आहे. खरीप मका (सांगली) चा नोव्हेंबर २०१८ डिलिवरी भाव १,३३१ आहे. नवीन हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). अजून या डिलिवरीसाठी फारसे व्यवहार होत नाहीत.

साखर
साखरेच्या (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या (रु. ३,३७५ ते रु. ३,१८४). या सप्ताहात त्या रु. ३,१६९ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१६५ वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. मार्च (२०१९) च्या फ्युचर्स किमती रु. ३,१६९ वर आल्या आहेत. साखरेतसुद्धा फारसे व्यवहार होत नाहीत.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जुलै महिन्यात १६ तारखेपर्यंत घसरत होत्या (रु. ३,५४३ ते रु. ३,३०७). नंतर त्या रु. ३,३३७ ते रु. ३,४२९ दरम्यान राहिल्या. या सप्ताहात त्या २.२ टक्क्यांनी घसरून रु. ३,३१७ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,४५३ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८, जानेवारी २०१९ व फेब्रुवारी २०१९ च्या किमती अनुक्रमे रु. ३,३६१, रु. ३,४०७ व रु. ३,४५३ आहेत. नवीन हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). ऑक्टोबरनंतर सोयाबीन हमी भावाच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (सप्टेंबर)घसा जुलै महिन्यातील किमती १२ तारखेपर्यंत घसरत होत्या (रु. ७,२५० ते रु. ६,९६६). नंतर त्या वाढून रु. ७,४०० पर्यंत गेल्या. या सप्ताहात त्या ३.५ टक्क्यांनी घसरून रु. ७,०३० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,१३१ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने २.१ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ७,२८२). आता आवक कमी होऊ लागली आहे. स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. मात्र, पाऊस चांगला होत असल्याने या वर्षी उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे.

गहू
गव्हाच्या (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या (रु. १,८६२ ते रु. १,९९८). या सप्ताहात त्या रु. १,९८८ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,९६२ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,०२२). पुढील दिवसात मर्यादित वाढ अपेक्षित आहे.

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या. (रु. ४,०५५ ते रु. ४,४५२). या सप्ताहात त्या २.४ टक्क्यांनी वाढून रु. ४,४६९ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती २.८ टक्क्यांनी वाढून रु. ४,३९८ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती २.५ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,५१०).

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात १२ तारखेपर्यंत वाढत होत्या (रु. ३,६२८ ते रु. ४,४०८). नंतर त्या रु. ४,०९२ रु. ४,२९२ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ३.३ टक्क्यांनी वाढून रु. ४,३३१ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,२८२ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा २.५ टक्क्यांनी अधिक आहेत. (रु. ४,३८८). आयातीवरील वाढत्या नियंत्रणामुळे व वाढत्या मागणीमुळे हरभऱ्यात वाढ अपेक्षित आहे.

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या. (रु. २२,८१० ते रु. २४,१२०). या सप्ताहात १ टक्क्यांनी घसरून त्या २३,७४० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २३,४२३ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. २३,१२० आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी अजूनतरी कापसाखाली लागवड कमी आहे. त्यामुळे किमतींत वाढीचा कल राहील. (सर्व किमती प्रती क्विंटल; कापसाची किंमत प्रती १४० किलोची गाठी).

arun.cqr@gmail.com

इतर अॅग्रोमनी
‘कॉन्टॅक्टलेस लेंडिंग’ पद्धतीची...नोव्हेंबर २०१६ मध्ये सरकारने ५०० आणि १०००...
चौदा गुंठ्यांतील वैविध्याने अर्थकारणाला...पाच एकर शेतीचे नियोजन करताना ऊस, आले, केळी अशा...
तीन वर्षांत हळदीच्या दरात दीड हजार...सांगली ः सांगली जिल्ह्यासह अन्य भागांत  ...
मका, हळद, गव्हाच्या किमतीमध्ये वाढरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात...कोल्हापूर  : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार...
अर्थशास्त्राला शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न...सन २०१९ चे अर्थशास्त्राचे नोबेल भारतीय वंशाचे...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
पावसामुळे कोल्हापुरात गुळाची आवक घटलीकोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून सुरू...
उत्तर प्रदेशात उसाला प्रतिक्विंटल ३०...नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातील साखर...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढीची शक्यतारब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
मध्य प्रदेश बाजारात कापसाला ५४०० रुपये...जळगाव  ः गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू...
औरंगाबाद, जालना, बीडमध्ये ज्वारी,...औरंगाबाद : यंदाच्या रब्बी हंगामासाठी...
रब्बी मका, गहू, हरभऱ्याच्या दरात वाढीची...सध्या बाजारपेठेत आवकेची कमतरता आणि अति पावसामुळे...
वाॅलमार्ट कोळंबी आयातीसाठी वापरणार...नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातून कोळंबीची अमेरिकेसह...
दसरा, दिवाळीत बेदाणा दर वधारण्याची...सांगली  ः गेल्यावर्षीपेक्षा बेदाण्याचे...
आंतरपिकाच्या योग्य नियोजनातून लबडे ...पेरूच्या प्रत्यक्ष उत्पादनाला वर्ष- दीड वर्ष...
सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र...मुंबई  ः सागरी मत्स्य उत्पादनात महाराष्ट्र...
सेंद्रिय शेतमालाचा आता ‘वनामती ब्रँड'नागपूर ः राज्यात सेंद्रिय शेतीचे दिशाहीन वारे...
मंदीतून सावरण्यासाठी उद्योग क्षेत्राला...पणजी : देशावर मंदीचे सावट असतानाच उद्योग जगताला...
हळद, गहू, हरभऱ्याच्या फ्युचर्स किमतींत...हळदीच्या डिसेंबर २०१९ च्या फ्युचर्स किमती...