agriculture story in marathi, forward market for agriculture commodities | Agrowon

सोयाबीन, कापसाच्या फ्युचर्स भावात घट
डॉ. अरुण कुलकर्णी
शुक्रवार, 31 ऑगस्ट 2018

या सप्ताहात चांगल्या पावसामुळे गहू वगळता सर्व शेतमालाच्या किमती उतरल्या. गव्हाच्या किमती स्थिर होत्या. सर्वात अधिक घसरण गवार बी (७.४ टक्के), सोयाबीन (४.३ टक्के) व हळद (३.२ टक्के) यांच्यात झाली. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, खरीप मका व कापूस वगळता इतरांचे भाव वाढतील.
 

या सप्ताहात चांगल्या पावसामुळे गहू वगळता सर्व शेतमालाच्या किमती उतरल्या. गव्हाच्या किमती स्थिर होत्या. सर्वात अधिक घसरण गवार बी (७.४ टक्के), सोयाबीन (४.३ टक्के) व हळद (३.२ टक्के) यांच्यात झाली. सध्याच्या स्पॉट किमतीच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत सोयाबीन, खरीप मका व कापूस वगळता इतरांचे भाव वाढतील.
 
या सप्ताहातसुद्धा माॅन्सूनने चांगली प्रगती केली. त्यामुळे १ जूनपासून २२ ऑगस्टपर्यंत झालेला पाऊस सरासरीपेक्षा ६ टक्क्यांनी कमी आहे. आत्तापर्यंत सरासरीपेक्षा कमी पाऊस मुख्यत्वे आसाम, सौराष्ट्र व रायलसीमा येथे झालेला आहे. सरासरीपेक्षा अधिक पाऊस केरळमध्ये झाला आहे. पुढील सप्ताहातसुद्धा पाऊस समाधानकारक असेल. चांगल्या पावसामुळे पुढील वर्षी मागणीसुद्धा वाढेल असा अंदाज आहे. आयात कमी करणे व निर्यातीला उत्तेजन देणे हे भारतातील शासनाचे प्रमुख धोरण राहील. बाजारभाव हमीभावापेक्षा अधिक राहावेत यासाठी शासन प्रयत्नशील राहील. सोयाबीन पेंडच्या निर्यातीवरील सवलत वाढवलेली आहे. हळदीच्या चीन व बांगलादेशमधील निर्यातीतसुद्धा वाढ होईल, अशी अपेक्षा आहे.
गेल्या सप्ताहातील एनसीडीईएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते.
मका
रब्बी मक्याच्या (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या (रु. १,२०८ ते रु. १,३०३). या सप्ताहात त्या १ टक्क्यांनी वाढून रु. १,३५१ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,२९८ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,४०१ वर आहेत. मागणी वाढती आहे. खरीप मका (सांगली) चा नोव्हेंबर २०१८ डिलिव्हरी भाव १,३३१ आहे. नवीन हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). अजून या डिलिव्हरीसाठी फारसे व्यवहार होत नाहीत.

साखर
साखरेच्या (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात घसरत होत्या (रु. ३,३७५ ते रु. ३,१८४). या सप्ताहात त्या ०.३ टक्क्यांनी घसरून रु. ३,१४६ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१३२ वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. मार्च (२०१९) च्या फ्युचर्स किमती रु. ३,१४६ वर आल्या आहेत. साखरेतसुद्धा फारसे व्यवहार होत नाहीत.

सोयाबीन
सोयाबीन फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जुलै महिन्यात १६ तारखेपर्यंत घसरत होत्या (रु. ३,५४३ ते रु. ३,३०७). नंतर त्या रु. ३,३३७ ते रु. ३,४२९ दरम्यान राहिल्या. या सप्ताहात त्या ४.३ टक्क्यांनी घसरून रु. ३,१८२ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,३०० वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८, जानेवारी २०१९ व फेब्रुवारी २०१९ च्या किमती अनुक्रमे रु. ३,२५३, रु. ३,३१३ व रु. ३,३७३ आहेत. नवीन हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). ऑक्टोबरनंतर सोयाबीन हमीभावाच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे.

हळद
हळदीच्या फ्युचर्स (सप्टेंबर) किमती जुलै महिन्यातील १२ तारखेपर्यंत घसरत होत्या (रु. ७,२५० ते रु. ६,९६६). नंतर त्या वाढून रु. ७,४०० पर्यंत गेल्या. या सप्ताहात त्या ३.२ टक्क्यांनी घसरून रु. ६,८०० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,०२६ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.९ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,८९०). आता आवक कमी होऊ लागली आहे. स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. मात्र पाउस चांगला होत असल्याने या वर्षी उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे.

गहू
गव्हाच्या (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या (रु. १,८६२ ते रु. १,९९८). या सप्ताहात त्या रु. १,९८९ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,९७८ वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा १.२ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. १,९९५). पुढील दिवसात मर्यादित वाढ अपेक्षित आहे.

गवार बी
गवार बीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या. (रु. ४,०५५ ते रु. ४,४५२). या सप्ताहात त्या ७.४ टक्क्यांनी घसरून रु. ४,१७६ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती ६.९ टक्क्यांनी घसरून रु. ४,१४८ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपुर) किमतींपेक्षा डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती २ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,२३३).

हरभरा
हरभऱ्याच्या फ्युचर्स (सप्टेंबर २०१८) किमती जुलै महिन्यात १२ तारखेपर्यंत वाढत होत्या (रु. ३,६२८ ते रु. ४,४०८). नंतर त्या रु. ४,०९२ रु. ४,२९२ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या ६.९ टक्क्यांनी घसरून रु. ३,९६७ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ४,००० वर आल्या आहेत. नोव्हेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा २.८ टक्क्यांनी अधिक आहेत. (रु. ४,१११). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतीत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे ही घट होत आहे. कडधान्याचे उत्पादनसुद्धा वाढण्याची अपेक्षा आहे.

कापूस
एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती जुलै महिन्यात वाढत होत्या. (रु. २२,८१० ते रु. २४,१२०). या सप्ताहात १.२ टक्क्यांनी घसरून त्या २३,१९० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २३,१९७ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. २२,७७० आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. पण पाऊस समाधानकारक होत असल्याने ही घट होत आहे. (सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति १४० किलोची गाठी).
 
arun.cqr@gmail.com
 

इतर अॅग्रोमनी
कडधान्यातील स्वयंपूर्णता यंदा ठरणार...नवी दिल्ली ः देशात यंदा मॉन्सूनच्या उशिरा...
देशात रब्बी मूग पेरणीत २९ टक्के घटनवी दिल्ली: देशात रब्बी हंगामाच्या पेरणीला...
सोयाबीनशिवाय सर्व पिकांच्या वायदा...या सप्ताहात गहू व गवार बी वगळता इतर सर्व...
राज्यात कापूस दर हमीभावापेक्षा कमीचजळगाव  ः राज्यात कापसाचे दर हमीभावापेक्षा...
‘कॉन्टॅक्टलेस लेंडिंग’ पद्धतीची...नोव्हेंबर २०१६ मध्ये सरकारने ५०० आणि १०००...
चौदा गुंठ्यांतील वैविध्याने अर्थकारणाला...पाच एकर शेतीचे नियोजन करताना ऊस, आले, केळी अशा...
तीन वर्षांत हळदीच्या दरात दीड हजार...सांगली ः सांगली जिल्ह्यासह अन्य भागांत  ...
मका, हळद, गव्हाच्या किमतीमध्ये वाढरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
पाडव्याच्या मुहूर्तावर कोल्हापुरात...कोल्हापूर  : कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार...
अर्थशास्त्राला शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न...सन २०१९ चे अर्थशास्त्राचे नोबेल भारतीय वंशाचे...
मका, हळद, हरभऱ्याच्या किमतीत वाढीचा कलरब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्याच्या...
पावसामुळे कोल्हापुरात गुळाची आवक घटलीकोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून सुरू...
उत्तर प्रदेशात उसाला प्रतिक्विंटल ३०...नवी दिल्लीः उत्तर प्रदेशातील साखर...
मका, हळद, गव्हाच्या किमतीत वाढीची शक्यतारब्बी मक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या...
मध्य प्रदेश बाजारात कापसाला ५४०० रुपये...जळगाव  ः गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू...
औरंगाबाद, जालना, बीडमध्ये ज्वारी,...औरंगाबाद : यंदाच्या रब्बी हंगामासाठी...
रब्बी मका, गहू, हरभऱ्याच्या दरात वाढीची...सध्या बाजारपेठेत आवकेची कमतरता आणि अति पावसामुळे...
वाॅलमार्ट कोळंबी आयातीसाठी वापरणार...नवी दिल्ली: आंध्र प्रदेशातून कोळंबीची अमेरिकेसह...
दसरा, दिवाळीत बेदाणा दर वधारण्याची...सांगली  ः गेल्यावर्षीपेक्षा बेदाण्याचे...
आंतरपिकाच्या योग्य नियोजनातून लबडे ...पेरूच्या प्रत्यक्ष उत्पादनाला वर्ष- दीड वर्ष...