गव्हाच्या फ्युचर्स भावात मर्यादित वाढ

शेतमालाचा वायदेबाजार
शेतमालाचा वायदेबाजार

या सप्ताहात कापूस व हरभरा यांचे भाव घसरले. सोयाबीन, गहू व गवार बी यांचे भाव चढले. सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने पुढील काही महिन्यांत गहू, हरभरा व गवार बी यांचे भाव वाढतील. चांगल्या पावसामुळे ऑगस्ट महिन्यात कापूस, साखर, सोयाबीन, हळद व हरभरा पिकाच्या किमतींमध्ये घसरता कल दिसून आला. मक्याच्या किमती वाढत होत्या. १ सप्टेंबरपासून जानेवारी २०१९ डिलिवरीसाठी खरीप मका व गहू, फेब्रुवारी २०१९ डिलिवरीसाठी कापूस आणि एप्रिल २०१९ डिलिवरीसाठी हळद यांचे व्यवहार सुरू झाले. गेल्या सप्ताहातील एनसीडीइएक्स व एमसीएक्समधील किमतीतील चढउतार खालीलप्रमाणे होते. मका रब्बी मक्याच्या (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यातसुद्धा वाढत होत्या (रु. १,३३० ते रु. १,३९३). या सप्ताहात त्या रु. १,३८५ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (गुलाब बाग) रु. १,३२५ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती रु. १,४३५ वर आहेत. मागणी वाढती आहे. खरीप मका (सांगली) चा नोव्हेंबर २०१८ डिलिवरी भाव १,३३१ आहे. नवीन हमी भाव रु. १,७०० आहे. (गेल्या वर्षी तो रु. १,४२५ होता). अजून या डिलिवरीसाठी फारसे व्यवहार होत नाहीत. साखर साखरेच्या (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यातसुद्धा घसरत होत्या (रु. ३,२२१ ते रु. ३,१३३). या सप्ताहात त्या रु. ३,१३४ वर आल्या आहेत. स्पॉट (कोल्हापूर) किमती रु. ३,१२४ वर आल्या आहेत. भारतातील उत्पादन या वर्षी व पुढील वर्षीसुद्धा वाढण्याचा अंदाज आहे. मे (२०१९) च्या फ्युचर्स किमती रु. ३,१३४ वर आल्या आहेत. साखरेतसुद्धा फारसे व्यवहार होत नाहीत. सोयाबीन सोयाबीन फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या (रु. ३,४२९ ते रु. ३,१८४). या सप्ताहात त्या वाढून रु. ३,३१२ वर आल्या आहेत. स्पॉट (इंदूर) किमती रु. ३,४५१ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८, जानेवारी २०१९ व फेब्रुवारी २०१९ च्या किमती अनुक्रमे रु. ३,३५७, रु. ३,४०१ व रु. ३,४४५ आहेत. नवीन हमी भाव रु. ३,३९९ आहे. (गेल्या वर्षी तो रु. ३,०५० होता). सोयाबीनमधील वाढ सोयापेंड निर्यातीत वाढ होण्याच्या अपेक्षेने होत आहे. ऑक्टोबरनंतर सोयाबीन हमी भावाच्या आसपास किंवा अधिक राहण्याची अपेक्षा आहे. हळद हळदीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर)च्या किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या (रु. ७,४४४ ते रु. ६,८३६). या सप्ताहात त्या रु. ६,८१० वर आल्या आहेत. स्पॉट (निझामाबाद) किमती रु. ७,००० वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींच्या तुलनेने १.१ टक्क्यांनी कमी आहेत (रु. ६,९२२). स्थानिक व निर्यात मागणी वाढू लागली आहे. मात्र, पाऊस चांगला होत असल्याने या वर्षी उत्पादन वाढण्याची अपेक्षा आहे. गहू गव्हाच्या (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यात रु. १९९० ते २०११ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. २,०२८ वर आल्या आहेत. स्पॉट किमती (कोटा) रु. १,९७४ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतींपेक्षा ३.९ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. २,०२२). पुढील काही दिवस मर्यादित वाढ अपेक्षित आहे. गवार बी गवार बीच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यात रु. ४,१५० ते रु. ४,६२४ या दरम्यान होत्या. या सप्ताहात त्या रु. ४,३४५ वर आल्या आहेत. स्पॉट (जोधपूर) किमती ४.८ टक्क्यांनी वाढून रु. ४,३४५ वर आल्या आहेत. सध्याच्या स्पॉट (जोधपूर) किमतींपेक्षा डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती १.७ टक्क्यांनी अधिक आहेत (रु. ४,४२१). हरभरा हरभ-याच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यात १६ तारखेपासून घसरत होत्या (रु. ४,४५२ ते रु. ३,९६९). या सप्ताहात त्या रु. ४,०१४ वर आल्या आहेत. स्पॉट (बिकानेर) किमती रु. ३,९१० वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ मधील फ्युचर्स किमती सध्याच्या स्पॉट किमतीपेक्षा ४.७ टक्क्यांनी अधिक आहेत. (रु. ४,०९२). शासनाने आता गेल्या हंगामातील खरेदी केलेली कडधान्ये बाजारात कमी किमतींत विक्री करण्याचा निर्णय केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे ही घट होत आहे. कडधान्याचे उत्पादनसुद्धा वाढण्याची अपेक्षा आहे. कापूस एमसीएक्समधील कापसाच्या फ्युचर्स (ऑक्टोबर २०१८) किमती ऑगस्ट महिन्यात घसरत होत्या. (रु. २४,१८० ते रु. २२,८६०). या सप्ताहात त्या पुन्हा घसरून रु. २२,७०० वर आल्या आहेत. स्पॉट (राजकोट) किमती रु. २३,११८ वर आल्या आहेत. डिसेंबर २०१८ च्या फ्युचर्स किमती रु. २२,४९० वर आल्या आहेत. गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी कापसाखाली लागवड कमी आहे. पण, पाऊस समाधानकारक होत असल्याने ही घट होत आहे.   arun.cqr@gmail.com  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com